Samsung Bharti – Samsung करणार हजारो पदांसाठी मेगा भरती

Samsung Recruitment 2021

Samsung, a South Korean electronics maker, is set to hire 1,000 engineers in India next year. This is a golden opportunity for job seekers for the post of engineer. Samsung will select candidates for the 1,000 positions in the Fields of Electronics, Electrical, Data Management, and Software. Samsung will soon release information regarding this recruitment. Read More details as given below.

Samsung करणार हजारो पदांसाठी मेगा भरती

Samsung Company Bharti 2021-इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करणारी दक्षिण कोरियातील सॅमसंग ही कंपनी पुढील वर्षी भारतात १ हजार इंजिनिअर पदांसाठी मेगा भरती करणार आहे. इंजिनिअर पदासाठी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. हे सर्व इंजिनिअरींगचे उमेदवार आयआयटी आणि इतर प्रमुख इंजिनिअरिंग संस्थांमधून नियुक्त केले जाणार आहे. अशी माहिती कंपनीने जाहीर केली. पुढच्या वर्षी सॅमसंग कंपनी एक हजार पदांसाठी इलेक्टॉनिक, इलेक्ट्रिकल, डेटा मॅनेजमेंट आणि सॉप्टवेअर क्षेत्रातील उमेदवारांची निवड करणार आहे. लवकरचं या भरती संदर्भातील माहिती सॅमसंग कंपनी जाहीर करेल.

सॅमसंग कंपनीने बुधवारी एका निवेदनात म्हटले की, २०२२ मध्ये पदवीधर इंजिनिअर्स तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि क्लाउड डेटा विश्लेषण यासारख्या अत्याधुनिक क्षेत्रात नियुक्त केले जाईल. यासाठी सॅमसंग कंपनी दिल्ली, कानपूर, मुंबई, मद्रास, गुवाहाटी, खडगपूर, BHU, रुरकी आणि इतर नवीन IIT कॅम्पसमधून (बेंगळुरू, नोएडा आणि दिल्ली) सुमारे २६० तरुण इंजिनिअर्सची भरती करेल. या उमेदवारांना प्रोत्साहित करण्यासाठी चांगले वेतने देखील देण्यात येईल.

उर्वरित भरती कंपनी बिट्स पिलानी, IIIT (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) आणि NIT (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सारख्या इतर अभियांत्रिकी संस्थांमधून करेल. सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख (मानव संसाधन) समीर वाधवन म्हणाले की, भारतातील संशोधन आणि विकास (R&D) क्षेत्र गेल्या काही वर्षांत मोठ्याप्रमाणात वाढ होतेय. यासाठी आम्ही १००० हून अधिक इंजिनिअर्स नियुक्त करण्याचे नियोजन करत आहोत.”

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!