महाराष्ट्र शिक्षण सेवा परीक्षा 2017-जिल्हा तांत्रिक सेवा संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी – MPSC Bharti 2023
Mahsul Van Vibhag Lipik Bharti 2023 - New GR, Notification
MPSC Vacancy 2023 Merit list
Maharashtra Public Service Commission (MPSC) has said that post graduate degree holders cannot be given a chance unless the service entry rules of Maharashtra Public Service Commission (MPSC) are changed regarding the recruitment of information and public relations department. Now the Information and Public Relations Department should immediately change the service access rules. The post graduate students preparing for this recruitment have demanded that the recruitment should be suspended till the new service entry rules.
Maharashtra Public Service Commission released jumbo recruitment advertisement for the posts of ‘Deputy Director, District Information Officer and Information Officer’ on 30th December 2022. However, the controversy started on the second day of the ad release. Because, students who have master’s degree in journalism could not apply for these posts. On the other hand, students who have completed degrees and diplomas in journalism are eligible for these posts. This means that students with higher academic qualifications in Journalism were deprived of the application process for these posts. Currently this advertisement has been extended till 25th April 2023.
MPSC : माहिती विभागाची भरती स्थगित करा; पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांची मागणी
- माहिती व जनसंपर्क विभागाच्या भरतीबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) सेवा प्रवेश नियमात बदल केल्याशिवाय पदव्युत्तर पदवीधारकांना संधी देता येणार नसल्याचे म्हणणे आहे. यावर आता माहिती व जनसंपर्क विभागाने तत्काळ सेवा प्रवेश नियमात बदल करावेत. नवीन सेवा प्रवेश नियम होईपर्यंत भरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी या भरतीची तयारी करणाऱ्या पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांनी केली आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३० डिसेंबर २०२२ रोजी ‘उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी’ पदांसाठी जम्बो पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, जाहिरात प्रसिद्धीच्या दुसऱ्याच दिवसापासून वाद सुरू झाला. कारण, पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदांसाठी अर्ज करता येत नव्हता. याउलट पत्रकारितेत पदवी व पदविका घेतलेले विद्यार्थी या पदांसाठी पात्र ठरले. म्हणजे पत्रकारिता विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता असताना विद्यार्थी या पदांच्या अर्ज प्रक्रियेपासून वंचित ठरले. सध्या या जाहिरातीला २५ एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Maharashtra Public Service Commission (MPSC) is going to start recruitment for some posts here soon. The application process will start from 10 April 2023. A notification has been issued for this on official website. This recruitment will be for the posts of Senior Geophysicist, Medical Officer, Administrative Officer, Custodian, Assistant Director, Inspector / Superintendent. Eligible candidates have to apply online through the given link. The last date to apply is going to be 02 May 2023. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 02 मे 2023
JOB TITLE | MPSC Bharti 2023 |
Name of Posts & No. of Posts |
वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी,अभिरक्षक, सहायक संचालक, निरीक्षक / अधिक्षक एकूण जागा – 157 |
Educational Details |
वरिष्ठ भूभौतिकशास्त्रज्ञ: जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी असणे; किंवा B.Sc मध्ये पर्यायी किंवा उपकंपनी विषयांपैकी एक म्हणून भौतिकशास्त्रासह भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान. आणि पदव्युत्तर पदवी किंवा सरकारने घोषित केलेल्या इतर कोणत्याही पात्रतेवर जिओफिजिक्समधील किमान एक किंवा दोन पेपर असणं आवश्यक. वैद्यकीय अधिकारी: M.B.B.S. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या शेड्यूलमध्ये निर्दिष्ट केलेली कोणतीही पात्रता प्रशासकीय अधिकारी: वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून सरकारद्वारे मान्यताप्राप्त पात्रता असणे आवश्यक. सहाय्यक संचालक: पेपरद्वारे इतिहासातील किमान द्वितीय श्रेणीतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, किंवा प्रबंधाद्वारे इतिहासातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी; किंवा इतिहासातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची डॉक्टरेट. निरीक्षक: सामाजिक कार्यात बॅचलर पदवी; कला, वाणिज्य, विज्ञान, कायदा किंवा कृषी या विषयातील पदवी आणि सामाजिक कार्य किंवा सामाजिक कल्याण प्रशासनातील पदव्युत्तर पदविका किंवा शारीरिकदृष्ट्या अपंगांच्या शिक्षणात पदवी किंवा डिप्लोमा भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम, 1992 अंतर्गत मान्यताप्राप्त संस्था म्हणून किंवा शिक्षणाची पदवी; किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून अपंग व्यक्तींसाठी विशेष शिक्षणातील प्रमाणपत्र, पदवी किंवा डिप्लोमा किंवा त्याच्या समकक्ष म्हणून सरकारने घोषित केलेली इतर कोणतीही पात्रता असणं आवश्यक. |
Required Documents |
Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.. |
Online Application will be start soon. |
10 एप्रिल 2023 |
Important Links of MPSC Recruitment 2023
- MPSC महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा अंतर्गत मेडिकल ऑफिसर पदांची मोठी भरती
- MPSC मार्फत विविध विभागात रिक्त पदांची भरती – थेट लिंक व्दारे करा अर्ज
Maharashtra Public Service Commission announced the press release regarding screening exams to be conducted for direct service recruitment. The matter under consideration of the Commission was to determine the procedure for the number of applications received under an advertisement for screening examination for direct service recruitment based on specific educational qualifications and experience conducted by the Maharashtra Public Service Commission.
आयोगामार्फत सरळसेवा भरती करिता चाळणी परिक्षांबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर…!
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती करिता आयोजित करण्यात येणाऱ्या चाळणी परिक्षांबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता चाळणी परीक्षा घेण्यासाठी एखाद्या जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जांची संख्या किती असावी याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती.
- याबाबत विचार करून विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि / अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता एखाद्या जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जांची संख्या २६ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास संबंधित जाहिरातीस अनुसरून चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल.
- प्रस्तुत कार्यपध्दतीची अंमलबजावणी सर्व प्रलंबित प्रकरणांसह दिनांक ०१ जानेवारी, २०२३ नंतर प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींपासून करण्यात येईल.
MPSC Latest Announcement regarding the abolition of the procedure of writing the number of questions solved on the objective multiple-choice answer sheet
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तरपत्रिकेवर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या लिहिण्याची पद्धत रद्द करण्याबाबतची घोषणा
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकेवर सोडविलेल्या प्रश्नांची संख्या लिहिण्याची व त्याकरीता दोन मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याच्या कार्यपध्दती रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून त्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
According to the MPSC, the revised exam plan and syllabus is being implemented from the year 2025, taking into consideration the demand of the candidates regarding the descriptive nature of the State Services Main Examination, the law and order situation and the additional time to be given to the candidates for preparation.
MPSC New Syllabus News : MPSC च्या अभ्यासक्रमात 2023 पासून बदल करण्याचा निर्णयाविरोधात राज्यभर MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यास सुरवात केली होती. अखेर त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहेत. अखेर आयोगाने मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय.
नवा अभ्यासक्रमातील बदल आता 2023 पासून नाही तर 2025 पासून लागू होतील अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करुन दिली. पण तुम्हाला माहिती आहे का MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आलेत? आणि कसा असणार असणार MPSCचा नवा पॅटर्न? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत?
- आता MPSCची परीक्षा ही वर्णनात्मक असेल आणि यात एकूण 9 पेपर असतील.
- त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे पेपर प्रत्येकी 300 गुणांचे असतील तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील.
- याशिवाय मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.
- सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.
- सोबतच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.
मुख्यमंत्र्यानीही घेतली होती दखल –
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. 2025 पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे. आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत सरकार सहमत असून आयोगाने देखील तशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.
The Maharashtra Public Service Commission has decided to conduct the exam on the lines of UPSC from this year i.e. from 2023 according to the new pattern. The new exam pattern will be implemented from 2025 by the Maharashtra State Public Service Commission. Read More details are given below.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परिक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून सकाळपासून पुण्यात आंदोलन करण्यात येत होते. यावर शिंदे-फडणवीस सराकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यावर्षीपासून म्हणजे 2023 पासून यूपीएससीच्या धर्तीवर नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याच ठरवण्यात आले होते. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध करत आज सकाळपासूनच पुण्यात आंदोलन करत होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबतच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार आणि माजी आमदार सदाभाऊ खोतही सहभागी झाले आहेत.
याबाबत कॅबिनेट मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचा आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. परंतु, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.
मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती मिळत आहे. 2025 पासून नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याची विनंती राज्य सरकारतर्फे एमपीएससीला करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे.
Mahsul Van Vibhag Lipik Bharti 2023 – New GR
Lipik Typist Bharti 2023 under the Mahsul Van Vibhag will be held through MPSC. Requisition letter has been published for the recruitment of Clerk Typist (Revenue Assistant) Group C Cadre Direct Service Quota posts in Revenue Department through Maharashtra Public Service Commission. Read the below given details carefully and keep visit us for the further updates.
