MHT CET 2021: जातपडताळणीची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

CET Engineering Degree Admission

The government has approved extending the deadline for submission of original certificates of caste verification required for the centralized admission process for the academic year 2021-22 under the Department of Technical Education in the CET examination room till the last date of admission in the second round of the centralized process. As per the demand of engineering students and parents and as per the suggestion of Tourism Minister Aditya Thackeray, the deadline for admission to engineering degree is being extended, tweeted Higher and Technical Education Minister Uday Samant.

CET परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्‍यक असलेली जातपडताळणी बाबतची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास केंद्रीभूत प्रक्रियेच्या द्वितीय फेरी प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

इंजिनिअरिंग विद्यार्थी आणि पालक यांच्या मागणीनुसार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार इंजिनिअरिंग पदवी प्रवेशासाठी मुदत वाढवण्यात येत आहे, असे ट्विट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.


 

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

MHT CET Merit List 2021

The quality list for the first round of CET through the Maharashtra Common Entrance Test Cell will be announced on Wednesday, November 24, 2021. Students can register their objections or complaints regarding this list from 25th to 27th November. This quality list will be published on the official website of CET Cell. Once the list is released, students can download it from cetcell.mahacet.org.

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (Maharashtra Common Entrance Test Cell)सीईटीची पहिल्या फेरीतील प्रवेशांची गुणवत्ता यादी  बुधवार २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी या यादीबाबतच्या त्यांच्या हरकती वा तक्रारी २५ ते २७ नोव्हेंबर पर्यंत नोंदवू शकतात. ही गुणवत्ता यादी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. ही यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थी ती cetcell.mahacet.org या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.

दरम्यान, इंजिनीअरिंगच्या काही अभ्यासक्रमांना मागणी वाढली आहे. डेटा सायन्स आणि आर्टिफशिअल इंटेलिजन्ससारख्या शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणीत १५ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी ९६,३३७ अर्ज आले होते. अंतिम गुणवत्ता यादी आणि प्रवर्गनिहाय प्रोव्हिजनल अलॉटमेंट २८ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी केली जाईल.

यंदा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी एकूण नोंदणी १.१ लाख रुपये इतकी झाली आहे. दुसरीकडे, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा मागील वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. पहिल्या फेरीची MHT CET Merit List 2021 कशी डाऊनलोड करायची ते स्टेप बाय स्टेप पद्धतीने पुढीलप्रमाणे समजवण्यात आले आहे.

MHT CET Merit List 2021 कशी करायची गुणवत्ता यादी डाऊनलोड?

 • – महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वर जा.
 • – आता होमपेजवरील ‘Undergraduate Courses’सेक्शनमध्ये जा आणि ‘B.Tech/B.E’ पर्याय निवडा.
 • – आता एक नवी विंडो उघडेल. तेथे ‘MHT CET Provisional Merit List 2021’(हा पर्याय निवडा. हा पर्याय लवकरच अॅक्टिवेट होईल)
 • – गुणवत्ता यादी पाहा आणि डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

नवे कोर्स कोणते?
काही महाविद्यालये नवनवीन अभ्यासक्रम सुरू करत आहेत. यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आदींचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी.


MHT CET Result 2021 For Technical Education

Maharashtra State Common Entrance Test (MHT CET) results have been announced for Engineering Admission. Candidates sitting for MHT CET 2021 for Engg. admission can check their result through the below given link or visiting the official website www.cetcell.mahacet.org. Candidates can view the results by following the steps given in the news or from the link given below the news.

MHT CET Result 2021: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. MHT CET ला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन किंवा बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवरुन उमेदवारांना निकाल पाहता येणार आहे.


