MHT CET 2020-अतिरिक्त परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी

MHT CET Exam : 

MHT CET Exam : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT-CET 2020 परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली होती, त्यांच्यासाठी जी अतिरिक्त परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, त्या परीक्षेसाठी हे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत.

ज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते सीईटीचे अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in येथे जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करून घेऊ शकतात.

MHT CET 2020 परीक्षेचे PCB आणि PCM ग्रुपचे अतिरिक्त सत्र ७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी केली आहे त्यांनी https://mhtcet2020.mahaonline.gov.in या सीईटीच्या पोर्टलवर लॉगइन करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

ज्यांना हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक हवी आहे, त्यांच्यासाठी या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि हॉल तिकिट नंबर देऊन लॉग इन करायचे आहे.

परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, रिपोर्टिंग टाइम, परीक्षेची तारीख, वेळ अॅडमिट कार्डवर नोंदवण्यात आली आहे. याविषयी परीक्षाविषयक अन्य माहितीसाठी तसेच सर्व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी mahacet.org या सीईटीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहावी.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/35Xlgyp


Mh CET Law Admit Card 2020

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने लॉ सीईटीचे हॉलतिकीट जारी केले आहे…

MH CET: लॉ सीईटीचे हॉलतिकीट जारी
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे MH CET 2020 चे प्रवेश पत्र म्हणजेच हॉलतिकीट शनिवारी जारी केले. ज्या उमेदवारांनी पाच वर्षे मुदतीच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी अर्ज केला आहे, त्यांनी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाऊनलोड करायचे आहे. हे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख नोंदवायची ाहे.
एमएच सीईटी लॉ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. MH CET प्रवेश पत्रावर उमेदवाराचे नाव, रजिस्ट्रेशन क्रमांक, परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आदी माहिती नमूद करण्यात आली आहे.

MH CET 2020 Admit Card कसे डाऊनलोड कराल?
– सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
– MH CET रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख आदी माहिती भरा.
– आता MH CET 2020 लॉ अॅडमिक कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करा.

विद्यार्थ्यांनी हॉलतिकिटावरची माहिती नीट काळजीपूर्वक वाचावी, असे यापूर्वी सीईटी सेलने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर आरोग्यविषयक चोख व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेली वेळ पाळावी, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.सीईटी सेलने अद्याप तीन वर्षे कालावधीचे लॉ अॅडमिट कार्ड जारी केलेले नाहीत.

MH CET 2020 हॉलतिकीट डाऊनलोड करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


MHT CET 2020 Hall Tickets Download

MHT-CET Exam Admit Card : MHT-CET 2020 परीक्षेचे PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. कसे डाऊनलोड करायचे ते जाणून घ्या….

MHT-CET Exam Admit Card : MHT-CET Admit Card 2020: महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.

हे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

यापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील अॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.

MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल?

  • – mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • – MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
  • – अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
  • – आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.
  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे याची विस्तृत प्रोसेस सीईटी कक्षाने दिली आहे.

एकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Download Admit Card

Notification


MHT CET 2019 Hall Tickets : State Common Entrance Test Cell,Maharashtra, Mumbai has released hall tickets for MHT CET 2019 examinations. Interested applicants who applied for the examinations can now download their examinations hall tickets by using following link. Applicants can download their examinations hall tickets by login to the account. Enter login ID & password require to get the hall ticket download link. Also need to enter the text from image shown. Use following official website link to get the MHT CET 2019 Hall tickets download link : –

For admission to engineering, pharmacy, agriculture courses of first admission entrance test will be conduct in 2nd May to 13th May. Hall tickets for these examinations are now available here to download. Applicants who applied for the examinations can now download their examinations hall tickets by using following link. To download the examinations hall tickets applicants need to get login first

MHT CET 2019 Hall Tickets

download MHT CET 2019 Hall Tickets here


DTE MHTCET 2018 Hall tickets Download

MHT CET 2018 Hall Ticket Download : For Admission to B.E/B.Tech & B.Phar./ Phar. D. & B.Sc. various courses for academic year 2018-19. For admission to these courses MHT-CET 2018 is going to conduct on Thursday 10th May 2018 at various center of Maharashtra state. For this examinations issue of admit card are available Here. Candidates can use following official link to get their require admit card using following link. State Common Entrance Test Cell, Maharashtra State,Mumbai MHT-CET 2018 are available to download using link given below by login to the account.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!