Nashik Fire -महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरती जानेवारी महिन्यात

Nashik Fire Brigade Bharti 2023 Apply Here

Nashik Fire Brigade Bharti 2023 updates

Nashik Municipal Corporation has cleared the way for recruitment in Fire Brigade department.  The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has prepared for the recruitment of fire and medical department vacancies, and it is likely that the recruitment process will  start in the first week of January.

 1. अग्निशमन व वैद्यकीय विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेचा एकमेव प्रस्ताव सादर झाल्याने याच संस्थेमार्फत भरती केली जाणार असून, साधारण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया सुरू होईल.
 2. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्त पदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे. मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही.
 3. मात्र, राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते.
 4. त्यातील आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला नाही. त्यामुळे आयबीपीएस संस्थेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
 5. “अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला असून, यामार्फतच भरती प्रक्रिया राबविली जाईल.”

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Nashik महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरती जानेवारी महिन्यात

 1. अग्निशमन व वैद्यकीय विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) संस्थेने तयारी दर्शवली असून, यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होऊन जानेवारी महिन्यात नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.
 2. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्तपदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे.
 3. मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही, मात्र राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते. त्यातील आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे.
 4. सदर संस्थेने नाशिक महापालिकेला प्रस्ताव दिला असून, या प्रस्तावाचा अभ्यास प्रशासनाच्या मार्फत सुरू आहे. पुढील आठवड्यात आयबीपीएस संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, टीसीएस कंपनीनेदेखील प्रस्ताव दिल्यास या मार्फतदेखील विचार होणार आहे. दोन्ही संस्थांमार्फत रिक्त पदांची भरती होईल किंवा महापालिकेला परवडेल, अशा एकाच संस्थेच्या माध्यमातून भरती होईल. जानेवारी महिन्यात रिक्त जागा भरल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 5. “अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या टीसीएस व आयबीपीएस या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यातील आयबीपीएस संस्थेने प्रस्ताव स्वीकारला आहे.

Nashik Fire Department 2022- The urban development department has cleared the way for the recruitment of 706 posts including 348 posts in fire department and 358 posts in health and medical department. The state government had not given instructions regarding the organization through which the recruitment of these posts should be done.

महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीची प्रक्रियेला प्रशासनाने गती दिली आहे.

राज्य सरकारने नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ तसेच ‘आयबीपीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत नोकरभरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर प्रशासनाने या दोन कंपन्यांकडून नोकरभरती संदर्भातील प्रस्ताव मागितला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडून विभागाकडून दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या कंपन्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर एक कंपनी महापालिकेकडून अंतिम केली जाणार आहे.

असा आहे मंजुरीचा प्रवास

शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत होती. परंतु, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली. दुसरीकडे सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती.

अखेर नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केल्याने नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने या पदांची भरती कोणत्या संस्थेमार्फत करावी यासंदर्भातील निर्देश दिले नव्हते.

परंतु, टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्विसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला गेला. यानंतर महापालिकेने या दोन्ही कंपन्यांना मंगळवारी (दि. २९ नोव्हेंबर) पत्र पाठवून त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भातील पदनिहाय सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिल्याने या भरती प्रक्रियेला चालना मिळाली.

राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिकेकडून टीसीएस, आयबीपीपीएस या कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर प्रस्ताव मागवण्यात आले असून, त्यानंतर एक कंपनीची भरतीसाठी निश्चिती केली जाईल.

महापालिकेत पदांची आकडेवारी…

 • ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदे : ७,०८२
 • सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्तपदे : २,६०० च्या वर
 • सद्य:स्थितीत कार्यरत अधिकारी, कर्मचारी : ४,५००

Nashik Fire Brigade Bharti 2022: Latest updates regarding about Nashik Fire Brigade Recruitment 2022 is that 706 fireman posts vacant in fire department of Nashik Municipal Corporation are getting approval. These vacancies will be filled soon. Nashik Municipal Corporation has decided to do this recruitment through third TCS & IPBS The recruitment process for a total of 706 posts including 348 in the fire department and 358 in the health and medical department of the municipal corporation will be started within 15 days.. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Fire Brigade Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नाशिक महापालिकेच्या अग्निशामक आणि आरोग्य विभागात बंपर भरती; १५ दिवसात भरती

राज्य सरकारने या भरतीसाठी टीसीएस, तसेच आयबीपीपीएस या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीकडून भरती करण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे. यासोबतच उर्वरित दोन हजार पदासांठी नगरविकास विभागात प्रलंबित सेवा प्रवेश नियमावलीबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत आता नोकरभरतीचा बिगुल वाजला आहे.

नाशिक शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची गरज असताना गेल्या चोवीस वर्षांपासून महापालिकेत नोकरभरती झालेली नाही. महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७,०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार निवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या २,६०० वर गेली आहे.

महापालिकेत सद्य:स्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला आहे. सरकारच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे. मात्र, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागांतील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली होती. मात्र, २०१७ पासून महापालिकेची सेवाप्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती.

अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशामक विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवाप्रवेश नियमावली मंजुर केली होती. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. राज्य सरकारने या पदांची भरती कोणत्या संस्थेमार्फत करावी, या संदर्भातील निर्देश दिले नव्हते. त्यानंतर सरकारने राज्यातील सर्व भरतीप्रक्रिया आयबीपीपीएस किंवा टीसीएसमार्फत करण्याचा निर्णय घेतला असून, त्या संदर्भातील पत्र महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

टीसीएस किंवा आयबीपीपीएसमार्फत भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब , क, ड या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धापरीक्षा प्रक्रिया टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासननिर्णय निर्गमित केलेला आहे. हा आदेश मंग‌ळवारी (दि. २३) महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे महापालिका या ७०६ पदांसाठीच्या नोकरभरतीसाठी या दोन संस्थांपैकी एका संस्थेची निवड करणार आहे.

दोन हजार पदांसाठीही भरतीप्रक्रिया

सद्य:स्थितीत ७०६ पदांची भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार असून, उर्वरित दोन हजार पदांसाठीही प्रलंबित असलेल्या सेवाप्रवेश नियमावलीबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. या संदर्भात १५ दिवसांची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित दोन हजार पदांच्या भरती प्रक्रियेलाही गती येणार असल्याचे चित्र आहे.

महापालिका क्षेत्रातील रिक्त पदे सरळसेवेने भरताना स्पर्धापरीक्षा प्रक्रिया टीसीएस, आयबीपीपीएस या कंपन्यांमार्फत राबविण्याबाबत शासननिर्णय निर्गमित होऊन तो महापालिकेला प्राप्त झाला आहे. या शासननिर्णयाच्या अनुषंगाने व आयुक्तांच्या निर्देशानुसार नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येईल.


Nashik Municipal Corporation has cleared the way for recruitment in Fire Brigade department. Work pressure has increased on the manpower available in the Nashik Municipal Corporation. The government approved the recruitment of some posts in the health-medical, fire department after following up the administration to recruit the officers and employees of health-medical, fire-fighting, technical departments with minimum essential services. Last year, the government sanctioned 875 new posts related to essential services including health-medical, fire fighting, following the follow-up of the Nashik Municipal Corporation. But, due to increasing establishment costs, the recruitment of these posts could not be approved. 348 posts were sanctioned for recruitment excluding the establishment cost condition. However, the recruitment of these posts was also stalled due to non-approval of service entry rules. Now, if the rules are approved, the pending issue of recruitment in the municipal corporation will also be resolved. Read the more details given below and keep visit us for the further updates.

अग्निशमन विभागातील 348 फायरमन भरतीचा मार्ग मोकळा

वैद्यकीय, अग्निशमनची भरती होणार : 
महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर शासनाने गेल्यावर्षी आरोग्य-वैद्यकीय, अग्निशमनसह अत्यावश्यक सेवेशी संबंधित ८७५ नवीन पदांना मंजुरी दिली होती. परंतु, वाढत्या आस्थापना खर्चामुळे या पदांच्या भरतीला मंजुरी मिळू शकलेली नव्हती. आस्थापना खर्चाची अट वगळून भरतीसाठी ३४८ पदांना मंजुरी दिली गेली. परंतु, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे या पदांचीही भरती रखडली होती. आता नियमावली मंजूर झाल्यास महापालिकेतील नोकरभरतीचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लागू शकणार आहे.

महापालिकेतील सेवा प्रवेश नियमावलीचा प्रस्ताव २०१७ पासून शासन दरबारी प्रलंबित आहे. सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळेच महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाच्या प्रस्तावाला शासनाने अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. त्यामुळे नोकरभरतीला मान्यता मिळू शकलेली नाही. नाशिक महापालिकेचा ‘ब’ संवर्गात समावेश होऊन आता बरीच वर्षे उलटल्यानंतरही क संवर्गातील आस्थापन परिशिष्ट कायम आहे. त्यातही या परिशिष्टातील विविध संवर्गातील ७, हजार ९२ मंजूर पदांपैकी अधिकारी, कर्मचाऱ्यांची २,६०० हून अधिक पदे सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीसह विविध कारणांमुळे रिक्त आहेत. मनपात सद्यस्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या आस्थापना खर्चाचे कारण देत महापालिकेतील नोकरभरतीला शासनाकडून मंजूरी दिली जात नव्हती. किमान अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य-वैद्यकीय, अग्निशामक, तांत्रिक संवगार्तील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती व्हावी, यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केल्यानंतर आरोग्य-वैद्यकीय, अग्निशमन विभागातील काही पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली. मात्र ही भरतीदेखील सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे अडखळली. सेवा प्रवेश नियमावलीच्या प्रलंबित प्रस्तावाला प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे आता चालना मिळाली आहे. या प्रस्तावाची नगरविकास विभागाकडून छाननी सुरू झाली आहे. प्रस्तावातील काही त्रुटींबाबत नगरविकास विभागाकडून महापालिकेला विचारणा झाली होती. त्यामुळे पालिकेतील आस्थापना विभागातील प्रतिनिधीने बुधवारी(दि.२८) मंत्रालयात हजेरी लावत आवश्यक माहितीचे सादरीकरण केले. त्यामुळे शासनाकडून सेवा प्रवेश नियमावली लवकरच मंजूर केली जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रलंबित नोकरभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.


