MSCE Scholarship – पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२२

MSCE Scholarship Result 2022

MSCE Scholarship 2022 Exam

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रूवारी – २०२२ च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत .

शिष्यवृत्ती परीक्षा – २०२२ साठी आवेदनपत्र स्विकारण्यास व शुल्काचा भरणा करण्याकरीता देण्यात आलेल्या मुदतवाढीतील अंशतः बदलाबाबत …

MSCE 5th and 8th Class Exam Results- The final results of Class V and VIII examinations conducted by the Maharashtra State Examination Council in August 2021 and the merit lists of the scholarship holders have been announced. Applicants who attend the scholarship exam may check their results from the given link.

MSCE Scholarship Results 2022- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे ५७ हजार ३३४, तर आठवीचे २३ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील इयत्ता पाचवीचे १४ हजार २५० आणि आठवीचे १० हजार ७३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असणार आहेत. (Scholarship Exam Result)

परीक्षा परिषदेच्या वतीने ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात घेण्यात आली. परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला, तर गुणपडताळणीसाठी २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइनद्वारे मागविले होते.

परिषदेने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आलेल्या परिपूर्ण अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार केला आहे. या निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम गुणपत्रकाची प्रत परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र लवकरच शाळांना पोचविण्यात येतील. तसेच, शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबत यापुढील पत्रव्यवहार त्यांच्या कार्यालयाकडे करण्यात यावा’’, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त एच.आय. आतार यांनी स्पष्ट केले.

शिष्यवृत्ती परीक्षेची सांख्यिकीय माहिती :

 • परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले विद्यार्थी : उपस्थित विद्यार्थी : अनुपस्थित विद्यार्थी : पात्र विद्यार्थी : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार टक्केवारी)
 • इयत्ता पाचवी : ३,८८,५१५ : ३,३७,३७० : ३७,८७१ : ५७,३३४ : १४,२५० : १६.९९ टक्के
 • इयत्ता आठवी : २,४४,३१४ : २,१०,३३८ : २२,८१४ : २३,९६२ : १०,७३६ : ११.३९ टक्के
 • एकूण : ६,३२,८२९ : ६,३१,०१४ : ६०,६८५ : ८१,२९६ : २४,९८६ :१४.२० टक्के

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविलेले विद्यार्थी :

*इयत्ता पाचवी :

विभाग : विद्यार्थ्याचे नाव

 • – शहरी विभाग : स्वराज चव्हाण (सी. एस. हायस्कूल वडूज, सातारा)
 • – ग्रामीण विभाग : तनिष्का गायकवाड (जिल्हा परिषद शाळा,तळेगाव, पुणे)
 • – सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : निरंजन तोरडमल (पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा)

*इयत्ता आठवी :

विभाग : विद्यार्थ्याचे नाव

 • – शहरी विभाग : श्रावणी धस (वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी, बीड)
 • – ग्रामीण विभाग : उमर शेख (नूतन एमव्ही युएमव्ही, मिरजगाव, नगर)
 • – सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : प्राजक्ता चव्हाण (विद्यानिकेतन ॲकॅडमी, नगर)

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे संकेतस्थळ मंदावले

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निकाल, गुणवत्ता याद्या पाहण्यासाठी संकेतस्थळ ओपन करण्यात येत होते. एकाच वेळी अनेकांकडून हे संकेतस्थळ सर्च होत होते.

त्यामुळे संकेतस्थळाची लिंक ओपन करूनही विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी खूप वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र पहायला मिळाले. ‘‘संकेतस्थळाला कोणतीही अडचण उद्भवलेली नाही. एकाच वेळी लाखो लोक संकेतस्थळ पाहत असावेत, म्हणून निकाल पाहण्यास काहीसा वेळ लागत असावा,’’ असे स्पष्टीकरण राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आले.


Scholarship examinations are conducted by the State Examination Council for the students of classes V and VIII. The State Examination Council has not yet announced the official results on its website. There was an atmosphere of confusion on Thursday as the results of the Class V Scholarship examination went viral even before the results. The results will be announced on Monday or Tuesday.

 • इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी निकालापूर्वीच व्हायरल झाल्याने गुरुवारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होण्यास सुरुवात झाली. मात्र ही यादी अधिकृत नसल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.
 • राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यंदा १२ ऑगस्ट रोजी पाचवीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी गुरुवारी दिवसभर व्हायरल झाली
 •  या यादीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे तसेच, शाळांचे आभार मानणारे फोनही सुरू झाले. मात्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी सावध पवित्रा घेत अद्याप आमच्याकडे अशी कोणीतीही यादी आली नसल्याचे सांगत पालकांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली
 • राज्य परीक्षा परिषदेने वेबसाइटवर अद्याप अधिकृत निकाल जाहीर झाला नसल्याचे दुपारी स्पष्ट केले. मग ही यादी व्हायरल कुठून झाली असा प्रश्न उपस्थित झाला. या परीक्षेचा तात्पुरता निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता.
 • यावर हरकत नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम निकालाची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे पेपरफुटीनंतर आता निकालही फुटू लागल्याची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती.

निकाल सोमवारी किंवा मंगळवारी

ही यादी आम्ही प्रसिद्ध केलेली नाही, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले. निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी किंवा मंगळवारी निकाल जाहीर होईल. ही यादी अधिकृत नसून पालक, विद्यार्थी, शाळांनी यावर विश्वास ठेवू नये, असेही ते म्हणाले.


MSCE Scholarship Results 2021

MSCE  Scholarship Result 2021- The interim results of the fifth and eighth scholarship examinations conducted by the Maharashtra State Examination Council have been announced. Applicants who applied for scholarships may check their results.

