NIOS दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर

NIOS 10th and 12th Exam Date

The next NIOS Public (Theory) Exam for Secondary and Sr. Secondary courses for April 2022 is likely to be commenced from 06.04.2022. The Principals of the schools are requested to apply for NIOS exam centers online through URL: exams.nios.ac.in

NIOS Public Exam: एनआयओएस (NIOS) पब्लिक एक्झाम  एप्रिल-मे २०२२ मध्ये घेतल्या जाणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे घेण्यात येणार्‍या सिनीअर आणि सिनीअर सेकेंडरी वर्गांसाठी थ्योअरी परीक्षा ६ एप्रिल २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. एनआयओएसने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

एप्रिल २०२२ साठी सिनीअर आणि सिनीअर सेकेंडरी अभ्यासक्रमांसाठी पुढील NIOS पब्लिक (थ्योअरी) परीक्षा ६ एप्रिल २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या परीक्षा केंद्रांसाठी अधिकृत वेबसाइट https://exams.nios.ac.in द्वारे एनआयओएस ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

या परीक्षा केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई/राज्य मंडळांशी संलग्न सरकारी/खासगी शाळांसह एनआयओएस मान्यताप्राप्त संस्थांमध्ये घेतल्या जाणार आहेत. अधिकृत नोटिफिकेशननुसार, संस्थेने शाळांच्या मुख्याध्यापकांना एनआयओएसच्या वेबसाइटवर परीक्षा केंद्रांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे.


NIOS Hall Ticket

NIOS Admit Card 2021: The National Institute of Open Schooling (NIOS) has issued admission cards for secondary and higher secondary examinations in October and November 2021. Practical exams will be held in these months. Students who have registered for the NIOS October-November 2021 exams can download their Admit Card from the official website of the institute sdmis.nios.ac.in to participate in the practical exams.

NIOS Admit Card 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजेच दहावी आणि बारावीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये आयोजित परीक्षांसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे. या महिन्यांमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केले आहे, ते प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी आपले अॅडमिट कार्ड संस्थेची अधिकृत वेबसाइट sdmis.nios.ac.in वरून डाऊनलोड करू शकतात. या वृत्तातही अॅडमिट कार्डची थेट लिंक देण्यात आली आहे.

एनआयओएसद्वारे प्रॅक्टिकल परीक्षेच्या अॅडमिट कार्ड संबंधी अपडेट संस्थेने जारी केले आहे. यानुसार, ‘उमेदवारांनी जर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेचे परीक्षा शुल्क भरले असेल आणि उमदेवारांचे छायाचित्र एनआयओएसकडे उपलब्ध असेल, तरच उमेदवारांना हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल. जर छायाचित्र गहाळ झाल्याने तुमचे हॉलतिकीट तयार झाले नसेल, तर तुमच्या प्रादेशिक कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा.’

या लिंकद्वारे डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड


NIOS 12th Exam Canceled

National Institute of Open Schooling (NIOS) has given relief to the students by canceling the Class XII examination. The decision was made in view of the safety of the students in the background of Corona (Covid-19). Student assessment will be announced soon through the Objective Criteria for evaluating. Both direct and written examinations for senior secondary courses have been canceled.

NIOS 12th Exam 2021 | NIOS बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द!! नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने देखील (NIOS) बारावीची परीक्षा रद्द केली आहे. देशातील करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पर्यायी पद्धतीद्वारे (Objective Criteria for evaluating) लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सिनिअर सेकंडरी कोर्सेसच्या प्रत्यक्ष आणि लेखी अशा दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे.


Nios 10th, 12th Date Sheet 2021 Released

NIOS बोर्डाचे दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जारी झाले आहे….

NIOS बोर्डाचे दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जारी

NIOS बोर्डाचे दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जारी
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. एनआयओएसच्या अधिकृत संकेतस्थळावर nios.ac.in येथे हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एनआयओएसची ही परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२० मध्ये होणार होती. पण ती स्थगित करण्यात आली होती. आता ही परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार आहे.

संस्थेने जाहीर केलेल्या एनआयओएसच्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा २२ जानेवारीपासून सुरू होतील आणि पहिला पेपर संस्कृत विषयाचा असेल. त्याच वेळी, शेवटचा व्यवसाय अभ्यास पेपर १५ फेब्रुवारी रोजी होईल. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षा २२ जानेवारी पासून हिंदुस्थानी संगीत पेपरपासून सुरू होतील आणि शेवटी रोजगार कौशल्य आणि कर्नाटक संगीत पेपर १५ फेब्रुवारी रोजी होईल.

माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यावहारिक डेटाशीट जाहीर केले

प्रॅक्टिकल परीक्षा कधी?

दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १४ जानेवारीपासून सुरू होतील आणि २५ जानेवारी २०२१ पर्यंत चालतील.

जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ परीक्षेसाठी १० डिसेंबरपर्यंत नोंदणी

या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी व्हायचे आहे, ते अधिकृत संकेतस्थळ sdmis.nios.ac.in द्वारे परीक्षा शुल्क भरून नोंदणी करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!