डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पर्याय काय? Teachers Recruitment 2023

Teachers Recruitment 2023 B.Ed

Teachers Recruitment 2023 -डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय…!

To become a teacher in Zilla Parishad schools and other schools, it will be mandatory to take a four-year BEd degree after class XII. Specially, there will be specialization in BEd education as well. The central government has started the implementation of new educational policies. Even after that, the state is now implementing the new educational policies. More details about the Teachers Recruitment 2023 read the below given content and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला. केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेतला आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Other Important Recruitment  

सिंधुदुर्ग तलाठी भरती 2023 करीता मदत कक्ष (हेल्प डेस्क) लवकरच तलाठी भरतीला सुरुवात
पवित्र पाेर्टलवर ६ हजार ९१९ उमेदवारांना पुन्हा भरावे लागणारत
वित्त विभागात कनिष्ठ लेखापाल पदाच्या १३०१ जागा रिक्त

जिल्हा परिषद १८,९३९ पदांच्या भरतीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

राज्यातील झेडपी भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर; वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या

महापारेषण येथे सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागा रिक्त

जून-जुलैमध्ये शिक्षक भरती! ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम; कशी होणार भरती

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांच्या भरतीचा नवीन अपडेट

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Shikshak Bharti -महत्वाचे- राज्यात तब्बल 18 हजार शिक्षकांची पदे रिक्त

Teachers Recruitment 2023 B.Ed Candidates

 1. आता जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इयत्ता बारावीनंतर चार वर्षांची बीएड पदवी घेणं अनिवार्य राहणार आहे. विशेष म्हणजे बीएडच्या शिक्षणातही स्पेशलायजेशन असणार आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीस सुरुवात केलीय. त्यानंतरही राज्यात आता नव्या शैक्षणिक धोरणांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 2. नव्या शैक्षणिक धोरणांनुसार, आता बीएड बंद होणार आहे. तसेच पीजी केलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षात डीएड करता येणार आहे. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी बीएडचं शिक्षण असेल. तर बारावीनंतर ही डीग्री मिळवण्यासाठी चार वर्षांचं शिक्षण घ्यावं लागेल. विशेष म्हणजे कोणत्या विषयाचं शिक्षक व्हायचं यावरुन विषय निवड असेल.
 3. डीएडने एक काळ चांगलाच गाजवला – एक काळ होता जो डीएडने चांगलाच गाजवलाय. डीएड करुन शिक्षक व्हायचं असा एक ट्रेंड काही वर्षांपूर्वी होता. पण सगळेच विद्यार्थी करिअरसाठी सरसकट डीएड निवडू लागले. त्यामुळे पुढे डीएड करणाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम पडला. नोकऱ्या मिळत नव्हत्या. अनेक विद्यार्थी त्यामुळे नैराश्यात गेले. अनेकांनी त्यातून टोकाचे निर्णय घेतले. तर काहींनी बीएड करुन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. काहींना नोकरी मिळाली तर काहींना नाही मिळाली. त्यामुळे काहींनी इतर क्षेत्राचा अभ्यास केला आणि नोकरी मिळवली. काहीजण पुन्हा शेतीकडे वळले, आपल्या वडिलांना शेतात मदत करु लागले तर काही जण व्यवसायात गुंतले.
 4. या सगळ्या दरम्यान डीएड आणि बीएडच्या शिक्षणात अनेक बदल झाले. 90च्या काळात दहावीनंतर डीएड करता यायचं. पण शिक्षणात बदल होत गेले, साक्षर वर्ग वाढत गेला. त्यानंतर 1996 साली आलेल्या शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारने दहावीनंतरचं डीएडचं शिक्षण बंद केलं. बारावीनंतर डीएडचं शिक्षण सुरु केलं. त्यानंतर आता सरकारने डीएडचं शिक्षणच बंद केलं आहे. शिक्षक व्हायचं असेल तर आता त्यासाठी पदवीच लागेल, अशी अट ठेवली आहे. शिक्षक बनण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शर्यती पाहता किती विद्यार्थी बीएडकडे वळतात हा चिंतनाचा विषय असला तरी पण आज ज्यांनी डीएड केलंय त्यांचं काय? ज्या विद्यार्थ्यांनी डीएड करुन नोकरी मिळवण्याचा विचार केलेला त्यांना आता बीएड करणं अनिवार्य राहील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

