NEET चे नेटके नियोजन; उद्या परीक्षा, केंद्रावर जाताना काय घ्यावी काळजी

NEET Exam 2020

 एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) १३ सप्टेंबरला घेण्यात येणाऱ्या ‘नॅशनल इलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) परीक्षेवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षी काहीना काही विघ्न येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत २५ हजारांवर विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र आणि केंद्राची संख्या वाढवून एनटीएने यंदा बरेच नीटनेटके नियोजन केल्याचे दिसून येते. दुपारी २ ता ५ या दरम्यान पेपर घेण्यात येणार असून १.३० वाजता विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करावे लागणार आहे.

 दरवर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी “नीट’ परीक्षा घेण्यात येते. दोन वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा घेण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईईनंतर देशातील सर्वात मोठी परीक्षा असल्याने येत्या १3 सप्टेंबरला वैद्यकीय प्रवेशांसाठी आवश्यक असलेल्या नीट प्रवेश परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षा केंद्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. यात शहरात ६४ केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर ३६० ते ४२० म्हणजे जवळपास २५ हजारांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल.

 ‘नीट’ परीक्षा घेण्यासाठी देण्यात आलेले शहरातील भारतीय कृष्णा विद्या विहार हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी काटोल येथील नबीरा महाविद्यालयाजवळील ऑर्चिड पब्लिक स्कूल हे केंद्र ठेवण्यात आले आहे. याबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे विद्यार्थ्यांना फोन, ई-मेल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे. मात्र, वेळेवर केंद्रात बदल करण्यात आल्याने नागपूरमधील विद्यार्थ्यांना काटोलला जावे लागणार आहे. या प्रकाराने परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

 एका वर्गखोलीत १२ विद्यार्थी 

 प्रत्येक वर्गखोलीत एका निरीक्षकाच्या देखरेखीखाली केवळ १२ विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर हात धुण्यासाठी ठिकठिकाणी हँड सॅनिटायझर, साबणाची व्यवस्था करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. संसर्गामुळे यंदा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी केंद्रावर एकमेकांपासून कमीत कमी सहा फूट जागा राखणे आवश्यक केले आहे.

 परीक्षेपूर्वी ‘थर्मल स्कॅनिंग’द्वारे तपासले जाणार 
नीट परीक्षेदरम्यान दरवर्षी केंद्रावर मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरानाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही गर्दी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये २ हजार ५४६ केंद्र होती. मात्र, त्यात वाढ करून ३ हजार ८४३ केंद्र देशभरात वाढविण्यात आले आहेत. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तालुका पातळीवर केंद्राची सोय करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना बराच दिलासा मिळाला आहे.

 केंद्रावर जाताना घ्या ही काळजी 

 परीक्षेसाठी फेरमूल्यांकनाची सोय उपलब्ध नसून कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी केंद्राची व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रावर पेन्सिल बॉक्‍स, स्टेशनरी, खाद्यपदार्थ, मोबाईल, इलेक्‍ट्रीक गॅझेट आणि इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय मुलांना सुती कपडे, हाफ शर्ट वा टी-शर्ट घालून जावे लागणार आहे. मुलींनीही हेअरपीन, ब्रेसलेट वा गळ्यात चेन घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर केंद्रावर येताना जोडे घालून येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मात्र, मधुमेही विद्यार्थ्यांना शुगर टॅबलेट, हॅन्ड बॅग, फळ आणि पारदर्शी बॉटल नेता येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावर पोहचावे लागणार आहे.

