जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील शंभर मुख्याध्यापकांची पदे रिक्त – Solapur ZP Teacher Bharti 2023
Solapur ZP Teacher Bharti 2023
Solapur ZP Teacher Bharti 2023
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील शंभर मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत.
Solapur ZP Teachers updates is given here. The posts of 4 Education Extension Officers, 178 out of 199 Center Heads and 100 Headmasters are vacant in the district. These vacancies will be filled by promotion next month, Education Officer Sanjay Javier informed. Teachers’ unions are demanding that these posts be filled by promotion from primary teachers. However, the vacant posts of principals will be filled first by the education department. After that, the posts of Center Head and Extension Officer will be filled by promotion.
- जिल्ह्यात ४ शिक्षण विस्तार अधिकारी, १९९ पैकी १७८ केंद्रप्रमुख आणि शंभर मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे पदोन्नतीने पुढील महिन्यात भरण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली. या जागा प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नतीने भराव्यात यासाठी शिक्षक संघटनांकडून मागणी होत आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून प्रथम मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यात येतील. त्यानंतर केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत.
- अनेक शिक्षक हे सेवानिवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संप, मार्च अखेरमुळे शिक्षकांच्या पदोन्नतीस विलंब होत आहे. परंतु, पुढील महिन्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांच्या रिक्त जागी पदोन्नतीने नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जावीर यांनी सांगितले.
- शिक्षक संघटनांचे आंदोलन – जिल्ह्यात शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे पदोन्नतीने तत्काळ भरावीत, अन्यथा ५ एप्रिलपासून चक्रीउपोषण करण्याचा इशारा गुरुसेवा परिवाराने शिक्षण विभागाला दिला होता. आता एप्रिल महिन्यात भरती होत असल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
अतिरिक्त शिक्षकांची आता ‘DAIT’ व ‘SCERT’वर नेमणूक
Additional teachers are now appointed to ‘DAIT’ and ‘SCERT’ in the state. As per the latest information 540 posts are to be filled from the additional appointed teachers instead of new recruitment in the state. For the last three-four years, the schools did not present those additional teachers, nor did those teachers join there. In this background, the school education department has taken such a decision. Meanwhile, the officials have expressed the belief that the problem of adjustment of additional teachers that arises every year will now be resolved permanently due to the decision of the school education department. Read the more details given below and keep visit us for the further updates.
५४० अतिरिक्त शिक्षकांची डायट, एससीईआरटी व प्रादेशिक विद्या परिषदेत होणार नेमणूक
- सोलापूर : राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (एससीईआरटी) परिषद कार्यालयात विषय सहायक व समुपदेशकांची पदे भरली जाणार आहेत. त्याठिकाणी नव्याने भरती करण्याऐवजी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमधूनच ५४० पदे भरली जाणार आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून त्या अतिरिक्त शिक्षकांना ना शाळांनी हजर करून घेतले ना ते शिक्षक त्याठिकाणी रुजू झाले. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला आहे.
- जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याने राज्यातील जवळपास बाराशे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यातील साडेसहाशेपेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. तरीपण, त्यांना शासनाकडून नियमित दरमहा वेतन दिले जात आहे. हा प्रकार बंद व्हावा म्हणून यापुढे समुपदेशन करून राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांना अशाच पद्धतीने शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विभागांमध्ये नेमले जाणार आहे. वेळप्रसंगी त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून दुसऱ्या जिल्ह्यात देखील पाठविले जाणार आहे.
- दरम्यान, दरवर्षी निर्माण होणारा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा पेच आता शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे कायमस्वरूपी मिटेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणार नाहीत, त्यांची पदे रद्द केली जाणार आहेत. त्यादृष्टीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याने राज्यातील जवळपास बाराशे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.
- त्यातील साडेसहाशेपेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. तरीपण, त्यांना शासनाकडून नियमित दरमहा वेतन दिले जात आहे. हा प्रकार बंद व्हावा म्हणून यापुढे समुपदेशन करून राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांना अशाच पद्धतीने शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विभागांमध्ये नेमले जाणार आहे. वेळप्रसंगी त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून दुसऱ्या जिल्ह्यात देखील पाठविले जाणार आहे.
- दरम्यान, दरवर्षी निर्माण होणारा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा पेच आता शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे कायमस्वरूपी मिटेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणार नाहीत, त्यांची पदे रद्द केली जाणार आहेत. त्यादृष्टीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.
खासगी शाळांमधील १७३ पदे होणार रद्द - पटसंख्येअभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे चार महिन्यांपूर्वी समायोजन प्रक्रिया पार पडली. त्या शिक्षकांना समुपदशेनातून शाळांवर नियुक्ती दिली. पण, काहीजण त्या शाळांवर रुजू झालेच नाहीत, तर काहीजणांना संबंधित शाळांनी सामावून घेतलेले नाही. या पार्श्वभूमीवर शाळांवर हजर न झालेल्या शिक्षकांचे वेतन आता थांबविण्यात आले आहे. दुसरीकडे ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतलेले नाही, त्या खासगी शाळांमधील तब्बल १७३ पदे व्यपगत (रद्द) करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना पाठवला आहे. त्यानुसार आता संबंधित शाळांमधील तेवढी पदे रद्द केली जाणार आहेत.