Maharashtra Teachers Recruitment 2022

Maharashtra Teacher Bharti 2022: Good News for Teachers, The state government has decided to conduct TET exam twice a year. Education department has decided to conduct CET again. CET exam was conducted for 15 thousand posts by education department. The education department has decided to re-conduct the CET exam in February 2023 for the remaining seats.

शिक्षण विभागातर्फे 15 हजार पदांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित जागांसाठी फेब्रुवारी 2023 मध्ये पुन्हा सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे जे विद्यार्थी अत्यंत कमी गुणांनी सीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना शिक्षक भरतीसाठी आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे

शिक्षक भरतीसाठी आणखी एक संधी; पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय

15 हजार पदांसाठी 54 हजार 342 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली. जरी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी सरकारी नियमावली, जिल्हानिहाय राखीवता, जातीय आरक्षण या सर्वांमुळे 15 हजारपैकी 3 हजार पदे रिक्त राहण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या जागा भरून घेण्यासाठी पुन्हा सीईटी परीक्षा घ्यावी लागणार आहे. मागील वेळेला 10 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार पदे रिक्त राहिली होती.

त्यामुळे यावेळीही अशीच पदे रिक्त राहणार असल्याने शिक्षण विभागाने पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात दोन वेळा शिक्षक भरतीसाठी सीईटी घेण्याचा पर्याय निवडला जात आहे. यामुळे जे परीक्षार्थी अत्यंत कमी गुणांनी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना ही परीक्षा सोयीची ठरणार आहे.

 टीईटीच्या धर्तीवर सीईटी… 

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे गरजेचे असते. यासाठी राज्य सरकारने वर्षातून 2 वेळा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर सीईटी परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.


Teachers Recruitment 2023: The recruitment of teachers in the state will now be done through the Maharashtra Public Service Commission. The next recruitment will be done according to the new system. Teacher recruitment through MPSC will be done soon. Read More details regarding Teachers Bharti 2022 are given below.

 गेल्या काही महिन्यांपासून पवित्र पोर्टल व शासनाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या धर्तीवर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.

 • मात्र शिक्षकांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
 • राज्यात २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त आहेत. शिक्षक भरतीची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत असल्याने २०१९ मध्ये १२ हजार पदांची भरती पवित्र संकेत स्थळामार्फत सुरू करण्यात आली.
 • भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. सध्या खासगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची पदे मुलाखतीद्वारे भरण्याचा टप्पा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.
 • एमपीएससीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यामार्फत शिक्षकांची भरती एमपीएससीमार्फत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. या प्रस्तावाबाबत शिक्षण सचिव, एमपीएससीचे अध्यक्ष यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
 • मात्र एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती करण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे बदल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रियाही पूर्ण होईल. त्यामुळे पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

Maharashtra Teacher Recruitment 2022: The recruitment of teachers will be done soon through the Maharashtra Public Service Commission (MPSC) . A proposal in this regard has been submitted to the government by the Commissionerate of Education. Earlier, teachers were recruited through Pavitra Portal. For recruitment of teachers through MPSC, some changes are required in the existing rules. Hence, the ongoing recruitment process will also be completed by the time these changes are processed. Therefore, efforts will be made to recruit the next teacher through MPSC.

