NEET UG Results: NEET UG 2021 च्या OMR आन्सरशीट्स लवकरच होणार उपलबध

NEET UG Answer Key

NTF has released a scanned copy of OMR sheet of UG 2021 exam. Candidates appearing for this exam will be able to view the OMR sheet by visiting the official website. Candidates can view the OMR sheet till 9 pm on November 14. Candidates are requested to contact the helpline number 011-40759000 if they have any queries.

नटीएफतर्फे नीट यूजी २०२१ परीक्षेच्या ओएमआर शीटची स्कॅन कॉपी जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ओएमआर शीट पाहता येणार आहे. तसेच बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन डाऊनलोड करता येणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा नीट यूजी २०२१  च्या ओएमआर शीटची स्कॅन कॉपी जाहीर केली आहे. एनटीएद्वारे जाहीर केलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, ‘ओएमआर उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत न मिळालेल्या उमेदवारांकडून विनंत्या प्राप्त झाल्यानंतर, एनटीए आता नीट यूजीच्या ओएमआर उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात. तसेच बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलोकरुन डाऊनलोडदेखील करु शकतात. एनटीएने आधीच उमेदवारांना ओएमआर उत्तरपत्रिका पाठवली आहे.

How to Download NEET UG 2021 OMR Sheet

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट-neet.nta.nic.in ला भेट द्या.
  • आता “NEET (UG) 2021 OMR DISPLAY” या नोटिफिकेशनवर क्लिक करा.
  • एक नवीन विंडो उघडेल. उमेदवारांनी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांसारख्या क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करा.
  • यानंतर स्क्रीनवर ओएमआर शीट दिसेल.
  • उमेदवार ओएमआर शीट डाउनलोड करण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करू शकतात.

उमेदवार १४ नोव्हेंबर रात्री ९ वाजेपर्यंत ओएमआर शीट पाहू शकतील. उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक-०११-४०७५९००० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी उमेदवार मेल [email protected] वर देखील लिहू शकतात.

 


NEET UG Exam Results

The result of the entrance test with National Eligibility (NEET UG 2021) has been announced. Students can view the results by visiting NTA’s official website neet.nta.nic.in. After successfully passing UG 2021, students can get admission for MBBS course in top medical colleges of the country.

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेचा (NEET UG 2021) निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी एनटीएच्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.inवर जाऊन निकाल पाहू शकतात. नीट यूजी २०२१ची परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर विद्यार्थी देशातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस कोर्ससाठी अॅडमिशन घेऊ शकतात.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एनटीए ऑल इंडिया कोटा अंतर्गत १५ टक्के जागांसाठी एक गुणवत्ता यादी तयार करेल. यासोबत एनटीए राज्य कोट्यातील इतर ८५ टक्के जागांच्या काउंसलिंगसाठी सर्व राज्यातील पात्र विद्यार्थ्यांची यादी संबंधित विभागाला देईल. ज्याआधारावर राज्य आपली गुणवत्ता यादी तयार करेल.

असा पाहा नीटचा निकाल

  • अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.inवर जा.
  • होमपेजवर दिसणार निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • मग तुमच्या लॉगिन क्रेडेंशियल्सवर नोंदवा आणि सब्मिट करा.
  • त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर येईल, तो डाऊनलोड करा.
  • निकालाची एक प्रिंट आऊट देखील काढा.

नीट यूजीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल


NEET UG Exam 2021

The National Testing Agency (NTA) will close the UG 2021 correction window 26th Oct 2021 at 11.50 pm. Candidates who want to amend their UG application in 2021 can apply from the link activated on the examination portal, neet.nta.nic.in.

NEET 2021: पदवीपूर्व वैद्यकीय आणि दंत प्रवेश परीक्षा ‘नीट यूजी २०२१’ च्या अर्जात सुधारणा करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२१ ही शेवटची संधी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे रात्री ११.५० वाजता नीट यूजी २०२१ च्या अर्जातील दुरुस्तीची विंडो बंद केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या नीट यूजी अर्ज २०२१ मध्ये सुधारणा करायच्या आहेत ते परीक्षा पोर्टल, neet.nta.nic.in वर सक्रिय केलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात.

अर्ज दुरुस्ती विंडोच्या कालावधीबाबत उमेदवारांकडून विनंत्या प्राप्त झाल्या होत्या. त्या लक्षात घेऊन नीट यूजी २०२१ अर्जामध्ये पहिल्या टप्प्यात भरल्या गेलेल्या मर्यादित तपशीलामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्व तपशीलांमधील त्रुटी सुधरणा करण्यासाठी अर्ज दुरुस्ती विंडो खुली करण्यात आली.

