MSRTC Beed Bharti-एसटी महामंडळाच्या बीड विभागामध्ये ७० पदे रिक्त
MSRTC Beed Bharti 2022
MSRTC Bharti 2022: Beed division needs 70 drivers, In 2017, the State Transport Corporation had recruited drivers, carriers. After that, in 2019, the carrier cum drivers were recruited. In MSRTC Beed there is 941 drivers are working in Beed division, while 1069 are carriers. Beed State Transport Corporation will be recruiting 70 posts soon. Read More details as given below.
एसटी महामंडळाच्या बीड विभागामध्ये ७० पदे रिक्त
बीड राज्य परिवहन महामंडळाने २०१७ मध्ये चालक, वाहकांची भरती केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये वाहक कम चालकांची भरती केली होती. दुष्काळग्रस्त भागासाठी ही भरती योजना राबविली होती. यात बीड विभागाचा समावेश नव्हता. परंतु, विविध कारणांमुळे चालकांच्या जागा रिक्त असल्याने प्रवासी सेवा देताना व्यवस्थापन आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत आहे. त्यानंतर कर्मचारी संपामुळे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी चालक भरतीचा निर्णय झाला. सध्या कंत्राटी चालक करारानुसार कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
MSRTC Beed Recruitment 2022
बीड विभागाला ७० चालकांची गरज
रापमच्या बीड विभागात ९४१ चालक कार्यरत आहेत, तर १०६९ वाहक आहेत. वाहकांच्या तुलनेत चालकांची संख्या कमी आहे. येत्या कालावधीत जर भरतीचा निर्णय झाला तर ७० जागांचा विषय भरती कार्यवाहीसाठी पटलावर येऊ शकतो.