महसुल विभागातील लिपिक टंकलेखक (महसुल सहाय्यक) गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्ट पदे महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत भरण्याकरिता मागणीपत्र जाहीर…
Read complete details here
MPSC Lipik Bharti 2023
MPSC Vacancy 2022- Recruitment process for clerk-typist posts will be implemented through Maharashtra Public Service Commission. This recruitment process will be implemented in the month of April and the recruitment advertisement for this will be published in the month of January. Read More details about MPSC Recruitment 2022 are given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभांगाना दिले आहेत. त्यामुळे लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमपीएससीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे.
जानेवारीत लिपीक-टंकलेखक पदासाठी एमपीएससीद्वारे निघणारी जाहिरात आजपर्यंतच्या पदभरतीतील सर्वांत मोठी जाहिरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थीनी सुवर्णसंधी समजून एप्रिलच्या परीक्षेची तयारी करावी. लिपीक टंकलेखक पदासारख्या अन्य पदभरती देखील एमपीएससीने राबवावी, यासाठी संघटना आग्रही आहे
MPSC Clerk Bharti 2022
- त्यामध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदासाठी खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रिया पदे महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा राबविण्यात येत होती. त्यामुळे त्यात अनेक संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून प्रस्तावित असून, गैरप्रकार झाल्याचे आढळले. त्यानंतर स्पर्धा त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवडयात परीक्षार्थीनी संबंधित भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
- त्यामुळे १५ एमपीएससीमार्फतच घेण्याची मागणी केली होती. डिसेंबरपर्यंत सर्व विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आता ही भरतीप्रक्रिया एमपीएससीमार्फतच घेण्यात आयोगाकडे परिपूर्ण मागणीपत्र सादर करावे, असे येणार असल्यामुळे ती पारदर्शी होईल, असा आयोगाने स्पष्ट केले आहे. लिपीक-टंकलेखक विश्वास स्पर्धा परीक्षार्थीनी व्यक्त केला आहे.
मागणीपत्र वेळेत न दिल्यास पदभरती नाही
१५ डिसेंबरपर्यंत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त न झाल्यास सन २०२३ मध्ये संबंधित विभागाची पदे भरायची नाहीत, असे समजण्यात येईल. तसेच स्पर्धा परीक्षांच्या सन २०२३ च्या अंदाजित वेळापत्रकामध्ये संबंधित विभागातील रिक्त पदांचा समावेश करण्यात येणार नाही. परिणामी, लिपीक-टंकलेखक भरतीसाठी सन २०२३ मध्ये आयोगास भरती प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही, असेदेखील आयोगाने स्पष्ट केले आहे.
MPSC Bharti 2022- NEW GR- The Mega Recruitment Process to be done through the Maharashtra Public Service Commission i.e. MPSC. The government has decided to fill up all the posts of clerical cadre in Group-C in the state government offices through the Maharashtra Public Service Commission.. Read More details are given below
सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSCमार्फत भरण्यात येणार आहे. मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदे MPSC द्वारे भरण्यात यावी, यासाठी 2019 पासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता.
राज्य शासकीय कायालयातील गट-क मधील लिपिक संवर्गातील सर्व पदे या पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रस्तुत शासन शासन निर्णय लिपिक वर्गीय भरतीस लागू राहील. या संदर्भातील अधिक माहितीसाठी दिलेल्या PDF GR पहावा.
- राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीत तक्रारी आल्यानंतर या विभागाच्या परीक्षा अनेकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.
- त्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे शासकीय खात्यातील भरती ही टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या प्रतिष्ठित आणि अनुभवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
- या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- गेल्या वर्षीच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे, असे ठरले होते.
- त्याप्रमाणे आधीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाइन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.
- या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची विहित कार्यपद्धती आणि इतर अटी-शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
राज्यात ७५ हजार पदांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत नामनिर्देशनाद्धारे परीक्षा घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीत तक्रारी आल्यानंतर या विभागाच्या परीक्षा अनेकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे शासकीय खात्यातील भरती ही टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या प्रतिष्ठित व अनुभवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आधीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवानिवड मंडळाच्या कक्षेतील, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळसेवेची रिक्त पदे ऑनलाइन पद्धतीने वरील संस्थांमार्फत भरण्याचा निर्णय झाला. या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची विहित कार्यपद्धती आणि इतर अटी-शर्ती सामान्य प्रशासन विभागामार्फत (सेवा) निश्चित करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.
MPSC Vacancy 2022: The Mega Recruitment Process to be done through the Maharashtra Public Service Commission i.e. MPSC was suspended to some extent due to the Corona from last 2 year. However, now the relevant restrictions have been completely removed So the Maharashtra government decision has been announced by the finance department. So now it is clear that the way for 100 percent direct recruitment through MPSC has been cleared. At the same time, 50 percent of the vacant posts in the direct service quota in other cadres are being allowed to be filled. Complete Vacancy Details and NEW GR are given below. Candidates Read the details which are given below and keep visit us for the further updates.
Mega Bharti 2022 Vacancy Details
- According to the information obtained from RTI:
- A total of 10 lakh 99 thousand 104 posts have been sanctioned including 7 lakh 80 thousand 523 posts of direct service and 3 lakh 18 thousand 581 posts of promotion.
- Out of this, 6 lakh 39 thousand 194 direct service posts and 2 lakh 59 thousand 717 promotion posts are filled in total 8 lakh 98 thousand 911 posts.
- 1 lakh 41 thousand 329 vacancies for direct service. Therefore, the picture shows that the way to fill the relevant posts has been cleared in the coming period.
MPSC Bharti 2022 – एमपीएससीव्दारे 100 टक्के पदभरतीचा मार्ग मोकळा
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून करण्यात येणार्या पदभरतीवर कोरोनामुळे काही प्रमाणात पायबंद घालण्यात आला होता. मात्र, आता संबंधित निर्बंध पूर्ण हटविण्यात आले आहेत. तसा शासन निर्णयच वित्त विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे एमपीएससीव्दारे 100 टक्के पदभरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
- वित्त विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. 11.02.2016 च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत. त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. त्याचबरोबर अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50 टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे.
- या प्रमाणानुसार पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसेल तर, किमान एक पद भरता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण केलेली पदे व अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव(व्यय), वित्त विभाग यांच्या उपसमितीने पदभरतीस मान्यता दिलेली रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. त्यामुळे यापुढील काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- एमपीएससी अंतर्गत येणार्या सरळसेवा पदभरती शंभर टक्के होणार असा शासन निर्णय आल्यामुळे अनेक वर्षांपासून परीक्षांची वाट पाहणार्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात दोन वर्ष गेल्यामुळे राज्यातील पदभरतीला खीळ बसली होती. आत्ता शंभर टक्के पदभरती होणार असल्यामुळे विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
– महेश घरबुडे, कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
MEGA BHARTI 2022 COMPLETE DETAILS SEE GR HERE
MPSC Clerk Bharti 2022- A decision has been taken in the Cabinet meeting held today to fill all the vacant posts of class 3 clerks in the state through the Maharashtra Public Service Commission. Candidates Read the complete details given below on this page regarding the MPSC Clerk Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा अंतर्गत या रिक्त पदांची भरती – थेट लिंक व्दारे करा अर्ज
- MPSC PSI Exam Answer Key-MPSC PSI मुख्य परीक्षा २०२१ परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर
- MPSC महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र जाहीर
- MPSC महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा प्रवेश पत्र जाहीर
- MPSC मार्फत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा विभागात विविध पदांची भरती
राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब (अराजपत्रित), गट- क आणि गट- ड संवर्गातील लिपिक वर्गीय सरळसेवा पदभरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहे.
राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे MPSCमार्फत भरण्याचा निर्णय
- राज्यात भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब (अराजपत्रित), गट- क आणि गट- ड संवर्गातील लिपिक वर्गीय सरळसेवा पदभरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या विचाराधीन आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांना राज्य सरकारद्वारे पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
- राज्य सरकारच्या विविध विभागांतील लिपिक वर्गाच्या भरती परीक्षा एमपीएससीद्वारे घेण्याची विनंती आमदार निरंजन डावखरे यांनी ४ ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्याकडे केली होती. राज्यातील सर्व विभागांतील लिपिक संवर्गातील पदांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते, परंतु प्रत्येक विभागातील लिपिक संवर्गातील पदांच्या परीक्षेसाठी वेगळी जाहिरात प्रसिद्ध करणे, स्वतंत्र परीक्षा आणि निकाल आदींमध्ये बराच कालावधी जातो. तसेच या परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. त्यामुळे सर्व विभागांच्या लिपिक संवर्गाची परीक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली होती. यासंदर्भात ऑक्टोबर २०२० मध्ये निर्णय झाल्यावरही अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले होते. त्यावर अपर मुख्य सचिव गद्रे यांनी लिपिक पदाच्या परीक्षा एमपीएससीद्वारे घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर सरळसेवा पदभरतीच्या प्रचलित कार्यपद्धती ४ मे २०२२ रोजी निश्चित झाली आहे. त्यानुसार आगामी भरती केली जाणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
MPSC Bharti 2022-Updates: MPSC has changed the priority ranking criteria. This change will be implemented in all upcoming advertisements. Apart from this, the rules of procedure will be amended. It has been informed by MPSC that the process will be started considering that the working rules have been revised during the period till the revision.
