भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, ‘येथे’ पाठवा अर्ज Railway Bharti 2023
Railway Recruitment 2023 Online Apply
Railway Recruitment 2023
Union Railway Minister Ashwini Vaishnaw has received an important update regarding the railway recruitment 2023. There are 2.4 lakh Group C posts vacant in all zones of the railways. The recruitment will be conducted by the railway department soon. The Railway Department has recently issued a notification for the recruitment of some vacant posts. How and where to apply for this? Let’s learn more about this.
While applying for recruitment to the vacant posts of Railways, first of all, you should go to the official website www.indianrailways.gov.in of railways. There will be options like RRB Region, RRC or Metro Rail. Select your option from this. Next, go to the recruitment section and carefully review the instruction given. After completing this process, click ahead for the online application process and fill the application correctly. Fill in the Aadhaar card details while applying. After this, pay the application fee and click on the ‘Submit’ button.
भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, ‘येथे’ पाठवा अर्ज
अनेक दिवसांपासून रेल्वे विभागात भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये 2.4 लाख ग्रुप सी पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाकडून लवकरच ही भरती केली जाणार आहे. रेल्वे विभागाने अलीकडेच काही रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी कसा आणि कुठे अर्ज करायचा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. रेल्वे विभागात मुख्यत्वे सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर (ASM), नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) आणि तिकीट कलेक्टर पदांची भरती केली जाणार आहे. भारतीय रेल्वे बोर्डाकडून गटांनुसार ही भरती केली जात आहे. रेल्वे विभागामध्ये, सर्व पदांचे दोन मुख्य गटांमध्ये वर्गीकरण केले आहे, पहिले राजपत्रित, गट ‘अ’ आणि ‘ब’ पदांचा समावेश आहे. दुसरे अराजपत्रित, गट ‘क’ आणि ‘ड’ पदांचा समावेश आहे.
- रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांची राज्यसभेत माहिती – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना महत्वाची माहिती दिली. यानुसार रेल्वेच्या सर्व झोनमध्ये गट क पदांवर 2 लाख 48 गडार 895 पदे रिक्त आहेत. तर गट अ आणि ब पदांमध्ये 2070 पदे रिक्त आहेत. नोटिफिकेशननुसार एकूण 1 लाख 28 हजार 349 उमेदवारांना गट ‘C’ पदांसाठी (स्तर-1 वगळता) निवडण्यात आले आहे.
- अधिसूचनेनुसार, लेव्हल-1 पदांसाठी एकूण 1 लाख 47 हजार 280 उमेदवार निवडले गेले आहेत. भारतीय रेल्वेवरील गट ‘अ’ सेवांमध्ये थेट भरती प्रामुख्याने UPSC द्वारे केली जाते.
- ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू – रेल्वे विभागाने अलीकडेच RPF मध्ये 9739 कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर, 62907 ग्रुप डी पदे, 27019 असिस्टंट लोको पायलट (ALP) आणि टेक्निशियन ग्रेड पदे, 798 RPF रिक्त जागा आणि 9500 RPF रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे.
- रेल्वे विभाग भरतीसाठी पात्रता – गट अ श्रेणीमधील पदे UPSC द्वारे आयोजित स्पर्धात्मक परीक्षांद्वारे भरली जातात. म्हणजेच नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षेमार्फत येथील उमेदवारांची निवड होते. गट ब मधील फक्त गट ‘क’ रेल्वे कर्मचाऱ्यांनाच सेक्शन अधिकाऱ्यांकडून श्रेणी-सुधारित पदांमध्ये जोडले जाते.
- गट सी श्रेणी अंतर्गत स्टेशन मास्टर, तिकीट कलेक्टर, लिपिक, कमर्शियल अप्रेंटिस, सेफ्टी स्टाफ, ट्रॅफिक अप्रेंटिस आणि विविध अभियांत्रिकी पदे (इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल, मेकॅनिकल) यासह विविध पदांचा समावेश आहे.
