Maharashtra SSC Exam : १०वी बोर्ड परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून उपलब्ध

SSC Exam 2022- Admit Card

SSC Exam Admit Card: State Secondary and Higher Secondary Board Class X examination tickets has been available to students from today (18 Feb 2022). The Hall Ticket is available for schools to download from the school’s official website www.mahahsscboard.in from 1 pm on Friday, February 18, 2022 from the school login.

१०वी बोर्ड परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून उपलब्ध

All Important links of 10th Exam 2022

10th Admit Card 2022- www.mahahsscboard.in

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (Mharashtra Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट (SSC Exam 2022 Hall Ticket) विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध होणार आहे. हे हॉलतिकीट शाळांना शुक्रवारी, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in येथून स्कूल लॉगइन मधून डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास शाळांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा आहे.

शाळांसाठी मंडळाच्या अशा आहेत सूचना –

 • ऑनलाइन प्रवेशपत्रे (Hall Ticket)डाऊनलोड करून शाळांनी त्याचे प्रिंट काढून ते विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
 • – प्रवेशपत्रांचे प्रिंट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये.
 • – हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
 • – प्रवेश पत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्याची दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायची आहे.
 • – प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे.
 • – प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत
 • (Duplicate)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे.
 • – फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे

परीक्षेचे वेळापत्रक

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

दहावीच्या च्या परीक्षांचे हॉलतिकीट येथून डाउनलोड करा 

१० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा

१० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना प्रात्य. तोंडी इ. परीक्षा

१० वी परीक्षार्थीसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा 


HSC Exam 2022- Admit Card

HSC Admit Card 2022- www.mahahsscboard.in

12th Board Exam 2022 will be started form 4th March to 30th March 2022. The Hall ticket for the same is available now. Candidates read the below given information and keep visit us for the further details.

12th Exam Hall ticket available now

HSC Exam 2022-Hall Ticket- Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will conduct the Class XII examination Offline. the oral and practical exam will start from 14th February. Admit Car (Hall tickets) of students appearing for Class XII examination will be available on the website of State Board (www.mahahsscboard.in) .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) बुधवारी (दि.९) दुपारी १ वाजता राज्य मंडळाच्या (www.mahahsscboard.in) या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून घेता येतील.

बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 एप्रिल  

बारावीच्या परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकानुसार नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या विरोधानंतरही या परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन पद्धतीनुसारच घेण्यात येतील, असं प्रशासनाने स्पष्ट केलं होत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून या एका प्रसिद्धीपत्रकामार्फत नव्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसारच बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बारावी 

 • तोंडी परीक्षा – 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022
 • लेखी परीक्षा – 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये. हॉल तिकीट मध्ये विषय माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत. तसेच हॉल तिकीट वरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या स्वीकारून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. एखाद्या हॉल तिकीटावर सदोष छायाचित्र असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे

कसं डाऊनलोड करायचं हॉलतिकीट ?

विद्यार्थांना हॉलतिकीट http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर कॉलेज लॉगइन मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. लक्षात घ्या, प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे.

या प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यास कॉलेजांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. हॉलतिकीट देण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

हॉल तिकीट २०२२ डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स

 • १. सर्वप्रथम महा एसएससी बोर्डाची वेबसाइट http://www.mahahsscboard.in उघडा.
 • २. आता अपडेट्स विभागात ‘ डाउनलोड महाराष्ट्र एचएससी हॉल तिकीट २०२२ लिंक’ वर जा.
 • २. त्यानंतर महा एसएससी १०वी हॉल तिकीट २०२२ किंवा महा एचएससी १२वी हॉल तिकीट २०२२ यापैकी निवडा.
 • ३. तुमचा महा एचएससी हॉल तिकीट २०२२ पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर किंवा नाव किंवा नोंदणी क्रमांक जन्मतारीखं टाकून एंटर करा.
 • ४. त्यानंतर महाराष्ट्र बोर्ड हॉल तिकीट २०२२ डाउनलोड करा.

बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट येथून डाउनलोड करा 

मार्च /एप्रिल २०२२ १२वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत (hall ticket)


SSC HSC 2022 Exam – Admit Card

After the Board of Education has decided to conduct the 10th,  12th examinations (ssc-hsc exam) offline, now the preparation for these examinations has started. As the oral and practical exam will start from 14th February, the proceedings were started to make the hall tickets available to the students before that.  Read More details as given below.

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा (ssc-hsc exam) या ऑफलाईन पद्धतीने (offline exam) घेण्याचा ठाम निर्णय मंडळाने घेतल्यानंतर आता या परीक्षांची तयारी सुरू केली आहे. बारावीच्या १४ फेब्रुवारीपासून तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा (Practical exam) सुरू होणार असल्याने त्यापूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांचे हॉलतिकिट (hall ticket) उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (sharad gosavi) यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी परीक्षा या१५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत तर त्यापूर्वी श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन आदी परीक्षा या २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.

बारावीच्या लेखी परीक्षाची सुरूवात ही ४ मार्च रोजी होऊन त्या ३० मार्चपर्यंत चालणार आहेत, तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च कालावधी होणार आहेत या परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांचे हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाकडून तयारी केली जात असून त्यासाठी लवकरच माहिती जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.


5 Comments
 1. Nagesh jaywant mulik says

  Nagesh jaywant mulik

 2. Nagesh jaywant mulik says

  Nagesh jaywant mulik Nagesh mulik. @1518 Com

 3. Nagesh jaywant mulik says

  Nagesh jaywant mulik Nagesh mulik

 4. Swapnilpimpalkar says

  12 th holl ticket

 5. Prajwal says

  Roll nambar

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!