RTE Admission – RTE प्रवेश प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २७ मे पर्यंत मुदत

RTE Admission 2022 Online Application @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2022 Waiting list deadline is 19th May 2022 to 27th May 2022. The Eligible Candidates for admission in the waiting list will receive SMS on the registered mobile while applying but without relying only on SMS, the status of the application on the RTE portal will be written on this tab to know whether the lottery has started or not. Read the below given details carefully and keep visit us.

 1. प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक १९ मे २०२२ ते २७ मे २०२२ अशी आहे.
 2. सर्व जिल्ह्यातील ( पुणे जिल्हा वगळून ) प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांना दिनांक १९ मे २०२२ रोजी दुपारी तीन नंतर SMS प्राप्त होतील
 3. प्रतिक्षा यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल.
 4. प्रतीक्षा यादीतील लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे. पुणे जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २७ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दरवर्षी खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ऑनलाइन सोडत (लॉटरी) ३० मार्च रोजी काढण्यात आली. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० मे पर्यत मुदत दिली होती. आता पुणे जिल्हा वगळून सर्व जिल्ह्यांतील निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सुरवात गुरूवारी झाली.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना गुरूवारपासून एसएमएस जाण्यास सुरवात झाली आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगिनमधून ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी. आणि हे ॲलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या मुदतीत जवळच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून २७ मे पर्यत कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा, असे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.

प्रतीक्षा यादीत राज्यातील १७ हजार ६३९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी ९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना सूचना –

 • – प्रवेश घेण्याची मुदत : २७ मे २०२२ पर्यंत
 • – पुणे वगळता संपूर्ण राज्यात प्रक्रिया सुरू
 • – अर्ज करताना नोंदविलेल्या मोबाईलवर ‘एसएमएस’ येईल
 • – केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवर अर्जाची स्थिती पहावी
 • – लॉटरी लागलेल्या पालकांनी ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी
 • – ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि कागदपत्रे घेऊन पडताळणी केंद्रावर प्रवेश निश्चित करावा

RTE Admission – As per the news, As many as 27,837 students in the state have been denied admission under the Right to Free and Compulsory Education Act (RTE) under 25 per cent admission. As a result, students on waiting list will now be given access to these seats. Admission process will start for the students in the waiting list. Parents will be informed about the admission via SMS after 3 pm today.

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम म्हणजेच आरटीईच्या  २५ टक्के प्रवेशांतर्गत राज्यातील तब्बल २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी शाळाप्रवेशाची संधी सोडल्याने त्यांचे अर्ज बाद झाले आहेत. यामुळे आता या जागांवर प्रतीक्षायादीतील  विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

 • पुणे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांची निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया १० मेपर्यंत पूर्ण झाली आहे. यंदा राज्यात ९ हजार ८६ शाळांत १ लाख १ हजार ९०६ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ६२ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून अद्याप ३९ हजार जागा शिल्लक आहेत.
 • या जागांवर प्रवेश देण्यासाठी आज, गुरुवारी प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशांसंबंधी कळविण्यात येणार आहे. मात्र पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहाता आरटीई प्रवेशाच्या वेबसाइटवर जाऊन ‘आपल्या अर्जाची स्थिती’ या टॅबवर क्लिक करावे. आपल्या पाल्याचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी केले.
 • प्रतीक्षायादीत बालकांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २७ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पालकांनी लॉगीनमधून अॅलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. हे अॅलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन दिलेल्या मुदतीत पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून २७ मेपर्यंत कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या पाल्याचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

RTE Admission 2022 updates : One thousand 880 children (25 per cent) who are first enrolled under RTE in 306 reputed English medium schools in the Solapur district are being given free admission. However, 490 parents did not enroll their children as they did not get the required schooling. So the waiting kids will have a chance at those places now.

सोलापूर जिल्ह्यातील ३०६ नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या एक हजार ८८० मुलांना (२५ टक्के) मोफत प्रवेश दिला जात आहे. पण, पाहिजे ती शाळा न मिळाल्याने ४९० पालकांनी मुलांचा प्रवेश घेतलाच नाही. त्यामुळे त्या जागांवर आता प्रतीक्षेतील मुलांना संधी मिळणार आहे.

 • आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेणे मागासवर्गीय प्रवर्गातील पालकांना शक्य होत नाही. त्यांच्या मुलांना तशा शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा म्हणून ‘आरटीई’तून २५ टक्के प्रवेशाची अट घालण्यात आली. त्या शाळेच्या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागांवर आरटीईतून प्रवेश देणे बंधनकारक आहे.
 • दरवर्षी आरटीईच्या एकूण जागांच्या तुलनेत तिप्पट-चौपट अर्ज येतात. पण, पाहिजे त्या शाळांमध्ये सर्वांनाच प्रवेश मिळतो, असे होत नाही. त्यामुळे जागा रिक्त राहतात आणि प्रतीक्षा यादी प्रसिध्द करावी लागते. अनेकांसाठी ही प्रतीक्षा यादी लॉटरी ठरते.
 • यंदा ४९० जागा शिल्लक राहिल्या आहेत. एक हजार ८८० पैकी एक हजार ३७६ मुलांनी प्रवेश घेतला आहे. तर १४ जणांचे प्रवेश नाकारण्यात आले असून त्यामागे कागदपत्रांची पुर्तता न केल्याचे कारण आहे. १३ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. तत्पूर्वी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
 • पहिल्या यादीतील सर्वांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर राज्य स्तरावरून प्रतीक्षा यादी प्रसिध्द होते. दरम्यान, ‘आरटीई’तून प्रवेश मिळालेल्या मुलांकडून संबंधित शाळांनी कोणतेही शुल्क आकारू नये, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

RTE Admission 2022 waiting list : Waiting list for RTE 25% admission 2022 willl be publsihed soon. The 1st round of RTE admissions 2022 expires on 10th May 2022. The Students on the waiting list will be given a chance to fill the vacancies. As per the sources the RTE Admission Waiting list will be announced in the next 4 to 5 days. So take advantage of this opportunity, keep visiting our website for more information …

Under the Right to Education Act (RTE), the process of Free Admissions is currently underway in 25 per cent of the reserved seats in private schools. Under this process of academic year 2022-23, despite two extensions, 33% vacancies remain at district level.

RTE 25% प्रवेश 2022 प्रतीक्षा यादी

RTE प्रवेशाची पहिल्या फेरीची मुदत १० मे रोजी संपली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्ध्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी देणार येणार आहे. येता ४ ते ५ दिवसांमध्ये प्रतीक्षा यादी जाहीर होईल. तेव्हा या संधी चा लाभ घा अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला व्हिसिट करत राहा.. .

RTE 25% Admission Waiting List

शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव स्‍वरुपातील २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची (Free Admissions) प्रक्रिया सध्या सुरु आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या या प्रक्रियेअंतर्गत दोनवेळा मुदतवाढ देऊनही जिल्‍हास्‍तरावर ३३ टक्‍के जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत. जिल्‍हास्‍तरावर उपलब्‍ध असलेल्‍या चार हजार ९२७ जागांपैकी मंगळवार (ता.१०) पर्यंत तीन हजार २७२ जागांवर प्रवेश झालेले असून एक हजार ६५५ जागा अद्यापही रिक्‍त आहेत. या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध होणार आहे.

 • यावर्षी आरटीईअंतर्गत पंचवीस टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया वेळेवर सुरु झाल्‍याने समाधान व्‍यक्‍त केले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील ४२२ शाळांनी प्रक्रियेत सहभाग नोंदविला होता. या शाळांमध्ये प्रवेशासाठी चार हजार ९२७ जागा उपलब्‍ध होत्‍या.
 • या जागांकरिता तब्‍बल सोळा हजार ५६७ अर्ज ऑनलाइन (Online Application) स्वरूपात प्राप्त झाले होते.
 • राज्‍यस्‍तरीय सोडतीत चार हजार ५१३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती. नियमित मुदतीत प्रवेशाला फारसा प्रतिसाद मिळाल्‍यानंतर मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.
 • दोन वेळा मुदतवाढ दिल्‍यानंतर मंगळवार अखेरीस तीन हजार ३७२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झालेले आहेत. तरीदेखील एक हजार ६५५ जागा रिक्‍त आहेत.

The admission process for 25 per cent reserved seats under the Right to Education Act (RTE) will come to an end today,. Despite giving RTE Admission Date Extension twice for the process, 30,000 seats are vacant. Therefore, there will be no extension for admissions, the Directorate of Elementary Education clarified on Monday. Today will be the last chance for the children who have been declared in the draw.

शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची मुदत आज, मंगळवारी संपुष्टात येणार आहे. प्रक्रियेला दोनवेळा मुदतवाढ (RTE Admission Date Extension) देऊनही ३० हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेशांसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सोमवारी स्पष्ट केले. सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांना आज शेवटची संधी असणार आहे.


There are still 30,000 vacancies in the School Admission under Right to Education (RTE). Five thousand seats are in Pune city and district, with only two days left for admission. On the one hand, parents are not keen to get admission in other schools except big schools and on the other hand, the students on the waiting list are still on the waiting list.

शालेय प्रवेशांतील अद्याप तीस हजार जागा रिक्तच

शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (Right to Education, RTE) देण्यात येणाऱ्या शालेय प्रवेशांतील (School Admission) अद्याप तीस हजार जागा रिक्त आहेत. पैकी पाच हजार जागा पुणे शहर आणि जिल्ह्यातील असून, प्रवेशासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. एकीकडे मोठ्या शाळा वगळता अन्य शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक फारसे उत्सुक नाहीत अन् दुसरीकडे प्रतीक्षा यादीतील (Waiting List) विद्यार्थी मात्र ‘वेटिंग’वरच आहेत.

आरटीई’ प्रवेशांसाठी (RTE Admission) शिक्षण विभागाकडून (School Department) दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ संपण्यासाठी दोन दिवस उरले असताना प्रवेशांचे घोडे नेमके अडकले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकांना हव्या त्या शाळांमध्ये प्रवेश मिळत नसल्याने; तसेच बनावट अर्जांची संख्याही मोठी असल्याने जागा रिक्त राहात असल्याचे निरीक्षण शिक्षण विभागाने नोंदवले आहे.

दोन वर्षांपासून ‘आरटीई’ प्रवेशांची संख्या सातत्याने घटत आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये राज्यात ‘आरटीई’ प्रवेशांच्या जवळपास २५ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. राज्यामध्ये ‘आरटीई’च्या सोडतींमध्ये नऊ हजार ८६ शाळांमधील ९० हजार ६८५ जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील ६० हजार ४५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. प्रवेशांसाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप तीस हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले नाहीत. सातत्याने देण्यात येणाऱ्या मुदतवाढीनंतरही विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नसतील, तर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रवेशांसाठी दुसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ मंगळवारी (१० मे) संपणार आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

प्रवेशांमध्ये घट का?
पालकांना अपेक्षित शाळांमध्ये प्रवेश मिळत नसल्याने प्रवेशांची संख्या घटत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय यंदा बोगस अर्जांचेही प्रमाण वाढले असून, शिक्षण विभागाने छाननी करून बनावट भाडेकरार दाखवणाऱ्या पालकांवर कारवाई केली आहे. त्यामुळेही प्रवेशांमध्ये घट होत आहे.

