Professor Bharti -राज्यात लवकरच 2 हजार 72 प्राध्यापकांच्या जागांसाठी मेगाभरती

Maharashtra Professor Bharti 2022

Professor Bharti 2022: Latest updated regarding Professor Bharti is that 2 thousand 72 professorships will be filled soon in Maharashtra according to higher and technical education. The recruitment of professors was stopped for many years. Now due to this new recruitment the eligible candidates will get a big relief. Read More details about Professor Bharti 2022 are give below.

Professor Bharti 2022

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Maharashtra Professor Recruitment 2022

राज्यात लवकरच 2 हजार 72 प्राध्यापकांच्या जागा  भरल्या जाणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ही माहिती दिलीय. त्यामुळे ज्ञानदानाचं काम करण्यासाठी इच्छूक तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातल्या प्राचार्यांच्या रिक्त जागा आणि 8 हजारांपैकी 2 हजार 72 प्राध्यापकांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौऱ्यावर असताना ही माहिती दिलीय. बऱ्याच वर्षांपासून प्राध्यापक भरती रखडली होती. आता या नव्या भरतीमुळे पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अपात्र शिक्षकांची कोर्टात धाव

टीईटी घोटाळ्यात कारवाई झालेल्या अपात्र शिक्षकांनी कोर्टात धाव घेतलीय. राज्यातील 7 हजार 880 शिक्षकांवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. घोटाळ्यात आरोप झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबवल्याने हिंगोलीतील तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतलीय. संबंधित याचिकेवर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आलीय. त्यामुळे या सुनावणीत काय निर्णय घेण्यात येणार, याकडे अपात्र शिक्षकांचं लक्ष असणार आहे.


Professor Bharti 2022: Latest updates about Maharashtra Professor Bharti 2022 is that There are thousands of vacant posts of private funded assistant professors and other teaching and non-teaching staff in Maharashtra. There are 9,511 teaching and 8,798 non-teaching posts vacant in the aided colleges. Read More details are given below.

सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त

महाराष्ट्रात खासगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त असून, करोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२०पासून पदभरतीवर निर्बंध आहेत. तथापि, पदभरती सुरू करण्यासाठी वित्त विभागासोबत विचारविनिमय सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराच्या माध्यमातून दिली आहे. १ ऑक्टोबर २००१पूर्वी मान्यता दिलेल्या महाविद्यालयात नवीन तुकडी, विद्याशाखा, संगणक शाखा यांना अनुदान पात्र करण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Professor Bharti 2022

 • बिगर कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या खासगी अनुदानित महाविद्यालयांतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांच्या भरतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, बाबाजानी दुर्राणी, काँग्रेसचे अमरनाथ राजूरकर, राजेश राठोड, डॉ. वजाहत मिर्झा आदी सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न सभागृहात पुकारण्यात आला नाही. तथापि, मंत्र्यांनी लेखी उत्तरात वरील माहिती स्पष्ट केली.

राज्यातील विद्यापीठाशी संलग्न असलेल्या व उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित महाविद्यालयांमधील प्राचार्य या संवर्गातील रिक्त पदे आणि प्राचार्य पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रिक्त होणारी पदे भरण्यासाठी तसेच सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली २,०८८ पदे भरण्यास काही अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आली आहे. तथापि, या पदभरतीस मान्यता देताना एक ऑक्टोंबर २०१७रोजीच्या विद्यार्थी संख्येचा आधार प्रमाण मानण्यात आला आहे.

Maharashtra Professor Recruitment 2022

 • त्याशिवाय एक ऑक्टोबर २०१७च्या वर्कलोडनुसार खासगी अनुदानित महाविद्यालयातील ९,५११ शिक्षकीय आणि ८,७९८ शिक्षकेतर पदे रिक्त आहेत. तसेच २०१७च्या आकृतीबंधानुसार मार्च २०२२अखेर राज्यातील बिगर कृषी विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये १,३३८ शिक्षकीय आणि २,५७२ शिक्षकेतर पदे रिक्त आहेत.
 • करोना साथरोग काळात आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी वित्त विभागाने चार एप्रिल २०२०रोजी पद भरतीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार शारिरीक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदाच्या भरतीवरही निर्बंध आहे.
 • या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नोकर भरतीच्या निर्बंधातून सवलत देण्यात यावी यासाठी राज्याच्या वित्त विभागासोबत विचारविनिमय सुरू आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
 • महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक यांच्यासह अन्य शिक्षकीय पदे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक आहे.
 • करोना संसर्ग संपुष्टात येत असून, राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर येत आहे. वित्त विभागाचा कार्यभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर उच्च व तंत्र शिक्षण खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे.
 • दोन्ही मंत्री हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे या प्रश्नात व्यवहार्य मार्ग निघण्याची शक्यता वर्तवली जाते.

