PM Scholarship Scheme 2021 -पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु

PM Scholarship Scheme 2021 Registration

पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु

PM Scholarship Scheme 2021 Registration- The process of applying online for the Dhanmantri Scholarship Scheme 2021 has started. The scheme was launched in 2016. However, in the meantime, the scheme was closed. Now this scholarship scheme has been started anew. Children of ex-servicemen can apply for this scholarship. Eligible students can apply online by visiting the official website ksb.gov.in

PM Scholarship Scheme 2021 Registration- प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही योजना 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. मात्र, मधल्या काळात ही योजना बंद केली होती. आता नव्यानं ही स्कॉलरशिप योजना सुरु करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी माजी सैनिकांची मुलं अर्ज करु शकतात. पात्र विद्यार्थी ऑफिशियल वेबसाईट ksb.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.

PM Scholarship Scheme 2021 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • स्टेप 1 : प्रधानमंत्री स्कॉलरशिप स्कीम 2021 साठी अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या
  • स्टेप 2 : तिथे PMSS (PM Scholarship Scheme) वर क्लिक करा
  • स्टेप 3 : आता New Registration वर क्लिक करा
  • स्टेप 4 : त्यानंतर Apply Online वर क्लिक करा
  • स्टेप 5 : रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये माहिती भरा
  • स्टेप 6 : अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

पीएम किसान स्कॉलरशीप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याच्या नावानं असलेल्या बँक खात्याच्या पासबूकची झेरॉक्स प्रत, जन्म प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आवश्यक आहे.

कोणते लाभ मिळणार ?

प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना 12 वीला 75 टक्केपेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना 10 महिने दरमहा 1 हजार रुपये दिले जाणार आहेत. 12 वी उत्तीर्ण आहेत पण शिक्षण सुटलेले आहे अशा माजी सैनिकांच्या पाल्यांना या योजनेतून शिक्षण घेता येईल. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षांसाठी 2 हजार रुपये दिले जातील. मात्र, विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रतेयक विषयात 50 टक्केंपेक्षा अधिक गुण मिळवावे लागतील. प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत जे विद्यार्थी 85 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवतील त्यांना 25 हजार रुपये दिले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!