डीएड-बीएड धारकांना संधी! राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती; लवकरच राबवणार प्रक्रिया – Shikshak Bharti 2023

Maharashtra Shikshak Bharti 2023 @ https://mahateacherrecruitment.org.in/

Shikshak Bharti 2023 Online Registration – The education department has decided to recruit another 20,000 teachers. Accordingly, the process for recruitment of teachers will be implemented soon and employment opportunities will be available to D.Ed and B.Ed holders. The process of filling up the posts of 13,500 teachers in the state has been going on for the last few days and so far many teachers have been given appointment letters. Accordingly, teachers are being admitted in various schools, yet it has been decided to recruit teachers again as there is a large number of vacant posts of teachers in government schools. It is being said that if teachers are recruited every year, it will help in increasing the number of students in DEd College.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील पाचव्या टप्पाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
ZP भरती 2023 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा
ZP भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या!
महा PWD भरती 2023 ऑनलाईन परीक्षेचे प्रदेशपत्र, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
आरोग्य विभाग २०२३ गट क आणि ड च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
जलसंपदा भरती २०२३ ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

तलाठी भरती 2023 मधील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल

वन विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

डीएड-बीएड धारकांना संधी! राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती; लवकरच राबवणार प्रक्रिया

शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असून डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरण्यात अडचण येत आहे. यामुळे दरवर्षी शिक्षक भरती झाल्यास डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.


https://mahateacherrecruitment.org.in/ Now from 1st September teacher recruitment through Pavitra portal has started. There will be recruitment of 23 thousand posts in Zilla Parishad, municipal and municipal schools and 8 to 10 thousand posts in private aided schools. Candidates have to register on ‘Pavitra’ from 1st to 22nd September. Currently, candidates have to register on ‘Pavitra’ and they have to upload information according to priority, caste and subject. After that, the merit list of the candidates will be published after verifying the documents and marks according to the final point list of the respective Zilla Parishad and the final selections will be made. Candidates Read the complete details of Shikshak Bharti 2023 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

23 हजार शिक्षकांची भरती सुरु! ‘पवित्र’वर नोंदणीसाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदत; ऑक्टोबरअखेर पूर्ण होणार भरती प्रक्रिया

साडेपाच-सहा वर्षांची प्रतीक्षा संपली, आता १ सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये आठ ते दहा हजार पदांची भरती होणार आहे. १ ते 22 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना ‘पवित्र’वर नोंदणी करावी लागणार आहे.

  1. राज्यभरात जिल्हा परिषदांच्या जवळपास ७० हजार शाळा असून त्याअंतर्गत ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक खूपच कमी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नयेत म्हणून ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.
  2. पण, आता त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली असून त्या शाळांना भरतीतून नवीन शिक्षक दिले जाणार आहेत. साधारणत: ऑक्टोबरअखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाल्यावर एकत्रितपणे भरतीला सुरवात होईल.
  3. सध्या ‘पवित्र’वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यात त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील, असे भरतीचे टप्पे आहेत.
  4. ‘खासगी’ची पदे ३ महिन्यानंतर पुन्हा भरता येणार – खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील बिंदुनामावली व संचमान्यतेनुसार जेवढी रिक्त पदे असतील, त्यानुसार त्यांना ‘पवित्र’वर जाहिरात अपलोड करावी लागणार आहे. पण, काही शाळांना आताच्या भरतीत सहभागी होता नाही आले आणि काही दिवसांनी त्यांची पदे रिक्त झाल्यास पुन्हा तीन महिन्यांनी भरतीत सहभागी होता येणार आहे. नवीन बदलानुसार आता खासगी संस्थांमधील शिक्षकांची भरती ‘पवित्र’वरूनच होणार आहे. त्यासाठी तीन उमेदवारांना त्या शाळांवर मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे.
  5. आता जिल्हाअंतर्गत बदली कायमची रद्द – प्रत्येक वर्षी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडून राबविली जाते. आता ही बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. पण, अनेकदा पूर्वीच्या शाळांना पुरेसे शिक्षक होते, पण बदल्यांमुळे तेथे शिक्षक कमी पडतात, असा अनुभव अनेकदा आला आहे. त्यामुळे आता नवीन शिक्षक भरतीवेळी उमेदवारांकडून एकाच शाळेवर कायमस्वरूपी नोकरीसाठी तयार असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. जिल्हाअंतर्गत बदलीची पद्धत आता बंद होणार आहे. तसा प्रस्ताव आहे, पण त्यावर अजून निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • शिक्षक भरतीची स्थिती
    • शासकीय शाळांची पदे – २३०००
    • ‘खासगी अनुदानित’ची पदे – ८ ते १० हजार
    • अंदाजे एकूण पदभरती  – ३३,०००
    • बिंदुनामावली अंतिम जिल्हा परिषदा – १२

How to Registration from Pavitra Portal for Shiskhak Bhati 2023

कशी करायची नोंदणी –

  • सध्या ‘पवित्र’ पोर्टल वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे.
  • त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील; असे भरतीचे टप्पे आहेत.