Professor Bharti 2022-In  Sir J. J. School of Art Mumbai there is a total 80% Post of Professor are vacant.  In Sir J. J. School of Art there is  49 posts have been sanctioned in Arts College. Out of which 29 posts are vacant. Out of the working professors, only 8 are full time professors. There are 5 professors working on seasonal basis. Read More details regarding Professor Recruitment 2022

Pune University Bharti -पुणे विद्यापीठ मध्ये तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त

Shikshak Bharti- या जिल्ह्यात शिक्षकांच्या ७०० जागा रिक्त

मुंबई : सर ज. जी. कला महाविद्यालयासह उपयोजित कला महाविद्यालय, वास्तुकला महाविद्यालयाला अनन्य स्वायत्ततेसह (डी नोव्हो) अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळत असताना त्याची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याऐवजी राज्य शासनाच्या अखत्यारितील विद्यापीठ करण्याच घाट घालण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत शासनानेच दुर्लक्ष केल्यामुळे तीनही महाविद्यालयांची जर्जरावस्था ठळक दिसत आहे. उपयोजित कला, कला महाविद्यालयातील प्राध्यापकांची तब्बल ८० टक्के पदे रिक्त आहेत. 

Shikshak Bharti बच्चू कडू – शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

प्राध्यापकांची स्थिती..

ज. जि. कला महाविद्यालयात साधारण ४९ पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यातील २९ पदे रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या प्राध्यापकांपैकी अवघे ८ पूर्णवेळ प्राध्यापक आहेत. हंगामी तत्वावर काम करणारे ५ प्राध्यापक आहेत. मात्र, त्यांना अनेकदा उशिरा वेतन मिळते

पदे रिक्त का?

देशातील कला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या या संस्थेत १९८६ पर्यंत सर्व सुरळीत सुरू होते. त्यानंतर १९९६ मध्येही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पदे भरण्यात आली. मात्र, त्यानंतर प्राध्यापक निवृत्त झाले, काही सोडून गेले मात्र त्यांच्याऐवजी पूर्णविळ प्राध्यापकांची भरती राज्य शासनाने केली नाही. साधारण २००० नंतर संस्थेतील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहू लागली.


Professor Bharti 2022– Over the last few years, the recruitment of professors has been facing difficulties due to various reasons. Therefore, in many aided colleges, CHB professors are currently handling most of the work. However, the honorarium paid to them is very meager. The Mane Committee, set up to augment it, submitted its report to the Government. It is expected to be accepted and implemented. However, the government is wasting time and the rules for recruitment of professors have not been prepared yet. The government will start the process of recruitment of professors soon.

राज्यात शिक्षकांच्या पाच हजार जागा रिक्त; लवकरच होणार भरती

  राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे तासिका तत्त्वावरील  प्राध्यापकांच्या  मानधनात वाढ करण्याचा अध्यादेश गेल्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, अजूनही या आदेशानुसार सीएचबी  प्राध्यापकांना  मानधन दिले जात नाही. तसेच सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नाबाबत स्थापन केलेल्या माने समितीचा अहवाल राज्य शासनास सादर केला असला तरी त्याची अंमलबजावणी केली. नाही. त्याचप्रमाणे प्राध्यापक भरतीच्या सर्व अडचणी दूर झाल्या, तरीही भरती प्रक्रिया सुरू का केली जात नाही, असा सवाल प्राध्यापक संघटनेतर्फे उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्राध्यापक भरतीला विविध कारणांमुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अनेक अनुदानित महाविद्यालयांमध्ये सध्या सीएचबी प्राध्यापकच बहुतांश सर्व कामकाज सांभाळत आहेत. मात्र, त्यांना देण्यात आलेले मानधन फारच तुटपुंजे आहे. त्यात वाढ करण्यासाठी स्थापन केलेल्या माने समितीने आपला अहवाल शासनास सादर केला. तो स्वीकारून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मात्र, शासन वेळकाढूपणा करत असून, प्राध्यापक भरतीची नियमावली अद्याप तयार केलेली नाही.