Shikshak Bharti -महत्वाचे- राज्यात तब्बल ३७ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त

Teachers Recruitment 2022

सध्या पवित्र संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र शिक्षकांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Teachers Bharti 2022 through MPSC

 • राज्यात २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत असल्याने २०१९ मध्ये १२ हजार पदांची भरती पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आली.
 • भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. सध्या खासगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची पदे मुलाखतीद्वारे भरण्याचा टप्पा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला.
 • एमपीएससीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की शिक्षकांची भरती एमपीएससीमार्फत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. या प्रस्तावाबाबत शिक्षण सचिव, एमपीएससीचे अध्यक्ष यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
 • मात्र एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती करण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे बदल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रियाही पूर्ण होईल. त्यामुळे पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
 • एमपीएससी ही राज्यातील पदभरती प्रक्रिया राबवण्यातील अनुभवी संस्था आहे. त्याशिवाय ही शासनाचीच संस्था आहे. एमपीएससीकडून पारदर्शक, गुणवत्तापूर्ण पद्धतीने प्रक्रिया राबवली जात असल्याने एमपीएससीची विश्वासार्हता आहे. त्यामुळे एमपीएससीकडून शिक्षक भरती प्रक्रिया राबवल्याचा गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळण्यास मदत होईल, असेही मांढरे यांनी नमूद केले.

शिक्षक भरती एमपीएससीमार्फत राबवल्यास भरती प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त, विना विलंब पार पडेल. एमपीएससीमार्फत शिक्षक भरती राबवण्यासाठी सातत्याने विविध मार्गानी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शासनाने एमपीएससीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेऊन अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा.

–  राहुल कवठेकरअध्यक्षएमपीएससी समन्वय समिती


Beed Shikshak Bharti Update: There are many vacancies for teachers and headmasters in Beed district of  for the last several years. At present, there are a total of 58 vacancies are vacant, 11 for headmasters and 47 for teachers. Due to non-recruitment, the on-duty teachers and other staff have to bear the stress of extra work. Read More details regarding Teachers Recruitment 2022 are given below.

शिक्षक, मुख्याध्यापकांची तब्बल ५८ पदे रिक्त

कोरोनानंतर आता शाळा सुरू झाल्या असून परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. परंतु असे असले तरी देखील शिक्षक, मुख्याध्यापकांची तब्बल ५८ पदे रिक्त असून ज्ञानदान होणार कसे, हा प्रश्न आहे. तर ही पदभरती झालेली नसल्याने कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण मात्र सहन करावा लागत आहे.

अशी आहेत रिक्त पदे- Name of the Posts 

 • मराठी माध्यम मुख्याध्यापक – ०९
 • मराठी माध्यम शिक्षक – ३४
 • उर्दू माध्यम मुख्याध्यापक – ०२
 • उर्दू माध्यम शिक्षक – १३

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये देखील बंदच होती. या परिस्थितीतही ज्ञानदानाचे काम थांबले नाही. परिस्थितीशी दोन हात करत जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा तत्काळ अवलंब करत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केले. परंतु नव्याने आणि प्रथमच असलेल्या या ऑनलाइन पद्धतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. दरम्यान सेवाज्येष्ठतेनुसार दरवर्षी अनेक शिक्षक, मुख्याध्यापक सेवानिवृत्त होतात.

परंतु त्या ठिकाणी रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यासाठी शासनाचे मात्र वेळकाढू धोरण आहे. याचा थेट परिणाम शाळेत कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढून आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानावर होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आजघडीला तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांवर मुख्याध्यापकांची ११ आणि शिक्षकांच्या तब्बल ४७ अशा एकूण ५८ जागा रिक्त आहेत.

२०१२ पासून जिल्हा परिषदेच्या शाळांत तर संस्थांमध्ये २०१७ पासून शिक्षक भरती बंद आहे. वास्तविक पाहता कोरोनानंतर आता शाळा सुरळीत झाल्या असून मराठी व सेमी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले आहेत.

२०१७ पासून भरतीचे पोर्टल बंद

 • तालुक्यात शिक्षक, मुख्याध्यापकांची ५८ पदे रिक्त
 • कोरोनानंतर सुरळीत सुरू झाल्या शाळा
 • शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण

मागील अनेक वर्षांपासून शिक्षक, मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. उपलब्ध मुख्याध्यापक व शिक्षकांद्वारे ज्ञानदानाचे काम होत आहे. विद्यार्थी संख्या यावर्षी वाढली असून जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे.


