RTE Admission २०२१ अपडेड-

RTE Admission 2021- Updated

Under the Right to Education Act (RTE), the admission process for 25 per cent reserved seats in private schools in the state is slow and more than 25,000 seats are vacant. The second round will now be implemented for the students on the waiting list. The entire admission process will be completed by October 25, according to the school education department.

RTE मधील २५ हजार जागा रिक्तच

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असून, २५ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. य़ेत्या २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

 • आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या.
 • त्यासाठी दोन लाख २२ हजार ५८४ पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले. या मुलांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आल्यानंतर, त्यामध्ये ९७ हजार ९५९ मुलांना प्रवेश जाहीर झाले. या मुलांना प्रवेशासाठी ११ ते ३० जूनची मुदत देण्यात आली होती.
 • त्यापैकी ६८ हजार ९५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. उर्वरित रिक्त जागांवर प्रवेशासाठी मुदतवाढ देऊन पुरेशा संधी दिल्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विद्यार्थ्यांसाठी पहिली फेरी राबविल्यानंतर,
 • आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत दुसरी प्रतिक्षा फेरी संपवून, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा शालेय़ शिक्षण विभागाचा मानस आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असून, मुलांचे प्रवेशाचे प्रमाण कमी आहे.
 • त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत २५ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

Under the Right to Education Act, admission to 25 per cent RTE reserved seats in private schools in the state has been disrupted across the state. After the completion of the first phase of admission, 35 thousand 640 seats have remained vacant

आरटीई प्रवेशाच्या अद्यापही ३५ हजार जागा रिक्त

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा राज्यभरात बोजवारा उडाला आहे. प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तब्बल ३५ हजार ६४० जागा रिकाम्या राहिल्या आहेत. तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यात प्रवेश मिळालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना  प्रवेश देण्यासाठी शाळांकडून अडवणूक केली जात असल्याने राज्यभरातील पालक संकटात सापडले आहेत.

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यंदा राज्यात ९ हजार ४३२ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या ९६ हजार ६९४ आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशाच्या जागांसाठी पहिल्या टप्प्यातील प्रवेश ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. यासाठी ६१ हजार ४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश लॉटरीच्या माध्यमातून निश्चित केले होते, मात्र त्यातील असंख्य जागांवर अद्यापही शाळांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचे मागासवर्गीय विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यख प्रवीण यादव यांनी सांगितले. अनेक शाळांमध्ये आरटीईचे शुल्क सरकारकडून मिळाले नसल्याचे सांगत हे प्रवेश नाकारले जात असल्याचेही यादव यांनी सांगितले.

राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या आरटीईच्या राखीव जागांपैकी तब्बल ३५ हजार ६४० जागा अद्याप रिक्त असून त्यातील मुंबईतील ३ हजार ७२५ जागांचा समावेश आहे. यातील काही जागा या प्रतिक्षा यादीच्या माध्यमातून भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या मुलांच्या पालकांना शाळेमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी ची प्रक्रिया 31 जुलैपर्यंत सुरू केली होती. मात्र यंदा मुंबईतील असंख्य शाळांनी आरटीईचे प्रवेश नाकारल्याने प्रवेशास पात्र झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार पालक संघटनांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे खाजगी शाळांचे आत्तापर्यंत १ हजार ८०० कोटी रूपये सरकारकडून आरटीई शुल्क प्रतिपूर्तीचे येणे बाकी असून ते सरकारने लवकर देण्याची मागणी मेस्टा या संस्थाचालक संघटनेने केली आहे.

३५ हजार ६४० जागा अद्याप रिक्त

शाळा एकूण जागा निश्चित झालेले प्रवेश रिक्त जागा

९४३२ ९६६८४ ६१०४४ ३५६४०

मुंबईतील शाळांची स्थिती

शाळा एकूण जागा निश्चित झालेले प्रवेश रिक्त जागा

३५२ ६४९३ २७६८ ३७२५आरटीई प्रवेशांना पुन्हा मुदतवाढ;  ३१ जुलै २०२१ पर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार

RTE admissions for the academic year 2021-22 have been extended. The period for the parents of the children who have been selected for admission for the academic year 2021-22 to go to school and confirm the admission of their children has been extended till July 31, 2021.

