‘केंद्रीय सशस्त्र पोलिस दल’ जुन्या पेंशन योजनेवर महत्वाचा निर्णय – CAPF Bharti 2023

CAPF Recruitment 2023 - Vacancy, Notification, Pay Scale & Online Apply

Old Pension CAPF updates – The Delhi High Court, in its 11th January 2-23 judgment on implementation of old pension in paramilitary forces, had said that the old pension scheme should be implemented in CAPF within 8 weeks. This time given by the court was over till Holi Festival. The central government did not approach the Supreme Court against the decision of the High Court, but sought an extension of 12 weeks from the court. The important point was that the central government in its arguments submitted to the High Court did not mention any implementation of the old pension scheme in 12 weeks. He asked for this time only to think. It means that during this time, the central government can go to the Supreme Court against the decision of the Delhi High Court or find another legal way. The central government had reserved all rights in this regard in the petition filed in the high court. Candidates Kindly Read the complete details given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सुप्रिम कोर्टाचा निमलष्करी दलांना धक्का, जुन्या पेंशन योजनेवर महत्वाचा निर्णय

‘केंद्रीय सशस्त्र पोलिस दल’ या केंद्रीय निमलष्करी दलातील लाखो जवानांचे जुनी पेंशन योजना लागू होण्याचं स्वप्न भंग झालं आहे. यावर्षी ११ जानेवारीला केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये जुनी पेंशन योजना लागू करण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने जो मोठा निर्णय दिला होता. त्यावर केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टोकडून फेब्रुवारी,२०२४ पर्यंत स्थगितीचे आदेश दिले आहेत. सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश संजीव खन्ना आणि न्यायाधिश बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हे स्थगितीचे आदेश दिले आहेत.सुप्रिम कोर्टात केंद्र सरकारची बाजू सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडली. याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं होतं की भारतीय निमलष्करी दल ‘भारतीय संघाचे सशस्त्र दल’आहेत. न्यायालयाने केंद्रीय निमलष्करी दलातून नवी पेंशन योजना काढून टाकण्याचे मत मांडलं होतं. या दलांत आज भरती झालेला, आधी भरती झालेला किंवा येणाऱ्या काळात भरती होणारा जवान किंवा अधिकारी जुन्या पेंशन योजनेच्या कक्षेत येईल, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

काय होता दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल?

  • दिल्ली उच्च न्यायालयाने निमलष्करी दलांमध्ये जुनी पेंशन लागू करण्यावर ११ जानेवारीला दिलेल्या निर्णयात म्हटलं होतं की सीएपीफमध्ये आठ आठवड्यांच्या आत जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी. न्यायालयाने दिलेला हा वेळ होळीपर्यंत संपला होता. केंद्र सरकार उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर सुप्रिम कोर्टात तर नाही गेलं, पण त्यांनी न्यायालयाकडून १२ आठवड्यांचा वाढीव वेळ मागितला.
  • यात महत्वाची गोष्ट ही होती की केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या युक्तीवादात १२ आठवड्यात जुनी पेंशन योजना लागू करण्याचा कोणताही उल्लेख केला नाही. त्यांनी हा वेळ फक्त विचार करण्यासाठी मागितला होता.
  • म्हणजेचं या वेळेत केंद्र सरकार दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात देखील जाऊ शकतं किंवा दुसरा कायदेशीर मार्ग देखील शोधू शकतात. केंद्र सरकराने उच्च न्यायालयात केलेले याचिकेत याबद्दलचे सर्व अधिकार आपल्याकडे सुरक्षित ठेवले होते.

लष्करी दलांमधील सर्व नियम इकडे लागू होतात

  • सीएपीफचे जवान आणि अधिकाऱ्यांचं मत आहे की, निमलष्करी दलांमध्ये लष्कराचे सर्व नियम आणि कायदे लागू केले जातात. केंद्र सरकारने स्वत: मान्य केलंय की निमलष्करी भारतीय लष्कराचा भाग आहे. त्यांना भत्ते देखील सशस्त्र बलाच्या आधारावर दिले जातात. या दलांमध्ये कोर्ट मार्शल करण्याची देखील तरतूद आहे.
  • याबाबतीत सरकार दुतोंडी भूमिका घेत आहे. जर या दलातील जवानांना सिव्हिलियन मानत असतील तर बाकीच्या गोष्टी आर्मीच्या अनुषंगाने का? या दलांना शपथ देण्यात येते की त्यांना जल, थल आणि वायु जिकडे कुठे पाठवण्यात येईल, त्या ठिकाणी ते काम करतील.