MHT CET २०२१ (PCM) टेक्निकल एज्युकेशनचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
MHT CET २०२१ (PCB) टेक्निकल एज्युकेशनचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा


The results of the Engineering CET will be announced this evening. The results will be announced after 7 pm today. The next admission schedule will be announced after the results are announced. The results can be viewed at https://cetcell.mahacet.org/

इंजिनिअरिंग सीईटीचा निकाल आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. आज संध्याकाळी सातनंतर हा निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. https://cetcell.mahacet.org/ या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

MHT CET परीक्षेचा (एमएचटी सीईटी) निकाल आज जाहीर होणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या दोन गटांसाठी एमएचटी सीईटी 2021 आणि जीवशास्त्र (PCB) — 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली होती. तसेच अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी पुनर्परीक्षा घेण्यात आली होती.

असा पाहा निकाल- How to Check MHT CET Exam Results 2021

 • MHT CET च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
 • cetcell.mahacet.org ही त्या वेबसाईटची लिंक आहे.
 • त्यावर रिझल्ट सेक्शनमध्ये जाऊन MHT CET result वर क्लिक करा.
 • त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि जन्मतारिख टाकून निकाल पाहा.

निकाल  बघण्यासाठी येथे क्लीक करा 


State General Entrance Examination Cell, Maharashtra (State Common Entrance Test Cell) has announced the result date of MHT-CET 2021. The results of the MHT Shared Entrance Examination will be announced on or before October 28, 2021. Candidates can view the official instructions on the official website of the State Common Entrance Test Cell at cetcell.mahacet.org.

राज्य सामान्य प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्रने (स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल) MHT- CET 2021 च्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. MHT सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल 28 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाणार आहे. उमेदवार स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलच्या cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत सूचना पाहू शकतात. सर्व सत्र परीक्षांच्या ‘आन्सर की’ 11 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केल्या जातील. अधिकृत वेळापत्रकानुसार उमेदवार 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2021 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळाद्वारे ‘अन्सर की’संबंधी आपले आक्षेप नोंदवू शकतात

MHT CET 2021 ची पुन्हा परीक्षा 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेच्या तारखा जाहीर करताना उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले आहे.

“आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला! यावेळी जाहीर करण्यात आले की पूरग्रस्त विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा 9 आणि 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल,” असे सामंत यांनी ट्विट केले आहे. तथापि, सेलने 28 ऑक्टोबर रोजी फेरपरीक्षेचा निकाल आणि 11 ऑक्टोबरला ‘अन्सर की’ कळवण्याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट केलेले नाही. राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्रच्या अधिकृत साइटद्वारे उमेदवार अधिक संबंधित तपशील तपासू शकतात.


Results of Maharashtra Common Entrance Examination, MBA / MMS and MHT-CET are expected to be announced around 20th October 2021. The entrance test was conducted offline from 16 to 18 September 2021. Candidates who have appeared for this exam can visit the official website of the Common Entrance Examination Cell at cetcell.mahacet.org to see the latest updates and more information about the results.

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा, MBA/ MMS आणि MHT-CET परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ च्या आसपास जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ही प्रवेश परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते ज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन ताजे अपडेट्स आणि निकालाची अधिक माहिती पाहू शकतात.

दरम्यान, हे ध्यानात घ्यावे की इंटरनेटवर ‘admitcardbuilder’ नावाची अनधिकृत लिंक फिरत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने महाराष्ट्र सीईटी निकाल 2021 बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सीईटी स्कोअरकार्डमध्ये नाव, परीक्षा, परीक्षेची तारीख, पर्सेंटाइल स्कोअर, राज्यस्तरीय रँक असे तपशील असतील. गेल्या वर्षी, एकूण १,१०,६३१ उमेदवारांनी एमएएच एमबीए/एमएमएस परीक्षेला हजेरी लावली होती, तर यावर्षी ही संख्या वाढून दीड लाख झाली आहे. महाराष्ट्र सीईटी निकाल २०२१ चे काही आवश्यक तपशील तुमच्या संदर्भासाठी पुढे शेअर केले आहेत.

