NEET PG 2021 :नोंदणी आणि करेक्शन करण्यासाठी मुदतवाढ

NEET PG 2021- date for Registration And Correction Extended

The National Board of Examinations (NBE) has extended the deadline for registration and correction window for PG 2021. Notice in this regard has been published on the official website natboard.edu.in. Accordingly, the date for filling up or amending the online application has now been extended to August 25, 2021

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBE)ने नीट पीजी २०२१ साठी नोंदणी आणि करेक्शन विंडोची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरण्याची किंवा दुरुस्ती करण्याची तारीख आता २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. जे उमेदवार या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात ते nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

यापूर्वी अर्ज भरण्याची नोंदणी आणि दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट होती. NEET PG 2021 ११ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार होती. पण देशभरात करोना केसेसमध्ये वाढ झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

या स्टेप्स फॉलो करुन अर्ज भरा- 

 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in ला भेट द्यावी.
 • होमपेजवर दिलेल्या NEET PG 2021 लिंकवर क्लिक करा.
 • एक नवीन पेज ओपन होईल. येथे नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा. विचारलेला तपशील वैयक्तिक तपशील इत्यादी भरुन सबमिट करा.
 • युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
 • आता मागील पानावर परत या आणि उमेदवार लॉगिन लिंकवर क्लिक करा. तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा आणि पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
 • अर्जदार लॉगिनद्वारे उमेदवार त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा देखील करू शकतात.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा

Extension of Registration Window and Edit Window for NEET-PG 2021


NEET PG Correction Window Open

NEET PG 2021: The National Board of Examinations (NBE) has given another opportunity to students to apply for the NEET PG 2021 exam. Students who have not yet applied for the National Eligibility cum Entrance Test (NEET PG) can now apply online on NBE’s official website nbe.edu.in till August 20.

NEET PG 2021: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE)ने NEET PG 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET PG साठी अर्ज केलेला नाही, ते आता २० ऑगस्टपर्यंत एनबीईच्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशन आणि करेक्शन विंडो २० ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, जे उमेदवार १ जुलै २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान आपली इंटर्नशीप पूर्ण करत आहेत आणि अन्य सर्व पात्रता निकषात बसत आहेत ते या उघडलेल्या विंडोच्या माध्यमातून NEET-PG 2021 साठी अर्ज करू शकतात.

या उमेदवारांना होणार फायदा
NEET PG प्रशासनाने अलीकडेच मेडिकल इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी कट ऑफची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच जे उमेदवार २१ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आपली इंटर्नशिप पूर्ण करत आहेत आणि नीट-पीजी २०२१ संबंधी सर्व मानदंड पूर्ण करत आहेत, ते या करेक्शन विंडोच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.


NEET PG Counselling Schedule 2021

The Medical Counseling Committee (MCC) has announced the counseling schedule for medical postgraduate courses. Candidates who have qualified for the National Eligibility cum Entrance Test (NEET) for PG courses will have to register for this counseling first. Candidates can register by visiting mcc.nic.in.

NEET PG Admission 2021:  वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC)ने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे काऊन्सेलिंग शेड्युल जाहीर केले आहे. जे उमेदवार पीजी अभ्यासक्रमांसाठी झालेली नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET)परीक्षेत पात्र ठरले आहेत, त्यांना या काउन्सेलिंगसाठी आधी नोंदणी करावी लागेल. mcc.nic.in वर जाऊन उमेदवार नोंदणी करू शकतात.

अर्ज प्रक्रिया २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी २४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत मु्दत आहे. उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावे लागतील. यासाठी विंडो २१ ऑगस्ट ते २२ ऑगस्टपर्यंत ओपन राहील. सीट अॅलोकेशन २५ आणि २६ ऑगस्ट रोजी होईल. प्रवेशांची यादी २७ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे.

प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागेल. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी, शुल्क आदी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास या उमेदवारांना मिळालेला प्रवेश पुढील फेरीसाठी खुला होईल.