- गट डी पदांमध्ये ट्रॅक-मॅन, हेल्पर, असिस्टंट पॉइंट्स मॅन, सफाईवाला/सफाईवाली, गनमन, शिपाई आणि रेल्वे विभागाच्या विविध सेल आणि बोर्डमधील विविध पदांचा समावेश आहे.
- याप्रमाणे करा अर्ज – रेल्वेच्या रिक्त पदांवरील भरतीसाठी अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट Indianrailways.gov.in वर जा. येथे RRB Region, RRC किंवा मेट्रो रेल्वे सारखे पर्याय उपलब्ध असतील.यातील तुमचा पर्याय निवडा. पुढे, भरती सेक्शनमध्ये जा आणि दिलेल्या सूचनेचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी पुढे क्लिक करा आणि अर्ज योग्यरित्या भरा. अर्ज करताना आधार कार्ड तपशील भरा. यानंतर अर्ज शुल्क भरा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
Railway Recruitment 2023: Important news for candidates who want to work in Railway. Indian Railways will get employment for another 1.4 lakh people Union Railway Minister Ashwini Vaishnav gave information about this. The recruitment process for 1.4 lakh posts in Railways is going on and will be completed soon. Read More details Railway Bharti 2022 are given below.
भारतातील दळणवळण व्यवस्थेचा प्राण समजल्या जाणाऱ्या रेल्वेने आतापर्यंत मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिले असून भविष्यामध्ये या क्षेत्रात नव्याने काही रोजगार निर्माण होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेमध्ये याबाबतची माहिती दिली. भारतीय रेल्वे आणखी 1.4 लाख लोकांना रोजगार देईल आणि त्यांची भरती करण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झा्ल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ही भरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 10 लाख नोकऱ्या देण्याच्या घोषणेचा भाग असल्याचे वैष्णव म्हणाले.
पश्चिम रेल्वे जगजीवनराम हॉस्पिटल मुंबई मध्ये भरती – थेट मुलाखती आयोजित
- अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेत 1.4 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरूआहे आणि लवकरच ती पूर्ण होईल, राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना उत्तर देताना, रेल्वेने या वर्षी आतापर्यंत 18,000 नोकऱ्या दिल्या असल्याचे देखील वैष्णव यांनी सांगितले.
- काही लोक हे दहा ते वीस हजार रुपये देण्याच्या राणाभीमदेवी थाटामध्ये घोषणा करतात, पण आम्ही प्रत्यक्षात नियुक्त्या केल्या आहेत, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात भारतीय रेल्वेचे मोठे योगदान आहे, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, 2014 ते 2022 दरम्यान 3,50,204 लोकांची भरती करण्यात आली आहे.
- ते म्हणाले, 2014 ते 2022 दरम्यान, भारतीय रेल्वेने 3,50,204 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. केवळ या वर्षात, आतापर्यंत तब्बल 18,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
- पुढे बोलताना वैष्णव यांनी माहिती दिली की, रेल्वे ही एक मोठी संस्था असल्याने, निवृत्ती, राजीनामा, मृत्यू इत्यादींमुळे रिक्त पदे भरणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रक्रियेदरम्यान, रिक्त पदे उद्भवू शकतात आणि ती नंतर भरली जातात. गेल्या दोन वर्षांमध्ये, 10,189 उमेदवारांची भरती करण्यात आली आहे.
- सध्या, सुमारे 1,59,062 पदांसाठी थेट भरती श्रेणीतील रिक्त पदांची भरती विविध टप्प्यांवर आहे, असे देखील त्यांनी सांगितले. यासोबतच अलीकडे, सुमारे 1.15 कोटी अर्जदारांनी रेल्वे ग्रेड IV नोकऱ्यांसाठी अर्ज केले, ज्यात ट्रॅक मेंटेनर, हॉस्पिटलमधील सहाय्यक, लोको शेड, डेपो आणि पॉइंट्समन यांच्यासह इतर लेव्हल1 ग्रेड कॅटेगरीचा समावेश आहे,
Railway Recruitment 2022- There is good news for candidates looking for jobs in the railway department and preparing for railway recruitment. The railways will soon have bumper recruitment. It has been announced that 1 lakh 48 thousand 463 posts will be filled in the railway department this year. In the last eight years, the railways have provided jobs to an average of 43,678 people every year. Read More details regarding Railway Recruitment 2022 as given below.
