NEET UG 2020: एमबीबीएस बीडीएस प्रवेशांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर

Maharashtra Neet UG 2020 Merit List

NEET UG 2020: एमबीबीएस बीडीएस प्रवेशांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर

MBBS, BDS Merit List: एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शुक्रवारी सकाळी जाहीर केली. दरम्यान, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एकूण ५० हजार ८६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहितीही सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

सीईटी सेलने एमबीबीए आणि बीडीएस प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ५० हजार ९६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एकूण ४१ हजार ७५२ विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, ६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत केवळ एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी कॉलेजांचे पर्याय भरण्याचे सूचित केले होते. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता शुक्रवारी जाहीर झाली. त्यानंतर प्रवेशाची पहिली निवड यादी १५ नोव्हेंबरला सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे.

या निवड यादीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरपर्यत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि माहिती सीईटी सेलच्या www.mahacet.org या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेचे उर्वरित वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

NEET UG 2020 यादीच्या थेट लिंकसाठी येथे क्लिक करा.

NEET Counselling 2020 प्रवेशनिश्चितीसाठी पुन्हा मुदतवाढ


NEET UG 2020 Exam Centers Change For Some Students

NEET UG 2020: काही परीक्षा केंद्रांमध्ये बदल!

NEET UG 2020 Exam Centers Change For Some Students  : नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा त्यांच्या अॅडमिट कार्डवरून त्यांच्या परीक्षा केंद्राच्या पत्त्याची खातरजमा करून घ्यावी.

NEET UG 2020 Exam Centres Update: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून काही विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG 2020 परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केली होती, त्या विद्यार्थ्यांनी फ्रेश अॅडमिट कार्ड डाउनलोड करावेत, असे आवाहन एनटीएने केले आहे. नीट यूजी २०२० परीक्षा रविवारी १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.

NEET 2020

एनटीएच्या संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. त्या परिपत्रकात असं म्हटलंय की, ‘१३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या नीट यूजी २०२० परीक्षेच्या केंद्रांमध्ये काही विद्यार्थ्यांसाठी बदल करण्यात आला आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांच्या शहरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केवळ काही परीक्षा केंद्रे बदलण्यात आली आहेत.’

या परिपत्रकात पुढे असंही म्हटलं आहे की संबंधित विद्यार्थ्यांना एनटीएने एसएमएस आणि इमेलद्वारे या बदलाची माहिती दिलेली आहे. त्यांना टेलिफोनद्वारेदेखील माहिती कळवण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी अद्ययावत अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे, असे त्यांना कळवण्यात आलेले आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा त्यांच्या अॅडमिट कार्डवरून त्यांच्या परीक्षा केंद्राच्या पत्त्याची खातरजमा करून घ्यावी. म्हणजे आयत्या वेळी धावपळ होणार नाही. अधिक माहितीसाठी एनटीए नीट च्या संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे.

NTA NEET संकेतस्थळ – https://ntaneet.nic.in/ntaneet/welcome.aspx

सोर्स : म. टा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!