GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

10th,12th Sports Student Get Discount Point

10th,12th Sports Student Get Discount Point

दहावी, बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलत गुण

Savlat Gun – Discount Points for Sports Student – The Corona Virus Effect has been on the rise since last month and the lockdown has been extended till 3rd May. District Sports Officer Vijay Santan has appealed to the schools and colleges which have failed to submit their proposals due to this lockdown to scan the proposals and send them by e-mail. The District Sports Office has once again provided an opportunity to schools and colleges to submit proposals for the concession marks of the players who have appeared for the Class X and XII examinations in the Pune district. The government has decided to give increased concession marks to sports students. The Directorate of Sports and Youth Services has also issued guidelines several times to facilitate the granting of sports concessions to eligible players.

Savlat Gun – concession marks for Sports Student

पुणे जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला बसलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. पात्र खेळाडूंना क्रीडागुणांची सवलत देण्याबाबतचे कामकाज सुलभ व्हावे याकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने मार्गदर्शक सूचनाही अनेकदा जारी केलेल्या आहेत. मात्र, तरीही काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांचे प्रस्तावच दाखल केलेले नाहीत, अशी बाब उघडकीस आली आहे. शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये काही खेळप्रकारात प्रथम पाच क्रमांक पर्यंत प्राविण्य असलेल्या खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र दिले जात असले तरीही सुधारीत शासन निर्णयामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडागुणाची सवलत देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

शाळांना प्रस्ताव सादर करण्यासाठी संधी

गेल्या महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून लॉकडाऊन मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनमुळे प्रस्ताव दाखल करायचे राहून गेलेल्या शाळा व महाविद्यालयांनी प्रस्ताव स्कॅन करुन ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी केले आहे. प्रस्तावात विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, शाळा सांकेतांक क्रमांक, बैठक क्रमांक, खेळ, स्तर, प्राविण्य, प्रमाणपत्र क्रमांक आदी माहिती नमूद करणे आवश्‍यक आहे. सर्व पात्र खेळाडूंचे प्रस्ताव एकत्रितपणे पाठवावे. प्रस्तावावरील कार्यवाहीबाबत मे नंतर कळविण्यात येणार आहे. खेळाडू विद्यार्थी सवलतीच्या गुणापासून वंचित राहिल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्त भंग कार्यवाही होईल, असा इशारा क्रीडा विभागाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी दिला आहे.

सौर्स : प्रभात

Leave A Reply

Your email address will not be published.