इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा उद्या (१८ फेब्रुवारी -रविवारी) घेण्यात येणार आहे – MSCE Pune 5th & 8th Scholarship Exam

MSCE 5th & 8th Class Scholarship Exam 2024 Form

MSCE Pune Scholarship 2024 :- MSCE 5th & 8th Class Scholarship Exam 2024 will be held on Sunday (18th Feb. 2024). The pre-upper primary scholarship 5th and pre-secondary scholarship examination conducted by the Maharashtra State Council of Examinations will be held on Sunday (February 18). Scholarship exams are conducted annually by the Examination Council for students of classes 5 and 8. This year, the exam is scheduled to be held on February 18.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

जिल्ह्यात ५३ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा – राज्यभरातून आठ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थी प्रविष्ट, उद्या होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. १८) फेब्रुवारीला होणार. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचे दर वर्षी आयोजन करण्यात येते. यंदा ही परीक्षा १८ फेब्रुवारीला होत आहे.


The Maharashtra State Council of Examinations (MSBSHSE) will conduct the scholarship examination for students of classes 5 and 8 on Sunday. The exam will be held on the same day in all districts of the state. As many as 8,91,700 students from the state will appear for the exam.
The state government has started a scheme from the academic year 1954-55 to identify meritorious students in the state and provide them incentive scholarships. Under this, the scholarship examination is conducted by the Maharashtra State Examination Council. Now, the State Examination Council conducts a scholarship examination every year for students of class 5 (pre-upper primary scholarship examination) and 8th (pre-secondary scholarship examination). This year, the scholarship exam will be held on Sunday, said The President of the State Examination Council. Nandkumar Bedse reports.

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवारी (ता. १८) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे. राज्यातील तब्बल आठ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना राज्य सरकारने १९५४-५५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. आता राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा) आणि आठवीमधील ( पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. त्यानुसार यंदा ही शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी होणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.


5th & 8th Class Scholarship Form Last Date – The deadline for submission of online applications for pre-upper primary (class V) and pre-secondary scholarship (class VIII) examinations has been extended till 7th December 2023. Therefore, students who could not fill the application within the given time and are interested in this scholarship examination will now be able to apply for this examination for another week. The scholarship exam is conducted every year in the month of February for students of classes 5 and 8 in primary and secondary schools in Pune city and district.

The scholarship exam is conducted by the Maharashtra State Examination Council. According to this, the pre-upper primary scholarship examination and pre-secondary scholarship examination for the current academic year (2023-24) will also be held on February 18, 2024. Students who want to appear for the exam are filling up online applications for the same. The deadline for this was November 30, 2023. The deadline expired Thursday. On Friday, the State Examination Council announced that it had extended the deadline for submission of applications by another week. Due to this extension, students will be able to fill the forms with regular fees till December 7. Apart from this, online applications can be made from December 8 to 15 with late fee, December 16 to 23 with very late fee and December 24 to 31 with very special late fee.

शिष्यवृत्ती अर्जासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या सात डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत अर्ज भरू न शकलेल्या आणि या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता आणखी आठवडाभर या परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. यानुसार चालू शैक्षणिक वर्षातील (२०२३-२४) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहे. यासाठी याआधी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत गुरुवारी (ता. ३०) संपली. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेने हे अर्ज करण्यासाठी आणखी आठवडाभर मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. या मुदतवाढीमुळे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह येत्या ७ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. याशिवाय विलंब शुल्कासह ८ ते १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर आणि अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.


MSCE Pune Scholarship 2024 :- MSCE 5th & 8th Class Scholarship Exam 2024 Form Online Registration started. 5th and 8th Scholarship Examination for the current academic year 2024 will be held on 18th February 2024 simultaneously. For this, the online application process is going on on the website of the Examination Council. Last date for submission of application with regular fee is 30th November and with late fee till 15th December.
According to the government decision, this exam is conducted for fifth and eighth. Pre-Higher Primary and Pre-Secondary School Scholarship’ is given as an academic incentive to meritorious students.
The concerned school should fill the bank account details of the scholarship holder students accurately on the website www.mscepune.in through the school login. Deputy Director (Planning) Rajesh Kshirsagar has appealed that the scholarship holders should contact the principal of the school.

