GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Opportunity for Govt Jobs

Opportunity for Govt Jobs

नोकरीच्या संधी सोडू नका

Various Departments of Center Government published the new recruitment advertisement very soon. Every one should know about the syllabus, academic qualifications and the nature of the examinations. Since recruitment is done every year in the Central Government, it is a great opportunity for the tenth to upper classes candidates. However, it is often ignored that due to lack of information, do not leave this opportunity without knowing the recruitment process. Candidates read the complete details carefully given below, Keep visit on our website for the further updates.

केंद्र शासनाच्या विविध विभागांत दरवर्षी रिक्त पदांची भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून त्यासाठीचा अभ्यासक्रम, शैक्षणिक आर्हता आणि परीक्षेचे स्वरूप प्रत्येकाने जाणून घ्यावे. केंद्र शासनात दरवर्षी भरती होत असल्याने दहावी ते उच्चशिक्षितांकरिता ही नामी संधी आहे. मात्र, अनेकदा माहिती अभावी त्याकडे दुर्लक्ष होते, असे न करता भरतीप्रक्रिया जाणून घेत या संधी सोडू नका, असा सल्ला प्रा. स्नेहलकुमार निवाते यांनी विद्यार्थ्यांना दिला.

भोईराज मित्र मंडाळातर्फे भोई गल्ली येथे ‘नोकरी-व्यवसाय आणि शिक्षण मार्गदर्शन उपक्रम’ रविवारी घेण्यात आला. त्यामध्ये आठवी ते उच्चशिक्षितांकरिता असलेल्या केंद्र शासनातील नोकरीच्या संधी, स्पर्धा परीक्षा, राजपत्रिक अधिकारी पदाच्या परीक्षा, लघुउद्योग व स्वयंरोजगार, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजना, महिला सक्षमीकरण या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रा. नवाते यांनी परीक्षेचे स्वरूप, रिक्त जागांचा तपशिल, आरक्षणनिहाय जागा, महिला व पुरूष उमेदवारांकरिता असलेल्या अटी व नियम यांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनआयए, आयटीबीपी, एसएसआय यासह इतर विभागांची माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास नियोजनबद्ध केल्यास परीक्षेचे दडपण येत नाही. परीक्षेचे स्वरूप योग्यरित्या माहित करून घेतल्यास नियोजन करणे सोयीस्कर होते. ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या विभागाच्या परीक्षांची माहिती सातत्याने घेतली पाहिजे. केंद्र शासनात नोकऱ्यांची अनेक कवाडे खुली असल्याने आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यापासून तर अगदी उच्चशिक्षितांना त्याची संधी आहे. त्यासाठी वाचन, चौकसबुद्धी, वैचारिकक्षमता आणि ध्यास याकडे विशेष लक्ष द्यावे. जेणेकरून पहिल्या प्रयत्नात तुम्हाला यश संपादित करणे शक्य होईल. अनेकदा अपुऱ्या माहितीमुळे विद्यार्थ्यांपर्यंत संधी पोहोचत नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांनी स्वत:हून संधींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मार्गदर्शन सत्राच्या अखेरीस उपस्थित विद्यार्थी व पालकांनी शंकांचे निसरन करून घेतले. या कार्यशाळेचे संयोजन संदीप हडांके यांनी केले.

म. टा.

1 Comment
  1. Nishikant says

    I am interested gov job

Leave A Reply

Your email address will not be published.