Nashik Fire Brigade Bharti 2022: Latest updates regarding about Nashik Fire Brigade Recruitment 2022 is that 208 fireman posts vacant in fire department of Nashik Municipal Corporation are getting approval. These vacancies will be filled soon. Nashik Municipal Corporation has decided to do this recruitment through third party. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Fire Brigade Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

अग्निशमन विभागातील २०८ फायरमन भरतीचा मार्ग मोकळा

महापालिकेच्या रखडलेल्या नोकरभरतीस शिंदे-फडणवीस सरकारने हिरवा कंदील दाखविला असून, पहिल्या टप्प्यात अतितातडीचे म्हणून अग्निशमन विभागातील २०८ फायरमनच्या भरतीचा शासनाने मार्ग मोकळा केला आहे. या पदासाठी आवश्यक असलेल्या सेवा प्रवेश नियमावली तसेच आरक्षण बिंदू नामावलीस नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून, ही भरती थर्ड पार्टीमार्फत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार भरतीकरता मनपाने टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या संस्थांना पत्र पाठवून भरती करण्याबाबत विचारणा केल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. त्यामुळे महापालिकेतील बहुप्रतिक्षित नोकरभरतीचा बिगूल वाजला आहे.

Nashik Fire Brigade Bharti 2022

 •  नाशिक शहराचा विस्तार वाढत असल्याने तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अग्निशमन दल सुसज्ज करण्यासाठी नोकरभरती करणे आवश्यक आहे.
 • महापालिकेत गेल्याने पंधरा ते वीस वर्षांपासून कुठल्याही प्रकारची सरळ सेवेने कायमस्वरूपी नोकरभरती झालेली नाही. महापालिकेत ‘क’ वर्ग संवगार्तील मंजूर पदांची संख्या ७,०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्तपदांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे.
 • सद्यस्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे.
 • कोरोनाकाळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन या महत्वाच्या विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजूरी दिली होती. परंतु, मनपाची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने भरतीप्रक्रिया रखडली होती.

Nashik Fire Department Bharti 2022: As per latest information regarding the Nashik Fire department is that 209 Fireman Posts Vacant in Nashik Fire Brigade. However, since there is no recruitment, drivers from other departments of the Municipal Corporation have been appointed for the past many years. Therefore, the fire department is facing many problems due to the lack of permanent driver. Read More details regarding Nashik Fire Brigade Recruitment 2022/ Nashik Fire Brigade Bharti 2022 are given below.

नाशिक अग्निशामक दलात २०९ फायरमन पदे रिक्त

Nashik Fire Brigade Bharti 2022: राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन या पदासह विविध संवर्गांतील पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार भरतीसाठी मनपा प्रशासनाकडून तयारी सुरू असतानाच, मनपा आयुक्त रमेश पवार यांची दांडी उडाल्याने या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत गरजेची असून, याबाबत नूतन आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

Fire Department – मुंबई अग्निशमन दलामध्ये ९०२ फायरमन भरती पुढील महिन्यात

Pune Fire Brigade Bharti-पुणे अग्निशामक दलात भरती प्रकिया सुरू; 1 हजार 700 जवानांची गरज

 • राज्य शासनाने फायरमन, लीडिंग फायरमन, सबऑफिसर, चालक यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर या पदांसाठी सध्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त आणखी जागा नव्याने मंजूर केल्या आहेत.
 • या मंजूर पदांपैकी फायरमन या पदाकरिताच सेवा प्रवेश नियमावली मंजूर असल्याने या पदांसाठी भरती करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली. फायरमन या संवर्गाच्या सध्या आस्थापनेवर 151 जागा असून, नव्याने 148 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.
 • परंतु, सध्या केवळ 90 फायरमन असून, 209 जागा रिक्त आहेत. यासंदर्भातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.
 • त्यासाठी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्यासमोर प्रस्ताव सादर करण्यात आला. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्याकरिता एजन्सीची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • त्यानुसार प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच, राज्य शासनाकडून रमेश पवार यांची उचलबांगडी करण्यात आली आणि भरती प्रक्रियेचा प्रस्तावही अधुराच राहिला.
 • आता नवनियुक्त आयुक्त याबाबत काय आणि कशी भूमिका घेतात, यावरच फायरमन पदाच्या भरतीची दिशा ठरणार आहे.

 इतर विभागांचेच वाहनचालक 

राज्य शासनाने अग्निशमन विभागासाठी नव्याने 98 चालक यंत्रचालकाची पदे मंजूर केली आहेत. परंतु, भरतीच नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील इतर विभागांतील वाहनचालकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी वाहनचालक नसल्याने अग्निशमन विभागाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच वायरलेस ऑपरेटरची सहा पदेही शासनाने मंजूर केलेली आहेत.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
 1. Sunil more says

  Fireman good job

 2. Aakash Mahale says

  Ok

 3. Admin says

  नाशिक अग्निशामक दलात २०९ फायरमन पदे रिक्त

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!