UPSC CAPF Bharti 2023 : Union Public Service Commission (UPSC) has issued the notification for the recruitment of “Assistant Commandants (AC) in the Central Armed Police Force (CAPF) including the BSF, CRPF, CISF, ITBP, SSB, etc. “ Posts. There are total 322 vacancies available for this posts in UPSC CAPF. All the eligible and interested candidates can apply online for the UPSC Assistant Commandant Bharti 2023 from the website upsc.gov.in starting from  starting from April 26, 2023. The last date for online application is the 10th of May 2023.  Candidates Read the complete details given below on this page regarding the UPSC CAPF Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

संघ लोकसेवा आयोग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “BSF, CRPF, CISF, ITBP, SSB सह केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) मध्ये असिस्टंट कमांडंट (AC)” पदांच्या एकूण 322 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मे 2023 या  तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

UPSC CAPF Recruitment 2023 Notification

Here we give the complete details of Union Public Service Commission (UPSC) Recruitment  2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

UPSC CAPF Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Union Public Service Commission (UPSC)
????Number of Vacancies :  322 Vacancies
????Name of Post :  Assistant Commandant (AC)
????Job Location :  All India
????Pay-Scale Rs. 56100- 177500/- (Pay Band: 3)
????Application Mode :  Online
????Age Criteria :  20 to 25 year

Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2023 Vacancy Details

1. Assistant Commandant (AC) 322 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

UPSC Vacancy 2023-Eligibility Criteria for above posts 

1.  Assistant Commandant (AC) A candidate must hold a Bachelor’s degree from a University incorporated by an Act of the Central or State Legislature in India or other educational institutions established by an Act of Parliament or declared to be deemed as a University under Section-3 of the University Grants Commission Act, 1956 or possess an equivalent qualification.

How to Apply for UPSC CAPF Bharti 2023

  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • Also, applicants need to upload their scan copy of their photograph & signature as per the required scale
  • Before registering/applying online, candidates are advised to go through Detailed Instructions

⏰ All Important Dates of UPSC Vacancy 2023

⏰ Last  Date
10th of May 2023.

Important Link of UPSC CAPF Recruitment 2023

????OFFICIAL WEBSITE
????APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT


There is a big news for the candidates who have applied for the CAPF Constable Exam 2023. The Union Home Ministry has approved the conduct of Constable (General Duty) examination in 13 regional languages besides Hindi and English for recruitment to the Central Paramilitary Force (CRPF). This historic decision was taken on the initiative of Home and Cooperation Minister Amit Shah to increase participation of local youth in CAPF and promote regional languages. Now CAPF recruitment exam question paper will be set in Assamese, Bengali, Gujarati, Marathi, Malayalam, Kannada, Tamil, Telugu, Odia, Urdu, Punjabi, Manipuri and Konkani language besides Hindi and English. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी बातमी! आता CAPF भरती परीक्षा होणार मराठीतून; गृहमंत्रालयाचा निर्णय

CAPF कॉन्स्टेबल परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलात (CRPF) भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आता CAPF भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत सेट केली जाईल.

  1. गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेतून परीक्षेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, 1 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल.
  2. गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापर आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.
  3. उल्लेखनीय आहे की तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केंद्रीय राखीव पोलीस दल भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते. स्टॅलिन यांनी या भरती परीक्षेत ‘बेसिक हिंदी अंडरस्टँडिंग’साठी ठेवलेल्या 25 टक्के गुणांची तक्रार केली होती. स्टॅलिन म्हणाले होते की, तमिळसोबत इतर प्रादेशिक भाषांनाही त्यात ठेवायला हवे. स्टॅलिन म्हणाले की, यामुळे तामिळनाडूतील तरुणांची सीएरपीएफ नोकरीसाठी निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे. स्टॅलिन यांनी अमित शहांना सांगितले की, उमेदवारांना तमिळ आणि इतर भाषांमध्येही परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी.