प्राध्यापक भरतीसाठी अनेक आंदोलने केली. परंतु, शासनाने भरतीसंदर्भात केवळ अध्यादेश प्रसिद्ध केले. त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे शासनाने प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करावी.


Professor Recruitment 2022: State government has approved to fill the posts of 2,088 professors in non-agricultural colleges, it has come to light that there are more than 1,500 vacancies in non-agricultural government universities. Even after a lapse of four and a half years, the recruitment process has not progressed and the number of vacancies has reached 17,000 as the government did not fully approve the October 1, 2017 format.

Professor Bharti 2022: राज्य सरकारने अनुदानित अकृषी महाविद्यालयांमध्ये दोन हजार ८८ प्राध्यापकांची पदे  भरण्यास मान्यता दिली असली, तरी अकृषी सरकारी विद्यापीठांमध्ये एक हजार ५०० पेक्षा अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त  असल्याचे समोर आले आहे. साडेचार वर्षांच्या कालावधी उलटून गेल्यानंतरही सरकारने एक ऑक्टोबर २०१७ च्या आकृतिबंधाला पूर्ण मान्यता न दिल्याने प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पुढे सरकत नसून, रिक्त पदांची संख्या १७ हजारांपर्यंत पोहोचली आहे.

राज्यात प्राध्यापकांची १७ हजार पदे अद्याप रिक्तच

Shikshak Bharti -शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा!! जाणून घ्या

Shikshak Bharti- शिक्षक भरतीसाठी या महिन्यात सीईटी; 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

 • राज्यातील प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयासमोर राज्यातील पात्रताधारक उमेदवारांनी सलग ६० दिवस आंदोलन केले. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सरकारने ४० टक्के रिक्त जागा म्हणजे दोन हजार ८८ जागा भरण्याला मान्यता दिली.
 • त्याबाबतचे राजपत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. या भरतीबाबत तातडीने कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने, त्रासलेल्या पात्रताधारक उमेदवारांनी सोमवारी एक दिवसीय आंदोलन केले. त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेला तातडीने सुरुवात न केल्यास चार जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण संचालनालयाला दिला आहे.
 • राज्यात सध्याची प्राध्यापक भरती एक ऑक्टोबर २०१७ च्या आकृतिबंधानुसार होत आहे. मात्र, साडेचार वर्षांच्या कालावधी उलटून गेल्यानंतरही सरकारने अंतिम मान्यता दिलेली नाही. या कारणामुळे सरकारला अनुदानित महाविद्यालयांमध्ये एक ऑक्टोबर २०१७ नंतर सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरता येत नसल्याचे चित्र आहे. ‘
 • राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये एक हजार ५७२ प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. सरकारच्या निर्णयानुसार ४० टक्के रिक्त जागा म्हणजे ६२९ प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल,’ असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र, त्याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.
 • गेल्या साडेचार वर्षांत विद्यापीठांमधील साधारण ५०० प्राध्यापक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या जागांची भर रिक्त जागांमध्ये पडली आहे. या जागा भरण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागांमध्ये प्राध्यापक नाहीत, अशी परिस्थिती आहे.

Professor Bharti 2022: Approval was given on 12 November 2021 to recruit 2,088 posts in about 1,171 subsidized colleges in the state as per the number of students as on October 1, 2017. On 28th December, 2021, both the Houses of the Legislative Assembly unanimously approved the Category wise Reservation Bill. But this has not been implemented. Read More details regarding Maharashtra Professor Bharti 2022 are give below.

प्राध्यापकांची 2088 पदे मंजूर, पदभरती कधी होणार!! जाणून घ्या

अकृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदभरती सुरू न होणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबतच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी न होणे, विनाअनुदानित तुकड्यांना अनुदान देणे यांसह विविध मागण्यासाठी येत्या सोमवारी शिक्षण संचालक कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर आणि सचिव डॉ. मारोती देशमुख यांनी दिला आहे.