‘वेटिंग’वरील विद्यार्थ्यांना संधी द्या

आरटीई प्रवेशांसाठी सोडतीमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दोन वेळा संधी देण्यात आली. आता तिसऱ्यांदा या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेला प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विरोध केला असून, तातडीने प्रतीक्षा यादीतील (वेटिंग) विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करावेत अशी विनंती पालकांनी केली आहे.

जिल्ह्यात पाच हजार जागा रिक्त

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यामध्ये आरटीई प्रवेशांच्या पाच हजार जागा रिक्त आहेत. जिल्ह्यामध्ये सोडतीतून १४ हजार ९५८ मुलांना प्रवेश उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, नऊ हजार ९८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. उर्वरीत पाच हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झालेले नाहीत. एका दिवसात हे प्रवेश होणे शक्य नसल्याने पुणे जिल्ह्यातही प्रवेशांच्या पाच हजार जागा रिक्त राहणार आहेत.


Under the Right to Education Act (RTE), admission process (rte admission 2022) is implemented in 25% of the seats in private schools for the economically and socially weaker sections. This year, the deadline for admission under this process was Friday, April 29, 2022. However, the state government has given a big relief to these parents by extending the process. Under this process, admissions can now be confirmed till May 10, 202

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया (rte admission 2022) राबवली जाते. यंदा या प्रक्रियेअंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत शुक्रवार २९ एप्रिल २०२२ रोजी संपत होती. मात्र या प्रक्रियेला मुदतवाढ देऊन राज्य सरकारने या पालकांना मोठा दिलासा दिला आहे.

 • या प्रक्रियेंतर्गत आता १० मे २०२२ पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत. आतापर्यंत या प्रक्रियेंतर्गत ५५,५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यापूर्वीही एकदा या प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. गुरुवार सायंकाळपर्यंत राज्यात प्रवेश जाहीर झालेल्या ९० हजार ६८५ मुलांपैकी ५४ हजार २८७ मुलांनी शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत.
 • साधारण ३५ हजारांपेक्षा अधिक मुलांचे प्रवेश होणे बाकी होते. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पालकांकडे उपलब्ध नसल्याने, अनेक पालकांना मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती असणाऱ्या या मुलांच्या पालकांना या मुदतवाढीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
 • यंदा आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत ३० मार्च २०२२ रोजी काढण्यात आली. ४ एप्रिल रोजी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली. या यादींतर्गत ९०,६८८ विद्यार्थ्यांची या प्रवेशाकरिता निवड झाली.
 • निवड झालेल्या मुलांच्या पालकांना तसे एसएमएसही पाठवण्यात आले. यादीनुसार मिळालेल्या शाळेत जाऊन प्रवेश निश्चितीसाठी आधी २० एप्रिलपर्यंत मुदत होती, ही मुदत नंतर २९ एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली होती.

आरटीई प्रवेशप्रक्रियेची स्थिती

 • ९,०८६ — शाळा
 • १,०१,९०६ — प्रवेशक्षमता
 • २,८२,७८३ — अर्जांची संख्या
 • ९०,६८५ — प्रवेश जाहीर

RTE Admission 2022- Under the Right to Education Act (RTE), more than 35,000 seats are still vacant in the admission process for 25 per cent reserved seats. As the deadline for admissions expires on Friday (April 29), the question is whether to extend the deadline for vacancies or to admit students on the waiting list.

शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अद्याप जवळपास ३५ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. प्रवेशांसाठी दिलेल्या मुदतवाढीचा कालावधी शुक्रवारी (२९ एप्रिल) संपत असल्याने आता रिक्त जागांसाठी पुन्हा मुदतवाढ देणार, की प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असा प्रश्न आहे.

आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांचे मोफत प्रवेश केले जातात. या प्रवेश प्रक्रियेत यंदा ९ हजार ८६ शाळांतील १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या सोडतीत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जवळपास ५४ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली. आरटीई अंतर्गत सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया आतापर्यंत मंदगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

असे का झाले? आरटीई प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे पालकांकडे उपलब्ध नसल्याने किंवा ती उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्याने अनेक पालकांना प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. प्रवेशासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीचा कालावधी संपत येऊनही प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३५ हजार विद्यार्थ्यांचा अद्याप प्रवेश निश्चित नाही.

पुन्हा मुदतवाढ मिळेल?

आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेशांसाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार, की प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.


Under the Right to Education Act (RTE Admission 2022-23), the deadline for admission in private schools expires today, Friday, and about 35,000 children in the state are deprived of admission. Therefore, the parents have asked whether the admission process will get a second extension. The Directorate of Elementary Education has appealed to the parents to ensure that their children are admitted within the stipulated time.

 
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (RTE Admission 2022-23) खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत आज, शुक्रवारी संपणार असून, राज्यातील साधारण ३५ हजार मुले प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार का, अशी विचारणा पालकांकडून करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश दिलेल्या मुदतीतच निश्चित करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहेत.

आरटीई’अंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांचे मोफत प्रवेश केले जातात. या प्रवेशप्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी आज शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पालकांकडे उपलब्ध नसल्याने, अनेक पालकांना मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे गुरुवार सायंकाळपर्यंत राज्यात प्रवेश जाहीर झालेल्या ९० हजार ६८५ मुलांपैकी ५४ हजार २८७ मुलांनी शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत.

साधारण ३५ हजारांपेक्षा अधिक मुलांचे प्रवेश होणे बाकी आहे. प्रवेशित मुलांची संख्या कमी असल्याने, प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ मिळेल का, अशी विचारणा पालकांकडून होत आहे. पुणे जिल्ह्यात १४ हजार ९५८ मुलांचे प्रवेश झाले आहेत. त्यापैकी नऊ हजार ३५५ मुलांचे प्रवेश निश्चित झाल्याने साधारण पाच हजार मुलांचे प्रवेश होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याचा निर्णय आज, शुक्रवारी जाहीर होणे अपेक्षित आहे. पालकांनी अधिक माहितीसाठी ‘आरटीई’च्या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

नामांकित शाळेत प्रवेश नसल्याने प्रवेशाला नकार

आरटीई प्रवेशप्रक्रियेत आपल्या मुलाचा नामांकित खासगी शाळेत प्रवेश व्हावा, अशी पालकांची इच्छा असते. मात्र, लॉटरी पद्धत असल्याने, प्रत्येक मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश जाहीर होत नाही. अशा परिस्थितीत मुलाचा एखाद्या खासगी शाळेत प्रवेश जाहीर होऊनसुद्धा, पालक प्रवेश निश्चित करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवेशित मुलांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.

आरटीई प्रवेशप्रक्रियेची स्थिती

 • ९,०८६ — शाळा
 • १,०१,९०६ — प्रवेशक्षमता
 • २,८२,७८३ — अर्जांची संख्या
 • ९०,६८५ — प्रवेश जाहीर
 • ५४,२८७ — प्रवेश निश्चित

 

Students under the Right to Education Act (RTE) have been given an extension till April 29. This admission process is being implemented by lottery for 25% of the reserved seats in private schools in the state. The extension gives parents a period to submit documents. Read More details as given below.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) प्रवेश (Admission) घेणाऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना (Students) २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील खासगी शाळांमध्ये (Private School) राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया सोडत (लॉटरी) (Draw) पद्धतीने राबविण्यात येत आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे पालकांना कागदपत्रे जमा करण्यासाठी अवधी मिळाला आहे. तसेच, कागदपत्रे पडताळणी समितीच्या सदस्यांनी पालकांना योग्य मार्गदर्शन केल्यास प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३साठी ३० मार्च रोजी सोडत जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर निवड आणि प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली आहे. सुरवातीला २० एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पालकांसह लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी दिली आहे. निवड आणि प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईल संदेशाद्वारे माहिती दिल्याचेही टेमकर यांनी सांगितले आहे.

निवासी पुराव्यासाठी भाडेकरार…

२०२२-२३ च्या प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून अकरा महिन्यांचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरावा, अशी मागणी पालकांच्या वतीने करण्यात आली होती. त्याची दखल घेत आरटीई प्रवेशासाठी ११ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरण्यात येणार आहे.

आरटीईची आकडेमोड –

 • निवड यादीतील विद्यार्थी – ९०,६८८
 • प्रतिक्षा यादीतील विद्यार्थी – ६९,८५९
 • दिव्यांग विद्यार्थी – २००

Eligible parents in the list have started going to the verification committee from April 5 and the last date of admission is 20th April 2022. However, 75 per cent seats are still vacant and only 25 per cent seats have been secured. Therefore, there is a possibility of getting extension for the admission of students selected in the lottery.

लॉटरीच्या प्रवेश यादीत प्रवेशपात्र पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत बुधवार 20 एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापही ७५ टक्के जागा रिक्त असून केवळ 25 टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

५ एप्रिल पासून यादीतील प्रवेश पात्र पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्यास प्रारंभ झाला असून, प्रवेशाची अंतिम मुदत २० एप्रिल आहे. उपलब्ध जागा कमी आणि अर्जाची संख्या जास्त असल्याने लॉटरी कडे पालकांचे लक्ष लागेल आहे


RTE 25% Admission Process 2022 – Parents has been received the SMS for admission in the school by their children. The deadline for admission is 20th April 2022. During this period, the parents of the students have to verify the documents through the verification committee to ensure the admission of the students in the school. Students will be admitted in schools during this period.

आरटीई प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत – RTE 25% शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठवले आहेत. प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करुन विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश निश्‍चित करायचा आहे. या काळात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

RTE Admission 2022- As there are still vacancies in the RTE admission process, the deadline for admissions will have to be extended. A decision will be made soon. There are 1,01,906 seats available for RTE admissions in the state this year. Out of these, students have been selected for 90 thousand 685 seats. Of these, only 13,700 students have secured their admission and there are still about 77,000 vacancies. As there will not be much increase in admissions, the Directorate of Elementary Education will have to extend the deadline for admissions.