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशांना मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ज्या बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी ३१ जुलै २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. ही मुदत २३ जुलै २०२१ रोजी संपत होती.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यानुसार, २५ टक्के जागांवरील प्रवेश निश्चितीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली होती. अजूनही ज्या पालकांनी शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केलेला नाही, किंवा ज्या पालकांना अजूनही या प्रवेशांची लॉटरी लागल्याचे कळले नाही, त्यांना एसएमएस करून शाळेत प्रवेश घेण्याबाबत कळवावे, असे निर्देश गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. तरीदेखील गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेला विलंब झालेला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. प्रवेशासाठी सोडत जाहीर झाल्यानंतर प्रारंभी प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिलेली होती. ही मुदत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली होती. आता पुन्हा एकवार मुदतवाढ देण्यात आली आहे.


Under the Right to Education Act (RTE), only 36 per cent of the students selected in the admission process for 25 per cent reserved seats have been confirmed so far. The admission process has been delayed for the last few months and parents seem to have turned their backs on it. The deadline for admission of students selected through lottery is now July 9.

RTE च्या राखीव जागांवर अद्याप केवळ ३६ टक्के प्रवेश

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्यांपैकी केवळ ३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने त्याकडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

आरटीईतंर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशाच्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. जूनमध्ये अखेर या प्रक्रियेला गती मिळाली. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ३० जूनपर्यंत प्रवेशाची मुदत यापूर्वी दिली होती. आता ही मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील ९६ हजार ६८४ जागांवरील प्रवेशाच्या सोडतीत जवळपास ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आतापर्यंत त्यातील ३८ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. तर २९ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित रिक्त जागांकरिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार संधी दिली जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रवेशाच्या पोर्टलवर स्वतंत्र सूचना देणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


Under the Right to Education Act (RTE), the admission process for 25 per cent reserved seats in private schools will start from June 11. It has been directed to complete the admission of 5611 students in 680 seats in the district within 20 days.

आरटीई’ अंतर्गत साडेपाच हजार जागांवर प्रवेश

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्हय़ातील ६८० जागांवर ५६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठीची सोडत ७ एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात ५ हजार ६११ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर करोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घ्यावा.

पडताळणी समितीने आलेले अर्ज, तक्रारींची शहानिशा करून प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश सुरू होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळेला द्यावा. शाळांनी पालकांना प्रवेशासाठी तारखा द्याव्यात आणि आरटीई प्रवेश सुरू झाल्याची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी संपल्यानंतर रिक्त जागांवर

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. त्याबाबतच्या सूचना आरटीई संकेतस्थळावर दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


The admission process for 25 per cent reserved seats in private schools will start from June 11.  The draw for admissions under RTE was drawn on April 7. Admission was declared for 82 thousand 129 students. However, the admission process had to be postponed due to Corona restrictions. Now that the restrictions have been relaxed, the admission process has begun.

निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठीची सोडत ७ एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर करोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घ्यावा.

प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांसाठी..

करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेशासाठी प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनी, ईमेल, व्हॉट्सअॅप द्वारे शाळेशी संपर्क  साधून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


The RTE admission process, which has been delayed due to corona, will begin in the coming weeks. Therefore, more than 82,000 students in the state, including Pune, will be able to start online education by getting admission in the school.

कोरोनामुळे रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया येत्या आठवड्याभरात सुरु होणार आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील 82 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु करता येणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शाळास्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत.

RTE Admission 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शाळास्तरावर कागदपत्रांची पाहणी करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती, या वर्षी सुधा त्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे प्राथमिक सिक्ष्ण संचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.


Document Verification in RTE Admission 2021 – Parents are facing many problems in fulfilling the required documents for admissions under the Right to Education Act (RTE). Although the RTE admission process will be completed after the lockdown, many parents are facing difficulties in getting income certificates, rental agreements and caste certificates. As a result, the admission of students who have been confirmed in the lottery is still pending.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मिळणाऱ्या प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउननंतर आरटीई प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार असली, तरी उत्पन्नाचे दाखले, भाडे करार आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठी अनेक पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे लॉटरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही अद्याप अधांतरीच आहेत.

It is not possible to carry out the admission process at present due to the situation of infection. The verification of documents and admission process will start only after the lockdown rules are relaxed, ‘said Dinkar Temkar, Director, Directorate of Primary Education.

