Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2020
Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2020
नाशिक महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी भरती
Nashik Mahanagarpalika Recruitment 2020 : There were 5000 seats are vacant for Safai Kamgar in Nashik Mahanagarpalika. As per the news the Nashik Mahanagarpalika decided to recruiting 700 safai karmchari very soon through the outsourcing process. Read the complete details carefully given below :
Nashik Mahanagarpalika Bharti 2020
नाशिक : शहरात स्वच्छता करण्यासाठी लोकसंख्येनुसार पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना, सध्या सतराशे कर्मचाऱ्यांवर सफाई केली जात आहे. पालिकेने आऊटसोर्सिंद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला असला तरी, तो न्यायालयात अडकून पडला आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात नियमित साफसफाईसाठी दोन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करावी अशी मागणी शहरातील तीनही आमदारांसह महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी, आमदार अॅड. राहुल ढिकले, सिमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे उपस्थित होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात स्वच्छता व जंतुनाशक फवारणी नियमित होणे आवश्यक आहे. सध्याच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. आऊटसोर्सिंगने ७०० सफाई कर्मचारी भरती प्रक्रियेस उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी शासनाच्या सचिवांशी चर्चा करून किमान दोन महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने कर्मचारी तातडीने भरावे, लॉकडाऊन मुळे नाशिक मध्ये नागरिकांना औषधे व जीवनावश्यक वस्तू घेण्यात अडचणी येत असल्याने महापालिकेने मोबाईल अॅप्लिकेशन तयार करून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची संपूर्ण नावे व त्यांच्या फोन नंबर अॅपवर द्यावा. शहरातील भाजी मार्केट मध्ये सामाजिक आंतर पाळणे, भाजीपाला हाताळताना संसर्ग होऊ नये तसेच पैशाची देवाण-घेवाण करताना संसर्ग होऊ नये यासाठी पेटीएम क्रेडिट कार्डची सुविधा वापरावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
सौर्स : मटा
[email protected]
10pass
Email:[email protected]
Add:- Lili apt flat no 4 Shanti park upnagar takali road nashik-06