MSCE Exam 2021 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

MSCE Scholarship Exam 2021

Scholarship examinations for Class V and VIII students in the state have been postponed twice in the last fortnight. The exam will now be held on August 12. Earlier, it was announced that the exam would be held on August 8.

Maharashtra Scholarship Exam 2021: राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ८ ऑगस्टला होणार असे जाहीर झाले होते. पण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेशी क्लॅश होत असल्याने ती ८ ऐवजी ९ ऑगस्ट रोजी होईल असे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरस्थिती आणि बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा ९ ऑगस्टऐवजी १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र १२ ऑगस्ट रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळवण्यात आले आहे.

Maharashtra State Examination Council President Tukaram Tupe has informed that the date of the fifth and eighth scholarship examinations in the state has been changed. Now the scholarship exam will be held on 9th August.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती दिली आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला आयोजित केली जाईल. 8 ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती आता ती 9 ऑगस्टला होईल. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.


The fifth and eighth scholarship exams, which were earlier postponed three times due to corona, will now be held on August 8. The school education department has recently given an order in this regard to the Maharashtra State Examination Council

कोरोनामुळे (corona) याआधी तीन वेळा लांबणीवर पडलेली पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा (scholarship exam) आता येत्या ८ ऑगस्टला घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेला नुकतेच दिला आहे. (Fifth and eighth standard scholarship examination now 8th August )

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा मात्र या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊ लागली होती. त्यामुळे राज्य सरकारने ही परीक्षा स्थगित केली होती. त्यानंतर एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यास सरकारने राज्य परीक्षा परिषदेला परवानगी दिली होती. परंतु याच कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गांचे प्रमाण खूप वाढले होते. त्यामुळे दुसऱ्यांदा ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. त्यानंतर २३ मे २०२१ ला ही परीक्षा ठेवण्यात आली होती. परंतु, सलग तिसऱ्यांदा कोरोनामुळे ही परीक्षा स्थगित करण्याची वेळ आली होती.

कोरोना संसर्गामुळे गेल्या शैक्षणिक वर्षातील पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अद्याप झालेली नाही. त्यातच आता १५ जून २०२१ पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची प्रक्रियाही सुरु करावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या ८ ऑगस्टमध्ये मागील शैक्षणिक वर्षातील पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यास शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परवानगी दिली आहे

The way has been cleared for class V and VIII scholarship examinations (scholarship exam2021). The exam will be held in August. Education Minister Varsha Gaikwad made the announcement in this regard

Scholarship exam 2021: इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा (scholarship exam2021) मार्ग मोकळा झाला आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.

२०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ऑगस्टमध्ये होणार आहेत. या परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.

याआधी ही परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार होती. त्यानंतर करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण करोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली.


MSCE Scholarship Exam 2021 Postpone

23मे ला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ठाकलण्यात येण्याची शक्यता

The scholarship examination for the fifth and eighth year students conducted by the Maharashtra State Examination Council has been postponed. The exam, which will be held on April 25, will now be held on May 23. The State Examination Council has issued a press release in this regard.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता 23 मे रोजी होईल. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

25 एप्रिल ऐवजी 23मे ला होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 एप्रिल दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्यानं शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे.


Pre-Upper Primary Scholarship Examination for Class V and Pre-Secondary Scholarship for Class VIII are conducted every year. The examination is conducted simultaneously in all the districts of the state. Due to the Corona crisis, the exam has been postponed for two months and will be held on April 25, 2021 instead of February 2021.

MSCE Scholarship Exam 2021 : इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ३०/०३/२०२१ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी 25 एप्रिल 2021 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल मध्ये

Scholarship Examine 2020-2021

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारीमध्ये होतात. मात्र यंदा या परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहेत.

यंदा स्कॉलरशिपची परीक्षा दोन महिने पुढे ढकलली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी साधारणत: ऑक्टोबरमध्ये सुरू होते. याच कालावधीत परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे आधीच्याच (फेब्रुवारी २०२०) परीक्षेचा निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. याबाबत ‘सकाळ’ने ऑक्टोबरमध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे आता राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.

यापूर्वी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी घेण्यात येत. मात्र यंदा (२०२०-२०२१) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्याऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्याचा प्रस्ताव असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

सौर्स : सकाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!