Teachers Recruitment-आता राज्यातील शिक्षकांची भरती MPSCमार्फत करण्याचा प्रस्ताव

Maharashtra Teachers Recruitment 2022

Maharashtra Teacher Recruitment 2022: The recruitment of teachers will be done soon through the Maharashtra Public Service Commission (MPSC) . A proposal in this regard has been submitted to the government by the Commissionerate of Education. Earlier, teachers were recruited through Pavitra Portal. For recruitment of teachers through MPSC, some changes are required in the existing rules. Hence, the ongoing recruitment process will also be completed by the time these changes are processed. Therefore, efforts will be made to recruit the next teacher through MPSC.

Shikshak Bharti -महत्वाचे- राज्यात तब्बल ३७ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त

 

Teachers Recruitment 2022

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

सध्या पवित्र संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र शिक्षकांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Teachers Bharti 2022 through MPSC

 • राज्यात २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत असल्याने २०१९ मध्ये १२ हजार पदांची भरती पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आली.
 • भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. सध्या खासगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची पदे मुलाखतीद्वारे भरण्याचा टप्पा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला.
 • एमपीएससीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की शिक्षकांची भरती एमपीएससीमार्फत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. या प्रस्तावाबाबत शिक्षण सचिव, एमपीएससीचे अध्यक्ष यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
 • मात्र एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती करण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे बदल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रियाही पूर्ण होईल. त्यामुळे पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
 • एमपीएससी ही राज्यातील पदभरती प्रक्रिया राबवण्यातील अनुभवी संस्था आहे. त्याशिवाय ही शासनाचीच संस्था आहे. एमपीएससीकडून पारदर्शक, गुणवत्तापूर्ण पद्धतीने प्रक्रिया राबवली जात असल्याने एमपीएससीची विश्वासार्हता आहे. त्यामुळे एमपीएससीकडून शिक्षक भरती प्रक्रिया राबवल्याचा गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळण्यास मदत होईल, असेही मांढरे यांनी नमूद केले.

शिक्षक भरती एमपीएससीमार्फत राबवल्यास भरती प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त, विना विलंब पार पडेल. एमपीएससीमार्फत शिक्षक भरती राबवण्यासाठी सातत्याने विविध मार्गानी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शासनाने एमपीएससीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेऊन अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा.

–  राहुल कवठेकरअध्यक्षएमपीएससी समन्वय समिती


Beed Shikshak Bharti Update: There are many vacancies for teachers and headmasters in Beed district of  for the last several years. At present, there are a total of 58 vacancies are vacant, 11 for headmasters and 47 for teachers. Due to non-recruitment, the on-duty teachers and other staff have to bear the stress of extra work. Read More details regarding Teachers Recruitment 2022 are given below.

शिक्षक, मुख्याध्यापकांची तब्बल ५८ पदे रिक्त

कोरोनानंतर आता शाळा सुरू झाल्या असून परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. परंतु असे असले तरी देखील शिक्षक, मुख्याध्यापकांची तब्बल ५८ पदे रिक्त असून ज्ञानदान होणार कसे, हा प्रश्न आहे. तर ही पदभरती झालेली नसल्याने कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण मात्र सहन करावा लागत आहे.

अशी आहेत रिक्त पदे- Name of the Posts 

 • मराठी माध्यम मुख्याध्यापक – ०९
 • मराठी माध्यम शिक्षक – ३४
 • उर्दू माध्यम मुख्याध्यापक – ०२
 • उर्दू माध्यम शिक्षक – १३

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये देखील बंदच होती. या परिस्थितीतही ज्ञानदानाचे काम थांबले नाही. परिस्थितीशी दोन हात करत जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा तत्काळ अवलंब करत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केले. परंतु नव्याने आणि प्रथमच असलेल्या या ऑनलाइन पद्धतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. दरम्यान सेवाज्येष्ठतेनुसार दरवर्षी अनेक शिक्षक, मुख्याध्यापक सेवानिवृत्त होतात.

परंतु त्या ठिकाणी रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यासाठी शासनाचे मात्र वेळकाढू धोरण आहे. याचा थेट परिणाम शाळेत कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढून आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानावर होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आजघडीला तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांवर मुख्याध्यापकांची ११ आणि शिक्षकांच्या तब्बल ४७ अशा एकूण ५८ जागा रिक्त आहेत.