आरटीई’ प्रवेशांची उर्वरित प्रक्रिया लॉकडाउननंतरच

आरटीई’ प्रवेश लॉकडाउननंतरच होणार आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबतच्या सूचना ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेच्या वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

‘संसर्गाची परिस्थिती पाहता सध्या प्रवेशप्रक्रिया राबवणे शक्य नाही. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतरच कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेशप्रक्रिया सुरू होईल,’ अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.


The state level draw for 25 per cent admission to RTE was taken out on Thursday. 67 thousand 553 children were admitted in this draw. Admission dates have been removed from the website by the Directorate of Education and it has been clarified that new notifications regarding admission dates will be posted on the website after the lockdown.

आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत गुरुवारी काढण्यात आली. या सोडतीत ६७ हजार ५५३ बालकांना प्रवेश निश्चित करण्यात आले होते. प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून, लॉकडाउन संपल्यानंतर प्रवेशाबाबत संकेतस्थळावर प्रवेशाच्या तारखांबाबत नव्याने सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

image not found ( लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टल वर सूचना दिली जाईल. Covid 19 मुळे पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये )

image not found पालकांसाठी सूचना :

 1. आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२१-२०२२ या वर्षाकरिता लॉटरी द्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून sms प्राप्त होतील.
 2. पालकांनी फक्त SMS वर अवलंबून राहू नये . पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याकरिता आर.टी.ई. पोर्टल वर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
 3. ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरी मध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी प्रवेशाकरिता sms द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे.
 4. पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
  a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
  b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे.
 5. पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये.
 6. मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
 7. पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
 8. तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल
 9. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे /बाहेरगावी असल्याने/किंवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी समितीशी संपर्क करून whats app /email किंवा अन्य माध्यमांच्या द्वारे बालकाच्या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.

महत्वाचे : प्रतिक्षा यादीतील (waiting list )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये . त्यांच्या करिता rte पोर्टल वर स्वतंत्र सूचना दिल्या जातील

निर्बंध असल्याने पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांतील ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल दोन लाख २२ हजार ०२९ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची निवड झाली. राज्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ठाण्यातून सर्वाधिक ९,०८८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.


Online applications were invited for RTE admission from March 3 to 30. As many as two lakh 22 thousand 029 applications were filled by parents for 96 thousand 684 seats in nine thousand 432 schools in the state. Out of which 67 thousand 553 students were selected.

आरटीई प्रवेशासाठी ३ ते ३० मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांतील ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल दोन लाख २२ हजार ०२९ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची निवड झाली.

ऑनलाइन काढलेल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मेसेज पाठवण्यास सुरुवात करण्यात आली. सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३० एप्रिलपर्यंत विभागातील पडताळणी समितीमार्फत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यायचा आहे. ज्या पालकांना एसएमएस येणार नाही त्यांनी https://student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अर्ज क्रमांक टाकून सोडतीची तपासणी करण्याचे आवाहनही पालकांना करण्यात आले आहे.


Under the Right to Education Act (RTE), the RTE for admission to 25 per cent reserved seats in private schools was announced on Wednesday. Students who are eligible for admission will be informed through SMS from 15th April 2021.

RTE प्रवेशाची सोडत जाहीर – खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेश. आरटीई प्रवेशाची सोडत बुधवारी ७ एप्रिल रोजी जाहीर झाली. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना या सोडतीमार्फत खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी आरटीई सोडत बुधवारी जाहीर झाली. येत्या १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.

आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. शिक्षण विभागाने ऑनलाइन सोडतीची प्रक्रिया सुरू केली असून, दोन दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना आरटीईच्या पोर्टलवर जाहीर होतील.

आरईटीई प्रवेश तपशील

 • एकूण शाळा – ९,४३२
 • प्रवेशक्षमता – ९६,६८४
 • एकूण अर्ज – २,२२,०२८

सोडतीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणास्तव पालक बाहेरगावी असतील, तर त्यांनी समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधावा. प्रवेश मिळूनही संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश लॉटरीतून प्रवेश मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे


RTE Admission 2021: In the academic year 2021-22, 450 schools in the district have registered for the RTE admission process. The deadline for admission of eligible students is March 3 to 21.RTE admission schedule has now been announced.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी जिल्ह्यातील ४५० शाळांनी नोंदणी केली या शाळांमधील ४ हजार ५४४ जागांवर पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशसाठी ३ ते २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

आरटीईअंतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत तीन शाळांची वाढ झाली असली तरी आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांमध्ये मात्र १ हजार १३ जागांनी घट झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी गेल्या चार ते पाच वर्षांपासून ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२१ व २०२२ या वर्षाकरिता आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, शाळांची नोंदणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. शाळांच्या नोंदणीनंतर आता आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ३ ते २१ मार्च या कालावधीत पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

 राखीव जागांमध्ये घट 

आरटीई प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना ३ ते २१ मार्च या कालावधीत आरटीईच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यात आरटीईअंतर्गत ४४७ शाळांमध्ये ५ हजार ५५७ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ११ हजार ११८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४ हजार ६६६ विद्या्र्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर ८९१ जागा रिक्त राहिल्या होत्या, तर २०२१-२२ शैक्षणिक वर्ष ४५० शाळांनी नोंदणी केली आहे. मात्र मागील वर्षी प्रवेशप्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने एकूण जागांच्या तुलनेत २५ टक्के राखीव जागांमध्येही घट झाली आहे.

 आवश्यक कागदपत्र 

आरटीई प्रवेशप्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, त्यांच्या प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर निर्माण केलेल्या पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक असेल. लॉटरीत नाव आल्यास ही सर्व कागदपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी लागणार आहे.


RTE Admission Time Table 2021

RTE Admission Time Table 2021: The online admission process is being implemented by the state school education department under the Right to Education Act (RTE). The admission schedule for 96,388 seats in 9,393 schools in the state will be published in the next two to three days. Therefore, the parents of the students who are interested in admission should prepare the necessary documents for admission, an appeal has been made by the Department of Education.

 आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच

पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील ९ हजार ३९३ शाळांमधील ९६ हजार ३८८ जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यातही शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आरटीई प्रवेशाच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित होते. यंदा कोरोनामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी आरटीईच्या प्रवेश क्षमतेत घट झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ९ हजार ३९३ शाळांनी नोंदणी केली असली तरी सुमारे ५० शाळांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. त्यामुळे आरटीईच्या एकूण जागांमध्ये वाढ होऊ शकते.

राज्यात आरटीईचे सर्वाधिक प्रवेश पुणे जिल्ह्यात होतात. मागील वर्षी जिल्ह्यात आरटीईच्या १६ हजार ९५० जागांवर उपलब्ध होत्या. यंदा जिल्ह्यातील जागांची संख्या १४ हजार ५२३ झाली आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. जिल्ह्यातील ९६९ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करून पूर्ण करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू असून ऑनलाइन अर्ज भरून त्याची चाचणी घेतली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

RTE Admission 2021

RTE Admission 2021: Under RTE, 25 per cent students from weaker sections are admitted in private schools every year. This year, online applications can be filled from February 9, 2021. According to the schedule, parents have to apply between February 9 and 26. The lottery for seats will start on March 5. The selected parents have to verify the documents between 9th to 26th March 2021. The waiting list will then be announced. Students on the waiting list will be admitted in four stages.

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, नव्या वर्षासाठी नऊ फेब्रुवारीपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

औरंगाबाद : आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी यंदा एकच सोडत निघणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी पात्रताधारक शाळांना ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पात्रता असूनही नोंदणी न करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

आरटीईअंतर्गत दरवर्षी दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेश दिला जातो. यंदा प्रवेशासाठी नऊ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरता येतील. वेळापत्रकानुसार नऊ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पालकांना अर्ज करायचे आहे. पाच मार्चला जागांची लॉटरी निघेल. अर्ज निवडलेल्या पालकांनी नऊ ते २६ मार्च २०२१ दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर होईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यांत प्रवेश घेता येईल.

यंदा एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी असेल. प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यावरही शाळेत जागा रिक्त असल्यास, अर्ज शिल्लक असल्यास पुन्हा सोडत काढून प्रवेश देण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक द. गो. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

संभाव्य वेळापत्रक

  • – ८ फेब्रुवारी : शाळांची नोंदणी
  • ९ ते २६ फेब्रुवारी : प्रवेश अर्ज भरणे
  • ५ ते ६ मार्च : ऑनलाइन सोडत
  • ९ ते २६ मार्च : प्रवेश निश्चित
  •  २७ मार्च ते ६ एप्रिल : प्रतीक्षा यादी- पहिला टप्पा
  • १२ ते १९ एप्रिल : प्रतीक्षा यादी- दुसरा टप्पा
  • २६ एप्रिल ते ३ मे : प्रतीक्षा यादी- तिसरा टप्पा
  •  १० ते १५ मे : प्रतीक्षा यादी- चौथा टप्पा

सोर्स: सकाळ


RTE Admission 2021

RTE’ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ

RTE Admission 2020-2021: According to the Right to Education Act, students on the waiting list for admission to 25 percent reserved seats in private schools have been given an extension till Thursday (24th). About 45 percent of the students on the waiting list have been admitted so far. The remaining students have been given this extension for admission.

