इंजिनीअरिंग, कृषी सीईटीसाठी विक्रमी नोंदणी – विद्यार्थ्यांची संख्या साडेसात लाखांहून अधिक – MHT-CET 2025 नोंदणीस सुरुवात
MHT-CET 2025 Registration Process
इंजिनीअरिंग, कृषी सीईटीसाठी विक्रमी नोंदणी – विद्यार्थ्यांची संख्या साडेसात लाखांहून अधिक
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी आणि बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटी प्रवेश परीक्षेसाठी यंदा विक्रमी ७,६४,३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मोठी चुरस राहणार आहे. सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. यंदा सीईटी सेलने या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी डिसेंबरमध्येच नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी ३० डिसेंबरला नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत २८ फेब्रुवारीला संपली.
- यंदा एमएचटी-सीईटीसाठी राज्यभरातून ८ लाख ९४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे शुल्क भरून नोंदणी अंतिम केली आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वाधिक नोंदणी आहे. त्यामुळे यंदा या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे.
- गेल्यावर्षी सात लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याची संख्या ३८,५९५ने वाढली आहे. यातील गेल्यावर्षी प्रत्यक्षात ६ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी परीक्षा दिली होती.
- कधी होणार परीक्षा ? – एमएचटी-सीईटी परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यानुसार पीसीबी ग्रुपची एमएचटी-सीईटी परीक्षा ९ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे, तर पीसीएम ग्रुपची एमएचटी-सीईटी परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान होणार आहे, असे सीईटी सेलने जाहीर केले आहे.
- सर्वाधिक अर्ज पीसीएमचे – यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक असे ४ लाख ६३ हजार अर्ज फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचा ग्रुप असलेल्या सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी भरले आहेत, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजी या विषयांच्या ग्रुपची सीईटी देण्यासाठी तीन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
‘सीईटीअटल’ उपक्रमामध्ये एक लाखाहून अधिक नोंदणी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दीड महिन्यांत एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच, या उपक्रमांतर्गत ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
- ‘अटल’ उपक्रमाअंतर्गत मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येतो. या सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर त्या विषयातील शैक्षणिक संधी आणि प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण कमी कमी होण्याबरोबरच शैक्षणिक आयुष्यात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. ‘अटल’ उपक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयांचा सहभाग असून कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या विद्याशाखांचा समावेश आहे. या उपक्रमाची विविध माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येत आहे.
- दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक – ‘अटल’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शहरी भागाबरोबरच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा सराव यामुळे करणे शक्य होणार आहे. तसेच, परीक्षांचे वेळापत्रक, माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
Online Registration Process of MHT-CET 2022 is started now. State Common Entrance Examination Board has started registration of MHT-CET 2022 for CET exam schedules for admission to various vocational courses have been announced. The registration started at Today . The Online registration Process is 19th March 2022. Complete details are given below
Registration for MHT-CET 2022 is Started
MHT-CET 2025- MHT-CET च्या नोंदणीस सुरुवात
MHT-CET २०२१- MHT-CET च्या नोंदणीस सुरुवात- करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीच्या परीक्षेबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणीही थांबवली होती. मात्र आता ही नोंदणी सुरू झाली आहे…
एमएचटी सीईटीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच एलएलबी, बीए, बीएड या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात होईल,नोंदणीसाठी कक्षाच्या www.mahacet.org या वेबसाइटवर लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.