शिक्षण संचालकांच्या पत्रातील ठळक बाबी…
- शाळेचे नाव, माध्यम, विषय, नेमणूक व सेवानिवृत्तीचे वर्ष अशा २३ मुद्द्यांवर मागविली माहिती
- अतिरिक्त शिक्षकांवर आता विषय सहायक व समुपदेशकाची जबाबदारी
- ५४० अतिरिक्त शिक्षकांची डायट, एससीईआरटी व प्रादेशिक विद्या परिषदेत होणार नेमणूक
- शाळांवर हजर न होणाऱ्या शिक्षकांना आता दुसऱ्या जिल्ह्यात मिळणार समायोजन
Solapur ZP Teacher Recruitment 2023
Solapur ZP Teacher Bharti 2023: As per the latest news regarding Soalapur ZP Shikshak Bharti 2023 is that As many as 178 posts out of 199 center heads are vacant in Solapur Zilla Parishad schools. There are 199 center head posts approved for the district, but as many as 178 posts are vacant. 50% of the total posts are filled by promotion and half of the posts are filled through State Public Service Commission. In the last few years, not a single center head has been received by the district through ‘MPSC. Read More details are given below.
ZP Bharti 2023 – जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ सुरू करण्याचे आदेश
शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे मेटाकुटीला आलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १९९ केंद्रप्रमुखांपैकी तब्बल १७८ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे ९३ शाळांना कामयमचे मुख्याध्यापक सुद्धा नाहीत. गटशिक्षणाधिकाऱ्यांची ११ पैकी तीनच पदे भरलेली आहेत. उपशिक्षणाधिकारी पण नाहीत, अशा स्थितीत जिल्हा परिषद शाळांचा गाडा हाकला जात आहे.
Solapur ZP Shikshak Bharti 2023
- जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खासगी शाळांशी स्पर्धा करताना ‘गुणवत्ता’ हीच प्रमुख बाब पटसंख्या वाढविणारी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे, विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची प्रमुख जबाबदारी केंद्रप्रमुखांवर असते. किमान दहा शाळांची जबाबदारी एका केंद्रप्रमुखावर असते.
- जिल्ह्यासाठी १९९ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत, पण तब्बल १७८ पदांवर केंद्रप्रमुखच नाहीत. एकूण पदांपैकी ५० टक्के पदे पदोन्नतीने व निम्मि पदे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जातात. मागील काही वर्षांत ‘एमपीएससी’च्या माध्यमातून एकही केंद्रप्रमुख जिल्ह्याला मिळालेला नाही. दुसरीकडे पदोन्नती रखडल्याने ७८ शिक्षकांना केंद्रप्रमुखाची संधी मिळालेली नाही. दुसरीकडे ९३ शाळांना मुख्याध्यापकच नाहीत.
- त्यामुळे शिक्षकांकडेच प्रभारी मुख्याध्यापक पद सोपविल्याने त्यांचे कोणीच ऐकत नाही, अशीही स्थिती आहे. आंतरजिल्हा बदलीतून १२० शिक्षक जिल्ह्यात येणे अपेक्षित असतानाही ९० शिक्षक आलेच नाहीत. आपल्याकडील ६० शिक्षक त्यांच्या जिल्ह्यात रुजू झाल्याने रिक्तपदांची संख्या पुन्हा वाढली आहे. शिक्षकांची संख्या कमी झाल्याने पदोन्नतीचा विषय अनेक वर्षांपासून रखडलेलाच आहे. शिक्षक संघटनांनी अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली तरीदेखील पदोन्नतीचा विषय मार्गी लागलेला नाही. आता मार्च महिन्यात पदोन्नतीने पदे भरली जातील, अशी आशा आहे.
शिक्षण’मधील रिक्तपदाचे वास्तव
- शिक्षक- ६३०
- मुख्याध्यापक-९३
- केंद्रप्रमुख-१७८
- गटशिक्षणाधिकारी- ९
- पोषण आहार अधीक्षक-१०
अधीक्षक नसल्याने पोषण आहारात गोंधळ
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत नियमित पोषण आहार दिला जातो. पोषण आहारावर नियंत्रण ठेवून सर्वांना तो व्यवस्थित मिळतो का, याची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी अधीक्षक असावा असा नियम आहे. परंतु, सोलापूर जिल्ह्यात मोहोळ वगळता उर्वरित दहा तालुक्यांना शालेय पोषण आहार अधीक्षकच नाहीत. त्यामुळे कोणाचा कोणाला मेळ नसल्याची स्थिती आहे.
I am intrested
Solapur Teachers Recruitment 2023