प्रवेशांची दुसरी फेरी ६ ते ९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहे. सर्व फेऱ्यांनंतरही जागा रिक्त राहिल्यास मॉप-अप राउंड होईल. याअंतर्गत रिक्त जागांची माहिती १८ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. यासाठी २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत नोंदणी होईल.


NEET PG Correction Window Open

The National Board of Examinations (NBE) has issued an important notice regarding NEET PG 2021 application process. The Board will reopen the Registration and Correction Window from 16 August 2021. Candidates who want to apply for the exam can apply online through the official site of NBE, nbe.edu.in.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE)ने NEET PG 2021 अर्ज प्रक्रियेसंबंधी एक महत्वपूर्ण सूचना जारी केली आहे. बोर्ड १६ ऑगस्ट २०२१ पासून नोंदणी आणि दुरुस्ती विंडो पुन्हा उघडणार आहे. जे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात, ते एनबीईच्या आधिकारिक साइट nbe.edu.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशन आणि करेक्शन विंडो २० ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, जे उमेदवार १ जुलै २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान आपली इंटर्नशीप पूर्ण करत आहेत आणि अन्य सर्व पात्रता निकषात बसत आहेत ते या उघडलेल्या विंडोच्या माध्यमातून NEET-PG 2021 साठी अर्ज करू शकतात.

NEET PG 2021 परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार एडिट विंडोचा उपयोग करत आपली श्रेणी किंवा EWS स्थिती बदलू शकतात.


NEET PG 2021 Exam Schedule

The National Board of Examinations (NBE) has announced the schedule of several medical examinations including PG, MDS, DNB-PDCET. The official website has released a list of dates for various exams. Candidates appearing for the examination can check the schedule by visiting the official website natboard.edu.in.

NEET PG 2021: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेश (NBE) ने पीजी, एमडीएस, डीएनबी-पीडीसीईटी सहित अनेक मेडिकल परीक्षांचे शेड्यूल्ड जाहीर करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइट विविध परीक्षांनुसार तारखांची यादी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेस बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जाऊन वेळापत्रक तपासू शकतात.

वेबसाइटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जून २०२१ सत्रासाठी डीएनबी/डीआरएनबी फायनल थेअरी परीक्षेचे आयोजन २४ ते २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत होणार आहे. तर नीट पीजी परीक्षा २०२१ चे आयोजन ११ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. डीएनबी-पीडीसीईटी परीक्षा २०२१ १९ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. याशिवाय नीट एसएस २०२१ परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर २०२१ ला होणार आहे.

नीट एमडीएस २०२२ चे आयोजन १९ डिसेंबर २०२१ करण्यात आले आहे. एफईटी, एफएमजीई या परीक्षांच्या तारखा अधिकृत वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत. या तपासण्यासाठी वेबसाइटवर नोटीस सेक्शनमध्ये जाऊन आगामी एनबीईएमएस परीक्षांच्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करायला हवे.

मेडिकलच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी (Medical PG admission) घेतली जाणारी प्रवेश परीक्षा नीट पीजी (NEET PG)च्या तारखेची घोषणा याआधी करण्यात आली होती. नीट पीजी परीक्षा २०२१ (NEET PG 2021)चे आयोजन ११ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री (Health Minister) मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांनी परीक्षेच्या तारखेची घोषणा केली. वेबसाइटवर याआधी या परीक्षेची २३ जुलै ही तारीख दाखविण्यात येत होती. पण आता ती अपडेट करण्यात आली होती.

नीट यूजी परीक्षा १२ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. यासाठी १३ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. देशभरातील परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन NEET UG 2021 परीक्षा होणार आहे. तसेच परीक्षेसाठी शहरांची संख्या देखील वाढविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याआधीच्या निर्णयानुसार १५५ शहरांमध्ये ही परीक्षा होणार होती. पण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १९८ शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. शहरांसोबत परीक्षा केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. २०२० मध्ये ३८६२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा


NEET PG Exam Postponed

The National Eligibility cum Entrance Test (NEET PG) for admissions to medical postgraduate courses has been postponed for at least four months. The Prime Minister’s Office has announced this.

