NCHMCT हॉटेल मॅनेजमेंट जेईईचा निकाल जाहीर!

नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटच्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात NCHMCT JEE चा निकाल जाहीर झाला आहे.

NCHMCT JEE Result 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटच्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात NCHMCT JEE चा निकाल जाहीर केला आहे. हॉटेल मॅनेजमेंट सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर nchmjee.nta.nic.in येथे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटच अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम २९ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा संगणक आधारित होती. देशभरातील हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमधील हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन (B.Sc. HHA) च्या बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी ही राष्ट्रीय परीक्षा घेण्यात येते. उमेदवार त्यांचा निकाल वर दिलेल्या एनटीएच्या संकेतस्थळावर पाहू शकतात किंवा पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची जन्मतारीख आणि NCHM JEE 2020 अॅप्लिकेशन नंबरच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.

NCHM JEE 2020 चा निकाल पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC परीक्षेच्या तारखेत बदल ; MPSC’चा मोठा निर्णय!

NCHM JEE निकाल अंतिम उत्तरतालिकेवरून तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे त्यांनी तो डाऊनलोड करून ठेवावा, असे आवाहन एनटीएने केले आहे.

शिवाय रिव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंगची कोणतीही प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे गुणांसंदर्भातील कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.


NCHMCT JEE 2020

The National Testing Agency (NTA) has announced the date of entrance test for Hotel Management and Catering Technology courses. The NCHMCT JEE 2020 exam will be held on August 29, 2020. The exam will be held on August 29 from 3 pm to 6 pm. The National Council of Hotel Management and Catering Technology Joint Entrance Examination is conducted for admissions to the Hotel Management course. The admission of students for this course is done through this computer-based examination.

हॉटेल मॅनेजमेंट जेईईची तारीख जाहीर

नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. अधिक माहिती जाणून घ्या….

NCHMCT JEE 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. NCHMCT JEE 2020 परीक्षा २९ ऑगस्ट २०२० रोजी होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी जॉइंट एन्ट्रन्स परीक्षा हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेण्यात येते. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश या कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेद्वारे होतात.

एनटीएने या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, ‘नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी जाईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन २९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधीत आयोजित केली जाईल. विद्यार्थी आणि पालकांना असे आवाहन करण्यात येत आहे की परीक्षेसंदर्भातील सर्व अद्ययावत माहितीसाठी nta.ac.in आणि nchmejee.nta.nic.in या संकेतस्थळांना भेट देत राहा.’

CET होणार की नाही? काय म्हणाले उच्च शिक्षणमंत्री?

विद्यार्थ्यांना NCHMCT JEE परीक्षा सुरू होण्याआधी १५ दिवस अगोदर आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. अॅडमिट कार्ड nta.ac.in आणि nchmejee.nta.nic.in या संकेतस्थळांवरून डाऊनलोड करता येतील. या परीक्षेचा निकाल एनटीए सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी करेल. देशभरातील विविध ७१ संस्थांमध्ये या प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!