पुणे – शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवार (ता. २४) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील जवळपास ४५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील नऊ हजार ३३१ शाळांमधील एक लाख १५ हजार ४७७ रिक्त जागांवरील प्रवेशासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत नियमित प्रवेश फेरीत ६८ हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या ३६ हजार ४५६ विद्यार्थ्यांपैकी ४५ टक्के म्हणजेच १६ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. प्रतीक्षा यादीतील ५५ टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळावी म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ही मुदतवाढ दिली आहे.


Deadline For RTE Admissions Has Been Extended For The Fourth Time Nashik

RTE Admission 2021: The school education department has extended the deadline for RTE admission of students in the state for the fourth time and the admission process will continue till December 21. There are thousands of vacancies in the state of RTE even in December due to delay in getting documents like income certificate, caste certificate etc. required for admission in Corona period;

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठ महिन्यांपासून ज्ञानमंदिरांना कुलपे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची मात्रा दिली जात आहे. शाळांचे पहिले सत्र संपले असले तरी राज्यात आरटीईचे प्रवेश सुरूच आहेत.

जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी एकूण ४४७ शाळा असून, त्याअंतर्गत पाच हजार ५३७ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी १७ हजार ६३० अर्ज आतापर्यंत आले असून, त्यांपैकी पाच हजार ३०७ जणांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळाला. मात्र त्यातील तीन हजार ६८४ जणांनी आतापर्यंत आरटीईमधून प्रवेश पूर्ण केला आहे. तिसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी मात्र शहराच्या तुलनेत कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.

 ७५ टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण 

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली असून, २१ डिसेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. कोरोनाकाळात प्रवेशासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी कागदपत्रे मिळण्यात दिरंगाई झाल्याने डिसेंबरमध्येही आरटीईच्या राज्यात हजारो जागा रिक्त आहेत.;कोरोनामुळे यंदा प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला. यापूर्वी पडताळणी समितीकडे होणारे प्रवेश शाळास्तरावर पूर्ण करण्यात आल्याने पालकांची सोय झाली. प्रवेशावेळी एकावेळी पालक, विद्यार्थ्यांची होणारी गर्दी कमी झाली. यंदा आरटीई प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत सरासरी ७५ टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण झाले होते. त्यामुळे आगामी काळात चौथी फेरीही काढण्यात यावी, अशी पालक व शिक्षणप्रेमींची मागणी होती.

दर वर्षी आरटीईचे प्रवेश लवकर सुरू केले जातील, असे आश्‍वासन शिक्षण विभागाकडून दिले जाते. मात्र प्रवेशप्रक्रिया वेळेत सुरू होत नाही. यंदा तर तब्बल तीन महिने उशिराने प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. त्यामुळेच यंदा प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी डिसेंबर उजाडला आहे. आगामी काळात शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन करून जूनपूर्वीच विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांनी केली आहे


Students On Waiting List Will Be Able To Get Admission On RTE Reserved Seats

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत तुमच्या पाल्याचे नाव लागले असेल आणि अद्याप प्रवेश मिळाला नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागा शिल्लक असतील, त्या शाळांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.

आर्थिकदृष्टया दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यावर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही अजूनही जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील पण अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता याच प्रक्रियेत आणखी एक संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. प्रतिक्षा यादीत नाव असतानाही अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचा पुढील टप्पा लवकरच जाहीर होणार आहे.


 आरटीई प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत

पुणे – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. 29) प्रवेश घेता येणार आहे.प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रतीक्षा यादीत 24 हजार 980 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील आठ हजार 480 विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्‍चित झाले आहेत. तर आठ हजार 176 विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश झाले आहेत.