RTE Admission 2022 Online Application @ student.maharashtra.gov.in

RTE Admission: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (Right to Education, RTE) खासगी शाळांमध्ये (Private School) प्रवेश देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांच्या प्रक्रियेला पालकांकडून अतिशय थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश निश्चितीसाठी केवळ चार दिवस उरले असताना आतापर्यंत फक्त १३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यात आता पुढील तीन दिवस सुट्टी असल्याने प्रवेशांसाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

आरटीई प्रवेशांसाठी यंदा राज्यामध्ये १,०१,९०६ जागा उपलब्ध आहेत. या पैकी ९० हजार ६८५ जागांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यातील केवळ १३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असून, अजूनही अंदाजे ७७ हजार जागा रिक्त आहेत. पुढील तीन दिवस सुट्ट्या असल्याने प्रवेशांमध्ये फारशी वाढ होणार नसल्याने प्राथमिक शिक्षण संचलनालयाला प्रवेशांसाठी मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

 • दरम्यान, पालकांना त्यांना हव्या असलेल्या शाळेमध्ये प्रवेश जाहीर होत नसल्याने ‘आरटीई’ प्रवेशांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. आपल्या परिसरातील नावाजलेल्या शाळेतच पाल्याला प्रवेश मिळावा, हा अट्टाहास असल्याने प्रवेशांची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून दिली जात आहे.
 • काही पालकांना कागदपत्रांच्या अडचणी भेडसावत असून, प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्यानेही काही प्रवेश रखडले आहेत. आरटीई प्रवेशांची ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली, तर प्रवेशांच्या मुदतीअंती ३० ते ४० हजार प्रवेशांच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 • पालकांकडून दाखवण्यात येत असलेल्या या अनास्थेमुळे लॉटरीत नाव न लागलेल्या अनेक गरजू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे पालकांनी तातडीने आपल्या पाल्याला मिळालेल्या शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
 • आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेत अद्यापही जागा रिक्त असल्याने प्रवेशांसाठी मुदतवाढ द्यावी लागणार आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. प्रवेशाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून, ज्या पालकांना अपेक्षित शाळेत प्रवेश मिळत नाहीत, त्यांना इतर शाळेमध्ये प्रवेश घेण्यास मुभा असल्याने जागा रिक्त दिसत असाव्यात.
 • मुदतवाढ मिळाल्यानंतर या प्रक्रियेला आणखी गती येईल अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षण संचलनालयाचे सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.

RTE प्रवेशांची २० एप्रिल पर्यंत पहिली फेरी

The list of students selected in the RTE admission process for admission to 25 per cent reserved seats in private schools under the Right to Education Act (RTE) was announced on Monday. Detailed instructions regarding the admission process are given below.  For More details Click on given link.

RTE ADmission

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के रखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश अर्ज दाखल करताना नोंदविलेल्या मोबाइल नंबरवर एसएमएस पाठविला जाणार आहे. परंतु, केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पालकानी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक टाकून पाल्याच्या नावाची खात्री करून घ्यावी, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. आरटीईमुळे पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. पालकांना अर्जाची शेवटची संधी २८ फेब्रुवारी होती; मात्र ही मुदत १० मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. एकूण अर्ज करणाऱ्या पालकांची संख्या ६ हजार २ आहे.

image not found प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल

image not found लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे

image not found User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे

image not found Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी

image not found प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे..

image not found Allotment letter वरील सर्व सूचना काळजी पूर्वक वाचून मगच प्रवेश घेण्यास जावे

image not found अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यास अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क करावा

image not found लॉगिन करत असताना पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड करावे

RTE प्रवेशाची पहिली यादी पहा


The list of students selected in the RTE admissions process for admission to 25 per cent reserved seats in private schools under the Right to Education Act (RTE) will be announced on Monday, April 4. The lottery process for ‘RTE’ was held on April 30 in the hall of the State Council for Educational Research and Training (SCERT).

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के रखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सोमवारी, चार एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) सभागृहात ३० एप्रिलला ‘आरटीई’साठीची लॉटरी प्रक्रिया पार पडल्याने पुढील प्रक्रियेला गती मिळाली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत खासगी शाळांमध्ये त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शाळांना नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर या जगांवरील प्रवेशासाठी पालकांना १० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मुदत दिली होती. या मुदतीनंतर दहा दिवसात लॉटरी प्रक्रिया होणे अपेक्षित होते. या प्रक्रियेला जवळपास २० दिवसांचा अवधी लागला. त्यानंतर ‘एमएससीईआरटी’मार्फत ३० मार्चला आरटीई प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजता आरटीई पोर्टलवर ऑनलाइन जाहीर केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश अर्ज दाखल करताना नोंदविलेल्या मोबाइल नंबरवर एसएमएस पाठविला जाणार आहे. परंतु, केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पालकानी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक टाकून पाल्याच्या नावाची खात्री करून घ्यावी, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे.

अर्ज सादरीकरणाचा उच्चांक

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीसोबतच प्रतीक्षा यादीही पोर्टलवर जाहीर केली जाईल. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी जिल्ह्यातील ४२२ शाळांनी नोंदणी केली होती. यातील ४ हजार ९२७ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी जिल्ह्याभरातून १६ हजार ५६७ म्हणजे सुमारे तिप्पटपेक्षा अधिक अर्ज यंदा दाखल झाले आहेत. आरटीई प्रवेश सुरू झाल्यापासून दहा वर्षातील हा अर्जांचा उच्चांक आहे.


Maharashtra RTE Admission 2022

Dinkar Temkar, Director, Directorate of Primary Education, announced his resignation from RTE. It was announced that 1 lakh 1 thousand 977 students will get admission in this year. This coming Monday evening. It will be released on RTE portal at 4 pm.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठी बुधवारी (दि.३०) सोडत काढण्यात आली. सोडतीत प्रवेश मिळालेल्या पासून एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी आरटीईची सोडत जाहीर केली. यामध्ये या वर्षी १ लाख १ हजार ९७७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. येत्या सोमवारी सायं. ४ वाजता आरटीई पोर्टलवर सोडत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

सोडतीत प्रवेश मिळाला की नाही, याची माहिती सोमवारीच पालकांना समजणार आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत आरटीई प्रवेशांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे टेमकर यांनी सांगितले.


Maha RTE Admission 2022- The online lottery for admission to 25 per cent reserved seats in private schools as per Right to Education Act (RTE) will be drawn today (30th) at 4 pm in the hall of Maharashtra State Council for Educational Research and Training.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेशाची ऑनलाइन सोडत (लॉटरी) आज  (ता.३०) दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात काढण्यात येणार आहे.

आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता राज्यातील जवळपास ९ हजार ८८ शाळांमधील तब्बल एक लाख दोन हजार २२ जागांकरिता सुमारे दोन लाख ८२ हजार ७७६ अर्ज आले आहेत.

प्रवेश प्रक्रियेमार्फत मुलांच्या प्रवेशासाठी यंदा मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यातील ९५७ शाळांमधील १५ हजार १३२ जागांकरिता तब्बल ६२ हजार ९५६ अर्ज आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेला १६ फेब्रुवारीपासून सुरवात झाली होती. प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरल्यानंतर आरटीई प्रवेशाच्या सोडत कधी लागणार याची प्रतीक्षा लाखो पालकांना होती, आता अखेर ही परीक्षा संपणार आहे.

‘शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत बुधवारी (ता.३०) जाहीर करण्यात येत आहे. यावेळी प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित राहतील.’’ अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.


According to the Right to Education Act (RTE), the draw for admission to 25 per cent reserved seats in private schools will be announced by the end of March. The release date will be finalized in the next two days by the Directorate of Elementary Education. ottery information for parents will be published in the media and on the RTE portal. Two lakh 82 thousand 907 parents from the state have applied online. As a result, two and a half times the number of applications for admission has come. In such a scenario, there is a lot of curiosity among the parents as to when the release of RTE will be announced

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील२५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) मार्च अखेरपर्यंत जाहीर होणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत येत्या दोन दिवसांत अधिकृतपणे सोडत जाहीर करण्याची तारीख अंतिम केली जाणार आहे.

आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता राज्यातील जवळपास ९ हजार ८८ शाळांमधील तब्बल एक लाख दोन हजार २२ जागांकरिता सुमारे दोन लाख ८२ हजार ७७६ अर्ज आले आहेत. प्रवेश प्रक्रियेमार्फत मुलांच्या प्रवेशासाठी यंदा मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.

या प्रवेश प्रक्रियेला १६ फेब्रुवारीपासून सुरवात झाली. परंतु आरटीई पोर्टलवर पुणे जिल्ह्यातील शाळांची नोंदणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीच्या चौथ्या आठवड्यात सुरू झाली. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या सोडतीकडे लाखो पालकांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांचा एकच अर्ज ग्राह्य धरणार

प्रवेश प्रक्रियेत अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे दिसून आले. संपूर्ण राज्यात जवळपास तीन ते चार हजार ‘डुप्लिकेट’ अर्ज दाखल झाले आहेत. आता प्राथमिक शिक्षण विभागामार्फत डुप्लिकेट अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा एक अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असून उर्वरित अर्ज रद्द केले जातील. हे अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

‘आरटीई’नुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोडती जाहीर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून येत्या दोन दिवसांत सोडत काढण्याची तारीख जाहीर केली जाईल. मार्चअखेरपर्यंत सोडत जाहीर करण्यात येईल.


RTE Admission 2022- The online admission process for admissions in private schools under the Right to Education Act (RTE) will be announced by March 25. The Department of School Education is preparing for the RTE draw. The release will be announced in the coming days. Lottery information for parents will be published in the media and on the RTE portal. Two lakh 82 thousand 907 parents from the state have applied online. As a result, two and a half times the number of applications for admission has come. In such a scenario, there is a lot of curiosity among the parents as to when the release of RTE will be announced

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत साधारण २५ मार्चपर्यंत जाहीर होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेमार्फत मुलांच्या प्रवेशासाठी यंदा मोठ्या प्रमाणात पालकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ‘आरटीई’च्या सोडतीकडे राज्यातील पालकांचे लक्ष लागले आहे.

 • आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. या प्रवेश प्रक्रियेला राज्यात १६ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.
 • मात्र, आरटीई पोर्टलवर पुणे जिल्ह्यातील शाळांची नोंदणी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे या शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, साधारण आठवड्यानंतर प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात झाली. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत मुलांच्या प्रवेशासाठी राज्यातील नऊ हजार ८८ शाळांमध्ये एक लाख २ हजार २२ जागा उपलब्ध आहेत.
 • त्यासाठी राज्यातून दोन लाख ८२ हजार ९०७ पालकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यामुळे प्रवेशक्षमतेच्या अडीचपट अर्ज आले आहेत. अशा परिस्थितीत ‘आरटीई’ची प्रवेशाची सोडत कधी जाहीर होणार, याबाबत पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
 • शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आरटीई’ची प्रवेशासाठीची सोडत २५ मार्चच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. या सोडतीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर माहिती पालकांना ‘आरटीई’च्या वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • शालेय शिक्षण विभागाकडून ‘आरटीई’च्या सोडतीची तयारी करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत सोडत जाहीर करण्यात येईल. पालकांच्या माहितीसाठी सोडतीची माहिती प्रसारमाध्यमे आणि ‘आरटीई’च्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.

