NATA FIRST TEST 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

NATA Results 2020

NATA FIRST TEST 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चा निकाल जाहीर झाला आहे.

NATA FIRST TEST 2020: काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) ने नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल CoA च्या अधिकृत संकेतस्थळावर nata.in वर उपलब्ध आहे.

दुसऱ्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन विंडो येत्या दोन दिवसात सुरू होत आहे. दुसऱ्या NATA 2020 टेस्टसाठी उमेदवारांना ६ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

निकालात पुढील मुद्दे दिसणार आहेत –

१) परीक्षेच्या प्रत्येक विभागातील २०० पैकी गुण
२) उत्तीर्ण / अनुत्तीर्ण

CBSE दहावी, बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर

NATA 2020 परीक्षेतील पात्र गुण (क्वालिफाइंग मार्क्स) पुढील नियमांवर आधारित असणार आहेत –

१) पार्ट ए मध्ये १२५ पैकी किमान ३२ गुण आवश्यक
२) पार्ट बी मध्ये ७५ पैकी किमान १८ गुण आवश्यक
३) परीक्षेनंतरच्या स्टॅटेस्टिक्सवर एकून पात्र गुण (२०० पैकी) अवलंबून असणार आहेत.

वरील तिन्ही नियम पूर्ण केल्याशिवाय उमेदवार NATA 2020 पात्र ठरू शकत नाही. NATA 2020 चे गुण केवळ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

NATA च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

नोंदणीच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!