राज्यातील सुमारे एक हजार १७१ अनुदानित महाविद्यालयांमध्ये १ ऑक्टोबर २०१७च्या विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापक पदभरतीला ४० टक्के नुसार दोन हजार ८८ जागांची भरती करण्यात १२ नोव्हेंबर २०२१मध्ये मान्यता देण्यात आली. पदभरतीतील आरक्षणासंदर्भात २८ डिसेंबर २०२१ रोजी संवर्गनिहाय आरक्षण विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. परंतु याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. तसेच पद भरतीला परवानगी देताना शिक्षण संचालक, ग्रंथपाल तसेच विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता न दिल्याने पात्रता धारकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राध्यापक भरतीसह अन्य मागण्यांबाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, या संदर्भातील मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

प्रमुख मागण्या :

 • अकृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पदभरती त्वरित सुरू करावी.
 • ऑक्टोबर २०१७च्या आकृतिबंधाला अंतिम मान्यता देऊन डिसेंबर २०२१पर्यतची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत.
 • तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या धोरणाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून अंमलबजावणी करावी.
 • विनाअनुदानित तुकड्यांना त्वरित अनुदान द्यावे.
 • २०१६ नंतरच्या सहाय्यक प्राध्यापकांना वेतनवाढ तत्काळ लागू करावी.

इन्फोबॉक्स :

‘‘तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या संदर्भात १४ नोव्हेंबर २०१८ आणि २२ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी न होणे, तसेच यामध्ये तासिका तत्त्वावरील अनुभव ग्राह्य धरावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबत धोरण निश्चितीसाठी डॉ. धनराज माने समितीने अहवाल देखील दिला आहे. तो शासन दफ्तरी धुळखात पडला आहे. अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.’’Professor Bharti 2022: As per the news, There are about 12000 vacancies for assistant professors in various aided colleges in the state. There are 40 or 50 %  vacancies for professors in various districts of the state. College administration is facing various difficulties due to non-recruitment of permanent professors. Read More details as given below.

राज्यात प्राध्यापकांच्या जवळपास १२ हजार जागा रिक्त

Professor Bharti 2022 मागील दहा वर्षांपासून राज्यातील विविध अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांच्या जवळपास १२ हजार जागा रिक्त रिक्त आहेत.  राज्यातील विविध जिल्ह्यात प्राध्यापकाची ४०, ५० टक्के जागा रिक्त आहेत. स्थायी प्राध्यापकांच्या पदांची भरती होत नसल्याने महाविद्यालय प्रशासनासमोर विविध अडचणी आहेत. विद्यापीठाशी निगडित कामकाज करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक अनेक महाविद्यालयात नाहीत. तर, महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणाया राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या तपासणीला सामोरे जाताना भौतिक सुविधा असल्या तरी रिक्त जागांमुळे परिपूर्ण तज्ज्ञ प्राध्यापकांचा तुटवडा प्रकर्षाने जाणवतो. 

जालना : गत अनेक वर्षांपासून महाविद्यालयांत प्राध्यापकांची भरती झाली नाही. भरती प्रक्रिया रखडल्याने बहुतांश महाविद्यालयांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त असून, केवळ तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर ही महाविद्यालये चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

लातूर :  जिल्ह्यात अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या ३६ ते ४० च्या घरात असून, गेल्या आठ वर्षांपासून प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती नसल्यामुळे तासिका तत्त्वावर काम भागविले जात आहे.जागा रिक्त असून, नोकरी मिळेना आणि तासिका तत्त्वावर पोट भरेना, अशी अवस्था तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची आहे. रिक्त जागांच्या ४० टक्के जागा भरण्यास २०१८ मध्ये शासनाने मंजुरी दिली. यानुसार जिल्ह्यातील ३६ महाविद्यालयांमध्ये १७७ पेक्षा अधिक जागा भरण्यास पात्र आहेत. मात्र, त्या जागांवर भरती झालेली नाही

वर्धा : गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. अशातच कोरोनाकाळामुळे या नियुक्त्यांना ब्रेक लागला आहे. जिल्ह्यामधील महाविद्यालयात प्राध्यापकांच्या असंख्य जागा रिक्त आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांचीही मोठी फौज आहे; परंतु शासनाकडून पदभरतीला परवानगी नसल्याने तासिका तत्वावरच काम भागविले जात आहे. म्हणूनच सध्या अनेक जागा रिक्त; तरी नोकरी मिळेना अन् तासिका तत्त्वावर पोट भरेना!’ अशी अवस्था महाविद्यालयीन अंशकालीन प्राध्यापकांची झाली आहे.

महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळविण्यासाठी सुरुवातीला सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली जाते. त्याकरिता संबंधित विषयामध्ये स्नातकोत्तर पदवी, नेट-सेट किंवा पीएचडी असणे अनिवार्य आहे. हे सर्व शिक्षण करण्यातच मोठा कालावधी जातो. सहायक प्राध्यापकांकरिता पात्र ठरण्यासाठी तप करावा लागत असून, पात्रता मिळविल्यानंतरही कायमस्वरूपी नोकरीकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे

सांगली : महाविद्यालयांमधील प्राचार्य आणि ४30 सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, त्याबाबतचे पुढील पाऊल अद्याप शासनाकडून पडलेले नाही. – सध्या सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत सहाय्यक प्राध्यापकांच्या ४० टक्क्यांहून जास्त जागा रिक्त आहेत. तरीही नोकरी मिळेना अन् तासिकेवर पोट भरेना, अशी अवस्था तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची झाली आहे. शासकीय आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. यामुळे प्राध्यपकांना नियुक्ती कधी मिळणार अशी विचारणा केली जात आहे. सध्या उच्च शिक्षित असुनही सहाय्यक प्राध्यापकांना योग्य वेतन नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात याबाबत ठोस निर्णय होणे गरजेचे बनले आहे

अकोला : जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५० टक्क्यांवर जागा रिक्त आहेत. यामुळे प्राध्यापकांना नोकरी मिळत नाही आणि घड्याळी तासिकांवर पोटही भरत नसल्याची विदारक परिस्थिती आहे. जिल्ह्यातील पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये ७०० च्या जवळपास प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर शासन भरतीही घेत नाही आणि घड्याळी तासिकांवर काम करणाऱ्या प्राध्यापकांना वेतनहीं देत नाही. त्यामुळे या प्राध्यापकांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह, आईवडिलांचे आजारपण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा असा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने प्राध्यापकांची तातडीने पदभरती करावी अशी तासिकेवर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी केली आहे.

हिंगोली : मागील अनेक वर्षांपासून अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यात येत नसल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत जवळपास १२५ अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यातील ८५० जागा रिक्त आहेत. रिक्त जागांवर तासिका तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापकांची मानधनावर नेमणूक केली जात असली तरी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यात वेळेवर मानधन मिळत नसल्याने प्राध्यापकांना अनेक संकटांना सामोर जावे लागत आहे. दरम्यान, शासन तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची भरती करूनरिक्त जागा भरण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी प्राध्यापकांतून होत आ

परभणी: राज्य शासनाने २००१ पासून प्राध्यापकांची भरती बंद केल्याने याअनुषंगाने पात्रता धारण केलेल्या प्राध्यापकांवर तुटपुंज्या मानधनावर तासिका तत्त्वावर काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्राध्यापकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

राज्य शासनाने २००९ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांची भरती बंद केली आहे. अशातच या महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या जवळपास ५० टक्के जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर संबंधित शैक्षणिक पात्रताधारण केलेले प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करीत आहेत. त्यांना एका तासासाठी ५०० रुपये मानधन देण्यात येते. आठवड्यातून या प्राध्यापकांना ४ तासिका देण्यात येतात. त्यामुळे महिनाभरात जवळपास त्यांना ८ हजार रुपये मिळतात. आजच्या महागाईच्या काळात हे मानधन परडणारे नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण वाढली आहे.

जळगाव : महाविद्यालयांमधील सुमारे ५० टक्क्याहून अधिक कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. रखडलेल्या प्राध्यापक भरतीमुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. राज्यशासन प्राध्यापक भरतीकडे दुर्लक्ष करीत असून, लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे, त्यामुळे प्राध्यापकांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ८३ अनुदानित महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ८२९ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.

सातारा : उच्च शिक्षणाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या राज्यातील प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनाकडून अजूनही ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांना अजूनही तुटपुंज्या मानधनाने त्यांचे पोट भरेना आणि रिक्त जागांवर भरती न काढल्याने नोकरी मिळेना अशी अवस्था प्राध्यापकांची झाली आहे.

बुलडाणा : राज्यभरात १२ हजारांच्या वर प्राध्यापकांच्या जागा रिक्त असताना शासनाकडून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या भरतीला मंजुरी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे,पात्रता धारक उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नेट, सेट, पीएचडी धारकांच्या विविध संघटनांनी आंदोलन केल्यानंतर शासनाने प्राध्यापक भरतीची घोषणा केली. २ हजार जागा भरण्याविषयी शासन आदेश काढून मंजुरीही दिली. मात्र, संवर्गनिहाय आरक्षणाविषयी शासन वेगवेगळे आदेश काढत आहे.