आरटीई २५ टक्के प्रवेश २०२२ प्रक्रियेचे ऑनलाईन अर्जाची स्थिती तपासा

RTE 25% Admission Application Wise Details

 1. Candidates first click on the official website of Maharashtra RTE admission
 2. The home page will open before you
 3. On the homepage, you are required to click on application-wise details
 4. Application Wise Details
 5. Now you have to enter your application number
 6. After that, you have to click on the go
 7. Application wise details will be on your computer screen

RTE Maharashtra Lottery Process 2022

Lottery Logic for School allocation (Provisional) –

 1. Lottery should be executed only for the schools which has got more no. of applications than the School intake as per 25% reservation.
 2. All the eligible candidates should be considered for all their preferred schools allotment.
 3. No candidates will be dropped after the allotment for one school. E.g. if the candidate applied for 5 schools, he/she may be allotted to all 5 schools or less than 5 schools.
 4. For the allotment, priority should be given to candidates residing within the range of 1 KM radius from the school and then for the candidates residing within the range of 2-3 KM radius from the schools applied.
 5. After the completion of School allotments to the candidates residing within the radius of 1 KM, candidates residing within the radius of 2-3 KM will be considered for the remaining vacancies with the lottery logic as explained below.

Lottery Process (Physical) –

 1. Lottery will be carried out in the auditorium.
 2. There will be number of bowls exactly equal to the digits of maximum number of applications received for any of the schools applicable & is a part of this process. eg. Max. No. of applications received for XYZ school is 599. Hence as the number of digits in 386 is = 3, bowls taken in consideration for the draw of lottery will be = 3.
  • a. First Bowl for Last Digit – 0 to 9 digits
  • b. Second Bowl for Second last digit – 0-9 digits
  • c. Third Bowl for Third last digit – 0-5 digits (Assuming that max no. of applications
   per school not greater than 599)
 3. In the auditorium, one of the parent / candidate (Person) will be called for collecting the digits from the bowls.
 4. The Person will pick the chits having digits 0 to 9 randomly from first bowl, then from second bowl, then 3rd Bowl one by one.
 5. Chits will be taken out from all the three bowls one by one for last digit, second last digit & third last digit respectively.
 6. There is a situation where the chits will not be there (for 3rd Bowl/third last digit) In this Zero (0)/Null value will be considered as a third last digit for that bowl.
 7. All the rounds of collecting all the chits from bowls will be carried out one by one serially at the same time.
 8. All the digits will be entered in the software, serially round wise in the table mentioned below –
 9. RTE Lottery
 10. After writing all the digits in the system, the process of lottery in the system will start by pressing a button ‘GENERATE LOTTERY’

Lottery Process (System Logic) –
First Round of Allocation for Candidates residing within the range of 1KM radius from the schools applied –

 1. Generate List of Schools with no. of applications within the range of 1 KM radius.
 2. Arrange the schools on descending order on the basis of no of applications received for 1 km.
 3. Check the schools with their 25% reservation vacancies.
 4. Allocate all the candidates to the schools whose no of applications are equal or less than the 25% reservation vacancies.
 5. Actual lottery logic will be implemented for the schools which are remaining i.e. whose vacancy is less than the no. of applications received.
 6. Arrange the remaining schools in descending order on the basis of no. of applications received.
 7. Generate the school wise list of candidates for the remaining schools
  • a. All the candidates who applied to the school will be considered
  • b. The list will be generated on the order of application form number.
  • c. Serial No will be generated from 1 to max. no of applications. (Sample Data attached in sample data sheet)
 8. Order the data with respect to Last digit, second last digit & Third Last Digit. (Sample Data attached in ordering sheet)
 9. Get the Vacancy of the school and allot the no of candidates as per the vacancy from top to bottom till the vacancy exists as per the Serial no order. (Marked in color in ordering sheet.) e.g. If the school has 300 Capacity, as per 25% reservation , the vacancy will be 75. Please check the lottery table, as the third last digit will be max 2 in 299 candidates/applications, so in ordering as per the order of lottery table 2,0 & 1 will be considered.
 10. So all the vacancies will be filled.
 11. Same logic will be applicable for all the remaining schools for its 1 km areas candidates.
 12.  Same logic will be considered for 2-3 km candidates for the remaining vacancies from point no 1 to 10.

RTE 25% Admission 2022 –  The list of eligible and non-eligible candidates will be published from today. The process of publishing the list is starting from today i.e. 21st March 2022. Students will be notified via SMS to their registered mobile number whether they are eligible or non – eligible for RTE admission 2022. Please read the following details carefully for more information:

RTE Admission 2022 eligible candidates

RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज करण्याची आज शेवटची संधी …!

Updated on 05.03.2022:  The RTE has clarified the minimum and maximum age limit for Free Admission under the 25 % Quota. According to this, the minimum age for admission in RTE 25% for 1st Class student is now six years and maximum age is 7 years 5 months 30 days. In addition, a minimum age limit of 25 %has been fixed for admission under RTE. The deadline for applications for RTE admission in the state is 10th March 2022.

शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्यासाठी ३१ डिसेंबर ही तारीख संचालनालयाकडून निश्चित करण्यात आली आहे. प्राथमिक संचालनालयाकडून नवीन पत्रक काढून यंदाच्या आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी किमान व कमाल वयोमर्यादा स्पष्ट केली आहे. त्यानुसार आरटीई २५ टक्क्यांचा पहिलीतील प्रवेशासाठी आता किमान वय सहा वर्षे तर कमाल वय ७ वर्षे ५ महिने ३० दिवस असायला हवे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ देम्यात आली आहे. सन 2022-23  च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार (Online Admission Process) मुलांचा प्रवेश घेण्‍यासाठी आता 10 मार्च 2022 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009” अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांना अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत होती. परंतु, ही मुदत आता 10 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय (Age limit) निश्चित करण्याबाबत 18 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव 31 डिसेंबर करण्यात आला आहे.


RTE Admission 2022-2023 Last Date Extended till 10th March 2022. Admission to students from economically weaker sections is being given under RTE 25 %  and the deadline for admission application has been extended till March 10. In addition, a minimum age limit of 25 %has been fixed for admission under RTE. The deadline for applications for RTE admission in the state is 10th March 2022. However, the Directorate noticed that many parents had difficulty in filling up the application form as many schools took time to register for RTE admission.

RTE 25% Admission Student Age Limit

आरटीई  25 टक्के अंर्तगत आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून यासाठी प्रवेश अर्जाच्या मुदतीत दहा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबतच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेताना किमान वयोमर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.

विविध प्रवेश अर्ज करताना नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली अशा विविध प्रवेश स्तरावरील वयोमर्यादेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई  प्रवेशाच्या वयोमर्यादेची निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली आहे. दरम्यान बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या सूचना देण्यात आल्याची माहिती संचालनालायकडून देण्यात आली आहे.

राज्यातील आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचलनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी जाऊ यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 10  मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक संचलनालयाकडून सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि उपसांचालक याना शाळांना या सूचना निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील आर टी ई 2022-23 च्या प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे वयोमर्यादा आवश्यक 

प्रवेशाचा वर्ग –   

प्ले ग्रुप / नर्सरी – 

 • वयोमर्यादा –  1 जुलै  2018 ते 31 डिसेंबर 2019
 • 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय – 4 वर्ष 5 महिने 30 दिवस

ज्युनिअर केजी – 

 • वयोमर्यादा – 1 जुलै 2017 ते 31  डिसेंबर 2018
 • 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय 5  वर्ष 5 महिने 30 दिवस

सिनिअर केजी –

 • वयोमर्यादा- 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017
 • 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय – 6 वर्ष 5 महिने 30 दिवस

पहिली  

 • वयोमर्यादा- 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016
 • 31 डिसेंबर 2022  रोजीचे वय -7  वर्ष 5 महिने 30 दिवस

Maharashtra RTE Admission 2022 Application Form and Registration

RTE Admission 2022 आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेला सुरूवात…

RTE 25% Admission 2022 Online Process has been started now. Parents have started filling up applications for the year 2022-23. Parents should complete the application form following the following instructions:

पालकांकरीता सूचना (२०२२-२३)

 • १) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
 • २) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
 • ३) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.
 • ४) १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना किमान १० च शाळा निवडाव्यात.
 • ५) ३ कि.मी पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला लॉटरी लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद घ्यावी.
 • ६) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
 • ७) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
 • ८) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
 • ९) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
 • १०) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
 • ११) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
 • १२) RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च २०२२ पर्यंत राहील.
 • १३) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
 • १४) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
 • १५) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
 • १६) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
 • image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित [email protected] इमेल वर मेल पाठवावा.

Maharashtra RTE Admission 2022 Application Form and online registration has been started now. RTE -Right to Education Act under this the students who belong to underprivileged parts of our society can easily study in private institutions. They shall get admitted to the 25% reserved seats under the RTE quota and get educated free of cost. However, the reservations are made only up to 8th Class. The parents in the state of Maharashtra will have to apply online for the schools in their district through the School Education and Sports Department of Maharashtra. Currently The Parents can apply online for the year 2022-23 from 16/02/2022. Today Gondia district is starting after 3 pm. The remaining districts can apply after 3 pm on 17/02/2022 through the website student.maharashtra.gov.in.

image not found RTE 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2022-23 साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक 16/02/2022 पासून होत आहे. गोंदिया,अहमदनगर, जळगाव  जिल्हा आज दुपारी 3 नंतर सुरू झाले आहेत, अन्य जिल्हाच्या लिंक्स लवकरच उपलब्ध होईल.

Maharashtra RTE admission 2022-2023 will commence from today i.e. February 16, 2022. Official website https://student.maharashtra.gov.in has published the notification for same. The Parents can apply online for Maharashtra RTE admission 2022-23 from today. Read the details and apply from given link.

For RTE 25% Admission Don’t give Fake documents 

image not foundमोफत प्रवेशासाठी बनावट कागतपत्र दिल्यास पोलीस कारवाई ला समोर जावे लागेल..

Police will have to take action if fake documents are provided for free admission under RTE Act. Read the details given below:

rte admission fake document face police action

Hing

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ ची इयत्ता १ ली करता नवीन विद्यार्थी नोंदणी Excel द्वारे सुरु करण्यात आली आहे

New Registration Link RTE Online Application

Note: To Create Your Application ID click on
New Registration Link is given below for User Login for 2022-2023

New registration Link

RTE Online Apply link

RTE Admission 2022 Required Documents List

RTE Maharashtra Admission 2022-23 Students have to submit following documents while applying for the RTE Admission 2022. The List of Documents are as below.

 1. Aadhar Card
 2. Passport Size Photo
 3. Residential Certificate
 4. BPL Ration Card
 5. Disability Certificate
 6. Caste Certificate
 7. Date of Birth Certificate
 8. Previous Year Marksheet
 9. Nationalize Bank Pass Book

Eligibility Criteria for Maharashtra RTE Admission 2022

 1. The student minimum age is 3 Years as per the RTE Act.
 2. The students maximum age is 14 Years as per the RTE Act.
 3. The student admissible classes are upto Class 8.
 4. The income of the family of the student who is seeking admission under RTE Act should not exceed Rs. 1 Lakh per annum, combined from all the sources.
 5. The applicant also needs to furnish a document in order to support the income claim.