MSCE Pune Scholarship Result 2021- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवी आणि आठवीचा निकाल तुलनेने घटला. त्यामुळे शिक्षण विभागाने या दृष्टीने कंबर कसली असून मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम शिक्षण विभागाने जाहीर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

MSCE Exam 2022 -MSCE शिष्यवृत्ती परीक्षा या तारखेला होणार

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा इयत्ता पाचवीचा निकाल ५.१ टक्के, तर आठवीचा निकाल ६.६ टक्के इतका लागला आहे. हा निकाल समाधानकारक नसल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता वाढवण्याकरिता ‘मिशन शिष्यवृत्ती’ कार्यक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला असल्याचे अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी दिली.

यावर्षी इयत्ता पाचवीच्या एक हजार ३०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार ८९ विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये फक्त ५६ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता आठवीच्या ५१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४०५ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी फक्त २७ विद्यार्थी पात्र ठरले. ही आकडेवारी समाधानकारक नसल्याने प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेतली.

मिशन शिष्यवृत्ती

या कार्यक्रमांतर्गत महापालिका शाळातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यात येईल. तसेच यासाठी शिक्षकांचे चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील शिष्यवृत्तीत तज्ज्ञ असलेली ८ मंडळी यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. महापालिकेचे ३५० हून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक याचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्य़ांच्या ३ सराव चाचण्या महापालिकेच्या वतीने घेण्यात येतील.

सध्या २०२२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरण्याची ३१ डिसेंबर २०२१ ही अंतिम तारीख आहे.

अंतरिम परीक्षेचा निकाल येथे तपास 


MSCE Pune 8th Scholarship Result 2021

MSCE Pune Results: The interim (provisional) results of Class V and VIII Scholarship examinations conducted by the Maharashtra State Examination Council were announced on Wednesday afternoon. Students who have appeared for the exam will be able to view their personal results at www.mscepune.in or www.mscepuppss.in. The exam was held on 12th August 2021 at all the centers in the state except Mumbai.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवीचे १६.९९ टक्के आणि पूर्व माध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. एकूण १४.८४ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत

ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला वैयक्तिक निकाल www.mscepune.in किंवा www.mscepuppss.in या संकेतस्थळांवर पाहू शकतील. मुंबई वगळता राज्यातील अन्य केंद्रावर या परीक्षेचे १२ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजन करण्यात आले होते.

दृष्टीक्षेपात निकाल –

इयत्ता पाचवी –

 • परीक्षेला उपस्थित विद्यार्थी – ३,३७,३७०
 • पात्र विद्यार्थी – ५७३३२
 • पात्रतेची टक्केवारी – १६.९९

इयत्ता आठवी –

 • परीक्षेला उपस्थित विद्यार्थी – २१०३३८
 • पात्र विद्यार्थी – २३९६२
 • पात्रतेची टक्केवारी – ११.३९

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २४ नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरता ५० रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाईल.

अंतिम निकाल कधी?

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण इत्यादी दुरुस्तीसाठी ५ डिसेंबर पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज पाठवल्यास तो स्वीकारला जाणार नाही. या मुदतीत ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगइनमध्ये ३० दिवसांपर्यंत कळवण्यात येईल. हे सर्व अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.


The results of the scholarship examination held on August 12 in all the districts except Mumbai are likely to be announced soon. Though the examination in Mumbai district has not been planned yet, the State Examination Council has started the process of results.

मुंबई वगळता इतर जिल्ह्यात १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई जिल्ह्यातील परीक्षेचे नियोजन अद्याप झाले नसले, तरी राज्य परीक्षा परिषदेने निकालाची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठीची अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. दोन सप्टेंबरपर्यंत त्यासाठीच्या त्रुटी व आक्षेप नोंदविता येणार आहेत. त्यानंतर अंतिम उत्तरसूचीसह निकालप्रत तयार करण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे परिषदेने सांगितले.

MSCE Pune Scholarship – 5th & 8th Class शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची जाहीर !!

वर्षभरापासून या परीक्षेची तयारी केल्यानंतर पुढील वर्गात प्रवेशित झाल्यावरही मागील अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा दिल्याने विद्यार्थ्यांची खरी ‘कसोटी’ पाहिली गेली. त्यामुळे या परीक्षेचा निकाल आणि गुणवत्ता यादी केव्हा जाहीर होते. याकडे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. करोना संसर्गामुळे परीक्षा लांबल्याने यंदा या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यास उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित केले जाणार नाही. पात्र किंवा अपात्र या स्वरूपात निकाल जाहीर होईल. त्यानुसार प्रत्येक पेपरमध्ये ४० टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरतील. या पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.


MSCE Pune 8th Scholership Answer Key 2020

MSCE 8th Scholership Exam : Maharashtra State Examination Council, Pune has conducted scholership examination for 8th Standard on 16th February 2020. Now MSCE has published a notification for Interim Answer key. Candidates who are appeared for this exam can check their answer keys from given link and if they have any objection in answer key can raise their objection before 13th March 2020 from the given link:

CHECK 8th SCHOLERSHIP EXAM ANSWER KEY

MSCE 8th Scholership Exam 2020 Answer Key

8th SCHOLERSHIP EXAM ANSWER KEY NOTICE


MSCE Pune 8th Scholarship Result 2019

MSCE Pune 8th Scholarship Result 2019  available Now  on 16th March 2019. The Students will able to Check your Online results from this page. By Entering the Roll Number You will able to Check the Online Result of Class 8th From this page. MSCE Pune 4th, 8th Class Results 2019 are published Today.

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी-२०१९ प्रकाशित झालेलं असून खाली दिलेल्या लिंक्स वरून आपण बघू शकता. खालील result section लोड व्हायला वेळ लागू शकतो, कृपया प्रतीक्षा करा..

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!