CAPF Recruitment 2023 For 83000 Posts

CAPF Recruitment 2023 Notification & Vacancy Details are here. Union Minister of Home Affair Nityanand Rai told in the Rajya Sabha that more than 83,000 posts of gazetted officers and other employees are lying vacant in the paramilitary forces. Recruitment in CAPF is being done in mission mode to fill these vacancies. He said that the plan is to complete this recruitment process in 2023. The Minister said that due to the large number of vacancies, the existing CAPF personnel are overworked to meet the urgent demands. Further he said that the Vacancies will be filled soon through various examinations conducted for recruitment by UPSC and SSC and AFCAT and other examinations conducted by various other forces. Read the more details regarding this below on this page and keep visit on our website www.govnokri.in also follow us on What-App group and Telegram Channel. Thanks…!

निमलष्करी दलात ८३ हजारांहून अधिक पदे रिक्त, जाणून घ्या भरती कधी होणार?

CAPF निमलष्करी दलात राजपत्रित अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या 83,000 हून अधिक पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी गृह मंत्रालयाने (MHA) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्सच्या सर्व महासंचालकांना त्यांच्या दलातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा तपशील देण्यास सांगितले आहे. जेणेकरून ही रिक्त पदे लवकरात लवकर भरता येतील.

या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले की, रिक्त पदे भरण्यासाठी CAPF मध्ये भरती मिशन मोडमध्ये केली जात आहे. 2023 मध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री म्हणाले की मोठ्या संख्येने रिक्त पदांमुळे, विद्यमान CAPF कर्मचारी तातडीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जास्त काम करतात. UPSC आणि SSC आणि AFCAT द्वारे भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांद्वारे आणि इतर विविध दलांद्वारे घेण्यात येणाऱ्या इतर परीक्षांद्वारे रिक्त पदे लवकरच भरली जातील, असेही ते म्हणाले. गृह मंत्रालयाने बीएसएफला 2023 च्या रिक्त वर्षासाठी आयपीएस कोट्यातून डीआयजी दर्जाच्या अधिका-यांची 15 पदे तात्पुरत्या स्वरूपात बीएसएफच्या कॅडर अधिकार्‍यांकडे वळवण्यासाठी पत्र पाठवले आहे.

Vacancy Details of CAPF Recruitment 2023

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गृह मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP), सशस्त्राचे डी.जी. सीमा यांना गेल्या आठवड्यात याबाबत कळवण्यात आले होते निमलष्करी दलात सुमारे ८३,१२७ पदे रिक्त आहेत. या पदांमध्ये राजपत्रित अधिकारी, अधिनस्त अधिकारी यांसह इतर अनेक पदे रिक्त आहेत.

कुठे किती पदे रिक्त आहेत

  1. CRPF – २९,२८३ पदे
  2. BSF – १९,९८७ पदे
  3. CISF – १९,४७५ पदे
  4. SSB – ८,२७३ पदे
  5. ITBP – ४,४४३ पदे





UPSC CAPF Recruitment 2023

CAPF Recruitment 2022: Important updates regarding Indian Armed Force is that About one and a half lakh posts are vacant in Indian armed forces. Mega recruitment is going to take place in the Central Armed Police Force (CAPF) in the coming days. Read More details about CAPF Bharti 2022/UPSC CAPF Recruitment 2022 are given below.

बदलत्या युद्धनीतीनुसार भारतीय सशस्त्र दलांमध्ये तांत्रिक, आधुनिक प्रणाली, शस्त्रास्त्र अशा अनेक अत्याधुनिक गोष्टींचा समावेश करण्यात येत आहे. जागतिक पातळीवर सशस्त्र दलांची ताकद वाढविण्यासाठी लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. असे असले तरी मनुष्यबळाची स्थिती पाहता सशस्त्र दलांमध्ये सुमारे दीड लाख पदे रिक्त असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे.

एकीकडे सशस्त्र दलांमध्ये तरुणांना दाखल करण्यासाठी ‘अग्निपथ’सारखी योजना राबविण्यात येत असून महिलांना देखील आता एनडीए, आरआयएमसी सारख्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्याची संधी मिळत आहे. सशस्त्र दलांमध्ये प्रवेशासाठी अनेक योजना तसेच प्रवेश परिक्षा, प्रक्रियांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी लाखोंच्या संख्येने तरुण-तरुणी अर्ज करतात. परंतु पात्रता निकषांच्या आधारावर केवळ काहींची निवड सशस्त्र दलांमध्ये होते. परिणामी अधिकारी, जवान यांची मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे सैन्यदलात असून तिन्ही दलांमध्ये एकूण एक लाख पदे रिक्त आहेत. सशस्त्र दलांमध्ये अधिकारी, जवान यांची संख्या, रिक्त पदे, पदे भरण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांची संख्या, तसेच यासाठी सरकारने उचललेली पावले या संदर्भातील माहिती नुकतीच लोकसभेत संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लेखी उत्तरात दिली.