NEET PG 2021 परीक्षा लांबणीवर

NEET PG 2021 परीक्षा चार महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने हा निर्णय जाहीर केला. कोविड-१९ परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय मनुष्यभल उपलब्ध व्हावे म्हणून ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET PG परीक्षा किमान चार महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतची घोषणा केली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कोविड-१९ परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध व्हावे,’ अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


NEET PG Admit Card 2021 :

The National Board of Examinations has issued the Admit Card of National Eligibility cum Entrance Test Postgraduate (NEET PG) on the official website nbe.edu.in.

NEET PG 2021 Admit Card Released: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंन्ट्रन्स टेस्ट पोस्टग्रेजुएट (NEET PG) चे अॅडमिट कार्ड अधिकृ वेबसाइट nbe.edu.in वर जारी केले आहेत. विद्यार्थ्यांनी आपले नीट पीजी अॅडमिट कार्ड अॅक्सेस करण्यासाठी आपल्या यूजर नेम आणि पासवर्डच्या आधारे ऑनलाइन पोर्टल वर लॉग इन करावे.

NEET PG परीक्षा १८ एप्रिला २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले NEET PG अॅडमिट कार्ड परीक्षा केंद्रांवर घेऊन जाणे बंधनकारक आहे.


NEET PG Admit Card: The National Board of Examinations (NBE) will issue admission papers for the National Eligibility Entrance Examination-Post Graduate (NEET PG 2021). Candidates who have registered can download their tickets by visiting the official website of NBE (nbe.edu.in.). Meanwhile, NEET has said that the board will upload the admission letter on its website on April 12, 2021.

 NEET PG 2021 : नीट पीजीचे प्रवेश पत्र’ या तारखेला होणार जाहीर

NEET PG 2021 Admit Card & Exam Date : राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदव्युत्तरचे (NEET PG 2021) प्रवेशपत्र देणार आहे. ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांनी एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर (nbe.edu.in.) जावून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. दरम्यान, बोर्ड 12 एप्रिल 2021 रोजी आपल्या वेबसाइटवर प्रवेश पत्र अपलोड करणार असल्याचे NEET ने सांगितले आहे.

 एनबीईनुसार, प्रवेश पत्र ऑनलाइन अपलोड करण्याची माहिती उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर, एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाईल. NBE उमेदवारांना प्रवेश पत्र पोस्ट किंवा ईमेलद्वारे पाठविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांचे अर्ज कोणत्याही कारणास्तव स्वीकारले गेले नाहीत, अशा उमेदवारांची प्रवेशपत्रे दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


NEET PG Exam Registration

NEET PG 2021: The National Board of Examinations (NBE) has launched online application process for the Post Graduate National Eligibility Entrance Test (NEET PG 2021) on its official website. The registration link for NEET PG 2021 is operational at 3 pm and the last date for submission of online application for NEET PG 2021 is March 15, 2021

NEET PG 2021 Registration: नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन (NBE) ने आपल्या अधिकृत वेबसाइट वर पोस्टग्रॅज्युएट राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेसाठी (NEET PG 2021) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET PG 2021) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. NEET PG 2021 ची नोंदणी लिंक दुपारी 3 वाजता कार्यान्वित झाली आहे आणि NEET PG 2021 साठी ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२१ आहे. एमडी / एमएस / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवार एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर nbe.edu.in यावर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

परीक्षा कधी घेतली जाईल?

