कृषी विभागात हजारो पदे रिक्त – MPSC Krushi Seva 2023
MPSC Krushi Seva 2023 updates regarding 203 posts. In February 2022, the MPSC had published an advertisement for 203 agriculture officers after a gap of four years. The exam was conducted a year and a half later. Candidates were also selected in July this year; However, four months later, the candidates are yet to be appointed. The candidates have urged the MPSC to at least start the process of appointment.
A total of 204 positions were held. The preliminary examination was held on April 30, 2022. The main examination was held on October 1, 2022 and the interviews were conducted from April 10 to 13, 2023. The final result of the exam was declared on July 12, 2023. However, the candidates are worried as they are yet to get appointments and no process is going ahead. As of now, thousands of seats are vacant. Hundreds of schemes are implemented by the Department of Agriculture; However, due to lack of officers, the agriculture department has failed to deliver the scheme to the farmers on time. Thousands of posts, from commissionerates to board agriculture officers, are vacant. Despite this, MPSC agricultural services main exam 2021 recommended 203 agriculture officers are not getting appointment.
कृषी विभागात हजारो पदे रिक्त – निवड होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवार हवालदिल
‘एमपीएससी’मार्फत तब्बल चार वर्षांनंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये २०३ कृषी अधिकाऱ्यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनंतर परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी जुलै महिन्यात उमेदवारांची निवडही करण्यात आली; मात्र, चार महिने होऊनही अजून या उमेदवारांना नियुक्ती न मिळाल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. कमीत कमी नियुक्तीची प्रक्रिया तरी सुरू करावी, अशी मागणी उमेदवारांनी ‘एमपीएससी’कडे केली आहे.
- एकूण २०४ पदांसाठी घेण्यात आली होती. ३० एप्रिल २०२२ ला पूर्वपरीक्षा पार पडली. १ ऑक्टोबर २०२२ ला मुख्य परीक्षा तसेच १० ते १३ एप्रिल २०२३ या दरम्यान मुलाखती पार पडल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल १२ जुलै २०२३ ला जाहीर करण्यात आला. मात्र, अजूनही नियुक्ती मिळत नसल्याने तसेच कोणतीही प्रक्रिया पुढे होत नसल्याने उमेदवार चिंतेत आहेत. आजमितीस हजारो जागा रिक्त आहेत. शेकडो योजना कृषी विभागाकडून राबविल्या जातात; परंतु, अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर योजना पोचविण्यात कृषी विभाग अपयशी ठरत आहे. अगदी आयुक्तालयापासून ते मंडळ कृषी अधिकाऱ्यांपर्यंतच्या हजारो जागा रिक्त आहेत. असे असतानाही एमपीएससी कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ शिफारस पात्र २०३ कृषी अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळत नाही.
- एमपीएससीमार्फत अत्यंत संथगतीने दीड वर्ष ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. १७ ऑगस्ट २०२३ ला पुण्यातील कृषी आयुक्तालयात कागदपत्रे पडताळणी झाली. त्यानंतर २०३ निवड झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांना ८ दिवसांत विभागीय विकल्प मागण्यात येईल आणि त्यानंतर नियुक्ती मिळेल, असे सांगण्यात आले; पण त्या दिवसापासून कुठलीही प्रक्रिया होत नाही. – जोतीराम जाधव, उमेदवार
- महाराष्ट्र कृषी सेवा २०२१ मधून निवडलेल्या २०३ अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रकिया (वैद्यकीय चाचणी व विभाग पसंतीक्रम) लवकरात लवकर करावी. निवड झाल्यापासून तीन महिन्यांत नियुक्ती बंधनकारक असून, . यासाठी आधीच चार महिने उलटून गेले आहेत. पुढे सार्वत्रिक निवडणुका असल्याने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही प्रक्रिया मार्गी लावावी. ही विनंती. – दत्तात्रेय शिंदे, उमेदवार
- रिक्त जागांची स्थिती
- १२७ – वर्ग १ कृषी उपसंचालक
- ३३४ – वर्ग २ तालुका कृषी अधिकारी (वरिष्ठ)
- ५९५ – वर्ग २ तालुका कृषी अधिकारी (कनिष्ठ)
MPSC Agriculture Services Answer Key
MPSC Agriculture Services Answer Key: MPSC conduct Maharashtra Agriculture Services Main Examination 2021. This exam was conducted on 1st October 2022 at various center. First Answer key has been released. Answer key for this examinations is now available here to download. Applicants who applied for this examinations can now check their examinations answer key by using following link. First Answer Key for this examinations for all of the given questions are now available here to check. Check MPSC Agriculture Service Main Exam 2021 Answer Key from below . Applicants having any objection related with answer key may raise their objection before 19th October 2022.
MPSC Krushi Seva 2023