How to Online apply for Maharashtra RTE admission 2022

 1. First Visit the official website of the Department of School Education and Assistance, Government of Maharashtra or directly click on the below given link.
 2. After that on the homepage, click on the link “Online Application”
 3. Click on the “New Registration” option.
 4. After this, a registration form will open in front of you.
 5. Candidates have to enter the required information mention in form, after entering all the information, you will have to submit this form.
 6. Log in to the portal by entering the application number, password and captcha code.
 7. Fill in all the information and upload all the necessary documents.
 8. Click on submit button and take a printout of this application form for future reference.

RTE25 admission 2022-2023

As per the latest update of RTE Admission 2022. It will be started from 16th February 2022. Maharashtra RTE Admissions 2022-2023 Online Application form to be release on 16th February 2022. This announcement was made by State School Education Minister Varsha Gaikwad, who took to the social media platform Twitter to share the tentative schedule.

“Important Note: The probable schedule of RTE 25% admission process for the academic year 2022-23 has been published. Accordingly, from Wednesday 16th February 2022, parents will be able to fill online application,” she wrote in Marathi.

Online Application Form


RTE Admission 2022 will be started from 16 Feb


RTE Admission 2022-2023- As per the latest news, With the Department of School Education taking a new decision under the Right to Education Act (RTE), the number of private schools in the state and in the city of Pune will be drastically reduced in this year’s RTE admission process. Similarly, admission capacity in many schools is likely to be halved. Therefore, it will be impossible for parents to get admission through the RTE admission process starting for the academic year 2022-23.

शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) नवे निर्णय घेतल्याने, यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील आणि पुणे शहरातील खासगी शाळांच्या संख्येत कमालीची घट होणार आहे. त्याचप्रमाणे अनेक शाळांमध्ये प्रवेश क्षमता निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणे पालकांसाठी अशक्य बाब होणार आहे.

 • आरटीई कायद्यांतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर मुलांचे मोफत प्रवेश होतात. यंदाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत काही बदल केले आहेत.
 • त्यानुसार एका खासगी शाळेत ३०-३० च्या दोन तुकड्या ग्राह्य धरून १५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार नाहीत. तर, एखाद्या शाळेत आरटीई अंतर्गत पहिली ते आठवीसाठी ५० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्यास, त्या शाळेची नोंदणी होणार नाही. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांत सुरू झालेल्या, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांची नोंदणी त्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या शाळांची नोंदणी होणार नसल्याचे चित्र आहे.
 • उर्वरित शाळांमध्ये प्रत्येकी १५ विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकणार आहे. या सर्व परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर, आरटीईच्या यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत सामील होणाऱ्या शाळांची संख्या निम्म्याने कमी होणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित शाळांमधील प्रवेश क्षमता घटणार आहे. गेल्यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत नऊ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी राज्यातून साधारण दोन लाख २२ हजार ५८४ पालकांनी अर्ज केले होते.
 • नव्या नियमांमुळे शाळांची संख्या साधारण साडेचार हजारांच्या आसपास येण्याची, तर प्रवेशक्षमता ५० हजारांच्या आत येण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यंदा आरटीईतून मुलांचे प्रवेश घेण्याचे पालकांचे स्वप्न भंगणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शिष्टमंडळ प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

पुण्याची प्रवेशक्षमता पाच हजार आणि मुले ५० हजार?

गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत असणाऱ्या ९८५ शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वधिक चुरस होती. या शाळांमध्ये १४ हजार ७७३ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या, तर अर्ज करणाऱ्या पालकांची संख्या ५५ हजार ८१३ होती. नव्या निर्णयामुळे पुणे शहरातील शाळांची संख्या २०० पर्यंत आणि प्रवेशक्षमता पाच हजारांपर्यत येईल. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांची संख्या; तसेच प्रवेश क्षमता रोडावणार आहे, अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली.


Maharashtra RTE admission 2022-23 sessions will be open from 16th Feb 2022. As schools have not registered for the 25 per cent reserved seats in private schools under the Right to Education Act (RTE) those submit application from 16th Feb. Parents will now be able to fill up RTE admission forms online from February 16 instead of 1st Feb 2022. More details as given below.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत शाळांनी नोंदणी न केल्याने, प्रवेश प्रक्रिया आता १६ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांकडून वेळोवेळी शिक्षण विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या शाळांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुला-मुलींसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. शैक्षणिक वर्ष २०२२-२३साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळांनी नोंदणी करावी, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना दिल्या गेल्या. मात्र, याकडे शाळांनी पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शाळांच्या मनमानी कारभाराचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेला बसला आहे.

शाळांची नोंदणी पूर्ण न झाल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. आता एक फेब्रुवारीऐवजी १६ फेब्रुवारीपासून पालकांना ‘आरटीई’चे प्रवेश अर्ज ऑनलाइन भरता येणार आहेत. संचालनालयाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार पात्र शाळांची नोंदणी पूर्ण करून, एक फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज उपलब्ध करण्यात येणार होते. मात्र, शाळांची नोंदणी पूर्ण झाल्याने प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी पालकांना पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे.


Maharashtra RTE admission 2022-23 sessions will be open soon. Parents can apply for the RTE 25 per cent reserved seats in online mode form below link. The RTE application forms will be available on the official website – rte25admission.maharashtra.gov.in. Read the details given below:

Admission Process for RTE 25% reservation through online application.

Part – I : School
Eligible schools to fill following details and get the approval of Cluster / URC head to make the school available for Selection

 • a) School Contacts
 • b) Valid age limit for admission
 • c) Total strength,(30 sept 2014) intake and vacancies for RTE 25% reservation
 • d) Accurate school location on Google map

Part – II : Child
The steps involved are as follows.

 • 1) Get your application number registered on the system. The application number and password will be communicated on your registered mobile.
 • 2) Enter child details, parent details.
 • 3) Locate the address accurately to list schools within 1 KM and within 1-3 KM range from your house.
 • 4) Select the required standard.
 • 5) Upload required documents.
 • 6) Confirm the application.
 • 7) After confirmation, take the printed application along with the required documents to help desk provided.

Part – III : Lottery

 • 1) The schools having more vacancies and less number of applications will allot the seats to all applicants.
 • 2) The schools having less vacancy will use lottery system. The lottery will be drawn and generated by the district administration i.e. Education officer, Primary for the district.
 • 3) The selection list will be published on the system.
 • 4) The list will be made available under application login for parents. The admit card can be printed.
 • 5) Schools will admit the students as approached by parents after completing necessary requirements.

RTE Admission 2022

RTE Admission 2022-2023 Maharashtra @ www.rte25admission.maharashtra.gov.in. Time Table and Required Document list is available below. Read More details as given below. RTE Admission 2022 was started form 28th December 2021 Last date of online Registration is 17th January 2022. Parents will be filled the application form for RTE Admission 2022-2023 from 1st February 2022 to 28th February 2022. Complete details are given below also the all required documents list for RTE Admission 2022-2023 are given below:

RTE Admission 2022-23

RTE Admission 2022-2023 Online Registration

RTE Maharashtra Admission 2022-23 Online Application

rte25admission.maharashtra.gov.in Lottery Result

 1. All parents should not rush to get admission in the school. Also, children should not be taken with them while going for admission.
 2. To get RTE admission, the school will inform the date of admission via sms on the mobile mentioned in the application.
 3. Only go to school after receiving further instructions for admission via SMS.
 4. Documents to be taken by the parents for admission: –
 5. Original documents required for admission and their photocopies.
 6. Click on the guarantee letter and application status on the RTE portal and print the guarantee letter and allotment letter and take it to the school.
 7. Parents of children on the waiting list may be locked out due to being out of town and / or for any other reason.
 8. If admission is not possible, they should contact the school and contact the child through WHATS APP / EMAIL / or other means.
 9. Necessary admission documents should be submitted and your child’s temporary admission in the school should be confirmed. Instructions have been given to put the admission schedule at the school entrance.
 10. Concerned parents will no longer have the right to enter the waiting list after the prescribed period.
 11. Parents are required to display a red balloon in Google location at the same address as the residence address entered in the application form. If there is a discrepancy between the location and the registered address of the house, the entry will be canceled.
 12. Also, if the same parents fill up 2 duplicate applications, even if they win the lottery, their admission will be canceled.

RTE25Admission 2022-2023 Online Registration Link


RTE admission process 2022-2023

The Department of Education on Thursday announced the probable timetable for the year 2022-23 of the 25 per cent admissions granted under the Right to Education Act (RTE). According to the schedule, the RTE admission process will be held from December 28 to May 9.

 • ‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (RTE) देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे २०२२-२३ या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २८ डिसेंबर ते नऊ मे दरम्यान ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे.
 • येत्या २८ डिसेंबरपासून राज्यातील ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांची पुनर्तपासणी सुरू होणार आहे. १७ जानेवारी पर्यंत तपासणी सुरू राहणार असून, त्यानंतर ‘आरटीई’ प्रवेशांसाठी राज्यात उपलब्ध शाळा आणि प्रवेशांच्या जागा जाहीर करण्यात येतील. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान, पालकांना ‘आरटीई’ प्रवेशांसाठी अर्ज करता येणार आहेत. आठ किंवा नऊ मार्चला ‘आरटीई’ प्रवेशांची सोडत निघणार असून, त्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल, असे संभाव्य वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.
 • ‘आरटीई’च्या सोडतीत नाव लागलेल्या पालकांना १० मार्च ते ३१ मार्च दरम्यान शाळांमध्ये जाऊन मूळ कागदपत्रे सादर करून प्रवेशनिश्चिती करता येईल. एक एप्रिलपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशफेऱ्या सुरू होणार आहेत.
 • यंदाचे संभाव्य वेळापत्रक पाहता मे महिन्यातच ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया पाहता शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकाच्याच कालावधीत ती पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेही यंदाही ‘आरटीई’ प्रवेशांची सोडत एकदाच जाहीर केली जाणार असून, शाळांमधील प्रवेशांच्या रिक्त जागांच्या संख्येइतकीच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Time Table of RTE Admission 2022- 2023

आरटीई’ प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक-

 • प्रवेशांच्या जागांची पुनर्तपासणी
  • २८ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२
 • ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत
  • एक फेब्रुवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२२
 • आरटीई प्रवेशांसाठी सोडत
  • आठ किंवा नऊ मार्च २०२२
 • प्रवेश निश्चित करण्याची मुदत
  • १० मार्च ते ३१ मार्च २०२२
 • प्रतीक्षा यादीतील पहिली प्रवेश फेरी
  • एक एप्रिल ते ७ एप्रिल २०२२
 • प्रतीक्षा यादीतील दुसरी प्रवेश फेरी
  • ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२
 • प्रतीक्षा यादीतील तिसरी प्रवेश फेरी
  • २५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२२
 • प्रतीक्षा यादीतील चौथी प्रवेश फेरी
  • दोन मे ते ९ मे २०२२

आरटीई अंतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. २८ डिसेंबर पासून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहोत. राज्यातील पालकांनी याची नोंद घ्यावी.