राज्यसेवा २०२२ द्वारे किमान एक हजार पदांची भरती करण्याची मागणी
‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने (एमपीएससी) पदभरती परीक्षांमध्ये समान गुण मिळविणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्य क्रमवारीच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. त्यात उमेदवारांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले असून, समान गुण मिळवणाऱ्या दोन विद्यार्थ्यांपैकी ज्याचे शिक्षण जास्त त्याला प्राधान्य मिळणार आहे.
या बदलाची अंमलबजावणी आगामी काळात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींमध्ये करण्यात येईल, असेही ‘एमपीएससी’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘एमपीएससी’तर्फे विविध भरतींसाठी उमेदवारांची अंतिम शिफारस यादी करताना समान गुण मिळवणाऱ्यांची प्राधान्य क्रमवारी वेगळ्या निकषांद्वारे करण्यात येत होती. जुने निकष रद्द करून नवे जाहीर करण्यात आले आहेत.
या बदलाची अंमलबजावणी आगामी काळात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींमध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय कार्यनियमावलीमध्ये सुधारणा करण्यात येईल. सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीत कार्यनियमावलीत सुधारणा झाली असे समजून प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही ‘एमपीएससी’कडून कळवण्यात आले आहे.
नवे निकष काय?
- – अर्ज करताना उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हा समान गुण मिळवलेल्यांसाठी पहिला निकष असणार आहे.
- दोन्ही विद्यार्थ्यांचे समान गुण आणि समान शिक्षण असेल, तर अर्ज करण्यापूर्वी कोणाचे शिक्षण पूर्ण होते हे पाहिले जाईल.
- त्यानंतर परीक्षेच्या जाहिरातीत एखादी पात्रता नमूद केली असेल आणि ती विद्यार्थ्यांकडे असेल तर त्याला प्राधान्य मिळेल.
- जाहिरातीत, परिपत्रकात स्पष्ट उल्लेख असेल, तर मागासवर्गीय समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास वर्ग, भटके विमुक्त आदींतील उमेदवार, वय, आडनावातील आद्याक्षर या क्रमाने क्रमवारी केली जाईल.
- पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी क्रमवारी करताना पदवी आणि अनुभव, बारावी आणि अनुभव व दहावी आणि अनुभव या क्रमाने क्रमवारी केली जाईल.
MPSC Bharti 2022: Latest updates regarding MPSC Recruitment 2022 is that Maharashtra Public Service Commission 100% Recruitment will be soon. Also, State Excise Minister Shambhuraj Desai informed in the Legislative Council that 50 percent of the seats in various departments will be filled, Read More details are given below.
Taluka Krida Adhikari Bharti -प्रशिक्षक होणार आता तालुका क्रीडा अधिकारी; लवकरच 80 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १०० टक्के, तर अन्य विविध विभागांतील ५० टक्के जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
MPSC च्या सर्वच्या सर्व जागा भरणार-शंभुराज देसाई
२४ ऑगस्ट या दिवशी आमदार अरुण लाड यांनी शासनाच्या २९ प्रमुख विभागांतील २ लाख १९३ जागा रिक्त असल्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळत नसल्याची लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. त्यावर शासनाच्या वतीने मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिले. यावेळी अरुण लाड यांनी लक्षवेधीमध्ये शासकीय नोकरभरती खासगी ठेका पद्धतीऐवजी राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्याची मागणी केली.
खासगी आस्थापनांच्या माध्यमातून नोकरभरती करणार नाही
राज्यातील एकूण दीड लाख पदे रिक्त असून ७५ हजार पदे भरण्याची प्रक्रिया केली जाईल. कोरोना महामारीच्या काळात नवीन नोकर भरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. आता हे निर्बंध शिथील केले आहेत. यापुढे कोणत्याही खासगी आस्थापनांच्या माध्यमातून नोकरभरती केली केली जाणार नाही.
MPSC Bharti 2022: There is great news for MPSC Student. Maharashtra Public Service Commission conducts competitive examinations for various posts every year. These exams were conducted separately for various posts. But now a big decision has been taken by the commission for the candidates who are preparing for MPSC. Recruitment of Group A to Group C cadres is now conducted through only two combined examinations. Read More details as given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवल्या जाणाऱ्या पदभरती परीक्षांमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात राजपत्रित आणि अराजपत्रित पदांसाठीच्या परीक्षा कमी करून दोनच संयुक्त पूर्व परीक्षा घेतल्या जाणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी २०२३पासून करण्यात येणार आहे.
एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सोमवारी ही माहिती दिली. आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत परीक्षांची संख्या वाढलेली आहे. त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर पडत असल्याने भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. तसेच गुणवत्ता राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागत आहे. त्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आणि भविष्यातील भरती प्रक्रियेच्या नियोजनाचा विचार करून विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
राजपत्रित गट अ आणि गट ब या संवर्गांसाठी आणि अराजपत्रित गट ब, गट क या संवर्गांसाठी दोन स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्यासह परीक्षा योजनेमध्येही बदल करण्यात आला. त्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या सर्व राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गांच्या निवड प्रक्रियेत आता वर्णनात्मक स्वरुपाची मुख्य परीक्षा असेल, असे नमूद करण्यात आले. राजपत्रित संयुक्त परीक्षा आणि अराजपत्रित संयुक्त परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी उमेदवारांकडून अर्ज घेताना जाहिरातीतील सर्व संवर्गांसाठी पात्रतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेतला जाईल. संबंधित संवर्गासाठी उमेदवाराने दिलेला विकल्प संबंधित संवर्गातील पदभरतीसाठीचा अर्ज समजला जाईल. तसेच भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या विविध संवर्गांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, वेतनश्रेणी, दर्जा आदी बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा या नावाने स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातील. या दोन्ही परीक्षांसाठी मराठी आणि इंग्रजी, सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन पेपरच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. मुख्य परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या विविध संवर्गासाठी उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच पात्रतेवर आधारित पसंतीक्रम घेतला जाईल. मुख्य परीक्षेसाठी सर्वसाधारण यादी प्रसिद्ध झाल्यावर उमेदवाराकडून ऑप्टिंग आऊट पर्याय घेऊन त्या आधारे संबंधित संवर्गासाठीची निवड प्रक्रिया होईल.
‘पीएसआय’साठी ७० गुण अर्हताकारी
पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीसाठी शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या पूर्वी ही चाचणी साठ गुणांसाठी अर्हताकारी होती. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदंडाधिकारी प्रथम संवर्गांच्या भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
प्रस्तावित परीक्षा पद्धतीमुळे उमेदवारांना योग्य दिशा मिळून आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच वर्णनात्मक पद्धतीच्या अवलंबामुळे केंद्रीय स्तरावरील परीक्षांच्या तयारीसाठीही उमेदवारांना फायदा होईल. या पूर्वीही आयोगाने देशात पहिल्यांदाच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याच धर्तीवर विद्यमान आयोगानेही अराजपत्रित आणि राजपत्रित पदांच्या परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे परीक्षांची गुणवत्ता राखली जाण्यास मदत होईल.
The Maharashtra Public Service Commission has decided to revise the pattern of various competitive examinations organized by the Maharashtra Public Service Commission and a press release in this regard has been published on the Commission’s website. Read more details as given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परिक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला होता. त्यानंतर आता परिक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
परिक्षांचा बदलेला पॅटर्न बघण्यासाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक देण्यात आलं आहे. त्यामध्ये आयोगाने बदलाच्या सर्व सूचना दिल्या आहेत. त्यासंदर्भात ट्वीट करत आयोगाने माहिती दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयोगाकडून परिक्षांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आयोगाच्या या निर्णयाविरोधात आंदोलन केलं होतं. पण आयोगाच्या कारवाईच्या सूचनेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांकडून बदलत्या अभ्यासक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे.
MPSC मार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा- जाहिरात येथे पहा
MPSC Bharti 2022– MPSC Duyyam Seva Main Exam 2022 updates. The admission process for the July 17 exam has been postponed. A press release has been published on the Commission’s website in connection with the confusion created among the candidates. Read More details as given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील संयुक्त पेपर 2 च्या प्रवेश प्रमाणपत्रासंदर्भात गोंधळ निर्माण झाला होता. 17 जुलै रोजी होणाऱ्या उपनिरिक्षक पेपर क्रमांक २ चे प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्ध करणे तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत. उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे
- Teachers Recruitment – शिक्षकांची भरतीसुद्धा MPSC मार्फत होणार?
- MPSC Answer Key-MPSC दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा -उत्तरतालिका जाहीर !!
- MPSC Hall Tickets – MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षाचे प्रवेशपत्र जाहीर
- MPSC Duyyam Seva Bharti 2022
- MPSC Technical Services Bharti 2022
महाराष्ट्र दुय्यम सेवागट ब मुख्य परीक्षा 2021 प्रवेश प्रमाणपत्र संदर्भात अपडेट
दरम्यान १७ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा २०२१ पोलिस उपनिरिक्षक पेपर क्रमांक २ साठी प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्यासाठी तांत्रिक कार्यवाही सुरू असताना उद्याच्या म्हणजेच ९ जुलै २०२२ रोजीच्या परिक्षेचे प्रमाणपत्र डाऊनलोड करणाऱ्या काही उमेदवारांना त्यांच्या खात्यात दोन वेगवेगळ्या उपकेंद्रांचे प्रवेश प्रमाणपत्र दाखवत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात आयोगाने ही कार्यवाही तूर्तास स्थगित केली आहे.