२१ ऑक्टोबरला नोटीस जाहीर करुन अर्ज दुरुस्ती विंडो खुली आली होती. एनटीद्वारे फेज १ मधील नीट यूजी २०२१ च्या अर्जामध्ये लिंग, राष्ट्रीयत्व, ईमेल पत्ता, श्रेणी, उप-श्रेणी यामध्ये दुरुस्त्या किंवा त्रुटी सुधारता येणार आहेत. तसेच फेज २ मध्ये भरलेल्या सर्व तपशीलांच्या दुरुस्त्या किंवा त्रुटी सुधारता येणार आहेत. ही प्रक्रिया करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉगिन करावे लागेल

अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी क्लिक करा


NEET UG Exam 2021 Results

Candidates awaiting the results of National Eligibility Test (UG) -2021 will have to wait a few more days. The National Testing Agency (NTA), which is conducting the exams, has once again opened the application correction window for National Eligibility cum Entrance (UG) -2021 (NEG) 2021 for admission in medical and dental courses

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (यूजी) – २०२१ च्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मडिकल आणि डेंटल कोर्सेजमध्ये प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रेंस (यूजी) -२०२१ म्हणजेच नीट (यूजी) २०२१ साठी अर्ज सुधारणा विंडो पुन्हा एकदा खुली केली आहे. यामुळे उमेदवारांना अर्जातील त्रुटी सुधारता येणार आहेत.

NEET 2021- नीट यूजी परीक्षेची उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार

२१ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्जात करेक्शन करण्यासाठी विंडो खुली राहणार आहे. अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. अर्जातील करेक्शन झाल्यानंतर एनटीएकडून नीट रिझल्ट २०२१ ची घोषणा करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

NEET PG Results: NEET PG परीक्षेचे स्कोअरकार्ड जारी

नीट यूजी २०२१ निकालाच्या घोषणेआधी एनटीए परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करेल. त्यानंतर त्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात येतील. त्यांच्या समीक्षेनंतरच अंतिम उत्तरतालिका आणि निकाल घोषित केले जातील.

या लिंकवरुन करा अर्जात सुधारणा


NEET UG Exam 2021

The National Testing Agency (NTA) is expected to release an update on the results of the Medical and BDS Entrance Examination, National Eligibility Test (NEET UG) -2021 soon. The results are likely to be published on the examination portal, neet.nta.nic.in or on the official website, nta.ac.in. Candidates appearing for this exam should visit the website regularly to know the updates.

NEET Result 2021: राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे मेडीकल आणि बीडीएस प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG)-2021 निकालाच्या घोषणेसंदर्भातील अपडेट लवकरच जारी केले जाण्याची शक्यता आहे. परीक्षा पोर्टल, neet.nta.nic.in वर किंवा अधिकृत वेबसाइट, nta.ac.in वर निकालासंदर्भातील माहिती जाहीर केली जाण्याची दाट शक्यता आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी वेबसाइटवर नियमितपणे भेट देत अपडेट्स जाणून घ्यावेत.

एनटीएने नीट यूजी २०२१ प्रवेश परीक्षेचे आयोजन १२ सप्टेंबर २०२१ रोजी देशभरात आणि परदेशातही विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. नीट २०२१ परीक्षेत सुमारे १६ लाख उमेदवार सहभागी झाले होते.

आतापर्यंतचे अपडेट जाणून घ्या…

सप्टेंबर २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात नीट यूजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर परीक्षेच्या निकालासंदर्भातील घोषणा सप्टेंबर अखेरपर्यंत केली जाणार होती. मात्र, या दरम्यान, एनटीएने नीट २०२१ साठी अर्जाची दुसरी फेरी सुरू केली.

दुसऱ्या टप्प्यातील रजिस्ट्रेशनसाठी अॅप्लिकेशन विंडो १ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत खुली करण्यात आली होती. यानंतर या अर्जांमधील दुरुस्तीसाठी उमदेवारांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असल्याने दुरुस्तीसाठी करेक्शन विंडो उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.५० पर्यंत ही विंडो दुरुस्तीसाठी अॅक्टिव्ह असणार आहे. यानंतर आता एनटीएद्वारे निकालाच्या घोषणेबाबत अपडेट येऊ शकते असं म्हटलं जात आहे.

उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की नीट यूजी 2021 निकालाच्या घोषणेआधी एनटीए परीक्षेची प्रोव्हिजनल ‘आंसर की’ जारी करेल. त्यानंतर त्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात येतील. त्यांच्या समीक्षेनंतरच अंतिम उत्तरतालिका आणि निकाल घोषित केले जातील.


NEET UG Exam 2018 Results

National Eligibility cum Entrance test (UG) results are now declared. For the examination which was conduct on 6th May 2018. Result of this examination is now declared here. Candidates can check their results using following link. To check the results candidates need to enter roll number & date of birth. Check NEET UG Exam 2018 Results here

NEET UG Exam 2018 Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!