२०१२ पासून जिल्हा परिषदेच्या शाळांत तर संस्थांमध्ये २०१७ पासून शिक्षक भरती बंद आहे. वास्तविक पाहता कोरोनानंतर आता शाळा सुरळीत झाल्या असून मराठी व सेमी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले आहेत.

२०१७ पासून भरतीचे पोर्टल बंद

 • तालुक्यात शिक्षक, मुख्याध्यापकांची ५८ पदे रिक्त
 • कोरोनानंतर सुरळीत सुरू झाल्या शाळा
 • शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण

मागील अनेक वर्षांपासून शिक्षक, मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. उपलब्ध मुख्याध्यापक व शिक्षकांद्वारे ज्ञानदानाचे काम होत आहे. विद्यार्थी संख्या यावर्षी वाढली असून जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे.


The School Education Department of the Punjab Government has made a big announcement regarding the recruitment of pre-primary teacher posts. As per the information, this teacher recruitment will be for a total of 8,393 posts. The school education department has also issued an official notification in this regard. Meanwhile, aspiring candidates are allowed to apply till 11th Oct 2021.

Shikshak Bharti – राज्यातील शिक्षक पदांसाठी मुलाखतीसह भरती प्रक्रिया सुरू

सरकारी शाळांमध्ये शिक्षक बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना त्यांचं स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध झालीय. पंजाब सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं  पूर्व प्राथमिक शिक्षक पदांच्या भरतीसंदर्भात एक मोठी घोषणा केलीय. माहितीनुसार, ही शिक्षक भरती एकूण 8,393 पदांसाठी होईल. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागानं अधिकृत अधिसूचनाही जारी केलीय. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आलीय. दरम्यान, अद्याप अर्ज प्रक्रियेची अधिकृत लिंक उपलब्ध झाली नसली, तरी ती लवकरच अर्जदारांसाठी उपलब्ध होणार असल्याचे कळतेय. याबाबतच्या अधिक माहितीसाठी उमेदवार शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटलाही भेट देऊ शकतात.

Shikshak Bharti- राज्यात ६ हजारहून अधिक प्राध्यापकांची पदे भरली जाणार

शैक्षणिक पात्रता- Eligibility Criteria for ERBP Recruitment 2021

 • : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 45% गुणांसह मान्यताप्राप्त मंडळाकडून उच्च माध्यमिक (12 वी) किंवा इतर समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • तसेच, उमेदवाराने भारत सरकारच्या मान्यताप्राप्त नर्सरी टीचर एजुकेशनमध्ये (NCTE) डिप्लोमा केला असावा.
 • याशिवाय, उमेदवाराने दहावीत पंजाबी विषयाचा अभ्यासही केलेला असावा.

वयोमर्यादा : 

 • पूर्व प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2020 पासून मोजले जाईल.
 • तसेच उमेदवाराचे किमान वय 21 आणि कमाल वय 35 वर्षे असावे.
 • शासकीय नियमानुसार, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत दिली जाईल.

अर्जासाठी आवश्यक फी :Application Fees

 • या पदांकरिता अर्ज करण्यासाठी सामान्य वर्ग आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 1000 रुपये अर्ज फी भरावी लागेल.
 • याशिवाय, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
 • माजी सैनिकांसाठी हा अर्ज विनामूल्य ठेवण्यात आलाय.

 


Teachers Professor Bharti 2021: The recruitment of professors in the state has been stalled for the last several years. However, professors will be recruited soon, said Higher and Technical Education Minister Uday Samant

राज्यात लवकरच होणार प्राध्यापकांची भरती

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची भरती रखडली आहे.  मात्र येत्या काळात लवकरच प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. नांदेडमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  (Professor Recruitment In Maharashtra Start Soon Announce Uday Samant)

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षक भरती रखडली आहे. ही भरती लवकर करावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. यासाठी अनेक आंदोलनही करण्यात आली. पण याबाबतचा कोणतीही प्रक्रिया झाली नाही. पण नुकतंच उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.

येत्या काळात लवकरच प्राध्यापकांची भरती करणार असल्याचे वक्तव्य उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी केलं.  मंत्र्यांच्या या घोषणेमुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.

15 तारखेपासून महाविद्यालये सुरु

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होतील. याबाबत उदय सामंत यांनी 1 फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढवा घेतला होता.. त्यावेळी विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतीगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता 15 तारखेपासून महाविद्यालये सुरु होतील.

1 Comment
 1. G.m. Gujar says

  35 years only what’s jokes yaha padhai karne me umra bit jati he our enhone 35 ki condition rakkhi he.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!