 पालकांसाठी सूचना : 
– रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल
– पालकांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून पाहावे
– शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये
– बालकांना शाळेत घेऊन जाऊ नये
– आवश्‍यक मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन जावे
– पोर्टलवरुन हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे

प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची सद्यःस्थिती

जिल्हा : निवड झालेले विद्यार्थी : प्रोव्हिजनल प्रवेश : निश्‍चित प्रवेश
पुणे : 4,765 : 1,885 : 1,624
नगर : 803 : 335 : 368
नाशिक : 1,360 : 480 : 432
सोलापूर : 446 : 212 : 202
ठाणे : 1,912 : 492 : 757
औरंगाबाद : 1,539 : 292 : 395
नागपूर : 1,780 : 756 : 431
कोल्हापूर : 270 : 89 : 128


 अखेर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

आरटीई प्रवेश प्रक्रिया; ८ आॅक्टोबरपर्यंत करता येणार प्रवेशनिश्चिती, पालकांना दिलासा

आरटीई २५ टक्के अंतर्गत पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर अखेर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळाली. १ आॅक्टोबरपासून प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ८ आॅक्टोबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेता येईल. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला.

बालकांचा मोफत व सक्तीच्याशिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी  शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. १७ मार्चला आरटीई प्रवेश प्रक्रियेची आॅनलाइन पहिली सोडत काढण्यात आली. राज्यातील ९,३३१ शाळांमधील  १ लाख १५ हजार ४५५ जागांसाठी २ लाख ९१ हजार ३६८ अर्ज आले होते. पहिल्या सोडतीत १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची निवड झाली. कोरोनाकाळात मुदतवाढीनंतर ६८,२८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. यात पुण्यातून सर्वाधिक ११,०१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल नागपूर ४,५९९, नाशिक ३,६८८, ठाणे ५,६४१, मुंबई ३,१३२ आणि औरंगाबाद येथील ३,०९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले

मुंबई विभागातील पालिका विभागाच्या अखत्यारीतील शाळांमधून २,२४३, उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील शाळांमधून ८८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मुंबईतून निवड झालेल्या ५,३७१ पैकी ५,२२८ विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेशासाठी तारीख दिली होती. यातील ३,१३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अधिक माहितीसाठी पालकांनी  https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या पोर्टलला भेट द्यावी

त्यानंतर आता रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल. पालकांनी आरटीई पोर्टलवर विद्यार्थी अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख पाहावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

शाळेत गर्दी न करण्याच्या सूचना

प्रवेशासाठी शाळेत गर्दी करू नये. प्रवेशादरम्यान बालकांना शाळेत आणू नये. कागदपत्रांच्या मूळ, छायांकित प्रती सोबत असाव्यात. हमीपत्र, अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत न्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने पालकांना केल्या आहेत.


RTE प्रवेशाचा आज अंतिम दिवस

RTE Admission 2020-2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्यामुळे आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला खीळ बसली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देऊनही आरटीईअंतर्गत अपेक्षित प्रवेश होऊ न शकल्याने आता प्रवेशनिश्चितीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज मागवून १७ मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली. दरम्यान, राज्यात आरटीईच्या ९,३३१ शाळांमध्ये एकूण १ लाख १५ हजार ४६० जागा असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ ५३,६८७ जागांवर प्रवेश निश्चित होऊ शकले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी-पालकांसह मूळ गावी स्थलांतरित झाल्यामुळे प्रवेशनिश्चितीसाठी ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेतल्याची महिती आरटीई समन्वयकांनी दिली. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मात्र, यामुळे प्रवेशासाठी आणखी ताटकळत बसावे लागेल.

असे होतील प्रवेश

शाळांनी दिलेल्या तारखांनुसार शाळेत गर्दी होणार नाही, याची काळजी घेऊन पालकांनी विद्यार्थ्यांची प्रवेशनिश्चिती करायची आहे. प्रत्यक्ष शाळेत जाणे शक्य नसल्यास आवश्यक कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलद्वारे शाळांना पाठवून तात्पुरते प्रवेश घेण्याची मुभा आहे. ज्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली नाही, त्या पालकांशी संपर्क साधून प्रवेशनिश्चिती करण्यास सांगण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.