या गोंधळामुळे सध्या उद्याच्या परिक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यावर ठेवण्यात आले असून १७ जुलैच्या परिक्षेसाठीचे प्रवेशपत्राची कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांच्या प्रवेशपत्रासंदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे अशा उमेदवारांच्या मेलवर प्रवेशपत्र पाठवण्याची सोय आयोगाकडून केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे.
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced that only the changes in the examination plan and syllabus of the State Service Examination will be implemented from the coming academic year i.e. from 2023. Read More details as given below.
परीक्षा निर्णयात बदल नाही ; ‘एमपीएससी’च्या नव्या योजना २०२३ पासूनच
MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा करिता नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही. काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून सदर प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल. तरी उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी, हि माहिती mpsc च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर प्रकाशित करण्यात आली आहे.
MPSC Vacancy 2022: Important information for candidates preparing for MPSC exam. Charges now apply for objections on the MPSC answer sheet. As per the Press Note Release candidates will now have to pay a fee to register objections on the first answer sheets of the examinations conducted by the Maharashtra Public Service Commission. There will be a service charge of Rs. 100 and Rs. 44 for each question. Read more details as given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या प्रथम उत्तरतालिकांवर हरकती-सूचना नोंदवण्यासाठी आता उमेदवारांना शुल्क भरावे लागणार आहे. त्यात प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपये आणि ४४ रुपये सेवा शुल्क या प्रमाणे शुल्क आकारले जाईल.
- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 800 पदांची जाहिरात प्रकाशित २०२२
- MPSC मार्फत महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा मध्ये विविध रिक्त पदांची भरती
- MPSC भरती ला अनुसरून सराव पेपर आणि मागील वर्षीचे पेपर्स -ऑनलाईन सोडवा आणि परीक्षेचा सराव करा…
- MPSC भरती ला अनुसरून चालू घडामोडी सराव पेपर्स येथे पहा
- MPSC मार्फत सामान्य राज्य सेवा मध्ये विविध रिक्त पदांची भरती -ऑनलाईन अर्ज करा
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांच्या प्रथम उत्तरतालिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने हरकती नोंदवण्याची सोय एमपीएससीने करून दिली आहे. त्यानुसार उमेदवारांकडून हरकती सूचना नोंदवल्या जातात. मात्र या प्रक्रियेसाठी आता शुल्क लागू करण्यात आले आहे. हरकती नोंदवताना उमेदवारांकडून सामूदायिक पद्धतीने हरकती नोंदवण्यात आल्याचे वारंवार निदर्शनास आले.
तसेच मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात आल्याने त्याची छाननी प्रक्रिया, दुरुस्ती यात बराच वेळ जातो. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रामाणिक, वस्तुनिष्ठ, सप्रमाण हरकती दाखल होण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे एमपीएससीकडून सांगण्यात आले. १ जुलैपासून होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा निर्णय लागू असेल, असेही एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले, की उत्तरतालिकांवर ऑनलाइन पद्धतीने हरकती सादर करण्यासाठी दिलेल्या सोयीमुळे एमपीएससीच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याची प्रतिपूर्ती होण्यासाठी शुल्क लागू करण्यात आले आहे. कर्मचारी निवड आयोग, राजस्थान लोकसेवा आयोग यांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला.
MPSC Bharti 2022- Recruitment for Group B and C category posts in all government offices will be done through MPSC. The posts of Clerk-Typist and Junior Engineer will be filled through MPSC. MLA Rohit Pawar said that the recruitment will be done in a transparent manner as it will be done through MPSC. Read More details regarding MPSC Bharti 2022 as given below.
लिपिक, टंकलेखक व कनिष्ठ अभियंता ही पदे ‘एमपीएससी’ मार्फत भरणार
राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्यसेवा आयोगाने शासनास सादर केला आहे. त्यामुळे ही पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंतापदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. पारदर्शक पद्धतीने भरती होण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अराजपत्रित गट ब आणि क संवर्गातील पदांची भरती ‘एमपीएससी’मार्फत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती.
त्यासंदर्भातील पाठपुरावा करत असताना उपमुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री भरणे यांच्या दालनांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये आमदार रोहित पवार यांनी या परीक्षा राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यासाठी मागणी लावून धरली होती. आमदार पवार यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या नियमित पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच ही पदे भरण्यासाठी ‘एमपीएससी’मार्फत प्रक्रिया सुरू होईल.
यापूर्वी काही विभागांच्या परीक्षा विविध कारणांनी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे उमेदवारांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला; परंतु आता लिपिक, टंकलेखक व कनिष्ठ अभियंता ही पदे ‘एमपीएससी’ मार्फतच भरण्यात येणार असल्याने पारदर्शी पद्धतीने भरती होईल, असा विश्वासदेखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
MPSC Bharti 2022: As per the latest news, Maximum opportunities for candidates canceled by MPSC. The MPSC has decided to remove the maximum opportunity limit for candidates. The candidate had the opportunity to appear for the examination any number of times within the age limit fixed by the MPSC, now, as in the past, candidates will have the opportunity to appear for the examination according to the age limit fixed for the category. Read More details as given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल केला आहे. उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय MPSCने घेतला असून, आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 800 पदांची जाहिरात प्रकाशित २०२२
- MPSC मार्फत महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा मध्ये विविध रिक्त पदांची भरती
- MPSC भरती ला अनुसरून सराव पेपर आणि मागील वर्षीचे पेपर्स -ऑनलाईन सोडवा आणि परीक्षेचा सराव करा…
- MPSC भरती ला अनुसरून चालू घडामोडी सराव पेपर्स येथे पहा
- MPSC मार्फत सामान्य राज्य सेवा मध्ये विविध रिक्त पदांची भरती -ऑनलाईन अर्ज करा
MPSCमार्फत विविध शासकीय पदांच्या भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस एमपीएससीकडून शासनाला केली जाते. एमपीएससीने निश्चित केलेल्या वयोमर्यादेत उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होती.
काय निर्णय होता?
मात्र निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर खुल्या गटातील (open) उमेदवारांना कमाल सहा संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी 2020 मध्ये निश्चित केल्या, तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले होते.
MPSC Bharti 2022- The Maharashtra Public Service Commission (MPSC) had conducted the examination in 2019 for the three posts of Tax Assistant, Clerical Typist and Deputy Inspector of Maharashtra Group ‘C’. Of these, 126 tax assistant posts were filled; But due to various reasons, those concerned had to wait for appointment for two and a half years. However, the state tax department has cleared the way for the appointment of 30 candidates. Read More details as given below.
- MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता १०८६ पदांची जाहिरात प्रकाशित
- MPSC मार्फत सामान्य प्रशासन विभागात 255 पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित
- MPSC Bharti 2022- Check All Results Here
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०१९ मध्ये महाराष्ट्र गट ‘क’च्या कर सहायक, लिपिक टंकलेखक व दुय्यम निरीक्षक या तीन पदांसाठी परीक्षा घेतली होती. यामध्ये १२६ कर सहायक पदे भरली; पण तब्बल अडीच वर्ष विविध कारणांमुळे संबंधितांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत राहावे लागले. मात्र राज्य कर विभागाने ३० उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला आहे.
या पदांची भरती प्रक्रिया न्यायालयीन आणि कोरोनामुळे तीन वर्षांपासून प्रलंबित होती. या भरती प्रक्रियेत एसईबीसी उमेदवारांना (सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास) आरक्षणावरील स्थगितीमुळे नियुक्ती दिलेली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’चे आरक्षण रद्द केल्यामुळे, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना ‘ईडब्ल्यूएस’चे १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन या रखडलेल्या भरती प्रक्रियेला गती दिली होती. त्यानुसार ”एमपीएससी”ने प्रक्रिया सुरू करून पुन्हा एकदा या पदांचा निकाल लावला होता. मात्र, उच्च न्यायालयाने या नवीन निकालानुसार ”एसईबीसी”च्या उमेदवारांना ”ईडब्ल्यूएस”चा (आर्थिक मागास वर्ग) लाभ देण्याच्या मुद्द्यावरून स्थगिती दिली होती. त्यामुळे फक्त १० टक्के ईडब्ल्यूएस उमेदवारांचा प्रश्न उच्च न्यायालयामध्ये उद्भवल्याने उर्वरित ९० टक्के उमेदवारांना नियुक्तीसाठी वेठीस धरले होते.
आता १२६ उमेदवारांपैकी ३० जणांना प्रशासनाने नियुक्ती दिली आहे. मात्र राहिलेल्या ९६ जणांची कागदपडताळणी सुरू असल्याने हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने लवकरात लवकर कागदपडताळणी करून आम्हाला नियुक्ती द्यावी, अशी मागणी उमेदवार मोहन पाटील यांनी केली आहे.