RTE Admission 2021- Updated

In the admission process for 25% reserved seats in the state in the academic year 2021-22. 25,000 seats have become vacant under the Right to Education Act. Read More details as given below.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (rte) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशप्रक्रियेत या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष (educational year) २०२१-२२ मध्ये राज्यातील तब्बल २५ हजार जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यातील ९६ हजार ६८४ जागांवर आतापर्यंत ७१ हजार ७१७ प्रवेश झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात येतात.

या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण(primary education) विभागामार्फत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया (online admission process) राबविण्यात येते. या अंतर्गत राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांकरिता यंदा प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये नियमित फेरीमध्ये तब्बल ६१ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. या फेरीत आतापर्यंत जवळपास १० हजार नऊ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.


RTE 2022 Admission list of 156 children for the year 2021-22 has been announced for 25 per cent reserved seats under RTE. Schools, parents and social organizations should contact for admission of children on the waiting list, appealed Education Officer Primary Chintaman Vanjari

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमांतर्गत कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी २०२१-२२ या वर्षासाठी १५६ बालकांची प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे. शाळा, पालक व सामाजिक संस्थांनी प्रवेश प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी केले आहे.

प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेशाबाबत या संकेतस्थळावर http://student.maharashtra.gov.in थेट देऊन आरटीई पोर्टलला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेता येईल.


Under the Right to Education Act (RTE), the admission process for 25 per cent reserved seats in private schools in the state is slow and more than 25,000 seats are vacant. The second round will now be implemented for the students on the waiting list. The entire admission process will be completed by October 25, according to the school education department.

RTE मधील २५ हजार जागा रिक्तच

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असून, २५ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. य़ेत्या २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

 • आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या.
 • त्यासाठी दोन लाख २२ हजार ५८४ पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले. या मुलांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आल्यानंतर, त्यामध्ये ९७ हजार ९५९ मुलांना प्रवेश जाहीर झाले. या मुलांना प्रवेशासाठी ११ ते ३० जूनची मुदत देण्यात आली होती.
 • त्यापैकी ६८ हजार ९५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. उर्वरित रिक्त जागांवर प्रवेशासाठी मुदतवाढ देऊन पुरेशा संधी दिल्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विद्यार्थ्यांसाठी पहिली फेरी राबविल्यानंतर,
 • आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत दुसरी प्रतिक्षा फेरी संपवून, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा शालेय़ शिक्षण विभागाचा मानस आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असून, मुलांचे प्रवेशाचे प्रमाण कमी आहे.
 • त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत २५ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

Under the Right to Education Act, admission to 25 per cent RTE reserved seats in private schools in the state has been disrupted across the state. After the completion of the first phase of admission, 35 thousand 640 seats have remained vacant

आरटीई प्रवेशाच्या अद्यापही ३५ हजार जागा रिक्त

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा राज्यभरात बोजवारा उडाला आहे. प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तब्बल ३५ हजार ६४० जागा रिकाम्या राहिल्या आहेत. तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यात प्रवेश मिळालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना  प्रवेश देण्यासाठी शाळांकडून अडवणूक केली जात असल्याने राज्यभरातील पालक संकटात सापडले आहेत.

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यंदा राज्यात ९ हजार ४३२ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या ९६ हजार ६९४ आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशाच्या जागांसाठी पहिल्या टप्प्यातील प्रवेश ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. यासाठी ६१ हजार ४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश लॉटरीच्या माध्यमातून निश्चित केले होते, मात्र त्यातील असंख्य जागांवर अद्यापही शाळांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचे मागासवर्गीय विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यख प्रवीण यादव यांनी सांगितले. अनेक शाळांमध्ये आरटीईचे शुल्क सरकारकडून मिळाले नसल्याचे सांगत हे प्रवेश नाकारले जात असल्याचेही यादव यांनी सांगितले.

राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या आरटीईच्या राखीव जागांपैकी तब्बल ३५ हजार ६४० जागा अद्याप रिक्त असून त्यातील मुंबईतील ३ हजार ७२५ जागांचा समावेश आहे. यातील काही जागा या प्रतिक्षा यादीच्या माध्यमातून भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या मुलांच्या पालकांना शाळेमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी ची प्रक्रिया 31 जुलैपर्यंत सुरू केली होती. मात्र यंदा मुंबईतील असंख्य शाळांनी आरटीईचे प्रवेश नाकारल्याने प्रवेशास पात्र झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार पालक संघटनांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे खाजगी शाळांचे आत्तापर्यंत १ हजार ८०० कोटी रूपये सरकारकडून आरटीई शुल्क प्रतिपूर्तीचे येणे बाकी असून ते सरकारने लवकर देण्याची मागणी मेस्टा या संस्थाचालक संघटनेने केली आहे.

३५ हजार ६४० जागा अद्याप रिक्त

शाळा एकूण जागा निश्चित झालेले प्रवेश रिक्त जागा

९४३२ ९६६८४ ६१०४४ ३५६४०

मुंबईतील शाळांची स्थिती

शाळा एकूण जागा निश्चित झालेले प्रवेश रिक्त जागा

३५२ ६४९३ २७६८ ३७२५


आरटीई प्रवेशांना पुन्हा मुदतवाढ;  ३१ जुलै २०२१ पर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार

RTE admissions for the academic year 2021-22 have been extended. The period for the parents of the children who have been selected for admission for the academic year 2021-22 to go to school and confirm the admission of their children has been extended till July 31, 2021.

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशांना मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ज्या बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी ३१ जुलै २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. ही मुदत २३ जुलै २०२१ रोजी संपत होती.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यानुसार, २५ टक्के जागांवरील प्रवेश निश्चितीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली होती. अजूनही ज्या पालकांनी शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केलेला नाही, किंवा ज्या पालकांना अजूनही या प्रवेशांची लॉटरी लागल्याचे कळले नाही, त्यांना एसएमएस करून शाळेत प्रवेश घेण्याबाबत कळवावे, असे निर्देश गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. तरीदेखील गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेला विलंब झालेला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. प्रवेशासाठी सोडत जाहीर झाल्यानंतर प्रारंभी प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिलेली होती. ही मुदत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली होती. आता पुन्हा एकवार मुदतवाढ देण्यात आली आहे.


Under the Right to Education Act (RTE), only 36 per cent of the students selected in the admission process for 25 per cent reserved seats have been confirmed so far. The admission process has been delayed for the last few months and parents seem to have turned their backs on it. The deadline for admission of students selected through lottery is now July 9.

RTE च्या राखीव जागांवर अद्याप केवळ ३६ टक्के प्रवेश

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्यांपैकी केवळ ३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने त्याकडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

आरटीईतंर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशाच्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. जूनमध्ये अखेर या प्रक्रियेला गती मिळाली. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ३० जूनपर्यंत प्रवेशाची मुदत यापूर्वी दिली होती. आता ही मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील ९६ हजार ६८४ जागांवरील प्रवेशाच्या सोडतीत जवळपास ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आतापर्यंत त्यातील ३८ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. तर २९ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित रिक्त जागांकरिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार संधी दिली जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रवेशाच्या पोर्टलवर स्वतंत्र सूचना देणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


Under the Right to Education Act (RTE), the admission process for 25 per cent reserved seats in private schools will start from June 11. It has been directed to complete the admission of 5611 students in 680 seats in the district within 20 days.

आरटीई’ अंतर्गत साडेपाच हजार जागांवर प्रवेश

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्हय़ातील ६८० जागांवर ५६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठीची सोडत ७ एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात ५ हजार ६११ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर करोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घ्यावा.

पडताळणी समितीने आलेले अर्ज, तक्रारींची शहानिशा करून प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश सुरू होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळेला द्यावा. शाळांनी पालकांना प्रवेशासाठी तारखा द्याव्यात आणि आरटीई प्रवेश सुरू झाल्याची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी संपल्यानंतर रिक्त जागांवर

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. त्याबाबतच्या सूचना आरटीई संकेतस्थळावर दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


The admission process for 25 per cent reserved seats in private schools will start from June 11.  The draw for admissions under RTE was drawn on April 7. Admission was declared for 82 thousand 129 students. However, the admission process had to be postponed due to Corona restrictions. Now that the restrictions have been relaxed, the admission process has begun.

निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठीची सोडत ७ एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर करोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घ्यावा.

प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांसाठी..

करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेशासाठी प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनी, ईमेल, व्हॉट्सअॅप द्वारे शाळेशी संपर्क  साधून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


The RTE admission process, which has been delayed due to corona, will begin in the coming weeks. Therefore, more than 82,000 students in the state, including Pune, will be able to start online education by getting admission in the school.

कोरोनामुळे रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया येत्या आठवड्याभरात सुरु होणार आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील 82 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु करता येणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शाळास्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत.

RTE Admission 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शाळास्तरावर कागदपत्रांची पाहणी करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती, या वर्षी सुधा त्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे प्राथमिक सिक्ष्ण संचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.


Document Verification in RTE Admission 2021 – Parents are facing many problems in fulfilling the required documents for admissions under the Right to Education Act (RTE). Although the RTE admission process will be completed after the lockdown, many parents are facing difficulties in getting income certificates, rental agreements and caste certificates. As a result, the admission of students who have been confirmed in the lottery is still pending.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मिळणाऱ्या प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउननंतर आरटीई प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार असली, तरी उत्पन्नाचे दाखले, भाडे करार आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठी अनेक पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे लॉटरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही अद्याप अधांतरीच आहेत.

It is not possible to carry out the admission process at present due to the situation of infection. The verification of documents and admission process will start only after the lockdown rules are relaxed, ‘said Dinkar Temkar, Director, Directorate of Primary Education.

आरटीई’ प्रवेशांची उर्वरित प्रक्रिया लॉकडाउननंतरच

आरटीई’ प्रवेश लॉकडाउननंतरच होणार आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबतच्या सूचना ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेच्या वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

‘संसर्गाची परिस्थिती पाहता सध्या प्रवेशप्रक्रिया राबवणे शक्य नाही. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतरच कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेशप्रक्रिया सुरू होईल,’ अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.


The state level draw for 25 per cent admission to RTE was taken out on Thursday. 67 thousand 553 children were admitted in this draw. Admission dates have been removed from the website by the Directorate of Education and it has been clarified that new notifications regarding admission dates will be posted on the website after the lockdown.

आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत गुरुवारी काढण्यात आली. या सोडतीत ६७ हजार ५५३ बालकांना प्रवेश निश्चित करण्यात आले होते. प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून, लॉकडाउन संपल्यानंतर प्रवेशाबाबत संकेतस्थळावर प्रवेशाच्या तारखांबाबत नव्याने सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

image not found ( लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टल वर सूचना दिली जाईल. Covid 19 मुळे पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये )

image not found पालकांसाठी सूचना :

 1. आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२१-२०२२ या वर्षाकरिता लॉटरी द्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून sms प्राप्त होतील.
 2. पालकांनी फक्त SMS वर अवलंबून राहू नये . पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याकरिता आर.टी.ई. पोर्टल वर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
 3. ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरी मध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी प्रवेशाकरिता sms द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे.
 4. पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
  a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
  b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे.
 5. पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये.
 6. मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
 7. पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
 8. तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल
 9. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे /बाहेरगावी असल्याने/किंवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी समितीशी संपर्क करून whats app /email किंवा अन्य माध्यमांच्या द्वारे बालकाच्या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.