सोर्स: लोकमत


शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने 31ऑगस्ट ही मुदत निश्चित‌ केली आहे ज्या ;विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये शाळा मिळाली आहे, त्यांच्या पालकांना या तारखेपर्यंत शाळेत प्रवेश घ्यायचा आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी यासंबंधी म्हटले आहे, की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत 17 मार्च‌ रोजी काढण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे. त्यांनी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे

पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई-मेलद्वारे, कागदपत्रे शाळेस पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करुन पालकांनी प्रवेश निश्चित करावा. तसेच शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे, त्यातील शाळेत प्रवेशासाठी अद्याप न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करुन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्यात यावी, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे


RTE Nashik Admission 2020-2021

Under the Right to Education Act (RTE), the process of free admission in 25 percent reserved seats in private schools is underway. The deadline for confirmation of admission to the students in the first draw list announced under this is till 31st August. Meanwhile, while there are still a large number of vacancies, the education department should expedite the admission process, otherwise, there is a possibility of academic loss to the students, the parents said.

आरटीई पहिल्‍या सोडतीतील प्रवेशासाठी ३१ पर्यंत मुदत

नाशिक : शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या सोडतीच्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीकरिता ३१ ऑगस्‍टपर्यंत मुदत आहे. दरम्‍यान, अद्याप मोठ्या संख्येने जागा रिक्‍त असताना, शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रियेत जलदगती आणावी, अन्‍यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्‍यता पालकांकडून व्‍यक्‍त केली जाते आहे.

जिल्ह्यातील ४४७ शाळांमध्ये पाच हजार ५५७ जागा उपलब्‍ध असून, प्रवेशासाठी तब्‍बल १७ हजार ६३० अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीत पाच हजार ३०७ बालकांची निवड झाली. त्यांपैकी दोन हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. अद्यापही निम्म्‍याहून अधिक जागा रिक्‍त असून, शाळांची अध्ययन प्रक्रिया मात्र गतिशिल झाली आहे. अशा परिस्‍थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवेशप्रक्रिया गतिशिल होण्याची आवश्‍यकता आहे, अन्‍यथा आटीईंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे पूर्णपणे अध्ययन होऊ शकणार नाही व त्‍यांच्‍या शैक्षणिक कामगिरीवर नकारात्‍मक परिणाम होण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.


RTE Admission 2020-2021: The state government has approved the implementation of the RTE admission process. The process was postponed due to lockdown by Corona. Therefore, the RTE admission process for the academic year 2020-21 is likely to start soon. The Director of Education has directed the parents to complete the admission process with the approval of the verification committee by conducting a preliminary verification of the documents at the school level.

‘आरटीई’प्रवेश लवकरच होणार सुरू

आरटीई’प्रवेश प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. महापालिकेच्या स्तरावर ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. कसे होणार हे प्रवेश… जाणून घ्या.

‘आरटीई’प्रवेश प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.करोनाच्या केलेल्या लॉकडाउनमुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे लवकरच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आरटीईप्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबवताना पालकांनी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावेत,असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम’नुसार खासगी विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यता शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी १७ मार्चला आरटीईची सोडत काढण्यात आली होती. मात्र, करोनाच्या पाश्वभूमीवर प्रवेश प्रक्रियाच बंद करण्यात आली. जाहीर झालेल्या सोडतीत राज्यभरात एक लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली, तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर पडताळणी व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.

RTE Admission 2020-2021

शाळांनी असे द्यावेत प्रवेश

– पोर्टलवर लॉग इन नुसार यादी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावयाचे आहे. गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेने नियोजन करावे. कोणत्या तारखेला बोलवावे हे शाळेने ठरवावे.

– प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर अथवा योग्य त्या ठिकाणी लावण्यात यावे.

– पालकांकडून मूळ कागदपत्रे घेतली जातील. तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरनुसार प्रवेश देत हमीपत्र भरून घ्यावे.

– पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतरित झाले असल्यास संपर्क करून त्यांच्या प्रवेशाचे नियोजन करावे. यासाठी त्यांना तीन संधी द्याव्यात

– शाळेने प्रतीक्षा यादीतील पालकांना सध्या बोलावू नये.

– करोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना निर्बंध शिथिल झाल्यानंतर बोलविण्यात यावे.

– करोनामुळे शाळा प्रशासनाने ताब्यात घेतली असल्यास अशा शाळांनी प्रतिबंधित क्षेत्रातील अटी शिथिल झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करावी.

1 Comment
 1. Nityanand Shivraj Kumbhar says

  Non selected list मद्ये ज्यांची नावे आहेत ,त्यांचा पुढील फेरी वेळी विचार होऊ शकतो का?

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!