GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Due to Corona UPSC Exam Schedule change

Due to Corona UPSC Exam Schedule change

करोनामुळे UPSC ने देखील बदललं शेड्युल

UPSC Exam 2020 – It was announced a few days ago that the Central Public Service Commission (UPSC Examination 2019) interview process was postponed. Lockdown was not announced nationwide at the time. Now the country is locked down for 21 days. Due to this, changes have been made in the dates of many UPSC examinations.

लॉकडाऊन: यूपीएससीच्या ‘या’ सर्व मुलाखती रखडल्या

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षा २०१९ च्या मुलाखतींची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. देशभरात लॉकडाऊनची घोषणा तेव्हा झाली नव्हती. आता देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे यूपीएससीच्या अनेक परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ‘देशात करोना व्हायरसमुळे लागलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या मुलाखतींचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. शिवाय UPSC IES आणि ISS 2020 भरती परीक्षांचं शेड्युलही बदलण्यात येणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही घोषणा केली जाणार नाही.’

पाहा कोणत्या मुलाखतींचं शेड्युल कसं बदललं —

सायंटिस्ट बी (ज्युनियर जियोफिजिसिस्ट) – ३० आणि ३१ मार्चला होणार होत्या मुलाखती.
असिस्टंट प्रोफेसर (अप्लायड आर्ट) – १ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
असिस्टेंट डायरेक्टर (CPDO) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (अॅग्रीकल्चर) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
असिस्टंट एक्झिक्युटिव इंजीनियर (सिविल) – २३ आणि २४ मार्च रोजी मुलाखती होत्या.
डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) – २५ मार्च रोजी होत्या मुलाखती.
असिस्टंट प्रोफेसर (पेंटिंग) – २६ व २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
सायंटिस्ट बी (केमिस्ट) – २४ ते २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियर – ३० मार्चला होत्या मुलाखती.
अॅडिशनल असिस्टंट डायरेक्टर – ३१ मार्चला मुलाखती होत्या.
नॉटिकल सर्वेयर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल – ७ एप्रिलला मुलाखती होत्या.
अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (BRO) – १५ व १६ एप्रिलला मुलाखती होत्या.

सौर्स – मटा


UPSC Exam Schedule : The interview process for the Civil Service Examination 2019 conducted by UPSC was about to begin. This process begins on February 17. Interviews for this exam were scheduled to run till April 3, according to the scheduled timetable. But this process has been postponed due to the Corona virus. Candidates who were called for the interview between March 23, 2020 and April 3, 2020, will now be given new dates. The Commission has informed that a new schedule will not be announced until further orders are made. Keep visit us for further updates.

UPSC Exam Schedule 2020

देशातल्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यापीठ, महाविद्यालये, शाळांमधील परीक्षा एकतर लांबणीवर पडल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षांची स्थितीही वेगळी नाही. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाने आपल्या भरती प्रक्रियेचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.

यूपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू होणार होती. ही प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२० पासून सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षेच्या मुलाखती ३ एप्रिलपर्यंत चालणार होत्या. पण ही प्रक्रिया करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली आहे. २३ मार्च २०२० ते ३ एप्रिल २०२० या दरम्यान ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते, त्यांना आता नव्या तारखा देण्यात येणार आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार नाही असे आयोगाने कळवले आहे.

सौर्स : मटा

Leave A Reply

Your email address will not be published.