महाराष्ट्र सीईटी निकाल 2021: महत्वाची अपडेट्स

 • – यापूर्वी निकाल २८ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर होणार होता. मात्र, कोविड १९ महामारी आणि प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला.
 • जर उमेदवाराने ठरवलेले पात्रता निकष पूर्ण केले नाहीत, तर ऑनलाइन परीक्षेचा निकाल काहीही असो, अर्जदाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
 • गैरप्रकारात सहभागी असलेल्या कोणत्याही उमेदवाराच्या उमेदवारीला अपात्र ठरवण्याचा अधिकार राज्य सीईटी सेलकडे राखीव आहे आणि अशा उमेदवारांचा निकाल रद्दबातल केला जाऊ शकतो.
 • ऑनलाइन परीक्षांमध्ये अनेक वेळा उपस्थित राहिल्याने उमेदवारी रद्द होईल.
 • प्रत्येक सत्राचे परीक्षेचे निकाल तीन विषयांपैकी प्रत्येकासाठी स्वतंत्रपणे कच्चे गुण आणि टक्केवारी गुणांच्या स्वरूपात तयार केले जातील.
 • तीन विभागांचे गुण एकत्र केले जातील आणि त्यांना सीईटी स्कोअर म्हटले जाईल, जे नंतर निकालासाठी वापरले जातील.

MAH Ll.B.3 Years CET 2020 Result Declared

MHT CET Exam Result : MAH Ll.B. 3 Years CET 2020 Result Declared by Maharashtra CET Cell – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या निकालात चार विद्यार्थ्यांना सर्वाधिक ११८ गुण मिळाले आहेत. गुणवत्ता यादीतील पहिल्या दहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तब्बल नऊ मुलींनी बाजी मारली आहे. यंदा करोनामुळे तीन विधी अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा लांबणीवर गेली होती. २ आणि ३ नोव्हेंबर या कालावधीत ती आयोजित करण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ५५ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ४३ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल सीईटी सेलने बुधवारी जाहीर केला.

या परीक्षेत मुग्धा पटवर्धन या विद्यार्थिनीने १५०पैकी ११८ गुण मिळत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर दुसरा क्रमांक युक्ती अरोरा हिने मिळवला असून, तिलाही ११८ गुण मिळाले आहेत. मुलांमध्ये प्रथम आलेल्या अनिरुद्ध सिद्धये यालाही ११८ गुण असून, गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक आला आहे. तर वृंदा भोला या विद्यार्थिनीसही ११८ गुण मिळाले असून. ती गुणवत्ता यादीत चौथ्या क्रमांकावर आली आहे.

MHT CET Results 2020

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. या निकालात पीसीबी गटात १९, तर पीसीएम गटात २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे ८५पर्यंत पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पीसीएम गटात २६ हजार ५०२, तर पीसीबी गटात ३२ हजार ७९६ विद्यार्थी इतकी आहे.

या निकालात यंदा गुणवतांची संख्या जास्त आहे. मागील वर्षी १०० पर्सेंटाइल असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन्ही गटांमध्ये अवघी दोन इतकी होती. तर ९९ पर्सेंटाइल असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन्ही गटांत मिळून सुमारे ९०० इतकी होती. ही यंदा पीसीएम गटात १,७८५; तर पीसीबी गटात २,१८२ इतकी आहे. यामुळे यंदा इंजिनीअरिंगमध्ये चांगल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी चुरस पाहवयास मिळणार आहे. तर औषधनिर्माणशास्त्र कॉलेजांतही प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहवयास मिळणार आहे. यंदा तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी पीसीएम, तर दोन लाख ११ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली आहे.

