UGC-NET 2020 परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की २०२० जारी

UGC Net Answer Key 2020

यूजीसी नेट परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की २०२० एनटीएने जारी केली आहे…

UGC NET Provisional Answer Key 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की २०२० जारी केली आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या संकेतस्थळावर ही उत्तरतालिका गुरुवारी जारी करण्यात आली. ज्या उमेदवारांनी एनटीए यूजीसी नेट २०२० परीक्षा दिली आहे त्यांनी अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जाऊन उत्तरतालिका पाहावी.

ही उत्तरतालिका पाहता येईल आणि डाऊनलोड देखील करता येईल. UGC NET Answer Key 2020 सोबतच एनटीएने या उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवण्याची लिंकही सक्रीय केली आहे. ही लिंक ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत अॅक्टिव्ह असणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक तसेच उत्तरतालिकेची लिंकही देण्यात येत आहे. २४ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत NET च्या ५५ विषयांच्या परीक्षा झाल्या. या सर्व प्रश्नपत्रिकांच्या तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर करण्यात आल्या आहेत.

UGC NET 2020 Answer Key कशी डाऊनलोड करायची?

पुढील पद्धतीने UGC NET 2020 Answer Key डाऊनलोड करता येईल –

– यूजीसी नेटचे अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जावे
– होमपेजवर ‘View Question Paper/ Answer Key Challenge’ या पर्यायावर क्लिक करावे.
– तुमचा UGC-NET अॅप्लिकेशन नं., जन्मतारीख, सिक्युरिटी पिन टाकावी.
– लॉगइन केल्यावर view / download या पर्यायवर क्लिक करत हव्या त्या ऑपशनवर जावे. येथे उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका असे अनेक पर्याय असतील.
– उत्तरतालिकेबाबत काही हरकत असेल तर तीही नोंदवावी. त्यासाठीची लिंकही देण्यात आलेली आहे.

UGC NET 2020 उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


UGC NET Exam 2020

UGC NET Admit Card Download : UGC NET 2020 Admit Card Update: विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय पात्रता परीक्षा २०२० (UGC NET 2020) साठी अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी यूजीसी नेटच्या अधिकृत संकेतस्थळावर ugcnet.nta.ac.in वर अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते, ते आता एनटीए यूजीसी नेटच्या वेबसाइटद्वारे आपलं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक देखील या वृत्तात दिली जात आहे. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून अगदी सहजपणे तुम्ही यूजीसी नेट २०२० अॅडमिट कार्ड मिळवू शकता

कधी होणार परीक्षा?

यूजीसी नेटची सामान्यपणे जून महिन्यात होणारी ही परीक्षा आहे, जी यावर्षी नोव्हेंबर मध्ये घेण्यात येत आहे. करोना विषाणू महामारीमुळे अनेकदा स्थगित झाल्यानंतर एनटीएद्वारे या परीक्षेचं आयोजन होत आहे. ही परीक्षा ४,५,११, १२ आणि १३ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.

कोणत्याही उमेदवाराला कोणत्या तारखेत अथवा सत्रात उपस्थित व्हायचे आहे, याची संपूर्ण माहिती अॅडमिट कार्डमध्ये देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही अन्य तारीख वा सत्रात तुम्ही परीक्षा देऊ शकणार नाही

प्रवेशपत्र डाउनलोड 


It has been decided to postpone the UGC’s National Eligibility Test. The Indian Council of Agricultural Research (ICAR) exam and the UGC exam were clashing as they were coming at the same time. So the UGC net has been put on hold.

UGC-NET परीक्षा लांबणीवर!!

UGC Net New Exam Details : UGC-NET परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे…

UGC Net New Exam Details : यूजीसीची नॅशनल एलिजिबीलिटी टेस्ट लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च (ICAR) परीक्षा आणि यूजीसी नीट परीक्षा एकाच वेळी येत असल्याने एकमेकांशी क्लॅश होत होत्या. त्यामुळे यूजीसी नेट लांबणीवर टाकण्यात आली आहे.

यूजीसी नेट परीक्षा १६ सप्टेंबर पासून सुरू होणार होती. ही परीक्षा १६ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. पण आता ती २४ सप्टेंबर नंतरच होईल.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ICAR परीक्षांचे आयोजन १६,१७,२२ आणि २३ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. त्यामुळे यूजीसी-नेट परीक्षा आता २४ सप्टेंबरनंतरज होतील,’ अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरिष्ठ संचालक साधना पराशर यांनी दिली. ‘काही विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत. त्यामुळे एक परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली,’ असंही त्या म्हणाल्या. यूजीसी नेटचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असंही पराशर यांनी सांगितलं.

जून २०२० मधील अनेक परीक्षा कोविड – १९ मुळे लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अनेक परीक्षांचे सुधारित वेळापत्रक ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात जारी केलं आहे.

सोर्स : म. टा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!