NCB Recruitment 2022
NCB Bharti 2022
Narcotics Control Bureau Bharti 2022
NCB Recruitment 2022: Narcotics Control Bureau has issued the notification for the recruitment of Special Associate Advocate Posts. Job Location for these posts in Mumbai, Thane, Ahmednagar, Vasai, Nagpur, Nashik, Panvel, Nanded and Aurangabad. All Desired and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 12th August 2022. More details about NCB Recruitment 2022/ Narcotics Control Bureau Recruitment 2022 like application and application address are given below.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विशेष सहकारी वकील पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑगस्ट 2022 पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
- शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
- पदाचे नाव – विशेष सहकारी वकील
- नोकरी ठिकाण –मुंबई, ठाणे, अहमदनगर, वसई, नागपूर, नाशिक, पनवेल, नांदेड आणि औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
Narcotics Control Bureau Bharti 2022 |
|
👉 Department (विभागाचे नाव) | Narcotics Control Bureau |
⚠️ Recruitment Name |
NCB Vacancy 2022 |
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms |
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://narcoticsindia.nic.in/ |
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Special Associate Advocate | — |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
Degree in Law |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 12th August 2022 |
Important Link of Narcotics Control Bureau Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
NCB Recruitment 2022- According to NCB sources, the NCB has proposed recruitment of 3,000 new officers to the Union Home Ministry; However, the Home Ministry has given the green light to the recruitment of 1800 of these officers and now the formality of sealing the Union Finance Ministry is pending. The recruitment will also include Deputy Director and Assistant Director level officers. More details regarding NCB Recruitment 2022 are given below.
NCB मध्ये लवकरच मोठी भरती निघणार; 1800 जागांना मंजुरी
गेल्या तीन वर्षांत देशात अमली पदार्थांच्या व्यवहारांत लक्षणीय वाढ झाली असून, या वाढत्या व्यवहारांना चाप लावण्यासाठी एनसीबीमध्ये (NCB) लवकरच १८०० नव्या अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
सध्या देशात एनसीबीचे अवघे ११०० अधिकारी असून, या भरतीमुळे अमली पदार्थ विरोधी कारवायांसाठी एनसीबीला(NCB) मोठे बळ मिळणार आहे.
एनसीबीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नशामुक्त भारत’ मोहिमेसाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली असून, याच अनुषंगाने एनसीबीमध्ये(NCB) मनुष्यबळाची कमतरता असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तीन हजार नव्या अधिकाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव एनसीबीने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला; मात्र यापैकी १८०० अधिकाऱ्यांच्या भरतीला गृहमंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून, आता केंद्रित वित्तमंत्रालयाच्या शिक्कामोर्तबाची औपचारिकता बाकी आहे. या भरतीमध्ये उपसंचालक आणि सहायक संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही भरती होणार आहे.
देशातील अंमली पदार्थ व्यवहारांचा पॅटर्नही मोठ्या प्रमाणात बदलत असून, आजवर प्रामुख्याने अमली पदार्थांची तस्करी ही समुद्रकिनारी वसलेल्या शहरांतून होत असायची; मात्र आता अमली पदार्थांच्या व्यवहाराने अजमेर, अमृतसर, भुवनेश्वर, देहरादून, गोवा, हैदराबाद, मदुराई, मंडी, रायपूर, रांची, कोची अशा प्रथम व द्वितीय श्रेणी शहरांतूनही आपले हातपाय मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. याला पायबंद घालण्यासाठी प्रामुख्याने या अधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार असल्याचे समजते.
तीन वर्षांत १८८१ कोटींचे अमली पदार्थ
- २०१८ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत देशभरात सुमारे १८८१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत
- या छाप्यांत ३५ लाख किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
Abhay Manjela nishakhalkho