MSRTC Dhule- ST महामंडळ धुळे येथील चालक-वाहक सरळसेवा भरती प्रक्रिया रखडली
MSRTC Dhule Recruitment 2022
MSRTC Dhule Bharti 2022: Dhule Maharashtra State Transport Corporation had announced the driver-carrier direct service recruitment 2019 year. Through this recruitment process, a written examination was conducted. But candidates still not got the job. Read More details regarding MSRTC Dhule Bharti 2022/ MSRTC Dhule Recruitment 2022 are given below.
ST महामंडळ धुळे येथील चालक-वाहक सरळसेवा भरती प्रक्रिया रखडली
ST Mahamandal Dhule Bharti 2022
धुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती २०१९ यावर्षी जाहीर केली होती. या भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली. कागदपत्रांची छाननी करण्यात आली. अनेकांची वैद्यकीय तपासणीही झाली. मात्र अद्यापही नोकरी मिळाली नाही.
चालकवाहकांची भरती लटकली
धुळे जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, साक्री, दोंडाईचा, शिंदखेडा असे पाच आगार आहेत. धुळे जिल्ह्यातूनही अनेक उमेदवारांनी चालकवाहक पदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र अजुनही यापैकी बहुतांश जणांना नोकरी मिळालेली नाही. या उमेदवारांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली आहेत.
सेवेसाठी उमेदवार तयार
इतर शासकीय विभागापेक्षा एसटीमध्ये पगार काहीसे कमी आहेत. असे असतांनाही अनेक उमेदवारांनी चालक-वाहक पदासाठी अर्ज केलेले आहेत. लेखी परीक्षा होऊनही अद्याप त्यांना संधी मिळाली नाही. महामंडळात सेवेसाठी अनेक उमेदवार तयार आहेत.
लेखी परीक्षा च नाहीतर यांची चालक वाहक चाचणी सुद्धा झालेली आहे यांचे फक्त एम ई ओ टेस्ट बाकी आहे