Nagpur Mental Hospital Recruitment 2016

Nagpur Mental Hospital Recruitment 2016

Nagpur Mental Hospital Recruitment 2016 is expected to starts soon. There will be total 103 vacancies under this recruitment process. Large number of candidates are waiting for Nagpur Manorugnalaya Hospital. More details given below in Marathi.

नागपूर येथील प्रादेशिक मनोरु ग्णालयातील मंजूर ३७५ पदापैकी १0३ पदे रिक्त आहेत. यात ‘ड’ वर्गातील ७५ तर ‘क’ वर्गातील १८ पदांचा समावेश आहे. रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
सदस्य माणिकराव ठाकरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. शासकीय अनास्थेमुळे नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सुविधांचा अभाव आहे. या रग्णालयासाठी सरकारकडून वर्षाला जेमतेम पाच लाख रुपये अनुदान मिळते. ही रक्कम तुटपुंजी आहे. यातून रुग्णांना सुविधा मिळणे शक्य नाही. यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे ठाकरे यांनी निदर्शनास आणले.
नागपूरचे मनोरुग्णालय जुने आहे. त्याचा एक इतिहास आहे. या रुग्णालयात नोव्हेंबर २0१५ अखेर १६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. २00९ सालापासून बाह्यरुग्णांना डे केअर सेंटरमध्ये समुपदेशन, व्यावसायिक प्रशिक्षण, मार्गदर्शन व सल्ला देण्याचा उपक्रम सुरू२ करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली. तसेच मनोरुग्णांना योगा प्रशिक्षण व बागकाम, शेतीकाम, विणकाम, पाकिटे बनविणे अशा व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. मनोरुग्णांवर विविध पद्धतीने उपचार केले जातात. अशी माहिती सावंत यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!💬