Poly Admission 2021-दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ

Polytechnic Diploma Admission 2021

Students can now apply till July 30 for the admission process of Polytechnic Diploma Admission 2021. Earlier, the deadline was July 23. After scrutiny, the first quality list will be announced on August 2. For more information visit http://poly21.dtemaharashtra.gov.in

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका तंत्रनिकेतन (Polytechnic Diploma Admission 2021 ) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आता विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी ही मुदत २३ जुलै होती. यानंतर छाननी करून पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालाअगोदरच सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत होती. ही मुदत संपल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनतर ऑनलाइन अर्ज करीत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड कराव्यात. आता जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार आहे. ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान यावर आक्षेप स्वीकारले जाणार असून, ७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून, ८६९८७४२३६०, ८६९८७८१६६९ या क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधता येणार आहे.  अधिक माहितीसाठी http://poly21.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

असे आहे वेळापत्रक – Timetable

  • – ऑनलाइन अर्ज भरणे – ३० जुलैपर्यंत
  • – कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती – ३० जुलैपर्यंत
  • – तात्पुरती गुणवत्ता यादी – २ ऑगस्ट
  • – गुणवत्ता यादीवरील आक्षेप – ३ ते ५ ऑगस्ट
  • – अंतिम गुणवत्ता यादी – ७ ऑगस्ट

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!