Good News: TCS करणार 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती

TCS Jobs 2021

TCS Jobs: Tata Consultancy Services (TCS), India’s largest software services company, is set to hire 1,500 technical staff in the UK by next year. Read More details as given below.

TCS 40000 Vacancies for Fresher

भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) पुढील वर्षापर्यंत ब्रिटनमध्ये 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने बुधवारी सांगितले. ब्रिटनचे व्यापारमंत्री लिझ ट्रस आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन (TCS CEO Rajesh Gopinathan) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

 या बैठकीत दोन्ही पक्षांनी टीसीएसच्या ब्रिटन अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीबरोबरच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, विविध प्रकारची गुंतवणूक, कौशल्य आदींबाबत महत्वपूर्ण चर्चा केली. दरम्यान, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनच्या काही मोठ्या कॉर्पोरेट्सच्या वाढत्या प्रवाहात सहभाग घेऊन आणि नवीन पुढाकार, तसेच विविध सेवांसाठी मदतनीस म्हणून ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठेवण्यात टीसीएस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

 ब्रिटनमधील टीसीएस कामगारांमध्ये 54 देशांचे लोक आहेत, त्यातील 28 टक्के महिला कर्मचारी आहेत. दरम्यान, या आर्थिक वर्ष 2020 च्या अखेरीस कंपनीचे ब्रिटन मार्केटमधून 2.7 अब्ज इतके उत्पन्न घेण्यात आले होते, त्यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर ठळक ठरण्यात टीसीएसचा मोठा वाटा असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.

सोर्स: सकाळ


TCS Eligibility Test Open For All

  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचबरोबर चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या कार्पोरेट इंडस्ट्रीज ना चांगले कर्मचारीही मिळू शकणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन” विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा आहे. त्यामुळे यात सहभागी होणाऱ्या कार्पोरेटसना त्यांच्याकडील नवीन कर्मचारी भरतीसाठी सामाईक परीक्षा म्हणून ही परीक्षा पाहता येणार आहे. TCS National Qualifier Test.

 या परीक्षेसाठी दोन वर्षापर्यंतचा कामाचा अनुभव असलेले युवा कर्मचारी, सध्या शिक्षण घेत असणारेकोणत्याही शाखेतले विद्यार्थी तसेच पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी पात्र असणार आहेत. माहिती तंत्रज्ञान(आयटी), बीएफएसआय, उत्पादन, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रे यातील कंपन्या आणि टीसीएस या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध आहे. या सर्वांसाठी ही सामाईक परीक्षा असणार आहे. विशेष म्हणजे घरी बसून ही परीक्षा देता येणार आहे. आणि ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा नसतील ते नजीकच्या “टीसीएस आयओएन सेंटर” मध्ये जावून परीक्षा देवू शकतात. TCS National Qualifier Tes.

 दर तिमाही ला ही परीक्षा होणार असून यामध्ये तोंडी, संख्यात्मक आणि तर्क क्षमतांच्या आधारवर गुणांकन केले जाणार आहे. उमेदवारांच्या आकलन क्षमतांचे निदर्शक म्हणून हे गुणांकन कार्पोरेटस ना सादर केले जाणार आहेत. TCS National Qualifier Test आपले गुणांकन सुधारण्यासाठी उमेदवार अनेक वेळा परीक्षा देवू शकतात. प्रत्येक तिमाहीत होणाऱ्या परीक्षेतील गुणांकन हे पुढील दोन वर्षांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. परीक्षा २४ त २६ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून १७ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करायची आहे. https://learning.tcsionhub.in/hub/national-qualifire-test/  या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे.

सोर्स: हॅलो महाराष्ट्र


TCS 40000 Vacancies for Fresher

TCS Vacancy 2020: Tata Consultancy Services (TCS) will provide jobs to over 40,000 fresher candidates even during the lockdown and recession. TCS plans to conduct a recruitment process for these 40,000 posts across all campuses across the country. Last year too, the big IT company had created as many jobs. However, TCS has taken this step despite the unfavorable situation this year and the economic downturn in the market.