पाचवी अन्‌ आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला; १५ डिसेंबरपर्यंत करा अर्ज; आता ५ ते ७५०० रुपये शिष्यवृत्ती

चालू शैक्षणिक वर्षासाठी १८ फेब्रुवारीला एकाचवेळी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ३४ हजार ४३२ शाळांमधील इयत्ता पाचवीच्या तीन लाख ७७ हजार ८०६ आणि आठवीच्या दोन लाख ८२ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
राज्यात १९५४-५५ पासून शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित असून इयत्ता चौथी व सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना होती. २०१५च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा पाचवी व आठवीसाठी घेतली जाते. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती’ ही शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहनात्मक दिली जाते.

इयत्ता पाचवीसाठी एकूण संच संख्या १६ हजार ६८३ एवढी असून इयत्ता आठवीसाठी १६ हजार २५८ संच संख्या आहे. दरवर्षी पाचवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे सहावी, सातवी व आठवीत शिक्षण घेणाऱ्या एकूण ५० हजार ४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तर आठवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या ३२ हजार ५१६ विद्यार्थ्यांनाही वार्षिक शिष्यवृत्ती मिळते.

  • बॅंक खात्याची अचूक माहिती द्यावी – २०२१पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त नसलेल्या शिष्यवृत्ती धारकांनी आपल्या बँक खात्याची माहिती तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे बॅंक खात्याची अचूक द्यावी. www.eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अपडेट झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा होईल. तर २०२१ नंतर शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संबंधित शाळेने परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर शाळा लॉगीनद्वारे अचूक भरावी. शिष्यवृत्तीधारकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे संपर्क साधावा, असे उपसंचालक (योजना) राजेश क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.
  • पाच ते साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती – २२ जुलै २०१०च्या शासन निर्णयाप्रमाणे २०२२-२३पर्यंत विद्यार्थ्यांना संचनिहाय जुन्या विविध दराने वार्षिक (इयत्ता पाचवीसाठी कमाल एक हजार व इयत्ता आठवीसाठी कमाल दीड हजार रुपये) शिष्यवृत्तीचे वितरण व्हायचे. चालू वर्षापासून सरसकट इयत्ता पाचवीसाठी पाच हजार रुपये तर आठवीसाठी साडेसात हजार रुपये, अशी शिष्यवृत्ती वाढविली आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वितरित झाली असून त्यासाठी परीक्षा परिषदेतील मंगल वाव्हळ, अश्विनी साठे यांनी परिश्रम घेतले. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आवश्यक निधीची राज्य शासनाकडे मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच त्यांनाही शिष्यवृत्ती मिळेल, असे या विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.

MSCE 5th & 8th Class Results 2023

Scholarship exam for 5th & 8th Class has been declared now. candidates check the below given details and check their score. Candidates entered the seat no. on below given link and click on the submit button to check the marks.

5th & 8th Class Results Declared

scholarship results

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) – 2023
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) – 2023

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतरिम निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक…

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतरिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक

MSCE 5th & 8th Class Results 2023

शिष्यवृत्ती परीक्षेत २५७८ पोरं पास; ५ वीचा १५ तर आठवीचा केवळ ८ टक्के निकाल

  • पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यात पाचवीचा १५.४८ टक्के, तर आठवीचा ८.६० टक्के निकाल लागला आहे.
  • पाचवीचे १ हजार ८०२, तर आठवीचे ७७६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दोन्ही मिळून २ हजार ७७८ मुले या परीक्षेत पास झाली आहेत.
  • जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी पार पडली. या परीक्षेला पाचवीच्या १२ हजार १५७ जणांनी नोंदणी केली. यापैकी ११ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. आठवीच्या ९४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०२८ जणांनी परीक्षा दिली. अशा एकूण २० हजार ६६६ पैकी केवळ २ हजार ५७८ विद्यार्थीच शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
  • निकालात अंजनगाव तालुका अव्वल
  • जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात अंजनगाव सुर्जी तालुका (१४.३३ टक्के) अव्वल आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर अमरावती तालुका १२.५० टक्के, तिसऱ्या क्रमांकावर धामणगाव रेल्वे ११.११, त्यानंतर मोर्शी १०.९५ टक्के, वरुड ७.७२ टक्के याप्रमाणे निकालाची टक्केवारी आहे. उर्वरित सर्व तालुके निकालाच्या टक्केवारीत मागे पडले आहेत.

