JEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय-जाणून घ्या

JEE main and NEET Exam 2021

The Union Ministry of Education is likely to take a decision soon in August on the remaining two stages of the Engineering Entrance Examination (JEE Main) and the Medical Entrance Examination (NEET Exam 2021). This information was given by the officials of the Ministry of Education. “Overall, the situation is being reviewed. So that a decision can be taken on the schedule of the pending two-phase JEE Mains and the conduct of the NEET-UG entrance examination on 1st August 2021.

JEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय-जाणून घ्या

केंद्रीय शिक्षण मंत्रालय ऑगस्टमध्ये अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन (Jee Main) आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटचे (Neet Exam 2021) उर्वरित दोन टप्पे घेण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. “एकंदर सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. जेणेकरून प्रलंबित दोन टप्प्यातील जेईई मेन्सचे वेळापत्रक आणि 1 ऑगस्टला नीट-यूजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्याबाबत निर्णय घेता येईल”, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सध्याच्या शैक्षणिक सत्रापासून जेईई मुख्य प्रवेश परीक्षा वर्षात चार टप्प्यात घेण्यात येते जेणेकरून विद्यार्थ्यांना आराम मिळेल आणि त्यांना गुण सुधारण्याची किंवा जास्त मिळवण्याची संधी मिळू शकेल. त्याअंतर्गत फेब्रुवारी महिन्यात पहिला टप्पा आयोजित करण्यात आला असून मार्चमध्ये दुसर्‍या टप्प्याचे आयोजन करण्यात आले होते. तिसरा टप्पा एप्रिलमध्ये आणि चौथ्या टप्प्यात मेमध्ये होणार होता. परंतु कोरोना व्हायरसच्या घातलेल्या धुमाकुळामुळे प्रवेश परीक्षेचे तिसरा आणि चौथा टप्पा तहकूब करण्यात आला. याशिवाय जेईई अॅडव्हान्स प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. ही परीक्षा 3 जुलै रोजी होणार होते. नीट-यूजीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.


JEE Main, JEE Advance, NEET 2020 Exam Date News, Updates: JEE-Mains to be held from July 18-23, JEE-Advanced in August, HRD Minister Ramesh Pokhriyal ‘Nishank’ announced on Tuesday while interacting with students live on social media. The minister also announced fresh date for NEET exam. It will be held on July 26.  Nishank had earlier announced that the JEE Main and NEET exams will be held in May end. However, with the nationwide lockdown in the wake of Coronavirus pandemic being extended to May 17, the exams are likely to be postponed again.

According to the National Testing Agency (NTA), for JEE Main over nine lakh candidates have registered, on the other hand over 15.93 lakh students are likely to take up the NEET 2020 exams.

बारावीच्या विद्यार्थ्यांना गेले अनेक दिवस ज्या परीक्षांच्या तारखांची वाट पाहत आहेत, त्या तारखा आज जाहीर झाल्या. जेईई मेन, अॅडव्हान्स्ड आणि नीट परीक्षांच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. जेईई-मेन परीक्षा १८ जुलै २०२० ते २३ जुलै २०२० या कालावधीत होणार आहे, असे डॉ. रमेश पोखरियाल यांनी सांगितले. नीट परीक्षादेखील २६ जुलै २०२० रोजी घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा ऑगस्ट २०२० मध्ये होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या उर्वरित परीक्षा कधी घेतल्या जाणार याबाबतचा निर्णय येत्या १ ते २ दिवसांत जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती देखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिली. डॉ. पोखरियाल निशंक यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या तारखा जाहीर केल्या. विद्यार्थ्यांना या तारखा कळल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी JEE Main ही परीक्षा घेतली जाते. यंदा ९ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET परीक्षेला यंदा १५ लाख ९३ हजारांवर विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जातात.

देशातील विद्यापीठांमधील परीक्षा १ जुलैपासून घेणार. ऑगस्टपासून नवं सत्र सुरू करणार. कुठल्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, त्याचा आढावा घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. जुलैनंतरही जर कुठल्या ठिकाणची परिस्थिती सामान्य नसेल तर तेथील आढावा घेऊन तसे निर्णय घेण्यात येतील, असे पोखरियाल म्हणाले.

सौर्स : मटा

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!