GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

SSC HSC Re Exam 2020

SSC HSC Re-Exam 2020

SSC-HSC Re-Exam: For students who failed the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education’s 10th-12th exams in February-March, the chances of a re-examination this year are slim. The year of failed students should not be wasted, so for the last few years this examination is conducted in July-August. However, due to the outbreak of corona this year, the chances of this test happening are low

दहावी-बारावी फेरपरीक्षा तत्काळ नाही?

दहावी-बारावी विद्यार्थ्यांवर अनुत्तीर्णचा शिक्का बसू नये दरवर्षी निकाल लागल्यावर तत्काळ फेरपरीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांना वर्ष वाचवण्याची संधी दिली जाते. मात्र यंदा ही परीक्षा तत्काळ होण्याची शक्यता धूसर आहे.

.

SSC-HSC Re-Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यंदा फेरपरीक्षा होण्याची शक्यता धूसर आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून गेल्या काही वर्षांपासून ही परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येते. मात्र, यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे.

दहावी, बारावीत नापास झाल्यास पुन्हा परीक्षा होणार की नाही?

दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, विनोद तावडे शिक्षणमंत्री असतांना, त्यांनी ऑक्टोबरमध्ये होणारी फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जुलै २०१५ पासून फेरपरीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळते. मात्र, यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल दीड महिने उशिरा जाहीर झाला. तर, दहावीचा निकाल जुलै अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातच करोनाचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यात कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये ही परीक्षा घेणे शक्य नाही. यंदा मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात देखील या परीक्षांबाबत उल्लेख नाही. त्यामुळे या परीक्षा पुन्हा ऑक्टोबर होण्याची शक्यता असून, शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने त्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळणार नाही. त्यामुळे यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. याबाबत, मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी याबाबत काहीच सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

जुलैअखेर दहावीचा निकाल

राज्य मंडळाचा साधारण बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर, आठ ते दहा दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होतो. मात्र, यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडले. त्यामुळे दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यत लागण्याची शक्यता आहे, असे मंडळाकडून सांगण्यात आले.

सोर्स:मटा

3 Comments
  1. Anil Bhilawekar says

    मग पेपर काधि घेणार बँक विषयांचे 12 वी वर्ग चा

  2. जाधव says

    तुम्हाला ह्याबद्दल विचार करायला पाहिजे अस वर्ष भर एक दोन विषयासाठी पूर्ण वर्ष घालवायचा का तुम्ही फेरपरीक्षा घ्या नाहीतर पास करुन टाका

  3. Abasaheb says

    Thanks for information.

Leave A Reply

Your email address will not be published.