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित एकूण २१२ महाविद्यालये आहेत. शिवाय विद्यापीठाचे कॅम्पस आहेत. या सर्व ठिकाणी प्राध्यापकांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत. शासनाकडून पदभरतीवर ब्रेक असल्यामुळे पात्र उमेदवारांना नोकरी मिळाली नाही. दुसरीकडे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना अल्प मानधन असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

चंद्रपूर : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित एकूण २१२ महाविद्यालये आहेत. शिवाय विद्यापीठाचे कॅम्पस आहेत. या सर्व ठिकाणी प्राध्यापकांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत. शासनाकडून पदभरतीवर ब्रेक असल्यामुळे पात्र उमेदवारांना नोकरी मिळाली नाही. दुसरीकडे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना अल्प मानधन असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित दोन्ही जिल्ह्यांतील महाविद्यालये तसेच कॅम्पसमध्ये मिळून प्राध्यापकांच्या जवळपास १ हजार १२० जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली असून अध्यापनाची प्रक्रिया सुरू आहे

औरंगाबाद : अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती तब्बल ८ वर्षांपासून बंद आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने भरतीवर घातलेली बंदी निवडणुकीच्या धामधुमीत मागे घेत रिक्त जागांच्या ४० टक्के जागा भरण्यास ३ नोव्हेंबर २०१८ रोजी मंजुरी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील ३९ अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त २७९ पैकी ९७ पदे भरण्यात येणार होती. मात्र त्यातील केवळ २० पदेच भरली.

बीड जिल्ह्यात जवळपास एक हजारपेक्षा जास्त प्राध्यापक तासिका तत्त्वावर महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत, तर ५५०पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्यामुळे पन्नास टक्के जागा रिक्त; तरी नोकरी मिळेना अन तासिकेवर पोट भरेना,अशी स्थिती सध्या आहे. नेट, सेट, पीएच. डी. अशी गुणवत्ता असताना नोकरीच्या प्रतीक्षेत त्यांचे वय निघून जात आहे. चांगल्या प्रकारची गुणवत्ता असतानाही केवळ भरतीअभावी तासिका तत्त्वावर तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. यातच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची बिले उशिरा निघत असल्याने ते तळमळीने कसे शिकवतील, हा प्रश्न आहे.

Professor Bharti 2022


Professor Bharti 2022: As per the news, There are about 12000 vacancies for assistant professors in various aided colleges in the state and 850 vacancies in 125 aided colleges in four districts under Swami Ramanand Tirtha Marathwada University. Read More details as given below.

मागील दहा वर्षांपासून राज्यातील विविध अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांच्या जवळपास १२ हजार जागा रिक्त असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत असलेल्या चार जिल्ह्यातील १२५ अनुदानित महाविद्यालयात ८५० जागा रिक्त आहेत. मात्र या जागा भरण्यात येत नसल्याने सीएचबी प्राध्यापकांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शासन तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची भरती करून रिक्त जागा भरण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावरील धोरणाला सीएचबी प्राध्यापकांनी विरोध दर्शविला आहे. यूजीसीच्या निर्देशानुसार १०० टक्के प्राध्यापकांची भरती करण्यात यावी,अशी मागणी सीएचबी प्राध्यापकांनी केली आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व सहायक प्राध्यापकांची घटती संख्या ही विसंगती आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले . 


Professor Bharti 2022- Many professors have retired while there are already vacancies in universities and aided colleges in the state. As a result, the backlog of vacancies has increased significantly. The state government has given permission to fill two thousand vacancies of professors. However, due to non-preparation of point list, the government has not been able to find the time for recruitment of professors.

राज्यात प्राध्यापकांच्या दोन हजार जागा रिक्त – भरती कधी? जाणून घ्या

राज्य शासनाने प्राध्यापकांच्या रिक्त दोन हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी शासन आदेशही जाही झाला आहे. मात्र प्राध्यापक भरतीचा अजूनही मुहूर्त शासनाला सापडत नसून, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील हजारो नेट, सेट, पीएच. डी धारक आर्थिक संकटात सापडले आहेत.

राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये आधीच पदे रिक्त असताना अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. राज्य शासनाने प्राध्यापकांच्या रिक्त पदांपैकी दोन हजार पदे भरण्याची परवानगी दिली आहे.  मात्र, बिंदुनामावली तयार नसल्याने प्राध्यापक भरतीचा मुहूर्त शासनाला सापडलेला नाही.