Online Registration Link

Online Apply for shikshak bharti

 


The Pavitra Portal will be open on Friday (i.e.e 1st September 2023) for the recruitment of teachers and non-teachers. Eligible candidates will be given 15 days to register on the portal, School Education Minister Deepak Kesarkar informed. The school education department has been working on various procedures for the recruitment of teachers for the past few months. Aadhaar verification of 1.4 lakh students is still pending. Therefore, the work of consensus and roster has not been finalized. However, the government says that 9% of the consensus and roster work has been done. In the next two months, 30,000 teachers will be recruited in the first phase, followed by 20,000 teachers in the second phase, Kesarkar said. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

शिक्षक भरती; पवित्र पोर्टल  शुक्रवारी सुरू

शिक्षक व शिक्षकेतर भरतीसाठी येत्या शुक्रवारी (१ सप्टेंबर) पवित्र पोर्टल सुरू करण्यात येईल. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पात्र उमेदवारांनी १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  शिक्षक भरतीसाठी शालेय शिक्षण विभाग मागील काही महिन्यांपासून विविध प्रक्रियेवर काम करीत आहे. अजूनही १४ लाख विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे संचमान्यता व रोस्टरचे काम अंतिम झालेले नाही. मात्र, ९५ टक्के संचमान्यता व रोस्टरचे काम झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पुढील दोन महिन्यांत पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्यात येईल, तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

Online Registration Link


There is important news for teachers in the state. An important update regarding the recruitment of teachers in 13 districts of the state has come out. The Education Department has issued instructions to the Chief Executive Officers of the concerned Zilla Parishads regarding the recruitment of teachers. Also, approval has been given to fill up 80 percent of the vacant posts in the Scheduled Tribes-Pesa sector accordingly. Due to this, teachers will now be recruited in the districts of Dhule, Gadchiroli, Jalgaon, Nanded, Pune, Nagar, Amravati, Chandrapur. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

राज्यातील १३ जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी हाती आहे. राज्यातील १३ जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिक्षण विभागाने शिक्षक भरतीबाबत संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच त्यानुसार त्यानुसार अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, पुणे, नगर, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यात शिक्षक भरती होणार आहे.

  1. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी १३ जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. ‘अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 ‘टक्के रिक्त पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे. अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या जिल्ह्यातील उमदेवारच पात्र असणार आहे. या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे’, अशी सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे.
  2. ‘१ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट-क मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती होत आहे. या भरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  3. या भरतीत ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (टेट) -२०२२’ परीक्षा दिलेल्या ‘एसटी-पेसा’ उमेदवारांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. टेट परीक्षा -२०२२ दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी, असे मांढरे यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
  4. तसेच , या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर निवडीचा पर्याय यापुढे खुला ठेवण्यात यावा, असेही मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

30 thousand teachers will be recruited in the first phase of teacher recruitment. For that, the private institutions have to upload the information of their vacant teacher posts on the portal along with the point list. Later, three candidates will be sent from the state level for one seat in that school. Out of the three institutions have to select one candidate.

As per the Teachers Bharti Time table the advertisement will be uploaded on the portal between 15th to 31st August. Selection of candidates from local government schools will be based on merit list and marks in ‘TET’ and ‘CAIT’ test. For this the interested candidates have to register on the holy portal. After registration between 1st to 15th September, district, caste category, subject priority should be filled in holy portal. Then on October 10, the list of candidates qualified for the interview will be given to the private organizations through the portal. Verification of shortlisted candidates for schools in local bodies will be completed from 11th to 21st October. Candidates selected between 21st to 24th October will be counseled and appointed.

अखेर मुहूर्त सापडला! राज्यात 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती; वेळापत्रक जाहीर

संपूर्ण राज्यातील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. शिक्षक भरतीचे वेळापत्रक झाले. यामुळे अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची आतुरता आता संपणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकभरती आता ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ६४ हजार शिक्षकांची कमतरता आहे. मात्र, शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांना त्यांच्याकडील रिक्त शिक्षकांच्या पदांची माहिती बिंदूनामावलीसह पोर्टलवर अपलोड करावी लागेल. नंतर त्या शाळेत राज्य पातळीवरून एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले जाणार आहेत. तीनपैकी संस्थेला एका उमेदवाराची निवड करावी लागेल. या प्रक्रियेमुळे खासगी संस्थांचा मनमानी कारभार थांबणार आहे.

  • राज्य शासनाचा निवृत्त शिक्षकांना १० ते १२ पटसंख्या असलेल्या शाळांवर नियुक्तीचा निर्णय आहे. ही नियुक्ती शिक्षण सारथी योजनेंतर्गत होईल. निवड झालेल्या निवृत्त शिक्षकाला १० हजार रुपये मानधन दिले जाईल.
  • सारथी योजनेंतर्गत ७० वर्षांपर्यंतचे निवृत्त शिक्षक नियुक्तीसाठी पात्र आहेत. निवृत्त शिक्षकांची नियुक्ती झाल्यास शिक्षक भरतीमधील रिक्त पदांची संख्या कमी होणार असल्याची शक्यता आहे.
  • अशी असणार भरती प्रक्रिया
    • संच मान्यता पूर्ण होताच शिक्षक भरतीला सुरवात होईल. मात्र, त्यापूर्वी बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण होईल. १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान पोर्टलवर जाहिरात अपलोड होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार आणि ‘टेट’ व ‘सीएआयटी’ चाचणीतील गुणांवरून होईल.
    • यासाठी इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झाल्यावर १ ते १५ सप्टेंबरदरम्यान जिल्हा, जात प्रवर्ग, विषयाचा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर भरावे लागेल. त्यानंतर १० ऑक्टोबरला खासगी संस्थांना मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोर्टलद्वारे दिली जाईल.
    • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी निवडलेल्या उमेदवारांची पडताळणी ११ ते २१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान निवड झालेल्या उमेदवाराचे समुपदेशन करून त्यांची नेमणूक होईल.

Online Registration Link

अर्ज कसा दाखल कराल आणि लॉक बद्दल माहिती देणारा व्हिडीओ

अर्ज कसा करावा सूचना


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    30 thousand vacancy filled in this year

  2. Admin says

    Marathi School Shikshak Bharti Details

  3. anand says

    whenever open pavitra portal to filling form and registration for the sanstha

  4. Mangesh raut says

    सर b.ed अॅपियर स्टुडन्ट पवित्र पोर्टल मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो का

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!