नीट पीजी २०२१ परीक्षा १८ एप्रिल रोजी संगणक आधारित चाचणी (CBT) घेण्यात येईल. ३१ मे पर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

नीट पीजी २०२१ साठी पात्रता

उमेदवारांकडे नीट पीजी २०२१ साठी पात्र होणअयासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यता प्राप्त संस्थेचे MBBS पदवी (तात्पुरती किंवा कायमस्वरूपी) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
याशिवाय, उमेदवारांकडे एमसीआय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र देखील असले पाहिजे. नीट पीजी २०२१ उमेदवारांनी ३० जून रोजी किंवा त्यापूर्वी एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली असली पाहिजे.
नीट पीजी प्रवेश परीक्षेद्वारे १०,८२१ मास्टर ऑफ सर्जरी (एमएस), १९,९५३ डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) आणि १,९७९ पीडी डिप्लोमा जागांवर ६,१०२ शासकीय, खासगी, डीम्ड विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो

NEET PG Exam 2021: NEET PG 2020 exam dates have been announced. This exam will start from 18th April. The National Board of Examinations (NBE) will soon start the registration process for this exam. The board will make the application form available on nbe.edu.in. Candidates can then register online.

नीट पीजी २०२१ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. परीक्षा अर्जांसाठी पोर्टल आणि अन्य माहिती जाणून घ्या…

NEET PG 2021: नीट पीजी 2020 परीक्षेच्या तारखांची घोषणा झाली आहे. ही परीक्षा १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) लवकरच या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे. बोर्ड परीक्षेसाठी अर्ज nbe.edu.in वर उपलब्ध करणार आहे. त्यानंतर उमेदवार ऑनलाइन नोंदणी करू शकतील.

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी ही परीक्षा संगणक आधारित असेल. एनबीईने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, जे विद्यार्थी ३० जून २०२१ रोजी वा त्यापूर्वी आपली इंटर्नशीप पूर्ण करतील, तेच पीजी परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टल nbe.edu.in किंवा natboard.edu.in ला भेट द्यावी लागेल.

नीट पीजीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे NMC द्वारे मान्यताप्राप्त संस्थेची प्रोव्हिजनल वा स्थायी MBBS डिग्री असणे अनिवार्य आहे. तसेच एमसीआय द्वारे किंवा राज्य चिकित्सा शिबीराद्वारे जारी प्रोव्हिजनल किंवा स्थायी नोंदणी प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त नीट पीजी २०२१ साठी इच्छुक उमेदवारांनी ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी आपली एक वर्ष कालावधीची इंटर्नशीप पूर्ण केलेली असावी. NEET PG 2021 परीक्षेचे आयोजन मास्टर ऑफ सर्जरी, डॉक्टर ऑफ मेडिसीन आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी केले जात आहे.

परीक्षेत मागील वर्षी १,६७,१०२ उमेदवारांनी नोंदणी केली होती, यापैकी १,६०,८८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. परीक्षेचा कालावधी साडेतीन तासांचा असेल. एकूण ३०० एमसीक्यू प्रश्न विचारले जातील. परीक्षेत नकारात्मक मूल्यांकन असेल. परीक्षेची भाषा इंग्रजी असेल. या परीक्षेत प्री-क्लिनिकल, क्लिनिकल, पॅरा-क्लिनिकल विषयांसह एमबीबीएस अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.


NEET PG Exam Date 2021

NEET PG Exam Date 2021:The National Board of Examinations (NTA) has announced the date of NEET PG, an entrance examination for postgraduate medical courses. Detailed information regarding the date of examination is given on the official websites nbe.edu.in and ntaboard.edu.in.