The School Education Department of the Punjab Government has made a big announcement regarding the recruitment of pre-primary teacher posts. As per the information, this teacher recruitment will be for a total of 8,393 posts. The school education department has also issued an official notification in this regard. Meanwhile, aspiring candidates are allowed to apply till 11th Oct 2021.

Shikshak Bharti – राज्यातील शिक्षक पदांसाठी मुलाखतीसह भरती प्रक्रिया सुरू

सरकारी शाळांमध्ये शिक्षक बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना त्यांचं स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध झालीय. पंजाब सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं  पूर्व प्राथमिक शिक्षक पदांच्या भरतीसंदर्भात एक मोठी घोषणा केलीय. माहितीनुसार, ही शिक्षक भरती एकूण 8,393 पदांसाठी होईल. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागानं अधिकृत अधिसूचनाही जारी केलीय. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आलीय. दरम्यान, अद्याप अर्ज प्रक्रियेची अधिकृत लिंक उपलब्ध झाली नसली, तरी ती लवकरच अर्जदारांसाठी उपलब्ध होणार असल्याचे कळतेय. याबाबतच्या अधिक माहितीसाठी उमेदवार शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटलाही भेट देऊ शकतात.

Shikshak Bharti- राज्यात ६ हजारहून अधिक प्राध्यापकांची पदे भरली जाणार

शैक्षणिक पात्रता- Eligibility Criteria for ERBP Recruitment 2021

 • : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 45% गुणांसह मान्यताप्राप्त मंडळाकडून उच्च माध्यमिक (12 वी) किंवा इतर समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • तसेच, उमेदवाराने भारत सरकारच्या मान्यताप्राप्त नर्सरी टीचर एजुकेशनमध्ये (NCTE) डिप्लोमा केला असावा.
 • याशिवाय, उमेदवाराने दहावीत पंजाबी विषयाचा अभ्यासही केलेला असावा.

वयोमर्यादा : 

 • पूर्व प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2020 पासून मोजले जाईल.
 • तसेच उमेदवाराचे किमान वय 21 आणि कमाल वय 35 वर्षे असावे.
 • शासकीय नियमानुसार, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत दिली जाईल.

अर्जासाठी आवश्यक फी :Application Fees

 • या पदांकरिता अर्ज करण्यासाठी सामान्य वर्ग आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 1000 रुपये अर्ज फी भरावी लागेल.
 • याशिवाय, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
 • माजी सैनिकांसाठी हा अर्ज विनामूल्य ठेवण्यात आलाय.

 


Teachers Professor Bharti 2021: The recruitment of professors in the state has been stalled for the last several years. However, professors will be recruited soon, said Higher and Technical Education Minister Uday Samant

राज्यात लवकरच होणार प्राध्यापकांची भरती

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची भरती रखडली आहे.  मात्र येत्या काळात लवकरच प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. नांदेडमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  (Professor Recruitment In Maharashtra Start Soon Announce Uday Samant)

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षक भरती रखडली आहे. ही भरती लवकर करावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. यासाठी अनेक आंदोलनही करण्यात आली. पण याबाबतचा कोणतीही प्रक्रिया झाली नाही. पण नुकतंच उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.

येत्या काळात लवकरच प्राध्यापकांची भरती करणार असल्याचे वक्तव्य उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी केलं.  मंत्र्यांच्या या घोषणेमुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.

15 तारखेपासून महाविद्यालये सुरु

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होतील. याबाबत उदय सामंत यांनी 1 फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढवा घेतला होता.. त्यावेळी विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतीगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता 15 तारखेपासून महाविद्यालये सुरु होतील.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Anand says

  Muje job chahiye

 2. G.m. Gujar says

  35 years only what’s jokes yaha padhai karne me umra bit jati he our enhone 35 ki condition rakkhi he.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!