लालपरीही सज्ज 

 नीट परीक्षेसाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र आहेत. यामुळे बसस्थानकांवर गर्दी होण्याची तशी शक्यता नाही. पण, विद्यार्थी आल्यास ते परीक्षेपासून वंचित राहू नयेत यादृष्टीने एसटी महामंडळाने तयारी केली आहे. नेहमीच्या महत्वाच्या मार्गांवर अधिकच्या फेऱ्यांचे नियोजन करण्याच्या सूचना आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सोबतच विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता तालुका स्तरावरून अधिकच्या बसेस सोडण्यासाठी नियोजन करून ठेवण्यास सांगण्यात आल्या आहेत. गरजेनुकार तालुका व आंतरजिल्हा फेऱ्या सोडण्यात येणार आहे. त्यासाठी १५ ते २० अधिक बसेस तयार ठेवण्यात येतील, गरज भासल्यास फेऱ्यांची संख्या वाठविण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

 ७२० गुणांचे प्रश्‍न 

 एनटीएद्वारे नुकतेच प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहेत. ७२० गुणांची परीक्षा असून यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषयांचे १८०-१८० गुणांचे ४५-४५ प्रश्‍न विचारण्यात येतील. जीवशास्त्र विषयात ३६० गुणांचे ९० प्रश्‍न विचारण्यात येतील.


Neet 2020 Neet Preparation Last Few Days Revision Plan

NEET 2020 Preparations: The National Eligibility Cum Entrance Test (NEET 2020) for admission to degree courses in various government and other medical colleges across the country will be held on September 13. Students have only a few days left to prepare for this exam. Students, you are preparing for COVID-19 sitting at home due to infection and lockdown. You have to work a little harder as you will not get any readymade help. So focus on regular, consistent, and planned study. This test is a test of your competitiveness and knowledge, depending on how well you prepare. So here are some tips to help you prepare for 2020.

नीट परीक्षेच्या तयारीसाठी अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. या शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यास कसा करावा जाणून घ्या…

NEET 2020 Preparations: देशभरातील विविध शासकीय आणि अन्य मेडिकल कॉलेजमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्था NEET 2020 येत्या १३ सप्टेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडे या परीक्षेच्या तयारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही कोविड-१९ संसर्ग स्थिती आणि लॉकडाऊनमुळे घरात बसूनच तयारी करत आहात. तुम्हाला कोणतीही रेडिमेड मदत मिळणार नसल्याने थोडी अधिक मेहनत करावी लागत आहे. म्हणूनच नियमित, सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यासावर भर द्या. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तयार केली आहे त्यावर अवलंबून असलेली तुमची स्पर्धात्मक क्षमता आणि ज्ञान याची कसोटी म्हणजे ही परीक्षा आहे. त्यामुळे घरबसल्या नीट २०२० ची तयारी कशी करायची त्याबाबतच्या टिप्स लक्षात घ्या….

शेवटच्या दिवसांमधील उजळणीसाठी टिप्स –

– जे आधी वाचलंय त्यावर अखेरचा हात फिरवा

शेवटच्या २०-२५ दिवसात नवे विषय हाताळणे टाळलेलेच बरे. त्याऐवजी जे टॉपिक तुम्ही छान पद्धतीने आत्मसात केले आहेत, त्यांची उजळणी करा.

– मॉडेल ग्रँड टेस्ट्स

शेवटच्या १५ दिवसात जितक्या शक्य तितक्या NEET Model Grand Tests द्या. यामुळे पेपरचं आकलन आणि तयारी पूर्ण होईल. मॉक टेस्टमुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमेल. या स्पर्धा परीक्षांमध्ये वेळेला अतोनात महत्त्व असतं.

– स्मार्ट अभ्यास

प्रभावी अभ्यासासाठी स्मार्टपणे अभ्यास करणे गरजेचे असते. तुमची बळकट स्थाने, कमजोर स्थाने ओळखा. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवा.

– फॉर्म्युला आणि नोट्स

स्वत:च्या नोट्सचा अभ्यास करा. महत्त्वाचे फॉर्म्युले हायलाइट करून ठेवा. दिवसभरातून एकदा या महत्त्वाच्या फॉर्म्युल्यांवर नजर मारा.

– नोट्सची उजळणी करा

तुम्ही किती अभ्यास पूर्ण केल्या यापेक्षा तुम्ही अभ्यास किती नीट केलाय यावर नीट परीक्षेतील कामगिरी ठरेल. यासाठी दररोज नोट्सची उजळणी करा. सिलॅबसची विभागणी करून उजळणी करा. नोट्स या वेळेची बचत करणाऱ्या आणि नियोजनबद्ध अभ्यासासाठी असतात. हायलाइट केलेले मुद्दे, विभाग नोट्समध्ये असावेत.

