SVIMS Recruitment 2022

SVIMS Bharti 2022

SVIMS Bharti 2022: Sadhu Vaswani Insitute of Management has issued the notification for the recruitment of Assistant Professor, Librarian, Network Administrator, Receptionist Cum Administration & Peon. There is a total of 05 vacancies to be filled under SVIMS Bharti 2022. All Interested candidates may submit their application form to the given address before 10th May 2022.

SVIMS Recruitment: दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी चालून आली आहे. पुण्यातील साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (Sadhu Vaswani Institute of Management Studies For Girls) येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Sadhu Vaswani Insitute of Management Recruitment 2022 – Notification Details :

  • Department Name :  Sadhu Vaswani Insitute of Management
  • Number of Posts : 05 vacancies
  •  Application Mode : Offline
  • Official Website : http://svims-pune.edu.in/
  • Last Date :  5th May 2022

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), ग्रंथपाल (Librarian), नेटवर्क प्रशासक (Network Administrator), शिपाई (Peon) आणि रिसेप्शनिस्ट सह प्रशासन (Receptionist cum Administration) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे. तसेच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण झालेले असावे. उमेदवाराकडे असिस्टंट प्रोफेसर पदाचा किमान अनुभव असावा.

लायब्ररियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून एमए इन लायब्ररियनपर्यंत शिक्षण घेतलेले असावे. उमेदवाराकडे लायब्ररियन पदाचा किमान अनुभव असावा. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असावी. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन पदाच्या कामाचा किमान अनुभव असावा.

शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावे. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. रिसेप्शनिस्ट कम अॅडमिनिस्ट्रेशन या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. तसेच त्याच्याकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.

पदभरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

उमेदवारांनी आपला अर्ज साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, 6, सातारा – कोरेगाव रोड, सेंट मिराज कॉलेज फॉर गर्ल्सच्या पुढे, संगमवाडी, पुणे, महाराष्ट्र ४११००१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. १० मे २०२२ ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!