दहावी-बारावी परीक्षांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

SSC HSC Exam 2021 Extension For Applications

SSC HSC Exam 2021: The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has extended the deadline for online registration of students appearing for the 10th and 12th written examinations to be held in April.

दहावी-बारावी परीक्षांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. मात्र त्यानंतर यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेला खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची मुदत वाढवून सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सोमवार २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन दहावी साठी http://form17.mh-ssc.ac.in या लिंकवर, तर बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. मात्र त्यानंतर यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावी व बारावी परीक्षेसाठी अर्जही ऑनलाइन पद्धतीने नियमित व विलंब शुल्कासह स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांमार्फत भरावे. माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांतील प्राचार्य यांनी ऑनलाइन अर्ज भरताना कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सरकारने व विशेषतः आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.


10 वी, 12 वी च्या परिक्षा आॅनलाईन की आॅफलाईन? बोर्डाने केले स्पष्ट

SSC HSC Exam 2021:The written test for 10th and 12th standard conducted by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be held offline. The main reason for this is that the board is not conducive to taking the exam online

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२वीचीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १०वी, १२वीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

 ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत असं बैठकीतील चर्चेत समोर आलं. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे.


Good News For 10 Th Graders Extension To Submit Art Points Proposal

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will conduct the 10th written examination in May this year. Accordingly, the students who have excelled in classical arts, painting and folk art have been given an extension till February 27 to submit proposals to the school for concessional marks.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! गुणांसदर्भात दिलासादायक निर्णय

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीची लेखी परीक्षा ही यंदा मे महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलेत सहभागी होवून प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांसाठी शाळेकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 यापुर्वी कला गुणांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत होती. परंतु देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे विविध स्तरातून विद्यार्थ्यांना प्रस्ताव सादर करण्यात अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कलागुणांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली होती.

 या मागणीची दखल घेत राज्यमंडळाने परीक्षा उशीरा होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत पुर्वी १५ जानेवारीपर्यंत होती. अशी माहिती राज्यमंडळाच्या सचिव पोपटराव महाजन यांनी पत्राद्वारे दिली आहे.

 ललितकला, चित्रकला लोककला खेळ यातील विशेष प्राविण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच ते २५ गुण देण्यात येतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी या अतिरिक्त गुणांचा फायदा घेतात. कला आणि क्रिडा क्षेत्रात प्राविण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांना यंदा मुकावे लागण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदा एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा, क्रिडास्पर्धा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास राज्यमंडळाने मुदत वाढवून दिली आहे.


एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांचा आराखडा कायम

Tenth Twelfth Grade Plan Maintained

Although there was a slight reduction in the syllabus of both the exams, there was no change in the score structure. The schedule of the practical examination will be announced soon. These exams will be the same as before.

मुलांनो लागा तयारीला ; एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांचा आराखडा कायम

 कोरोनामुळे गेल्या वर्षी दहावी- बारावीच्या परीक्षेचे गणित विस्कळित झाले होते. लॉकडाउनच्या काळात पेपर तपासणी करताना राज्य मंडळाला मोठी कसरत करावी लागली होती. दोन्ही परीक्षेच्या अभ्याक्रमात थोडी कपात झाली तरी गुणांच्या आराखड्यात कोणताही बदल झालेला नाही. प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. या परीक्षाही पूर्वीप्रमाणेच होतील.

प्रारंभी ऑनलाईन, नंतर ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू झाल्या. बारावीची परीक्षा दर वर्षी फेब्रुवारीत होते. मार्चमध्ये दहावीच्या परीक्षेस प्रारंभ होतो. या वर्षी दोन्ही परीक्षा पुढे गेल्या आहेत. दरवर्षी डिसेंबरमध्ये दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम पूर्ण होतो.