Professor Bharti 2022: Various posts of professors are vacant in the state. The recruitment situation of professors in higher education institutions in the state is very serious. It is unfortunate that the process of recruitment of professors on Tasika principle, which was started as a temporary facility, is becoming a norm. In most of the colleges, the number of professors on Tasika principle is more than the number of permanent professors. For quality higher education, the government should immediately fill the vacancies in the state, said Dr. Maharashtra State Professors Association President. Presented by Shyamrao Lawande.

Professor Bharti 2022

राज्यात प्राध्यापकांची विविध पदे रिक्त

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक भरतीची स्थिती अतिशय गंभीर आहे. तात्पुरती सोय म्हणून सुरु करण्यात आलेली तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची भरती ही प्रक्रिया रूढ होत आहे ही दुर्दैवी बाब आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राध्यापकांपेक्षा तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची संख्याच जास्त आहे. दर्जेदार उच्च शिक्षणासाठी शासनाने राज्यामधील रिक्त प्राध्यापकांची भरती तातडीने केली पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्यामराव लवांडे यांनी मांडली.

येथील प्राध्यापकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. के. एल. गिरमकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. हनुमंत अवताडे, शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. के. चव्हाण, सोलापूर विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नेताजी कोकाटे, स्पूक्टोचे सरचिटणीस डॉ. प्रवीण ताटे-देशमुख, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. राजेंद्र साळुंखे, प्रा. धनंजय भोसले उपस्थित होते. यावेळी डॉ. लवांडे यांची महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापकांच्या व प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. राजाराम गावडे यांची स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक डॉ. राजेंद्र साळुंखे यांनी सूत्रसंचालन डॉ. तानाजी कसबे व डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले. तर आभार प्रा. उत्तम माने यांनी मानले. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मेळाव्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर कार्यक्षेत्रातील १५० प्राध्यापक मेळाव्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व इंदापूरमधील प्राध्यापकांनी केले.

 

Shikshak Bharti 2022– According to the number of students in 1 thousand 171 non-government colleges in the state as of October 1, 2017, and till now the vacancies of retired professors have been filled and about 17 thousand professors are vacant. There are at least 12,000 vacancies for non-teaching staff. In the academic department of non-agricultural universities, there are at least fifteen hundred vacancies for assistant professors and professors, and at least one thousand vacancies for non-teaching staff.

राज्यात १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

राज्य सरकारने (State Government) संवर्गनिहाय आरक्षण (Reservation) कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी. तसेच त्यानुसार राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदभरतीचा (Professor Recruitment) अध्यादेश काढावा आणि ही भरती प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने केली आहे.

Shikshak Bharti- या ग्रामीण भागात ५५१ शिक्षकांची पदे रिक्त !

राज्यातील एक हजार १७१ अशासकीय महाविद्यालयांमध्ये १ ऑक्टोबर २०१७ च्या विद्यार्थी संख्येनुसार आणि आतापर्यंत सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा पकडून जवळपास १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या किमान १२ हजार जागा रिक्त आहेत. अकृषी विद्यापीठांमधील शैक्षणिक विभागात किमान पंधराशे सहायक प्राध्यापक, प्राध्यापक यांच्या जागा रिक्त असून, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या किमान एक हजार जागा रिक्त आहेत.

राज्यात एकूण ३१ हजार ५०० इतकी प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील नेट-सेट, पीएच.डी. पात्रताधारकांमध्ये नैराश्य आले आहे. परंतु त्यानंतर सरकारने प्राध्यापक पदभरतीला १२ नोव्हेंबर २०२१ रोजी दोन हजार ८८ पदांसाठी परवानगी दिली. सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी प्रक्रिया महाविद्यालय व संस्था स्तरावर सुरू झाली होती. परंतु राज्यातील सर्व प्रवर्गांना न्याय मिळावा, या हेतूने राज्य सरकारने २९ डिसेंबर २०२१ रोजी संवर्गनिहाय आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केले. हे विधेयक मंजूर होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरीही विधेयकाचे अजून कायद्यात रूपांतर झालेले नाही. परिणामी सहायक प्राध्यापक पदभरतीसंबंधी पुढील कार्यवाही महाविद्यालय व संस्था स्तरावर होत नसल्याचे दिसून येते, असे नवप्राध्यापक संघटनेचे म्हणणे आहे.

