Ratnagiri Arogya Vibhag -रत्नागिरीतील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार

Ratnagiri Arogya Vibhag Bharti 2021

Public Health Minister Rajesh Tope said that vacancies in the health department in Ratnagiri district would be filled soon. 31 ambulances have been provided to Ratnagiri Zilla Parishad by the Arogya Vibhag Maharashtra. Read the details carefully given below and keep visit on our website for the further updates.

Arogya Vibhag Bharti Hall Tikcet – गट क व ड लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध

रत्नागिरीतील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार

रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी श्री.टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात श्री. टोपे मंत्रालयातून सहभागी झाले.

Arogya Vibhag Bharti -आरोग्य विभाग भरती परीक्षेची नवीन तारीख जाहीर

  • यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
  • सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी राज्यात आतापर्यंत एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्यापैकी 31 रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत देण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मदत होईल.
  • रुग्णवाहिकांमुळे अर्भक-मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी होण्यात मदत होईल. रुग्णवाहिकांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील गर्भवतींचा संस्थात्मक प्रसूती होईल, याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशा सूचना श्री. टोपे यांनी दिल्या.
  • लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी राज्य शासनाने मिशन कवच कुंडले अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात जास्त जास्त लसीकरण करण्यासाठी रुग्णांची माहिती संकलित करुन ठेवावी, अशा सूचनाही श्री. टोपे यांनी दिल्या.
  • लोकार्पण कार्यक्रमास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण आणि अर्थ सभापती चंद्रकांत मंणचेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!