– मागील वर्षांचे प्रश्न

तुमची तयारी किती चोख आहे हे पाहण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा. नीटचा अभ्यास खूप व्यापक असतो. त्यामुळे काही भाग राहून जाणे स्वाभाविक आहे. म्हणूनच मागील प्रश्नपत्रिका सोडवताना बहुतांश प्रश्नांचे स्वरुप स्पष्ट होईल.

– परीक्षेतील अचुकता आणि वेळेचे व्यवस्थापन

वेळेचे व्यवस्थापन आणि अॅक्युरसीच्या स्वत:च्या पद्धती शोधून काढा. कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते नाही याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात स्पष्टता हवी.

– आरोग्य चांगले राखा

सद्यस्थिती पाहता, करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या. अभ्यास करताना मध्ये थोडा ब्रेक घ्या. विश्रांती घ्या. दररोज किमान ६ ते ७ तास झोप घ्या. चांगला आहार घ्या. खूप पाणी प्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका.

NEET 2020 Exam Centre City Update

NEET 2020 Exam Centre City Update: A circular has been issued regarding the NEET entrance examination for admissions to medical degree courses (MBBS / BDS). The National Testing Agency (NTA) has issued this circular on its official website nta.ac.in. This circular has given important information regarding the examination centers for 2020. For the first time, ATA is providing this facility to the students of NEET. Each time the information about the city in which the examination center will be located is given in the admit card. But for the first time this year, students are getting this information first.

NEET 2020: परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती विद्यार्थ्यांना लवकर कळणार!

यंदा प्रथमच नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची माहिती लवकर कळणार आहे…

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (MBBS / BDS) होणारी नीट (NEET) प्रवेश परीक्षेसंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने आपले अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर हे परिपत्रक जारी केले आहे.

नीट २०२० च्या परीक्षा केंद्रांच्या बाबतीत महत्त्वाची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. एटीए पहिल्यांदाच नीटच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा देत आहे. दरवेळी परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल, याची माहिती अॅडमिट कार्ड म्हणजेच प्रवेश पत्रात दिली जाते. पण यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ही माहिती आधी मिळत आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, सध्यस्थितीत अॅडमिट कार्ड मिळायच्या आधीच एनटीए आणि नीटच्या अधिकृत संकेतस्थळांवर परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती दिली जात आहे, जेणेकरून आयत्या वेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची कसरत करावी लागू नये. जर परीक्षा केंद्राचे शहर त्यांच्या वर्तमान शहरापेक्षा वेगळं असेल तर तेथे पोहोचण्याची तयारी त्यांना करता येईल.

आपल्या परीक्षा केंद्राच्या शहराचे नाव या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या लिंकवरून तपासता येईल.

अॅडमिट कार्डची माहिती

या परिपत्रकात एनटीएने हेही सांगितले आहे की नीट २०२० साठी लवकरच अॅडमिट कार्ड जारी केले जातील. अॅडमिट कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि पत्ता, प्रश्नपत्रिकेचे माध्यम (भाषा), रिपोर्टिंग आणि एंट्री टाइम, परीक्षा केंद्राचे गेट बंद होण्याची वेळ आदी माहितीचा समावेश असेल.

एनटीएद्वारे नीट २०२० चे आयोजन १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळा ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

हेल्पलाइन क्रमांक

नीट २०२० संबंधी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर थेट एनटीएशी संपर्क साधता येईल. पुढे दिलेल्या ईमेल वा संपर्क क्रमांकाद्वारे एनटीएशी संपर्क साधता येईल –

ईमेल आयडी – [email protected]

संपर्क क्रमांक –
८२८७४७१८५२,
८१७८३५९८४५,
९६५०१७३६६८,
९५९९६७६९५३,
८८८२३५६८०३

NTA द्वारे NEET Exam centre city संबंधी जारी करण्यात आलेले परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!