गुणनिहाय विद्यार्थीसंख्या

पर्सेंटाइल –पीसीएम –पीसीबी

१०० — २२ — १९

९९ — १७८५ — २१८२

९८ — १७७६ –२१९७

९७ — १८३१ — २१४९

९६ — १७११ — २१२८

९५ — १७५२ — २१६०

MHT सीईटी निकाल २०२०


MHT CET Exam : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झाल्या. त्यापैकी १० सीईटींचे निकाल सीईटी सेलने जाहीर केले आहेत. मराठा आरक्षण वगळून प्रवेश प्रक्रिया घेण्याचे सरकारने ठरवल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी सीईटींचे निकाल जाहीर केले जात आहेत.

सामाईक परीक्षा कक्षाच्या वतीने करोनाची तीव्रता कमी झाल्यावर आणि अनलॉक झाल्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात आल्या होत्या. उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या आठ परीक्षांपैकी सहा परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. तर तंत्र शिक्षणाच्या अखत्यारित असलेल्या पाच सीईटींपैकी चार सीईटींचे निकाल सेलच्या वतीने जाहीर करत संकेतस्थळावर रात्री उशिरापर्यंत अपडेट होत होते. या निकालानंतर प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. प्रवेशासाठी डिसेंबरमधील १५ दिवस घेतले जाणार आहेत. त्यानंतर शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे.

निकाल जाहीर झालेल्या परीक्षा — निकाल जाहीर झालेले एकूण विद्यार्थी

 • एमसीए २८ ऑक्टोबर — १,१०,६३१
 • एम.आर्च २७ ऑक्टोबर — ९६७
 • बीएचएमसीटी १० ऑक्टोबर — १,१०८
 • एमएचएमसीटी २७ ऑक्टोबर — २३
 • विधी ५ वर्षे ११ ऑक्टोबर — १६,३४९
 • बीएस्सी/बीए बीएड १८ ऑक्टोबर — १,२१२
 • बीएड एमएड २७ ऑक्टोबर — ९८३
 • एमपीएड २९ ऑक्टोबर — १,५८१
 • बीपीएड ४ नोव्हेंबर — ५,८११
 • एमएड ५ नोव्हेंबर — २,१५७
 • निकाल जाहीर झालेले एकूण विद्यार्थी — १,४०,९२२

सीईटी 28 नोव्हेंबरला निकाल : तांत्रिक चुकांचे २३ गुण विद्यार्थ्यांना मिळणार

राज्य सामाईक परीक्षा सेलच्या माध्यमातून घेण्यात आलेली एमएचटी सीईटीत (MHT CET) उत्तरांच्या पर्यायामध्ये दिलेल्या तांत्रिक चुकांचे २३ गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. मात्र, हे गुण ज्या विद्यार्थ्यांनी ज्या शिष्टमध्ये परीक्षा दिली आहे आणि त्या शिष्टमध्ये उत्तर देताना दिलेल्या पयार्यात तांत्रिक चूक झाली आहे अशा विद्यार्थ्यांनाच मिळणार आहेत. यासंदर्भात सीईटी सेलने हरकती आणि त्यावर घेतेलल्या निर्णयाचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सीईटीचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरच्यापहिल्या आठवड्यात राज्यभरात सीईटी परीक्षा सुमारे २०० केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा पीसीबी गटासाठी १६ शिप्ट आणि पीसीएम गटासाठी १४ अशी ३२ शिप्टमध्ये घेण्यात आली. राज्यभरातून ५ लाख ४२ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ८३ हजार ७३६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली.


MHT CET Answer Key 2020

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT CET 2020 परीक्षेची उत्तरतालिका जारी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, ते सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट mhtcet2020.mahaonline.gov.in वरून आन्सर की डाऊनलोड करू शकतात.

MHT CET आन्सर कीमध्ये परीक्षेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यात आली आहेत. आन्सर की व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी रिस्पॉन्स शीट देखील जारी केली आहे.

