MSRTC Parbhani Bharti -एसटी महामंडळ परभणी विभागात पात्र उमेदवारांची भरती रखडली
ST Mahamandal Parbhani Bharti 2022
MSRTC Parbhani Bharti 2022: In MSRTC Parbhani there is a total of 203 vacancies are still vacant. Advertisement was released for 203 posts under Parbhani Divisional Controller Office in the district. However, due to the transfer of power in the state after Corona, the recruitment of qualified candidates has been suspended. Read More details MSRTC Parbhani Recruitment 2022/ MSRTC Parbhani Bharti 2022 are given below.
परभणी जिल्हातील सर्व नवीन जॉब्स येथे पहा
एसटी महामंडळ परभणी विभागात पात्र उमेदवारांची भरती रखडली
परभणी एसटी महामंडळ प्रशासनाने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत २०३ जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. मात्र, कोरोनानंतर राज्यातील सत्तांतरामुळे पात्र उमेदवारांची भरती लटकली आहे.
२०३ चालकवाहकांची भरती लटकली
२०१९ मध्ये वाहक कम चालकांची भरती परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी या आगारांसाठी करण्यात आली होती. त्यासाठी २०३ जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यातील १९३ जणांची निवड करण्यात आली. ५२ जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते.
किती वर्षे वाट पाहणार ?
विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारांसाठी १९३ उमेदवारांची निवड करण्यात आली. मात्र या उमेदवारांना अद्यापही पदस्थापना देण्यात आलेली नाही.