MSRTC Ahmednagar Bharti- एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागामध्ये 120 पदे रिक्त

MSRTC Ahmednagar Recruitment 2022

MSRTC Ahmednagar Bharti 2022: ST Corporation recruited for the posts of driver cum carrier last few years. Accordingly, some posts were recruited in the district before 2019 and 56 posts in 2019. Accordingly, 120 posts of driver cum carrier are now filled in the district. But due to Corona this recruitment was suspended. Read More details about MSRTC Ahmednagar Bharti 2022 are given below.

एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागामध्ये 120 पदे रिक्त

MSRTC Ahmednagar Recruitment 2022: काटकसर करण्यासाठी एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षापूर्वी चालक कम वाहक या पदांवर भरती केली. त्यात एकच व्यक्ती बस चालवण्यासह वाहकाचे म्हणजेच तिकीट काढण्याचेही काम करेल, अशी ही संकल्पना होती.. त्यानुसार जिल्ह्यात २०१९ पूर्वी काही व २०१९ मध्ये ५६ पदांची भरती करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात आता चालक कम वाहक अशी १२० पदे भरलेली आहेत.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

वाहकाविना एसटी बसमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, रोजगारनिर्मितीच्या विरोधात हे धोरण आहे, असा आरोप करत एसटी वाहकचालक व प्रवासी संघटनांनी या धोरणास प्रारंभी विरोध केला. एसटीच्या खासगीकरणाच्या दिशेने जाणारे हे धोरण आहे. ते रद्द करा किंवा सुधारणा करा, अशी मागणी एसटी कामगारांनी केली. मात्र, त्यावर पुढे काहीही झाले नाही. याच धोरणानुसार २०१९ मध्ये जी पदभरती झाली. त्यानुसार नगर जिल्ह्यात ५६ चालक कम वाहक पदांची भरती झाली. त्यामुळे सद्य:स्थितीत चालक कम वाहक पदांची संख्या १२० झाली आहे.

MSRTC Ahmednagar Bharti 2022

इतर जिल्ह्यात पदभरती रखडली –

  • २०१९ मध्ये चालक कम वाहक पदांची मोठी भरती महामंडळाने जाहीर केली होती. परंतु, पदांची जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागविण्यासह इतर प्रक्रियेत बराच वेळ गेला. त्यात मार्च २०२० उजाडले व पुढे कोरोनामुळे ही भरतीच स्थगित झाली.
  • पुढे दोन वर्षे कोरोना स्थिती होती. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांनी बराच काळ संप केला. पुढे एसटी रुळावर येण्यास सुरुवात झाली. मात्र, राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत एसटीची ही भरती अजूनही रखडलेलीच आहे. मात्र, नगर जिल्ह्यात ५६ पदांची भरती प्रक्रिया तेव्हाच उरकली व पूर्णही झाली.

प्रत्येकजण म्हणतोय, माझ्याकडे माहिती नाही… –

एसटीच्या सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालयातील कामकाज सरकारी नियमाप्रमाणे कसे तंतोतंत चालते, याची प्रचिती मंगळवारी आली. जिल्ह्यात २०१९ मध्ये चालक कम वाहक या पदावर किती पदांची भरती झाली, याची माहिती अख्ख्या विभागीय कार्यालयात कोणाकडेच मिळाली नाही. विभाग नियंत्रकांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, कामगार अधिकाऱ्यांकडून घ्या. कामगार अधिकारी म्हणाले, कार्यालयातील आस्थापना लिपिकाकडून घ्या.

लिपिक म्हणाले, माझ्याकडे माहिती नाही. संबंधित लिपिक कोटाच्या कामासाठी औरंगाबादला गेले, त्यांच्याकडून घ्या. त्यांना फोन केला तर ते म्हणाले, माझ्याकडे नाही, कार्यालयात आल्यावर देतो. म्हणजे एखादा लिपिक रजेवर असेल तर तो येईपर्यंत त्या टेबलची माहिती विभागीय नियंत्रकालाही मिळू शकणार नाही, असा काटेकोर कारभार या कार्यालयाचा आहे.

1 Comment
  1. Vishal Dattatraya jadhav says

    Driver

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!