GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Police Bharti 2016 Selection List, Waiting List Opportunities

Police Bharti 2016 Selection List, Waiting List Opportunities

पोलीस शिपाई पदासाठी पात्र परंतु अंतिम निवड यादीत निवड न झालेल्या (क्वालिफाईड बट नॉट सिलेक्टेड) उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये मुलाखत घेऊन ११ महिन्यांच्या करार पद्धतीवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
राज्यात पोलीस शिपायांची ४0१४ रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल यांनी इच्छुक उमेदवारांसाठी करार पद्धतीवर नोकरी मिळविण्याची तरतूद केली आहे.

  • महिलांचे प्रमाण १0.४८ टक्के
  • सध्या पोलीस दलात महिलांचे प्रमाण १0.४८ आहे.
    पोलीस दलात महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी एकूण रिक्तपदांच्या ३0 टक्के पदे महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. (प्रतिनिधी) पोलिसांच्या पाल्यांसाठी राखीव जागा
  • यावर्षीपासून पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलिसांच्या पाल्यांसाठी तीन टक्के व कर्तव्यावर निधन झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या पाल्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

    धावण्याच्या चाचणीत बदल

    ■ यंदापासून पोलीस शिपाई भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटरऐवजी १६00 मीटर व महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटरऐवजी ८00 मीटर धावण्याची चाचणी देण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.