रेल्वे विभागात यावर्षी १ लाख ४८ हजार ४६३ पदे भरणार
Mission Mode – मोदींची मोठी घोषणा ’18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या’
रेल्वेत लवकरच बंपर भरती (Railway Recruitment 2022) होणार आहे. यासंदर्भात खुद्द रेल्वेने १४ जून रोजी माहिती दिली. रेल्वेमध्ये यावर्षी १ लाख ४८ हजार ४६३ लोकांना नोकऱ्या (Railway Job) मिळू शकणार आहेत. काही दिवासांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढील १८ महिन्यांत विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये १० लाख नोकऱ्या देण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर रेल्वेने ही घोषणा केली आहे. गेल्या आठ वर्षांत रेल्वेने दरवर्षी सरासरी ४३ हजार ६७८ लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत
- वेतन आणि भत्तेवरील खर्च विभागाच्या वार्षिक अहवालानुसार, १ मार्च २०२० पर्यंत, केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ३१ लाख ९१ हजार इतकी होती. या आकडेवारीत केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
- तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व विभागांमध्ये ४०.७८ लाख पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यानुसार साधारण २१.७५ टक्के पदे रिक्त आहेत.
- या कर्मचाऱ्यांचे ९२ टक्के मनुष्यबळ हे पाच मुख्य मंत्रालये किंवा विभागांचे आहे, ज्यात रेल्वे, संरक्षण (नागरी), गृह, महसूल या विभागांचा समावेश आहे. केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त, ३१.३३ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांपैकी ४०.५५ टक्के रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.
- पंतप्रधान कार्यालयाकडून विविध विभाग आणि ९१ मंत्रालयांना रिक्त पदांची यादी तयार करण्यास सांगितल्याची माहिती सरकारशी संबंधित सुत्रांनी दिली. तसेच १० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- विधानसभा निवडणुकीदरम्यान विविध विरोधी पक्षांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. या पार्श्वभूमीवर नोकरी देण्याच्या हालचालींना वेग आल्याचे म्हटले जात आहे.
रेल्वेकडून महत्वाची अपडेट
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ ते २०२१-२२ पर्यंत एकूण ३ लाख ४९ हजार ४२२ नोकऱ्या देण्यात आल्या. वर्षनिहाय सरासरी पाहिल्यास दरवर्षी ४३,६७८ लोकांना नोकऱ्या मिळाल्या. तर २०२२-२३ मध्ये १ लाख ४८ हजार ४६३ नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.
RRC Railway Recruitment 2022– There are 1.49 lakh vacancies at the entry level in Indian Railways. The highest number of 19183 posts are vacant in the Northern Railway Division. The recruitment process has started, the Railway Minister has informed Parliament. Read More details as given below.
रेल्वेत दीड लाख पदे रिक्त; या झोनमध्ये सर्वाधिक पदे रिक्त
Railway Bharti 2022- भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) तब्बल दीड लाख पदे रिक्त असून याची भरती प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी संसदेत दिली आहे. रेल्वे वेळोवेळी विभागानुसार भरती प्रक्रिया राबवत असते, असे ते म्हणाले.
वास्तविक, भारतीय रेल्वेमध्ये प्रवेश स्तरावरील १.४९ लाख पदे रिक्त आहेत. यामध्ये उत्तर रेल्वे विभागात सर्वाधिक १९१८३ पदे रिक्त आहेत. खासदार महेश बाबू यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी स्वरूपात ही माहिती दिली आहे.
लोकसभा खासदार महेश साहू यांनी भारतीय रेल्वेमध्ये किती एंट्री लेव्हल पदे रिक्त आहेत असा प्रश्न विचारला होता. यासोबतच ही पदे कधी भरली जाणार, असा सवालही करण्यात आला. याला उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आतापर्यंत 149688 प्रवेश स्तरावरील पदे रिक्त आहेत.
पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे
ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ऑपरेशनल आवश्यकतांनुसार नियुक्ती मागणी पत्रांसह पदे भरली जातात. त्यांनी माहिती दिली की सी आणि डी श्रेणीची पदे खुल्या बाजारात निवडीद्वारे रेल्वे भरती मंडळ आणि रेल्वे विभागीय रेल्वेच्या भर्ती सेलद्वारे भरली जातात.
या झोनमध्येही पदे रिक्त आहेत
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर रेल्वेनंतर दक्षिण मध्य विभागात सर्वाधिक जागा रिक्त आहेत. प्रवेश स्तरावरील 17022 पदे रिक्त आहेत. पश्चिम विभागात 15377 तर पश्चिम मध्य विभागात 11101 पदे रिक्त आहेत. पूर्व विभागात ९७७४ प्रवेश स्तराची पदे रिक्त आहेत.
RRC Group D Exam Date 2023
This is important news for those waiting for the RRC Group D exam date. The Railway Recruitment Board (RRB) has completed the 7th phase of Non-Technical Popular Category (NTPC) examination on July 31, 2021. Now the update of examination for Group D recruitment of Railway Recruitment Cell (RRC) will be announced soon.
Railway Exam- RRC ग्रुप डी परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होणार
RRC Group D Exam Date 2023: आरआरसी ग्रुप डी परीक्षेच्या तारखेची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) तर्फे आतापर्यंत सर्वात मोठी परीक्षा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) चे ७ टप्पे ३१ जुलै २०२१ ला पूर्ण झाले. आता रेल्वे भरती सेल (RRC)च्या ग्रुप डी भरतीसाठी परीक्षेचे अपडेट लवकरच जाहीर केले जाणार आहेत. रेल्वेतर्फे डिसेंबर २०२० मध्ये दिलेल्या मााहितीनुसार आरआरसी ग्रुप डी भरती परीक्षेची प्रक्रिया आरआरबी एनटीपीसी परीक्षा संपल्यानंतर सुरु केली जाईल.
आरआरबी एनटीपीसी भरतीचे नोटिफिकेशन २०१९ मध्ये जाहीर करण्यात आले होते. आरआरसीतर्फे ग्रुप डी (लेवल १) च्या एक लाखहून अधिक (१ लाख ३ हजार ७३९) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन (RRC-01/20219) देखील २०१९ च्या सुरुवातीस जाहीर करण्यात आले होते. याची अर्ज प्रक्रिया १२ मार्च ते १२ एप्रिल २०१९ पर्यंत सुरु होती.
आरआरसी ग्रुप डी (लेवल १) भरतीसाठी निर्धारित निवड प्रक्रियेच्या अंतर्गत कॉम्प्युटर आधारित परीक्षा (सीबीटी)चे आयोजन सप्टेंबर/ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार होती. पण देशभरात करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा अद्याप झाली नाही.
RRC Recruitment 2023
रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. याबाबत त्यांनी अधिसूचनाही जारी केली आहे. ही भरती दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.rrchubli.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना 9 जानेवारी पर्यंत अर्ज करता येतील. एकूण पदांची संख्या १००४ असून त्यापैकी २८७ पदे हुबळी विभागात, २८० बेंगळुरू, २१७ पदे कॅरेज रिपेयर वर्कशॉप हुबळी, १७७ पदे म्हैसूर आणि ४३ पदे सेंट्रल वर्कशॉप म्हैसूरमध्ये भरण्यात येणार आहेत.
Eligibility of Candidates शैक्षणिक पात्रता-
- या पदांवर भरतीसाठी गुणवत्ता यादी आठवी आणि दहावीतील उत्तीर्ण गुण तसेच आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
- उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षांदरम्यान असावे.
- या पदांवर थेट भरती होईल. म्हणजेच उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत देण्याची गरज नाही.
- सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.
- अर्ज करण्यासाठी उमेदवार वेबसाइटला भेट देऊ शकतात. त्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
भरतीच्या जाहिरातीसाठी इथे क्लिक करा…
At post Solapur dis Solapur mardi north east
Railway Recruitment 2023 Online Apply
Sir me B.A pass hu muze nokri chahie