इतर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी
महसूल प्रशासनामार्फत होत असल्याने नियुक्तीस उशीर होत आहे. उर्वरित उमेदवारांचे पडताळणी अहवाल महसूल प्रशासनाने राज्य कर विभागास द्यावेत, जेणेकरून लवकरात लवकर नियुक्ती मिळेल.
MPSC Recruitment 2022: This is important news for MPSC students. The advertisement was drawn up in 2019 for the five categories of ZP Health Health Workers, Health Workers, Pharmaceutical Manufacturers, Laboratory Technicians and Health Supervisors in the Zilla Parishad which have been in limbo for the last three years. But for the last three years, it has been stalled due to technical reasons. Read More details as given below.
खुशखबर! शासनातील तब्बल दोन लाख रिक्त जागा भरणार
- MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता १०८६ पदांची जाहिरात प्रकाशित
- MPSC मार्फत सामान्य प्रशासन विभागात 255 पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित
- MPSC Bharti 2022- Check All Results Here
आनंदाची बातमी! 3 वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया सुरु होणार, 5300 जणांना नोकरी मिळणार
- एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या तीन वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषदेतील ZP Health आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदासाठी ही जाहिरात 2019 ला काढण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडली होती.
- दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच सकारात्मक चिन्ह दिसून लागल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
- कोरोनामुळे आणि त्यानं वेगवेगळ्या वादांमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता आणि इतर संबंधित पदांची भरती रखडली होती. जाहिरात काढण्यात आल्यानंतरही ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यानं विद्यार्थी निराश झाले होत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात येण्याच्या हालचालींना वेग आलाय.
5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्देशांनुसार 5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी शैक्षणिक पात्रता औषध निर्माता यासाठी B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-CIT/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे ,
पात्रता काय हवी?- Eligibility Criteria
- आरोग्य सेवक पदासाठी 10वी उत्तीर्ण तसेच संगणकीय ज्ञान हवे.
- आरोग्य सेविका पदासाठी सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद असावे.
- आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी आरोग्य कर्मचारी कोर्स केलेला असावा, अशी अट घालण्यात आली आहे
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc ला फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी हे विषय घेऊन पदवीधर असावा.
या परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे होती. ही पदे संपूर्ण महाराष्ट्र भरली जाणार आहेत. यासाठी नोंदणी फी ओपन कॅटेगिरीसाठी 500 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आणि माजी सैनिकांसाठी मोफत असणार आहे. या प्रक्रियेत, उमेदवाराला ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तपशीलांसह तयार होणे आवश्यक होतं. वैयक्तिक तपशील जसे आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, ईमेल आयडी, फोन नंबर, पत्ता तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी आवश्यक आहे. SSC किंवा जन्म प्रमाणपत्रानुसार अर्जदाराचे नाव भरावे, कारण जर तुमच्या कोणत्याही अधिकृत ओळखपत्राशी नाव जुळत नसेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल.
MPSC Bharti 2022 for 15000 posts will be held soon. In the last six months, the government has advertised for 7,000 vacancies through the State Public Service Commission (MPSC) after the corona outbreak subsided. That filling process is underway. There are over two lakh Empty Posts in various departments of the government and efforts are being made to fill those posts. So young people should set their goals. Read More details as given below.
MPSC मार्फत राज्यात लवकरच स्पर्धा परीक्षेच्या १५ हजार जागा भरणार
सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले, ‘कोरोनानंतर राज्यात १५ हजार जागांवरील पदभरती सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार आतापर्यंत सात हजार जागांवरील भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या सहा महिन्यांत पदभरतीच्या सात हजार जागांसाठी जाहिराती दिल्या आहेत. त्या भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनात विविध विभागांतर्गत तब्बल दोन लाख जागा रिक्त असून ती पदे भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे तरुणांनी आपले ध्येय निश्चित करावे. मनात जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती ठेवून त्यादिशेने वाटचाल करावी, त्यातून निश्चितच यशाचा मार्ग मिळेल’, असा सल्ला राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेयांनी युवकांना दिला.
MPSC Recruitment 2022: Minister of State for School Education Bachchu Kadu has demanded to the Chief Minister Uddhav Thackeray that the state government should recruit direct service in Group B (Non-Gazetted), Group C and Group D through Maharashtra Public Service Commission (MPSC). Nomination posts in Group B (Non-Gazetted), Group C and Group D are also filled by MPSC. Considering this demand of educated unemployed youth, the decision to be taken by a private company should be withdrawn.
राज्य शासनाने गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात यावी, अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
गट ब क ड संवर्गातील सरळ पदभरती MPSC मार्फत घेण्याची मागणी
राज्य शासनाने या संवर्गातील सरळसेवेची पदभरती जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीमार्फत आणि खासगी कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातूनच घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयावर विविध विद्यार्थी संघटना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून होत आहे. आता खुद्द बच्च कडू यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
वास्तविकत: खासगी कंपन्याची विश्वासार्हता ढासळलेली असून, त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षा घेताना केलेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे दिसून आली आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देखील गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाची पदे एमपीएससीकडून भरण्यात येतात. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या या मागणीचा विचार करून खासगी कंपन्याद्वारे घेण्यात येणार असल्याच्या निर्णय मागे घ्यावी, अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
MPSC Vacancy 2022- Corona has delayed the recruitment process for the last two years. But now vacancies have been identified in all the divisions of the state. Accordingly, about 15,000 seats will be filled. Out of which recruitment process has started for 8000 posts. Recruitment process will be carried out for the remaining posts. There will be no confusion about the exams now. Read More details regarding MPSC Vacancy 2022 are given below.
MPSC मार्फत राज्यात लवकरच स्पर्धा परीक्षेच्या १५ हजार जागा भरणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती आली आहे. वर्षभरात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या प्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी आहे. तशीच मलाही आहे. एमपीएससी अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. या वर्षात खूप परीक्षा द्यायच्या असल्याने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना केले.
अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांचे संयुक्त विद्यामाने आयोजित स्पर्धा परीक्षा वास्तव, भवितव्य आणि दिशा या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमीत्ताने दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शैलेश पगारिया, अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेंडगे, महेश बडे, किरण निंभोरे उपस्थित होते.दत्तात्रय भरणे यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
MPSC Bharti 2022 for 15000 posts
”कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे १५ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी ८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राहिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षांबाबत कोणताही गोंधळ आता होणार नाही. वर्षभरात सर्व रिक्त पदे भरली जाऊन नेमणुकाही दिल्या जाणार असुन मोठा भाऊ या नात्याने आपल्यासाठी काम करणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.”
MPSC Bharti 2022– The Administrative Departments have finally approved the revised diagrams as per the directions of the Finance Department in the Government Resolution dated 11 February 2016. In such revised diagrams, except for the posts in the scope of Maharashtra Public Service Commission, other posts are being allowed to be filled up to 50%. If no post is available for recruitment then at least one post can be filled.
MPSC भरती ला अनुसरून सराव पेपर आणि मागील वर्षीचे पेपर्स -ऑनलाईन सोडवा आणि परीक्षेचा सराव करा…
MPSC भरती ला अनुसरून चालू घडामोडी सराव पेपर्स येथे पहा
MPSC मार्फत सामान्य प्रशासन विभागात 253 लघुलेखक पदांची भरती -नोकरीची उत्तम संधी
As per the government decision, the revised diagrams have been approved by the government departments. On the other hand, the Mahavikas Aghadi government has given another good news to the youth and has approved to fill all the posts in the MPSC.
शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात शासनाकडून मंगळवारी (ता. १२) शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार शासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर करून घेतले आहेत, त्या सुधारित आकृतीबंधातील ५० टक्के (एमपीएससीच्या कक्षेतील पदे वेगळून) पदभरती करता येणार आहे. तसेच दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने तरुणांना आणखी एक खुषखबर देत एमपीएससीच्या कक्षेतील सर्वच पदे भरण्यास मान्यता दिली आहे.
राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या तुलनेत वेतनावरील खर्च अधिक होऊ नये, यासाठी नवीन पदभरती, पदनिर्मितीवर वित्त विभागाने यापूर्वीच निर्बंध घातले आहेत. पण, विविध विभागांमधील काही प्रमाणात रिक्तपदे भरण्यासाठी वित्त विभागाने आज मन्यता दिली आहे. ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार शासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर करून घेतले आहेत, त्यांना पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यात विशेषत: एमपीएससीमार्फत भरल्या जाणारी पदे प्रामुख्याने भरली जाणार आहेत.
MPSC’च्या कक्षेतील पदांची होणार १०० टक्के भरती
ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसल्यास किमान एक पद भरता येईल.
ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसल्यास किमान एक पद भरता येईल.
ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.
कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत ४ मे २०२० चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्चस्तरीय सचिव समितीने/उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.
A petition has been filed in the Aurangabad Bench by the advocates here seeking adjournment of the Class 1 and 2 examinations of the Agriculture Department to be held on April 30 on behalf of the Maharashtra Public Service Commission. Read more details as given below.
परभणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ३० एप्रिल रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी येथील वकिलांमार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या वर्ग १ व २ पदभरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या समितीने ११ फेब्रुवारी रोजीच्या आदेशानुसार कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पर्यायी असणारा २०० गुणांचा पेपर क्र. २ सरसकट वगळण्यात आला. तसेच पेपर क्र. १ मध्ये ८० गुण होते तेही वगळले. एकूण ४०० गुणांपैकी २८० गुण कृषी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी होते.
विद्यार्थ्यांनी याविरुद्ध आंदोलने केली. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही, तर दुसरीकडे १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १८ फेब्रुवारी रोजी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे ३० एप्रिल रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. त्यास तत्काळ स्थगिती मिळावी, यासाठी वर्षा मांदळे व आकाश पांडुळे यांनी अॅड. विवेक राठोड व अॅड. चंद्रबोधी जोंधळे यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ३० मार्च रोजी या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून याचिका मंजूर करण्यात आली. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला लेखी म्हणणे दाखल करण्यास सांगितले. या याचिकेवर पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार असल्याचे अॅड. विवेक राठोड यांनी सांगितले.
MPSC Bharti 2022- Good news for students who preparing for MPSC; The state will soon have a large recruitment through MPSC. Demand forms have been issued to fill the vacancies of Group-A, Group-B and Group-C in various departments of the State Government. It has come to light that 6 thousand 356 vacancies have been filled. Read More details as given below.
राज्यात लवकरच एमपीएससी मार्फत होणार मोठी भरती
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी MPSC students मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच राज्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती होणार आहे. कारण राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिलं आहे. यात तब्बल 6 हजार 356 जागा भरण्याची गरज असल्याचे मागणीपत्र दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
- MPSC मार्फत आरोग्य विभागात एकूण 145 पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध
बृहमुम्बई महानगरपालिकेत MPSC अंतर्गत विविध पदांची भरती
MPSC मार्फत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा विभागात विविध पदांची भरती
- MPSC मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागात भरती -त्वरित अर्ज करा
एमपीएससी आयोगाला राज्य सरकारने तसं मागणीपत्र दिले आहे. कोणत्या विभागात किती जागा भरणार याबाबत परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच मोठी भरती निघणार आहे.
MPSC कडून होणार 1700 जागांची भरती | लवकरच जाहीरात येणार
MPSC Vacancy 2022: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has issued about 300 advertisements in the last six months. It has six advertisements for 100 seats. Another 1700 vacancies will be advertised in the next week. Minister of State for General Administration Dattatreya Bharane informed that all the procedures would be completed expeditiously through MPSC s
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मागील सहा महिन्यांत साधारणतः तीनशे जाहिराती काढलेल्या आहेत. यामध्ये शंभर जागांच्या सहा जाहिराती काढलेल्या आहेत. तसेच पुढील आठवडाभरात अजून सतराशे जागांची जाहिरात काढण्यात येणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. यापुढे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून एमपीएससीमार्फत सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
सहा महिन्यांत ७८०० जागांची जाहिरात काढून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उच्चांक केला आहे. भविष्यात राज्य सामन्यात सरकार सर्व रिक्त पदांची जाहिरात एमपीएससीमार्फत काढणार आहे. तसेच, यापुढे रिक्त जागा तातडीने भरण्याचे नियोजन केले आहे. – दत्तात्रेय भरणे
पुण्यात गुरुवारी (ता. १७) ते पत्रकारांशी बोलत होते. भरणे म्हणाले, “कोरोनामुळे यापूर्वी एमपीएससीची प्रक्रिया रेंगाळत होती. दिरंगाईमुळे राज्यभरातील हजारों विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. अनेक विद्यार्थ्यांना वय उलटून गेले, तर त्यांना परीक्षा देता येत नव्हती. परंतु आता एमपीएससीकडून पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, मुलाखती आणि प्रत्यक्ष नियुक्ती ही सर्व प्रक्रिया वेगाने पार पाडली जाणार आहे.”
MPSC माध्यमातून राज्यात आठ हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच
MPSC Bharti 2022- As per the news, The recruitment process for the highest number of 8,000 posts in the history of the state will be completed in the next six months. Dattatray Bharane, Minister of State for General Administration, has announced that in the next six months, the Maharashtra Public Service Commission (MPSC) will conduct 300 examinations for the highest number of 8,000 mega recruitments in the history of the state. Read More details as given below.
MPSC Bharti 2022 for 15000 posts
आगामी सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) (MPSC) च्या ३०० परीक्षांच्या (Exam) माध्यमातून राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक आठ हजार पदांची भरती प्रक्रिया (Mega Recruitment) राबवली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिली आहे.
- MPSC मार्फत आरोग्य विभागात एकूण 289 पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध-ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- MPSC महाराष्ट्र तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -588 जागांसाठी जाहिरात प्रकाशित- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- MPSC मार्फत कृषी व पशुसंवर्धन विभागात 262 पदांची भरती-त्वरित अर्ज करा
- MPSC महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध –ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- MPSC बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- MPSC तर्फे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021ची जाहिरात प्रकाशित–ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- MPSC अंतर्गत 55 +पदांची भरती सुरु-
- MPSC मार्फत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा विभागात विविध पदांची भरती
भरणेवाडी (ता.इंदापूर) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून इंदापूर व बारामती तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी भरणे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडल्या होत्या. यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करुन एमपीएसीची सदस्यांची नेमणूक करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पाठपुरावा केला. राज्यपालांची सहीसाठी मी स्वतः भेट घेवून सही घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३०० परीक्षांची जाहिरात दिली असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे. आगामी सहा महिन्यामध्ये राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक ८ हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
सत्कारमुर्ती विद्यार्थी
प्रतीक्षा ज्ञानदेव वणवे (रा. लाकडी), चेतन ढावरे (रा. इंदापूर शहर), निलेश दिलीप ओमासे (रा.कळस), दिपाली धालपे (रा. घोलपवाडी), अशोक बाळासो नरुटे (रा. काझड), अनिकेत वाघ (रा. अकोले), शैलेश मोरे (रा. रणगाव) व बारामती तालुक्यातील प्राजक्ता श्रीनिवास देवकाते – घुले (रा. पिंपळी) यांचा सत्कार सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्याचे स्वप्न होणार पूर्ण
ग्रामीण भागासह शहरातील मुलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न असते. सामान्य प्रशासन मंत्री झाल्यानंतर एमपीएसीची च्या संदर्भात मुले-मुली वारंवार भेटत होती. त्यांच्या अडचणी सांगत होते. त्यांची तळमळ पाहून तातडीने एमपीएसच्या परीक्षेचा प्रश्न मार्गाी लावला असून सहा महिन्यामध्ये ८ हजार पदांची भरती प्रक्रिया होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
मुलाने स्पर्धा परीक्षा पास होवून अधिकारी होणे आई वडिलांचे स्वप्न असते. ही परीक्षा संयमाची व विद्यार्थ्याच्या वाढत्या वयाची परीक्षा असते. एमपीएससीच्या परीक्षासंदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेवून तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण केल्याने कुंटूबाचे व आमचे स्वप्न वेळेत पूर्ण करु शकलो असल्याचे नवनिर्वार्चित पोलीस उपनिरीक्षक निलेश ओमासे यांनी सांगितले.
MPSC Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has Published the notification for the various Posts in Public Health Department, Maharashtra Animal Husbandry Service, Town Planning, Maharashtra Town Planning and Valuation Service, General State Service, Group-B and various department. There is a total 1500+ vacancies available to be filled. Applicants as per the requirement may apply for the posts before the last date.
MPSC परीक्षेत एका जागेवर आता एकाच विद्यार्धी निवडला जाईल
MPSC Exam : The Maharashtra Public Service Commission (MPSC) has decided to implement the general merit list, preference list and opt out option. The implementation of this decision has started from the ‘Civil Engineering Service’ Main Examination 2019 and the candidates have been given till February 20 to exit the recruitment process. Read More details as given below.
MPSC Bharti 2022 for 15000 posts
पदभरती प्रक्रियेत रिक्त राहणाऱ्या जागांवर पात्र उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने (MPSC) सर्वसाधारण गुणवत्ता यादी, पसंतीक्रम नोंदवणे आणि पदभरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (opt out) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ‘स्थापत्य अभियांत्रिकी सेवा’ मुख्य परीक्षा २०१९पासून सुरू झाली असून, उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- ‘एमपीएससी‘कडून पदभरतीच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात.
- या परीक्षांतील गुणवत्ता यादीद्वारे उमेदवारांची विविध सरकारी पदांसाठी शिफारस करण्यात येते.
- मात्र, अपेक्षित पदावर शिफारस होत नसल्याने, अनेक उमेदवार संबंधित नियुक्ती स्वीकारत नाही.
- त्यामुळे अनेक पदे रिक्त राहून प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांची नियुक्ती होण्यात अडचण निर्माण होते.
- त्याचप्रमाणे सरकारी सेवेत किंवा ‘प्रोबेशनरी’ पदावर असणारे अधिकारी वरिष्ठ पदांसाठी पुन्हा परीक्षा देतात.
- मात्र, त्यांची पुन्हा त्याच पदावर शिफारस करण्यात येते.
- अशा वेळी ते अधिकारी नोकरी स्वीकारत नाहीत.
