NATA 2020 आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
NATA 2020 Admit Card
NATA 2020 आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
NATA 2020 Admit Card download: काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरने नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चे प्रवेश पत्र (Admit Card) उपलब्ध केले आहेत. CoA चे अधिकृत संकेतस्थळ nata.in वरून हे अॅडमिट कार्ड विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येतील. ही परीक्षा २९ ऑगस्ट रोजी होत आहे. देशाच्या विविध संस्थांमधील बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चे आयोजन केले जाते.
काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) तर्फे ही परीक्षा घेण्यात येते. NATA (National Aptitude Test in Architecture) एकदा स्थगित करण्यात आली आहे. सध्या तरी या परीक्षेची नवी तारीख २९ ऑगस्ट २०२० आहे. कोविड – ९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ए आणि बी दोन्ही परीक्षा ऑनलाइन होणार आहेत.
२९ ऑगस्ट रोजी दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. पहिलं सत्र सकाळी १० ते १२ आणि दुसरं सत्र दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत होईल. NATA 2020 चा निकाल ३ सप्टेंबर २०२० रोजी जाहीर होईल.
प्रवेश पत्र डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यावरील छायाचित्र आणि स्वाक्षरी खराब होणार नाही, फाटणार नाही याची काळजी घ्यावी. अशा स्थितीतील प्रवेश पत्रांसह परीक्षेला प्रवेश दिला जाआर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड काळजीपूर्वक ठेवावे.
आर्किटेक्चर प्रवेशासाठी बारावी गुणांची अट शिथील
यावर्षी आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेत किमान गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. बारावीत वरील विषयांसह केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) या विषयांसह उत्तीर्ण केली आहे आणि १० + ३ स्कीममध्ये गणितासह डिप्लोमा केला आहे, ते सर्व विद्यार्थी २०२०-२१ मध्ये बीआर्क कोर्सेसना प्रवेश घेण्यास पात्र आहेत.
सोर्स: मटा
Sr plzplzplz information degy