GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Expert Doctor’s Task Force in Thane Municipal Corporation

Expert Doctor’s Task Force in Thane Municipal Corporation

ठाणे महापालिकेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स

TMC Doctors recruitment 2020 : Thane City Hospital, Horizon Hospital, Sapphire Hospital, Jupiter Hospital are getting corona patients. The thane mahanagarpalika is trying to reduce the number of corona deaths and to prevent the mortality of patients. For this purpose, a task force comprising expert doctors from Thane city has been created to provide guidance and advice to the specialist doctors in the hospitals recruited for this purpose.

TMC Doctors recruitment 2020

ठाणे शहरातील जिल्हा रुग्णालय, होरायझन रुग्णालय, सफायर रुग्णालय, ज्युपिटर रुग्णालय या ठिकाणी करोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रुग्णांचा मृत्यूदर टाळण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहे. या हेतूने रुग्णालयांमध्ये भरती झालेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि सल्ला मिळावा, यासाठी महापालिकेच्या वतीने ठाणे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेला टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये राजीव गांधी वैद्यकीय कॉलेजच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. योगेश शर्मा, प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. आनंद भावे, किडनी विकारतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना झोपे, डॉ. राजेंद्र गुंजोटीकर, डॉ. विद्या कदम, स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. जयनारायण सेनापती, बालरोग तज्ज्ञ डॉ. जयेश पानोट, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. संतोष कदम, भूलतज्ज्ञ डॉ. विजय पाटील, न्यूरो फिजिशयन डॉ. दीपक अहिवाले, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दयानंद कुंबला, चेस्ट स्पेशालिस्ट डॉ. अल्पा दलाल, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. हृषिकेश वैद्य, साथ रोगतज्ज्ञ डॉ. प्रिती पिलाय, इंटेसिव्हिस्ट डॉ. रवि घावत या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या संदर्भात आदेश दिले. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासह या साथीच्या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आणि रुग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेला टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.

TMC Contract No. पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधा

करोना विशेष रुग्णालयांमध्ये भरती झालेल्या रुग्णांची प्रकृती अस्थिर आणि किंवा गंभीर आहे, असे वाटल्यास संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर (९७६९००७०७०) तसेच कोविड १९चे विशेष कार्य अधिकारी डॉ. राम केंद्रे (९७६९६७६९६०) यांना व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सौर्स : मटा

Leave A Reply

Your email address will not be published.