- त्यामुळे तीही पदेही रिक्त राहतात. त्यावर उपाय म्हणून ‘एमपीएससी’ने ‘ऑप्टिंग आउट’चा पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
एमपीएससी’ने या संदर्भातील परिपत्रक शनिवारी प्रसिद्ध केले. ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून, उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रांची पुनर्पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी न्यायालयात, न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. ‘ऑप्टिंग आउट’साठी ऑनलाइन वेबलिंक २० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.
नंतर विचार नाही’
पसंतीक्रम नोंदवण्याबाबत ‘एमपीएससी’ने काही सूचना उमेदवारांना केल्या आहेत. पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग, पदांसाठी पसंतीक्रम सादर करतील, केवळ त्याच संवर्ग, पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल. दिलेल्या मुदतीनंतर संवर्ग, पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवारांची विनंती मान्य केली जाणार नाही. भरतीप्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम शिफारशीसाठी विचार करण्यात येणार नाही, असेही ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे.
MPSC Bharti 2022: This is important news for candidates preparing for the competitive examinations conducted by the Maharashtra Public Service Commission (MPSC). Maharashtra Secondary Service Joint Examination seats have been increased due to additional demand from State Government (MVA) to MAPSC. MPSC Group B Non-Gazetted 2021 Service Examination will now recruit 1085 posts.
The posts of Assistant Cell Officer, State Tax Inspector, Sub-Inspector of Police will be filled through this examination. The Maharashtra Public Service Commission has informed through additional tweets that additional demand letter has been received from the government for a total of 419 posts. Earlier it was announced for 666 seats but now with the increase of 419 seats, the process will be implemented for 1085 posts. The Public Service Commission (PSC) has said that more information about the increased seats will be given while announcing the main examination.
PSC मार्फत दुय्यम सेवा परीक्षेत 419 पदांची वाढ, 1085 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारकडून (MVA) एमएपीएससीकडे अतिरिक्त मागणीपत्र देण्यात आल्यानं महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एमपीएससी गट ब अराजपत्रित 2021 सेवा परीक्षेद्वारे आता 1085 पदांची भरती होणार आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक अशी पद या परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. एकूण 419 पदांसाठी अतिरिक्त मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झालं असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विट द्वारे कळवण्यात आलं आहे. या आधी 666 जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलं होतं आता 419 जागा वाढल्यानं 1085 पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. वाढ करण्यात आलेल्या जागांसंबंधीची अधिक माहिती लोकसेवा आयोगाकडून मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर करताना करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
1085 पदांची भरती होणार – महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021करीता राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. याद्वारे एकूण 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल.प्रवर्गनिहाय पदे मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील, असं लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आलं आहे. दरम्यान, वाढ करण्यात आलेली पदं ही राज्य कर निरीक्षक संवर्गातील आहेत.
MPSC Bharti 2022 for 15000 posts
सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदं अशा एकूण 666 पदांसाठी मूळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता त्यामध्ये राज्य कर निरीक्षक पदाच्या 419 जागांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे राज्य कर निरीक्षक पदाच्या एकूण 609 जागांसाठी ही भरती होईल. तर एकूण भरती प्रक्रिया 1085 पदांसाठी राबवण्यात येईल.
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित परीक्षा जाहीर – पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आणि परिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या द्वारे पोलीस सेवेत असणाऱ्या उमदेवारांना 6 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
The state government has given relief to thousands of candidates who have crossed the age limit for MPSC exams in the state. For Ad.No.143/2021 to 212/2021, a weblink has been started for the candidates who have exceeded the maximum age limit for the period from 1st March 2020 to 17th December 2021. Last date to apply: February 9, 2022. Read More details as given below.
कोरोना (Corona) काळात नोकरभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे राज्यातील MPSC परिक्षेसाठीची वयोमर्यादा ओलांडणाऱ्या हजारो उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ज्या विभागाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होतील, अशा परीक्षेला विशेष बाब म्हणून एकवेळ बसण्याची संधी मिळणार आहे.
जा.क्र.१४३/२०२१ ते २१२/२०२१ करीता दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-९ फेब्रुवारी, 2022.
शेवटची तारीख काय?
प्रशासकिय सेवांसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची शेवटची संधी हुकली होती. त्यांना कमाल वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांना परिक्षेला बसता येणार नव्हते, मात्र राज्य शासनाने त्यांना एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आल्याची माहिती MPSC कडून देण्यात आली. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान हे अर्ज करण्याचा अंतिम तारिख ९ फेब्रुवारी, 2022 असणार आहे.
राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी घेतलेल्या निर्णयात म्हटले होते की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दिनांक १ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे
MPSC Bharti 2022 for 15000 posts
MPSC Vacancy 2022- The recruitment process for government posts is carried out through direct service and competitive examinations. Accordingly, applications for 7,460 posts for various posts in Group A, B and C have been issued from a total of 25 departments such as Public Health, Finance, Home, Higher and Technical Education, Water Resources, Planning, Public. This includes 3,011 posts in Group A, 2,658 in Group B and 1,891 in Group C. Read More details as given below.
राज्य शासनाच्या विविध विभागांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) ७ हजार ४६० पदांची मागणीपत्रे देण्यात आली आहेत. आयोगाने जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची जाहिरात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती एमपीएससीने दिली.
एमपीएससीने शासनाच्या विविध विभागांकडून ३१ डिसेंबपर्यंत आलेल्या पदांच्या मागणीपत्राची माहिती शुक्रवारी दिली. सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय पदांची पदभरती प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य, वित्त, गृह, उच्च व तंत्रशिक्षण, जलसंपदा, नियोजन, सार्वजनिक अशा एकूण २५ विभागांकडून अ, ब आणि क गटातील विविध पदांसाठी ७ हजार ४६० पदांची मागणीपत्रे देण्यात आली आहेत. त्यात अ गटाची ३ हजार ११, ब गटातील २ हजार ६५८ आणि क गटातील १ हजार ८९१ पदांचा समावेश आहे.
आयोगाकडून आतापर्यंत ४ हजार ३२७ पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात अ गटातील १ हजार ४९९, ब गटातील १ हजार २४५ आणि क गटातील १ हजार ५८३ पदांचा समावेश आहे. जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची जाहिरात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
MPSC Bharti 2022 for 15000 posts
Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Main Examination 2019 will be conducted as per the given date Read More details
PSI भरती संदर्भात MSPC ने दिली महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक ८, ९ व १० फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्र पणे प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती एमपीएससीने ट्विट करून दिली आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध –ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक ८,९ व १० फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्र पणे प्रसिद्ध करण्यात येईल.
MPSC Exam: The joint main examination conducted by Maharashtra Public Service Commission (MPSC) has been postponed. A circular has been issued by the MPSC informing about this. Accordingly, the examination scheduled for January 29 and 30, February 5 and February 12 has been postponed.
MPSC Exam:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ((Maharashtra Public Service Commission, MPSC) घेण्यात येणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीतर्फे परिपत्रक जाहीर करुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यानुसार २९ आणि ३० जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा लांबणीवर गेली आहे.
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
४ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या सयूंक्त पूर्व परीक्षेची उत्तरतालिका आयोगाने ७ सप्टेंबरला प्रसिद्ध केली. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुसऱ्या उत्तरतालिकेत काही बरोबर प्रश्न आयोगाने रद्द केल्याने अनेक विद्यार्थ्यांना निकालात स्थान मिळाले नाही. यामुळे असंख्य तरुणांचे नुकसान झाले असून वर्षानुवर्षं अभ्यास केल्यानंतर देखील त्यांना अपयशाला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले होते.
यासंदर्भात जवळपास ८६ विद्यार्थ्यांनी औरंगाबाद मॅट न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर कोर्टाने या विद्यार्थ्यांना मुंबई मॅट न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले. मुंबई मॅटने सदर बाब तातडीची असल्याने मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा निकाल दिला. त्यानंतर २५ जानेवारी २०२२ मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या संदर्भात याचिकाकर्त्या ८६ उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसण्याची संधी दिली. मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथे यासंदर्भातील याचिका दाखल झाल्या होत्या.
MPSC परीक्षेकरीता प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येनुसार उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिकांची छपाई करण्यात येते. ऐनवेळी कोणत्याही कारणामुळे प्रवेश द्यायच्या उमेदवारांच्या संख्येत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेतली जाते. पण या परिक्षेसंदर्भात राज्यातील विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशामुळे उमेदवारांच्या पुर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार आहे. अशावेळी आयोगाकडून छपाई करण्यात आलेल्या प्रश्नपुस्तिका आणि उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणे, परीक्षा आयोजनासंदर्भात व्यवस्था करणे हे अल्प कालावधीत शक्य नव्हते. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
MPSC Exam 2022- These students have received great relief from the Supreme Court. The High Court has directed the Maharashtra Public Service Commission to allow students who failed the main examination due to one mark to sit for the main examination. So now these students will be able to take the main exam. However, the same 86 students who had filed the petition in the court will be allowed to appear for the main examination.
एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत एका मार्काने वंचित असणाऱ्यांना देता येणार मुख्य परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआय पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची उत्तरपत्रिका आयोगाकडून तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरपत्रिकेवर काही विद्यार्थ्यांकडून अक्षेप घेण्यात आला होता. उत्तरपत्रिकेत अनेक प्रश्नाचे उत्तरं चुकीचे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता. याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाकडून या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे विद्यार्थी एका मार्कमुळे मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले त्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश हायकोर्टाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्याच 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे.
विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 या वर्षासाठी पीएसआय पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र जेव्हा आयोगाकडून या परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली तेव्हा या उत्तरपत्रिकेमध्ये अनेक त्रुटी राहिल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले होते. या उत्तरपत्रिकेमध्ये अनेक प्रश्नाचे उत्तर ही चुकीचे असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. याचा फटका जवळपास 3 हजार 500 विद्यार्थ्यांना बसल्याचा दावा देखील करण्यात आला होता. याविरोधात 86 विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. या विद्यार्थ्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
MPSC Bharti 2022 for 15000 posts
ज्या विद्यार्थ्यांची एका मार्काने मुख्य परीक्षेची संधी हुकली आहे. अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याच 86 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. याबाबतचे आदेश न्यायालयाकडून आयोगाला देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
MPSC Bharti 2022 for 15000 posts
Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2020 Interview was held on Tuesday (25th January 2022) at Amravati. Students numbered 3,350 to 3,377 were to be interviewed. However, the interview has been postponed due to administrative reasons. The Maharashtra Public Service Commission has tweeted that the interview will be held on February 2, 2022, at the same place.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची २०२० मुलाखत अमरावती येथे मंगळवारी (ता. २५ जानेवारी २०२२) रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ३,३५० ते ३,३७७ या क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येणार होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही मुलाखत २ फेब्रुबारी २०२२ रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ट्विट करून कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020-अमरावती येथे दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजी आयोजित मुलाखती (मुलाखत क्रमांक 3350 ते 3377) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. सदर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 2 फेब्रु. 2022 रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.
MPSC Bharti 2022 for 15000 posts
Saral Seva Bharti 2022– As per the latest GR, All state government recruitment will be done only through IBPS, TCS, and MKCL. Due to various complaints received in the examination system started by OMR Vendor, a revised decision was taken in the state cabinet on Wednesday for recruitment. All government exams will now be conducted through IBPS, TCS, and MKC. Read More details as given below.
पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे. यापुढे राज्य शासकीय भरती फक्त IBPS, TCS आणि MKCL मार्फत होतील असा GR जाहीर झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी रात्री . 15/12/2021 च्या बैठकीत मा. मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे, असा निर्णय घेतला आहे.
या पुढील पद भरती संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात येतील. शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या निर्देशांची अंमल बजावणी व सनियंत्रण करण्याची करण्याची सर्व जबाबदारी सर्व संबंधित मंत्रालयीन विभागाची राहील.
MPSC Bharti 2022 for 15000 posts
The MPSC has recently made an important announcement. The online application process for all upcoming exams has been temporarily suspended. The MPSC has informed that the application process has been postponed due to some technical issues. The application process is being postponed as per all the advertisements published. The MPSC has been informed through its official Twitter handle that it will be notified again after the technical problem is resolved and will be given sufficient time to submit the application as per all the advertisements.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC दरवर्षी अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असते. ही परीक्षा दिल्यानंतर अनेकांना सरकारी अधिकारी होण्याची संधी मिळते. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागतात. मात्र MPSC नं नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रोसेस तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल
MPSC नं आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे ही अर्ज प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती MPSC नं दिली आहे. प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल असं MPSC नं आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलद्वारे कळवलं आहे.
प्रसिद्ध सर्व जाहिरातींच्या अर्जासाठी आता उमेदवारांना काही वेळ वाट बघावी लागणार आहे. मात्र तांत्रिक अडचणी दुरुस्त करण्यात आल्यानंतर MPSC तर्फे उमेदवारांना वाढवून देण्यात येईल असं आश्वासन MPSC कडून देण्यात आलं आहे. तोपर्यंत मात्र उमेदवारांची गैरसोय होणार आहे.
काही दिवसांपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र यानंतर तांत्रिक अडचणी येत होत्या. काही उमेदवारांच्या यासंबंधीच्या तक्रारीही येऊ लागल्या. यानंतर MPSC नं या अडचणी दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. लवकरच ही अडचण दूर करून उमेदवारांसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
Goods News MPSC Bharti 2022 for 15000 posts
MPSC Bharti 2022 for 15000 posts
Updated 03.01.2022 -MPSC Bharti 2022-Golden opportunity to the students of MPSC. The government has approved filling 15 thousand 511 posts from various departments including the public health and medical education departments in the state through Maharashtra Public Service Commission. Read More details as given below.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागासह विविध विभागांमधून १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे. सात हजार ५६० पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. तसेच, राहिलेल्या जागांचे मागणी पत्र आयोगास का दाखल झाले नाही. याचा पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील 547 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा – २०२१ ची जाहिरात (क्रमांक २७०/२०२१) प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती करिता व ऑनलाईन अर्ज करण्यसासाठी खालील दिलेली लिंक वर क्लिक करा वर्षाच्या सुरुवातीलाच दोन जुलैला राज्यसेवा पूर्व परीक्षा ३९० जागांसाठी घेण्यात येणार होती. मात्र, ती अचानक रद्द झाली असून, या महिन्यात होईल, अशी अपेक्षा आहे. संयुक्त पूर्व परीक्षा ६६६ जागांसाठी २६ फेब्रुवारीला होत आहे, याची मुख्य परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. गट ‘क’ परीक्षा ९०० जागांसाठी तीन एप्रिलला होणार आहे. या वर्षातील पुन्हा होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा १९ जूनला घेण्यात येणार आहे. पुन्हा दुय्यम परीक्षेची पूर्व परीक्षा ८ ऑक्टोबरला रोजी होणार आहे, त्याचबरोबर गट ‘क’ची परीक्षा ५ नोव्हेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियोजित केली आहे.
‘‘येणाऱ्या वर्षात सर्व नियोजित परीक्षा वेळेवर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. १५ हजार ५११ जागा लवकरात लवकर भरण्याचा आमचा मनोदय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे.’’
‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक आयोगाने प्रसिद्ध केले आहे. मात्र, यातील २० टक्केसुद्धा परीक्षेच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी होत नाही, असा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे.’’
– सनी चव्हाण, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
मागणीपत्राद्वारे प्राप्त पदसंख्या
स्पर्धा परीक्षा/सरळसेवा भरती… जागा
अ…३०११
ब…२६५८
क…१८९१
एकूण…७५६०
जाहिराती प्रसिद्ध पदसंख्या
स्पर्धा परीक्षा/सरळसेवा भरती…जागा
अ…१४९९
ब…१२४५
क…१५८३
एकूण…४३२७
Updated on 01.01.2022 MPSC Recruitment 2022- Goods News MPSC will recruit 7560 posts. This will give a golden opportunity to the students of MPSC in the coming year. A total of 7560 seats are vacant in the three groups. Advertisements for 4327 posts have already been published. These exams will take place in the next few months. Besides, examinations for the remaining 3233 seats will be held this year. This will bring a golden opportunity for the students preparing for MPSC in the new year
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आणि सरळसेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०२१ वर्षाअखेरीपर्यंत ‘एमपीएससी’ने राज्याच्या विविध विभागांकडून मागवलेल्या रिक्त जागांच्या माहितीपत्रात ७५६० जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे येत्या वर्षात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ गटांतील एकूण किती पदे रिक्त आहेत, याबाबतचे मागणीपत्र देण्यास ‘एमपीएससी’ने सांगितले होते. त्याप्रमाणे राज्याच्या २५ विभागांमधील रिक्त असलेल्या पदांची संख्या ‘एमपीएससी’कडे प्राप्त झाली असून, राज्यात तिन्ही गटांच्या एकूण ७५६० जागा रिक्त आहेत. यामुळे यातील ४३२७ पदांसाठी जाहीराती यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. या परीक्षांत पुढील काही महिन्यात होणार आहेत. याचबरोबर उर्वरित ३२३३ जागांसाठीच्या परीक्षा याच वर्षी घेण्यात येणार आहेत. यामुळे नवे वर्ष ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे.
राज्यातील सामान्य प्रशासन विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग या विभागांमध्ये सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षा अशा दोन्ही गटांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत. या पदांसाठी येत्या वर्षात विद्यार्थ्यांमध्ये चुरस असणार आहे. या संदर्भातील सविस्तर यादी ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यात विभागवार रिक्त पदांची संख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये फारशा परीक्षा झालेल्या नाहीत. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी चिंतेत होते. परीक्षा होत नसल्याने अनेकांच्या कमाल वयाची मर्यादा ओलांडून चालली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या वर्षात रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने परीक्षांची संख्याही वाढणार आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. ‘एमपीएससी’ने लवकरात लवकर परीक्षांची वेळापत्रक आणि जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी आता विद्यार्थी करत आहेत
‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा
सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षांद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या वाढल्याने ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. येत्या वर्षात या सर्व पदांसाठी परीक्षा घेऊन ‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा. लवकरात लवकर आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे.
MPSC Bharti 2023 – राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे MPSCमार्फत भरण्याचा निर्णय