ऐन आर्थिक मंदी काळात टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीच्या काळातही तब्बल ४० हजार फ्रेशर उमेदवारांना नोकऱ्या देणार आहे. देशभरातली सर्व कॅम्पस मिळून या ४० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्याची टीसीएसची योजना आहे. गेल्या वर्षी देखील या मोठ्या IT कंपनीने इतक्याच नोकऱ्या उपलब्ध केल्या होत्या. मात्र यंदा परिस्थिती अनुकूल नसतानाही, बाजारात आर्थिक मंदी असतानाही टीसीएसने हे पाऊल उचलले आहे.

 

 

यूएस कॅम्पसमधील प्लेसमेंटची संख्याही या वर्षी दुप्पट करून २ हजार इतकी करण्याचा TCS चा प्रस्ताव आहे. टीसीएसचे सीईओ राजोश गोपीनाथन यांनी गेल्या आठवड्यात या नोकऱ्यांसंबधी भाष्य केले. ते म्हणाले, ‘या तिमाहीत कोविड – १९ मुळे मागील तिमाहीपेक्षा कठीण परिस्थिती असेल याचा अंदाज होता. करोनामुळे गेल्या तिमाहीत आम्ही असं जाहीर केलं होतं की फ्रेशर्सची भरती थांबवण्यात येत आहे. मात्र ज्यांना ऑफर लेटर देण्यात आले होते त्यांची भरती होणार आहे.’ मागणीतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता कंपनी हळूहळू रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरूवात करत आहे, असंही गोपीनाथन यांनी सांगितले.

राज्य पोलीस दलात १० हजार पोलिसांची भरती होणार

टीसीएसचे ग्लोबल एचआर प्रमुख मिलिंद लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात नव्याने देण्यात येणाऱ्या नोकऱ्यांची संख्या ३५ हजार किंवा ४५ हजारही असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत व्यवसाय पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. टीसीएसतर्फे अमेरिकेत इंजिनीअरांव्यतिरिक्त टॉप १० बिझनेस स्कूलच्या पदवीधरांनाही सेवेत सामावून घेत आहे. व्यवसायात वाढ करण्यासाठी आणि अमेरिकेत विस्तार करण्यासाठी कंपनीतर्फे नवोदितांबरोबरच अनुभव कर्मचाऱ्यांचीही भरती करणार आहे. लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत कर्मचाऱ्यांची भरती करणे ही बाब आमच्यासाठी नवी राहिलेली नाही. कंपनीने २०१४पासून वीस हजारहून अधिक अमेरिकी व्यक्तींना नोकरी देऊ केली आहे.

गेल्यावर्षीही ४० हजार नोकरभरती

CREDAI Rojgar Melava 2020

टीसीएसने गेल्या वर्षी भारतात कॅम्पसच्या माध्यमातून ४० हजार नोकरभरती केली होती. त्यामध्ये भरती केलेले नवोदित १५ जुलैपासून कंपनीत रूजू होण्यास सुरुवात होईल. कंपनीतर्फे भरती करण्यात आलेल्या ८ हजार ते ११ हजार प्रशिक्षणार्थींचा प्रत्येक आठवड्यात ऑनलाइन मागोवा घेतला जातो. ८ हजारहून अधिक नवोदितांनी रूजू होण्यापूर्वीच दोन डिजिटल सर्टिफिकेशनही पूर्ण केले आहे. या शिवाय कंपनी विविध पदांवर शंभरहून अधिक अनुभवी आणि हुशार कर्मचाऱ्यांची भरती करीत आहे.

3 Comments
  1. Premchand jugaseniye says

    Sir, I am interested

  2. Saurabh narewade says

    Very good

  3. Pravin Karad says

    Thanks

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!