महत्वाचे : प्रतिक्षा यादीतील (waiting list )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये . त्यांच्या करिता rte पोर्टल वर स्वतंत्र सूचना दिल्या जातील

निर्बंध असल्याने पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांतील ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल दोन लाख २२ हजार ०२९ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची निवड झाली. राज्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ठाण्यातून सर्वाधिक ९,०८८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.


Online applications were invited for RTE admission from March 3 to 30. As many as two lakh 22 thousand 029 applications were filled by parents for 96 thousand 684 seats in nine thousand 432 schools in the state. Out of which 67 thousand 553 students were selected.

आरटीई प्रवेशासाठी ३ ते ३० मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांतील ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल दोन लाख २२ हजार ०२९ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची निवड झाली.

ऑनलाइन काढलेल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मेसेज पाठवण्यास सुरुवात करण्यात आली. सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३० एप्रिलपर्यंत विभागातील पडताळणी समितीमार्फत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यायचा आहे. ज्या पालकांना एसएमएस येणार नाही त्यांनी https://student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अर्ज क्रमांक टाकून सोडतीची तपासणी करण्याचे आवाहनही पालकांना करण्यात आले आहे.


Under the Right to Education Act (RTE), the RTE for admission to 25 per cent reserved seats in private schools was announced on Wednesday. Students who are eligible for admission will be informed through SMS from 15th April 2021.

RTE प्रवेशाची सोडत जाहीर – खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेश. आरटीई प्रवेशाची सोडत बुधवारी ७ एप्रिल रोजी जाहीर झाली. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना या सोडतीमार्फत खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी आरटीई सोडत बुधवारी जाहीर झाली. येत्या १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.

आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. शिक्षण विभागाने ऑनलाइन सोडतीची प्रक्रिया सुरू केली असून, दोन दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना आरटीईच्या पोर्टलवर जाहीर होतील.

आरईटीई प्रवेश तपशील

 • एकूण शाळा – ९,४३२
 • प्रवेशक्षमता – ९६,६८४
 • एकूण अर्ज – २,२२,०२८

सोडतीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणास्तव पालक बाहेरगावी असतील, तर त्यांनी समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधावा. प्रवेश मिळूनही संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश लॉटरीतून प्रवेश मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे


RTE Admission 2021: In the academic year 2021-22, 450 schools in the district have registered for the RTE admission process. The deadline for admission of eligible students is March 3 to 21.RTE admission schedule has now been announced.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी जिल्ह्यातील ४५० शाळांनी नोंदणी केली या शाळांमधील ४ हजार ५४४ जागांवर पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशसाठी ३ ते २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

आरटीईअंतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत तीन शाळांची वाढ झाली असली तरी आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांमध्ये मात्र १ हजार १३ जागांनी घट झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी गेल्या चार ते पाच वर्षांपासून ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२१ व २०२२ या वर्षाकरिता आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, शाळांची नोंदणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. शाळांच्या नोंदणीनंतर आता आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ३ ते २१ मार्च या कालावधीत पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

 राखीव जागांमध्ये घट 

आरटीई प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना ३ ते २१ मार्च या कालावधीत आरटीईच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यात आरटीईअंतर्गत ४४७ शाळांमध्ये ५ हजार ५५७ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ११ हजार ११८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४ हजार ६६६ विद्या्र्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर ८९१ जागा रिक्त राहिल्या होत्या, तर २०२१-२२ शैक्षणिक वर्ष ४५० शाळांनी नोंदणी केली आहे. मात्र मागील वर्षी प्रवेशप्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने एकूण जागांच्या तुलनेत २५ टक्के राखीव जागांमध्येही घट झाली आहे.

 आवश्यक कागदपत्र 

आरटीई प्रवेशप्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, त्यांच्या प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर निर्माण केलेल्या पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक असेल. लॉटरीत नाव आल्यास ही सर्व कागदपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी लागणार आहे.


RTE Admission Time Table 2021

RTE Admission Time Table 2021: The online admission process is being implemented by the state school education department under the Right to Education Act (RTE). The admission schedule for 96,388 seats in 9,393 schools in the state will be published in the next two to three days. Therefore, the parents of the students who are interested in admission should prepare the necessary documents for admission, an appeal has been made by the Department of Education.

 आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच

पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील ९ हजार ३९३ शाळांमधील ९६ हजार ३८८ जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यातही शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आरटीई प्रवेशाच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित होते. यंदा कोरोनामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी आरटीईच्या प्रवेश क्षमतेत घट झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ९ हजार ३९३ शाळांनी नोंदणी केली असली तरी सुमारे ५० शाळांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. त्यामुळे आरटीईच्या एकूण जागांमध्ये वाढ होऊ शकते.

राज्यात आरटीईचे सर्वाधिक प्रवेश पुणे जिल्ह्यात होतात. मागील वर्षी जिल्ह्यात आरटीईच्या १६ हजार ९५० जागांवर उपलब्ध होत्या. यंदा जिल्ह्यातील जागांची संख्या १४ हजार ५२३ झाली आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. जिल्ह्यातील ९६९ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करून पूर्ण करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू असून ऑनलाइन अर्ज भरून त्याची चाचणी घेतली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

RTE Admission 2021

RTE Admission 2021: Under RTE, 25 per cent students from weaker sections are admitted in private schools every year. This year, online applications can be filled from February 9, 2021. According to the schedule, parents have to apply between February 9 and 26. The lottery for seats will start on March 5. The selected parents have to verify the documents between 9th to 26th March 2021. The waiting list will then be announced. Students on the waiting list will be admitted in four stages.

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, नव्या वर्षासाठी नऊ फेब्रुवारीपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

औरंगाबाद : आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी यंदा एकच सोडत निघणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी पात्रताधारक शाळांना ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पात्रता असूनही नोंदणी न करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

आरटीईअंतर्गत दरवर्षी दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेश दिला जातो. यंदा प्रवेशासाठी नऊ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरता येतील. वेळापत्रकानुसार नऊ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पालकांना अर्ज करायचे आहे. पाच मार्चला जागांची लॉटरी निघेल. अर्ज निवडलेल्या पालकांनी नऊ ते २६ मार्च २०२१ दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर होईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यांत प्रवेश घेता येईल.

यंदा एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी असेल. प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यावरही शाळेत जागा रिक्त असल्यास, अर्ज शिल्लक असल्यास पुन्हा सोडत काढून प्रवेश देण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक द. गो. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

संभाव्य वेळापत्रक

  • – ८ फेब्रुवारी : शाळांची नोंदणी
  • ९ ते २६ फेब्रुवारी : प्रवेश अर्ज भरणे
  • ५ ते ६ मार्च : ऑनलाइन सोडत
  • ९ ते २६ मार्च : प्रवेश निश्चित
  •  २७ मार्च ते ६ एप्रिल : प्रतीक्षा यादी- पहिला टप्पा
  • १२ ते १९ एप्रिल : प्रतीक्षा यादी- दुसरा टप्पा
  • २६ एप्रिल ते ३ मे : प्रतीक्षा यादी- तिसरा टप्पा
  •  १० ते १५ मे : प्रतीक्षा यादी- चौथा टप्पा

सोर्स: सकाळ


RTE Admission 2021

RTE’ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ

RTE Admission 2020-2021: According to the Right to Education Act, students on the waiting list for admission to 25 percent reserved seats in private schools have been given an extension till Thursday (24th). About 45 percent of the students on the waiting list have been admitted so far. The remaining students have been given this extension for admission.

पुणे – शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवार (ता. २४) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील जवळपास ४५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील नऊ हजार ३३१ शाळांमधील एक लाख १५ हजार ४७७ रिक्त जागांवरील प्रवेशासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत नियमित प्रवेश फेरीत ६८ हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या ३६ हजार ४५६ विद्यार्थ्यांपैकी ४५ टक्के म्हणजेच १६ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. प्रतीक्षा यादीतील ५५ टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळावी म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ही मुदतवाढ दिली आहे.


Deadline For RTE Admissions Has Been Extended For The Fourth Time Nashik

RTE Admission 2021: The school education department has extended the deadline for RTE admission of students in the state for the fourth time and the admission process will continue till December 21. There are thousands of vacancies in the state of RTE even in December due to delay in getting documents like income certificate, caste certificate etc. required for admission in Corona period;

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठ महिन्यांपासून ज्ञानमंदिरांना कुलपे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची मात्रा दिली जात आहे. शाळांचे पहिले सत्र संपले असले तरी राज्यात आरटीईचे प्रवेश सुरूच आहेत.

जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी एकूण ४४७ शाळा असून, त्याअंतर्गत पाच हजार ५३७ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी १७ हजार ६३० अर्ज आतापर्यंत आले असून, त्यांपैकी पाच हजार ३०७ जणांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळाला. मात्र त्यातील तीन हजार ६८४ जणांनी आतापर्यंत आरटीईमधून प्रवेश पूर्ण केला आहे. तिसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी मात्र शहराच्या तुलनेत कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.

 ७५ टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण 

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली असून, २१ डिसेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. कोरोनाकाळात प्रवेशासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी कागदपत्रे मिळण्यात दिरंगाई झाल्याने डिसेंबरमध्येही आरटीईच्या राज्यात हजारो जागा रिक्त आहेत.;कोरोनामुळे यंदा प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला. यापूर्वी पडताळणी समितीकडे होणारे प्रवेश शाळास्तरावर पूर्ण करण्यात आल्याने पालकांची सोय झाली. प्रवेशावेळी एकावेळी पालक, विद्यार्थ्यांची होणारी गर्दी कमी झाली. यंदा आरटीई प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत सरासरी ७५ टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण झाले होते. त्यामुळे आगामी काळात चौथी फेरीही काढण्यात यावी, अशी पालक व शिक्षणप्रेमींची मागणी होती.

दर वर्षी आरटीईचे प्रवेश लवकर सुरू केले जातील, असे आश्‍वासन शिक्षण विभागाकडून दिले जाते. मात्र प्रवेशप्रक्रिया वेळेत सुरू होत नाही. यंदा तर तब्बल तीन महिने उशिराने प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. त्यामुळेच यंदा प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी डिसेंबर उजाडला आहे. आगामी काळात शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन करून जूनपूर्वीच विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांनी केली आहे


Students On Waiting List Will Be Able To Get Admission On RTE Reserved Seats

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत तुमच्या पाल्याचे नाव लागले असेल आणि अद्याप प्रवेश मिळाला नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागा शिल्लक असतील, त्या शाळांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.