राज्य सीईटी कक्षाने MHT CET प्रोव्हिजनल आन्सर की वर काही हरकत असेल तर ती नोंदवण्यासाठी देखील मुदत दिली आहे. उमेदवार १२ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकतात. आन्सर की वर हरकत नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक हरकतीसाठी एक हजार रुपये याप्रमाणे शुल्क भरावे लागेल. यानंतर अंतिम उत्तर तालिका २८ नोव्हेंबर रोजी जारी केली जाईल.

MHT CET 2020 Answer Key अशी करा डाऊनलोड

– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in वर जा.
– यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा.
– आता MHT CET आन्सर की च्या लिंक वर क्लिक करा.
– आता सर्व माहिती सबमीट करून आन्सर की डाऊनलोड करा.

MHT CET Answer Key वर हरकत कशी नोंदवायची?.. जाणून घ्या…

– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in वर जा.
– आता आपल्या पासवर्ड आणि आयडीच्या मदतीने लॉग इन करा.
– यानंतर प्रोसीट बटण क्लिक करा.
– यानंतर ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करा.
– आता सर्व माहिती भरून सबमीट करा.

निकाल कधी?

सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एमएचटी सीईटीचा निकाल (MHT-CET Result) २८ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी सुमारे ४.३५ लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.


MHT-CET 2020 परीक्षेची प्रोव्हिजनल उत्तरतालिका मंगळवारी जाहीर होणार आहे…

MHT CET Answer Key 2020: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत MHT-CET 2020 परीक्षेची उत्तरतालिका १० नोव्हेंबर २०२० रोजी जारी करण्यात येणार आहे. सीईटी कक्षाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.

 

MHT CET 2020: परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे ते www.mahacet.org या संकेतस्थळावरून परीक्षेची उत्तरतालिका डाऊनलोड करू शकतात. या प्रोव्हिजनल उत्तरतालिकेवर जर काही आक्षेप असतील तर तेही नोंदवण्यात येतील, आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवाय परिपत्रकानुसार, राज्य  सीईटी कक्ष २८ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्या पूर्वी MHT CET 2020 परीक्षेचा निकाल जारी करणार ाहे.
MHT CET Answer Key 2020: उत्तरतालिका अशी पाहता येईल –
– सर्वात आधी अधिकृ वेबसाइट mahacet.org वर जा.
– यानंतर होम पेज वर उपलब्ध आन्सर की च्या लिंकवर क्लिक करा.
– आता विचारलेली माहिती भरा.
– MHT CET उत्तरतालिका 2020 तुमच्या स्क्रीन वर दिसू लागेल.
– आता तुम्ही आन्सर की डाऊनलोड करून तिचं प्रिंट आऊट घेऊ शकाल.

१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही नैसर्गिक आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सीईटी सेलने या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून दिली होती. सीईटी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली.

सीईटीच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


MHT CET Results 2019

MHT CET 2019 Results : For engineering, pharmacy & agricultural degree course admission process MHT – CET exam result is declared on Tuesday. State Common Entrance Cell was conduct this examination in 26 districts 166 various centers. This examination was conduct in 10 days 19 session duration. Result of this examinations is now declared here. Students who applied for the examinations can now check from following link. Check MHT CET Results 2019

MHT CET Results 2019

check MHT CET Results 2019 here


MHT CET 2018 Results

DTE Maharashtra has just published the MHT CET 2018 Result. Candidates can check their MHT CET result 2018 in online through below given link. The subject-wise marks and total score of the candidate will be known through the MHT CET result 2018 in addition to personal details like name, category, date of birth etc.  As per the MHT CET 2018 Results, candidates who qualify in the exam held on May 10 can apply for counselling. The Directorate of Technical Education (DTE) declared the results of the Maharashtra Common Entrance Test 2018 (CET).

Steps to Check result of MHT CET 2018 :

 • Go to the official Maharashtra DTE website or Click the below link.
 • Click on the link that says ‘MHT CET result 2018’.
 • Enter roll number and date of birth in the space provided.

Download the results or take a print out for future reference.

MHT CET 2018 Results-Check Here

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!