MSCE 5th & 8th Class Results 2023

MSCE declared the scholarship results for 5th & 8th Class on official website – https://www.2022.mscepuppss.in/ Candidates just click on the below given link and Enter Candidate’s Seat Number (11 Digits) to see the results. Candidates keep visit us for the further updates.

5th & 8th Class Results Declared

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) – 2022
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) – 2022

MSCE 5th & 8th Class Results 2022


MSCE  Scholarship 2023 Application form

Online Application link open till 5th November 2022 for 8th Class scholarship on the official website www.nmmsmsce.in & www.mscepune.in. Candidates apply till 5th Nov. 2022 for scholarship. Scholarship examine for 8th Class will be held on 18th December 2022. Read the more details given below:

MSCE Pune 8th Class Scholarship Exam 2023

scholarship


MSCE  Scholarship Answer Key 2023

MSCE  Scholarship Exam Answer Key: Maharashtra State Examination Council have been published paper wise final answer sheets of Class V and VIII Scholarship examinations. Maharashtra State Examination Council have been published on the Council’s website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in.. 5th, 8th scholarship exam interim result is expected by the end of September as the result is released in two months. Read More details are given below.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Council of Examination) घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वी च्या स्कॉलरशीप निकालाचे (Maharashtra Scholarship Exam 2022 Result) वेध आता विद्यार्थ्यांना लागले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 20 सप्टेंबरला या परीक्षेची अंंतिम उत्तर तालिका (Final Answer Key) जारी केली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांतच निकालही जाहीर केला जाणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कोविड 19 संकटामुळे मागील दोन वर्षापासून या परीक्षेच्या तारखांमध्ये सातत्याने बदल झाले होते. यंदा 31 जुलैला ही परीक्षा  राज्यात पार पडली आहे. त्यामुळे परीक्षेनंतर दोन महिन्यात निकाल जारी केला जात असल्याने सप्टेंबर महिना अखेरीपर्यंत 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल अपेक्षित आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम उत्तरसूची जारी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरसूची जारी करण्यात आली आहे. अंतरिम उत्तरसूची  18 ऑगस्ट 2022 दिवशी जारी केली होती. त्यावर तज्ञांचे अभिप्राय जाणून घेऊन आता अंतिम उत्तरसुची बनवण्यात आली आहे. या अंतिम उत्तर तालिकेवरून  विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल लावला जाणार आहे.

 इथे पहा अंतिम उत्तरसूची.


MSCE Pune Scholarship Exam Answer Key: Maharashtra State Examination Council have been published paper wise final answer sheets of Class V and VIII Scholarship examinations. Maharashtra State Examination Council have been published on the Council’s website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in. Applicants having any objection may raise their objection before 28th August 2022. Read More details are given below.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबत निवेदन परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावरुन ऑनलाइन स्वरूपात करता येणार आहे. ऑनलाइन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर आणि शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये ‘ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड आन्सर की’ या पर्यायात उपलब्ध करून दिली आहे.  त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे ऑनलाइन निवेदन सादर करण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी तसेच आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

तसेच मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे परिषदेने सांगितले आहे.

ऑनलाइन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्तीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव. वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी देखील २८ ऑगस्टपर्यंत मुदत दिल्याचे, दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ च्या अंतरिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक

२०२२ अंतरिम उत्तरसूची


Maharashtra State Examination Council have been published Class wise, paper wise final answer sheets of Class V and VIII Scholarship examinations. Maharashtra State Examination Council have been published on the Council’s website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in.

MSCE Exam 2022 – 5th & 8th Class शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in  आणि  https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता अंतिम उत्तरसूचीच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येणार आहेत. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा निकाल तयार केला जाईल, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर केला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

MSCE Pune Scholarship – 5th & 8th Class शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!