 मात्र  एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांच्या आराखड्यात कोणताही बदल होणार नसल्याचे विभागीय मंडळाच्या सूत्रांनी आज “सकाळ’ला सांगितले. लेखी परीक्षा 100 गुणांचीच होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

 यावर्षी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये उशिरा सुरू झाली. ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविताना ज्या भागात मोबाईला रेंज नव्हती, तेथे अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुणांकन कमी होईल का, अशी शंका होती. बारावीच्या परीक्षेस 23 एप्रिलपासून, तर दहावीच्या परीक्षेस 29 एप्रिलपासून सुरवात होत आहे. शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्यावर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर सध्या शिक्षक व प्राध्यापकांचा भर आहे. कोल्हापूर विभागातून दहावीच्या परीक्षेस सुमारे दीड लाख विद्यार्थी दरवर्षी सामोरे जातात.

 कोणताही बदल नाही; परीक्षा 100 गुणांचीच होणार 

दहावी, बारावीच्या गुणांच्या आराखड्यात कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणे 100 गुणांची परीक्षा होईल. एकूण अभ्यासक्रमातील 25 टक्के आशय कमी होईल. प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होईल.

देवीदास कुलाळ, प्रभारी सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ


दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासात अडचणी येताहेत? मग ही बातमी वाचाच

  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 426 तज्ज्ञ समुपदेशक आणि 596 विषय तज्ज्ञांची नियुक्‍ती केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहेत. करोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच, अभ्यासक्रमातही कपात केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य पद्धतीने शिक्षण घेता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे.

 तसेच, त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी आणि शंकाचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्‍नोत्तरातून संवाद साधला;जाणार आहे. त्यासाठी ५९६ शिक्षकांची नियुक्‍ती केली आहे. जिल्हानिहाय शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या maa.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Maharashtra SSC  HSC Board Exam And Result Date 2021:

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Maharashtra Ssc Hsc Board Exam And Result Date 2021: The Department of School Education has decided to conduct the SSC (10th) Board Examination from April 29 to May 31, 2021.The written examination for Higher Secondary Certificate 12th will be held from 23rd April 2021 to 29th May 2021. The results of the 12th exam will be announced in the last week of July 2021. The written examination for the certificate examination in secondary schools will be held from April 29, 2021 to May 31, 2021 and the results of the 10th examination will be announced in the last week of August 2021

Ssc, Hsc ExamDate 2021 : एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय.

कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यानं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होतंय. एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. (Maharashtra Ssc Hsc Board Exam And Result Date 2021 )

आता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केलीय. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. 12 वी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल आणि 10 वी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.


SSC HSC Exams 2021: दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच – वर्षा गायकवाड

SSC HSC Board Exams 2021 Will Not Be Held Before May 2021

SSC HSC Exams 2021: दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच – वर्षा गायकवाड

पुढील वर्षी २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेतल्या जाणार नाहीत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली….

SSC HSC Exams 2021: दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच – वर्षा गायकवाड
SSC HSC Exams 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या यंदाच्या परीक्षा मे २०२१ पूर्वी होणार नाहीत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. करोना व्हायरस महामारी स्थितीमुळे परीक्षा मे महिन्याच्या आधी होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.सर्वसाधारणपणे बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात सुरु होते. २०२० मध्येही या परीक्षा नियोजित वेळेतच पार पडल्या होत्या. मात्र दहावीचा केवळ भूगोल विषयाचा पेपर लॉकडाऊनमुळे लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीला उशीर लागून निकाल विलंबाने लागले. दरम्यान, इयत्ता दहावी, बारावीचे चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे वर्ग करोना महामारी स्थितीमुळे ऑनलाइनच सुरू आहेत. परिणामी या परीक्षा कधी होणार, होणार की नाही याबाबत पालक-विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती.

परीक्षांविषयी माहिती देताना गायकवाड म्हणाल्या, ‘करोना विषाणू संसर्गाची सध्याची स्थिती पाहता ही परिस्थिती आणखी काही काळ राहील, असे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही बोर्डाच्या परीक्षा आणि अभ्यासक्रम आदी मुद्द्यांवर चर्चा केली. राज्य मंडळाला मे २०२१ पू्र्वी दहावी, बारावीच्या परीक्षा घेता येणार नाहीत. आम्ही २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.’

दरम्यान, दिवाळीनंतर २३ नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरु करण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!