GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Security Guard Jobs 2020

Security Guard Jobs 2020 – 1400 Posts

सुरक्षा रक्षकांची १४०० पदे रिक्त

Mumbai Mahanagarpalika Security Guard Bharti 2020 : Due to the Corona Effect various emergency services recruitment process has been started. However, labor unions have questioned why the vacancies are not being filled in the 1400 vacant posts for Security Guard. The administration has deployed firefighters and security guards in three shifts due to the need for more manpower along with Corona. This puts a strain on the security guards. Due to the large number of posts and the small number of guards, many important places are being driven without security guards. Read the complete details carefully and keep visit us for further updates.

Mumbai Mahanagarpalika Security Guard Bharti 2020

करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत अत्यावश्यक सेवेच्या विविध विभागांत भरती केली जात आहे. मात्र १४०० पदे रिक्त असलेल्या सुरक्षा विभागात भरती का केली जात नाही, असा सवाल कामगार संघटनांनी केला आहे. करोनाच्या साथीत अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने प्रशासनाने अग्निशमन दल जवान व सुरक्षा रक्षकांना तीन पाळ्यांमध्ये ड्युटी लावली आहे. त्यामुळे असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कामाचा ताण येत आहे. नेमणुकीच्या जागा अनेक आणि रक्षकांची संख्या कमी असल्याने असंख्य महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाविनाच गाडा हाकला जात आहे.

पालिकेत सुरक्षा रक्षकांची ३८०० मंजूर पदे असून त्यातील १४०० म्हणजे ३७ टक्के पदे रिक्त आहेत. मध्यंतरी सुरक्षा रक्षकांची काही पदे भरण्यात आली. त्या भरतीच्या प्रतीक्षा यादीवरील जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिकेकडे केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णालये व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असून त्यासाठी तातडीने या विभागात भरती करावी, असे बने यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.

सौर्स : मटा

4 Comments
 1. Dnyaneshwar Dattatra says

  Sir vacancy kadhi nignar ahet

 2. Gangadhar sureshrao Yadav says

  मी परभणी येथील जिसारु मध्ये काही महिने कंत्राटी वाहन चालक म्हणुन काम केले आहे, यामुळे मला मुंबईत bmc त वाहन चालक म्हणून काम करायला आवडेल.

 3. RANJEET RAVINDRA DHAINJE says

  .

 4. CHINTAMAN PRATAP PAWAR says

  Hello sir

Leave A Reply

Your email address will not be published.