आर्थिकदृष्टया दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यावर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही अजूनही जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील पण अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता याच प्रक्रियेत आणखी एक संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. प्रतिक्षा यादीत नाव असतानाही अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचा पुढील टप्पा लवकरच जाहीर होणार आहे.


 आरटीई प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत

पुणे – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. 29) प्रवेश घेता येणार आहे.प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रतीक्षा यादीत 24 हजार 980 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील आठ हजार 480 विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्‍चित झाले आहेत. तर आठ हजार 176 विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश झाले आहेत.

 पालकांसाठी सूचना : 
– रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल
– पालकांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून पाहावे
– शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये
– बालकांना शाळेत घेऊन जाऊ नये
– आवश्‍यक मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन जावे
– पोर्टलवरुन हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे

प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची सद्यःस्थिती

जिल्हा : निवड झालेले विद्यार्थी : प्रोव्हिजनल प्रवेश : निश्‍चित प्रवेश
पुणे : 4,765 : 1,885 : 1,624
नगर : 803 : 335 : 368
नाशिक : 1,360 : 480 : 432
सोलापूर : 446 : 212 : 202
ठाणे : 1,912 : 492 : 757
औरंगाबाद : 1,539 : 292 : 395
नागपूर : 1,780 : 756 : 431
कोल्हापूर : 270 : 89 : 128


 अखेर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

आरटीई प्रवेश प्रक्रिया; ८ आॅक्टोबरपर्यंत करता येणार प्रवेशनिश्चिती, पालकांना दिलासा

आरटीई २५ टक्के अंतर्गत पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर अखेर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळाली. १ आॅक्टोबरपासून प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ८ आॅक्टोबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेता येईल. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला.

बालकांचा मोफत व सक्तीच्याशिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी  शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. १७ मार्चला आरटीई प्रवेश प्रक्रियेची आॅनलाइन पहिली सोडत काढण्यात आली. राज्यातील ९,३३१ शाळांमधील  १ लाख १५ हजार ४५५ जागांसाठी २ लाख ९१ हजार ३६८ अर्ज आले होते. पहिल्या सोडतीत १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची निवड झाली. कोरोनाकाळात मुदतवाढीनंतर ६८,२८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. यात पुण्यातून सर्वाधिक ११,०१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल नागपूर ४,५९९, नाशिक ३,६८८, ठाणे ५,६४१, मुंबई ३,१३२ आणि औरंगाबाद येथील ३,०९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले

मुंबई विभागातील पालिका विभागाच्या अखत्यारीतील शाळांमधून २,२४३, उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील शाळांमधून ८८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मुंबईतून निवड झालेल्या ५,३७१ पैकी ५,२२८ विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेशासाठी तारीख दिली होती. यातील ३,१३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अधिक माहितीसाठी पालकांनी  https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या पोर्टलला भेट द्यावी

त्यानंतर आता रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल. पालकांनी आरटीई पोर्टलवर विद्यार्थी अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख पाहावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

शाळेत गर्दी न करण्याच्या सूचना

प्रवेशासाठी शाळेत गर्दी करू नये. प्रवेशादरम्यान बालकांना शाळेत आणू नये. कागदपत्रांच्या मूळ, छायांकित प्रती सोबत असाव्यात. हमीपत्र, अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत न्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने पालकांना केल्या आहेत.


RTE प्रवेशाचा आज अंतिम दिवस

RTE Admission 2020-2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्यामुळे आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला खीळ बसली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देऊनही आरटीईअंतर्गत अपेक्षित प्रवेश होऊ न शकल्याने आता प्रवेशनिश्चितीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज मागवून १७ मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली. दरम्यान, राज्यात आरटीईच्या ९,३३१ शाळांमध्ये एकूण १ लाख १५ हजार ४६० जागा असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ ५३,६८७ जागांवर प्रवेश निश्चित होऊ शकले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी-पालकांसह मूळ गावी स्थलांतरित झाल्यामुळे प्रवेशनिश्चितीसाठी ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेतल्याची महिती आरटीई समन्वयकांनी दिली. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मात्र, यामुळे प्रवेशासाठी आणखी ताटकळत बसावे लागेल.

असे होतील प्रवेश

शाळांनी दिलेल्या तारखांनुसार शाळेत गर्दी होणार नाही, याची काळजी घेऊन पालकांनी विद्यार्थ्यांची प्रवेशनिश्चिती करायची आहे. प्रत्यक्ष शाळेत जाणे शक्य नसल्यास आवश्यक कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलद्वारे शाळांना पाठवून तात्पुरते प्रवेश घेण्याची मुभा आहे. ज्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली नाही, त्या पालकांशी संपर्क साधून प्रवेशनिश्चिती करण्यास सांगण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.

सोर्स: लोकमत


शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने 31ऑगस्ट ही मुदत निश्चित‌ केली आहे ज्या ;विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये शाळा मिळाली आहे, त्यांच्या पालकांना या तारखेपर्यंत शाळेत प्रवेश घ्यायचा आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी यासंबंधी म्हटले आहे, की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत 17 मार्च‌ रोजी काढण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे. त्यांनी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे

पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई-मेलद्वारे, कागदपत्रे शाळेस पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करुन पालकांनी प्रवेश निश्चित करावा. तसेच शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे, त्यातील शाळेत प्रवेशासाठी अद्याप न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करुन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्यात यावी, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे


RTE Nashik Admission 2020-2021

Under the Right to Education Act (RTE), the process of free admission in 25 percent reserved seats in private schools is underway. The deadline for confirmation of admission to the students in the first draw list announced under this is till 31st August. Meanwhile, while there are still a large number of vacancies, the education department should expedite the admission process, otherwise, there is a possibility of academic loss to the students, the parents said.

आरटीई पहिल्‍या सोडतीतील प्रवेशासाठी ३१ पर्यंत मुदत

नाशिक : शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या सोडतीच्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीकरिता ३१ ऑगस्‍टपर्यंत मुदत आहे. दरम्‍यान, अद्याप मोठ्या संख्येने जागा रिक्‍त असताना, शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रियेत जलदगती आणावी, अन्‍यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्‍यता पालकांकडून व्‍यक्‍त केली जाते आहे.

जिल्ह्यातील ४४७ शाळांमध्ये पाच हजार ५५७ जागा उपलब्‍ध असून, प्रवेशासाठी तब्‍बल १७ हजार ६३० अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीत पाच हजार ३०७ बालकांची निवड झाली. त्यांपैकी दोन हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. अद्यापही निम्म्‍याहून अधिक जागा रिक्‍त असून, शाळांची अध्ययन प्रक्रिया मात्र गतिशिल झाली आहे. अशा परिस्‍थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवेशप्रक्रिया गतिशिल होण्याची आवश्‍यकता आहे, अन्‍यथा आटीईंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे पूर्णपणे अध्ययन होऊ शकणार नाही व त्‍यांच्‍या शैक्षणिक कामगिरीवर नकारात्‍मक परिणाम होण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.


RTE Admission 2020-2021: The state government has approved the implementation of the RTE admission process. The process was postponed due to lockdown by Corona. Therefore, the RTE admission process for the academic year 2020-21 is likely to start soon. The Director of Education has directed the parents to complete the admission process with the approval of the verification committee by conducting a preliminary verification of the documents at the school level.

‘आरटीई’प्रवेश लवकरच होणार सुरू

आरटीई’प्रवेश प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. महापालिकेच्या स्तरावर ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. कसे होणार हे प्रवेश… जाणून घ्या.

‘आरटीई’प्रवेश प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.करोनाच्या केलेल्या लॉकडाउनमुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे लवकरच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आरटीईप्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबवताना पालकांनी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावेत,असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम’नुसार खासगी विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यता शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी १७ मार्चला आरटीईची सोडत काढण्यात आली होती. मात्र, करोनाच्या पाश्वभूमीवर प्रवेश प्रक्रियाच बंद करण्यात आली. जाहीर झालेल्या सोडतीत राज्यभरात एक लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली, तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर पडताळणी व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.

RTE Admission 2020-2021

शाळांनी असे द्यावेत प्रवेश

– पोर्टलवर लॉग इन नुसार यादी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावयाचे आहे. गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेने नियोजन करावे. कोणत्या तारखेला बोलवावे हे शाळेने ठरवावे.

– प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर अथवा योग्य त्या ठिकाणी लावण्यात यावे.

– पालकांकडून मूळ कागदपत्रे घेतली जातील. तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरनुसार प्रवेश देत हमीपत्र भरून घ्यावे.

– पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतरित झाले असल्यास संपर्क करून त्यांच्या प्रवेशाचे नियोजन करावे. यासाठी त्यांना तीन संधी द्याव्यात

– शाळेने प्रतीक्षा यादीतील पालकांना सध्या बोलावू नये.

– करोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना निर्बंध शिथिल झाल्यानंतर बोलविण्यात यावे.

– करोनामुळे शाळा प्रशासनाने ताब्यात घेतली असल्यास अशा शाळांनी प्रतिबंधित क्षेत्रातील अटी शिथिल झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करावी.

9 Comments
 1. Atul Wakaskar says

  ज्या प्रारेंट्स लोकांना RTE के फॉर्म भरायचा आहे त्यानी मला संपर्क करावा ऑल महाराष्ट्र call 942188136

 2. Atul Babulal Wakaskar says

  ज्या प्रारेंट्स लोकना RTE के फॉर्म भरायचा आहे त्यानी मला संपर्क करावा ऑल महाराष्ट्र call me 942188136

 3. Atul Babulal Wakaskar says

  जिस किसी की rte के फॉर्म भरना है वो मुझसे संपर्क करें 9421881336 ऑल महाराष्ट्र

 4. अतुल says

  If You Want to Do RTE APPLICATION Or ADMISSION,
  If You Want ANY INFORMATION ALL OVER MAHARASHTRA )
  CONTACT +91-9421881336

 5. अतुल says

  ज्या कुणाला RTE APPLICATION फोम भरायचा असेल तर मला संपर्क करा All महाराष्ट्र 9421881336

 6. अतुल says

  जिस किसी को RTE APPLICATION ऑनलाइन भरना होंगा तो मुझसे बात करे All महाराष्ट्र 9421881336

 7. SACHIN says

  IF YOU WANT TO DO RTE APPLICATION OR ADMISSION,
  IF YOU WANT ANY INFORMATION (SUPPORT FOR ALL OVER MAHARASHTRA )
  CONTACT +91-7350478889…

  Reply

 8. SACHIN says

  IF YOU WANT TO DO RTE APPLICATION OR ADMISSION,
  IF YOU WANT ANY INFORMATION (SUPPORT FOR ALL OVER MAHARASHTRA )CONTACT +91-7350478889

  Reply

 9. Nityanand Shivraj Kumbhar says

  Non selected list मद्ये ज्यांची नावे आहेत ,त्यांचा पुढील फेरी वेळी विचार होऊ शकतो का?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!