‘‘महाविद्यालय किंवा एखाद्या संस्थेत आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, पदभरतीत कुठले आरक्षण असावे, यासंदर्भात संवर्गनिहाय आरक्षण विधेयक मंजूर झाले. परंतु शासन निर्णय होत नाही तोपर्यंत रोस्टर तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. सर्व शिक्षणसंस्थांना नव्याने रोस्टर तयार करून पदभरतीची प्रक्रिया करावी लागणार आहे. परंतु सद्यःस्थितीत पदभरतीला मान्यता असूनही रोस्टरच्या लालफितीत प्राध्यापक पदभरती अडकली आहे. एकीकडे प्राध्यापक पदभरतीला शासनाने परवानगी द्यायची आणि दुसरीकडे आरक्षण पद्धतीच्या धोरणात प्राध्यापक पदभरती लांबवायची ही पात्रताधारकांची फसवणूक आहे.’’


राज्यातील प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील – तब्बल २ हजार ८८ पदे भरणार

Maha Shikshak Bharti 2022 – As many as 2,088 vacant posts of professors of various subjects in the senior colleges of the state and also the posts of principals will be filled soon. Higher and Technical Education Minister Uday Samant had announced the appointment of professors in the state a few months back. In it, he had clarified that 15,000 posts of assistant professors in senior colleges would be filled. Read More details as given below.

 1. CTET परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड
 2. Shikshak Bharti -राज्यात शिक्षण विभागात ८० टक्के पदे रिक्त
 3. Maha TAIT Exam 2022- राज्यात शिक्षक भरतीसाठी दुसरी अभियोग्यता चाचणी परीक्षा लवकरच
 4. Shikshak Bharti- रखडलेल्या प्राध्यापक भरती चा मार्ग मोकळा-1,298 जागांसाठी भरती
 5. Shikshak Bharti- पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार
 6. Shikshak Bharti- शिक्षक भरती लवकरच ; जाणून घ्या नविन नियम

राज्यातील प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील – तब्बल २ हजार ८८ पदे भरणार

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये (colleges) रिक्त असलेली विविध विषयांची प्राध्यापकांची तब्बल २ हजार ८८ पदे (professor vacant post) आणि त्यासोबतच प्राचार्यांची पदेही (principal post) लवकरच भरली जाणार आहेत. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) , व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या बैठकीत या पदांना मान्यता देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी राज्यातील प्राध्यापकांची पदे भरण्याची घोषणा मागील काही महिन्यांपूर्वी केली होती.

त्यात त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची १५ हजार पदे भरली जाणार असे स्पष्ट केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील २ हजार ८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्यांची पदे भरण्याला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सामंत यांनी एक ट्वीट करून दिली आहे. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयाती रिक्त पदे भरण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्राध्यापक संघटनांसोबतच युवा सेना, महाराष्ट्र प्राध्यापक सेना आदी संघटनांनीही मागणी लावून धरली होती.

तर यासाठी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य व महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे अध्यक्ष डॉ. धनराज कोहचाडे यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच सामंत यांची भेट घेऊन प्राध्यापक पदांची भरती लवकर करण्याची मागणी केली होती. राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध विषयाची सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानेही वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पदभरतीची प्रक्रियाही लांबणीवर पडली होती.

Professors Recruitment 2022

There is double good news for professors in the state. Higher and Technical Education Minister Uday Samant has assured that the recruitment process, which has been closed in the state since 2013, will start soon. This will bring relief to the candidates across the state who are deprived of jobs. There are currently over fifteen thousand vacancies for professors in various colleges in the state 

शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रखडलेली प्राध्यापक भरती पुन्हा सुरु करण्याचे आणि तासिका प्राध्यापकांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. गोंदियात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात सध्या विविध कॉलेजमधील पंधरा हजारावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. या देखील भरण्यात येणार आहेत. तसेच तासिका प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली जाणार असल्याचे आश्वासनंही उदय सामंत यांनी दिले आहे.

२०१३ पासून ही भरती बंद आहे. या पदावर भरती व्हावी म्हणून राज्यातील पन्नास हजारावर नेटसेटधारक आणि पीएच.डी पदवी मिळवलेल्यांनी प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर पाच वर्षापूर्वी युती सरकारने चाळीस टक्के भरतीला मान्यता दिली होती. यामुळे भरतीची आशा निर्माण झाली होती, पण सरकारने प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही. उलट पुन्हा नवीन आदेश काढून भरतीला बंदी घालण्यात आली होती.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!