NEET PG परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे…कधी होणार परीक्षा जाणून घ्या…

NEET PG Exam Date 2021: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NTA) ने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेची अर्थात NEET PG परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. अधिकृत संकेतस्थळ nbe.edu.in आणि ntaboard.edu.in वर परीक्षेच्या तारखेसंदर्भात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

NEET PG २०२१ परीक्षेचे आयोजन १८ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे. ही परीक्षा संगणकीकृत असेल. या परीक्षेचा पेपर पॅटर्न आणि परीक्षा देण्यासाठी काय पात्रता आवश्यक यासंबंधीची माहिती जाणून घ्या…

NEET PG eligibility

मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया (MCI) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून नियमित एमबीबीएस (MBBS) पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
एमसीआय किंवा स्टेट मेडिकल काउन्सिलद्वारे दिलेले प्रोव्हिजनल किंवा परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असावे.
मेडिकलच्या पीजी कोर्समध्ये अॅडमिशनसाठी उमेदवारांना ३० जून २०२१ पर्यंत मेडिकल यूजी इंटर्नशीप पूर्ण करणे आवश्यक आहे.

नीट पीजी परीक्षेचा पॅटर्न (NEET PG Exam Pattern)

 • परीक्षा संगणकीकृत असेल.
 • परीक्षेचा कालावधी ३.३० तासांचे असेल.
 • ३०० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारले जातील.
 • योग्य उत्तरासाठी प्रत्येकी ४ गुण दिले जातील तर अयोग्य उत्तरासाठी एक गुण कापला जाईल.
 • परीक्षेची भाषा इंग्रजी असेल.
 • प्री-क्लिनिकल, क्लिनिकल, पॅरा-क्लिनिकल विषयांसह एमबीबीएस अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जातील.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन NBE ने सांगितले की करोना स्थितीनुसार परीक्षेच्या तारखेत बदलही होऊ शकतो. या परीक्षेद्वारे देशातील ६,१०२ संस्थांमध्ये एकूण १०,८२१ मास्टर ऑफ सर्जरी (MS), १९,९५३ डॉक्टर ऑफ मेडिसीन (MD) आणि १,९७९ डिप्लोमाच्या जागांवर प्रवेश मिळतो. यात ५० टक्के जागा ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात, तर उर्वरित ५० टक्के जागा या स्टेट कोट्यातील असतात.

सोर्स : म. टा.


NEET PG 2020 Postponed

नीट पीजी २०२१ परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

NEET PG 2021: Postponed: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नीट पीजी २०२१ परीक्षा (NEET PG 2021) स्थगित केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन देण्यात आलं आहे. त्यानुसार, नीट पीजी २०२१ परीक्षा १० जानेवारी २०२१ रोजी होणार होती. मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

NEET PG 2021 का झाली स्थगित?

नीट पीजी २०२१ स्थगित करण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाद्वारे (NMC) कळवल्यानंतर आला आहे. एनएमसीने सांगितलं की नीट पीजी २०२१ च्या तुलनेत आयोगाच्या यूजी आणि पीजी बोर्ड द्वारा सीबीएसई विविध प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे.

NEET PG 2021 चे अर्ज नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत सूचनेसह जारी होण्याची शक्यता आहे. नीट पीजी २०२१ आधी १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाणार होती आणि नीट एमडीएस २०२१चे आयोजन १६ डिसेंबर २०२० रोजी होणार होते. नीट पीजी २०२१ च्या आयोजनाच्या नव्या तारखा अद्याप जारी केलेल्या नाहीत.

NEET PG 2021 परीक्षा देशातील १६२ शहरांमध्ये संगणक आधारित पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. NEET PG 2021 च्या माध्यमातून १०,८२१ मास्टर्स ऑफ सर्जरी (MS) जागांवर प्रवेश, १९,५५३ जागांवर डॉक्टर आणि अन्य १,९७९ पीजी डिप्लोमा जागांवर प्रवेश होतील. देशातील तब्बल ६,१०२ सरकारी, खासगी, डिम्ड आणि केंद्रीय विद्यापीठे या भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

NEET PG 2020 Final Merit List.

NEET PG 2020: The Commissioner of Health Services has announced the final merit list of the NEET PG 2020 exam. Candidates may be applied for these exams may check their names from the given link.  Click on the link below to download the list.

NEET PG Exam Merit List Check Here

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!