सशस्त्रदलातील भरती प्रक्रिया ही तिन्ही दलांच्या गरजेनुसार पार पडते. सशस्त्र दलातील सर्व रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. रिक्त पदांना भरण्यासाठी सरकारद्वारे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये करिअर मेळावे, प्रदर्शने, लष्करातील विविध संधींबाबत तरुणांमध्ये जागृकता निर्माण करणे, संरक्षण क्षेत्रातील फायदे तसेच, सशस्त्र दलातील नोकरी आकर्षक करण्यासाठी पदोन्नतीच्या संधींमध्ये सुधारणा अशा वेगवेगळ्या माध्यमातून पदे भरण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, असे ही भट्ट यांनी नमूद केले.

अग्निपथ’चा फायदा होऊ शकतो ?

कोरोनामुळे भरती प्रक्रिया देखील रखडल्या होत्या. त्यामुळे रिक्त पदांची संख्या ही जवळपास दीड लाखांच्या घरात आहे. केवळ जवानांच्या रिक्त पदांना पाहिलं तर तो आकडा अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांच्या तुलनेत मोठा आहे. वर्षातून दोन वेळा भरती प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियांना वेळ लागतो. तसेच दरवर्षी ४५ ते ५० हजार जवान निवृत्त होतात. त्यामुळे त्या रिक्त जागा आणि आता असलेली रिक्त पदे भरण्यासाठी किमान सात वर्षांचा कालावधी लागू शकतो. अग्निपथ योजने अंतर्गत दरवर्षी किती अग्निवीरांची निवड केली जाईल, ही माहिती देण्यात आली नाही. याची माहिती मिळाल्यास पुढील पाच वर्षांत किती जागा भरल्या जाऊ शकतात याबाबत स्पष्टपणे समजेल. असे संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त) यांनी सांगितले.

रिक्त पदांची कारणे

– अधिकाऱ्यांच्या तुलनेत जवानांच्या रिक्त पदांची संख्या जास्त

– मागील दोन वर्षांत कोरोनामुळे भरती प्रक्रिया झाली नाही

– दरवर्षी सुमारे ५० हजार जवान सेवानिवृत्त होतात

तिन्ही दलांमधील रिक्त संख्या

  • सैन्यदल – ११६४६४
  • नौदल – १३५९७
  • हवाईदल – ५२१७

विविध पदांसाठी इतक्या जागा भरण्याची मंजुरी

१) सैन्यदल –

  • अधिकारी – ५६९७२
  • नर्सिंग अधिकारी – ४३९६
  • जेसीओ/जवान – १२४१७६८

२) नौदल –

  • अधिकारी – ११८२१
  • सेलर – ७५८६६

३) हवाईदल –

  • अधिकारी – १२७४५
  • एअरमेन – १५६३६२

UPSC CAPF Bharti 2022: As per the latest update regarding CAPF Bharti 2022, Mega recruitment is going to take place in the Central Armed Police Force (CAPF) in the coming days. Currently there are 84,405 vacancies in CAPF and the government has planned to fill all these posts by 2023. The number of sanctioned posts in Armed Police Force is 10,05,779, out of which 84,405 posts are vacant. All these vacant posts are to be filled by December 2023. Read More details about CAPF Recruitment are given below.

सशस्त्र दलात 84000 हून अधिक पदांवर मेगाभरती

CAPF Recruitment 2022:  गृह राज्यमंत्री (MoS) नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत माहिती दिली की सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये (CAPFs) विद्यमान 84,405 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप खासदार अनिल अग्रवाल यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पुढे म्हणाले की, कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ची 25,271 पदे भरण्यासाठी यापूर्वीच परीक्षा घेण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

—–बल——-                   मंजूर पद        रिक्त
आसाम रायफल्स                 65520       9659
बीएसएफ                          265277     19254
CISF                               164124      10918
CRPF                             324654      29985
ITBP                                88430        3187
SSB                                   97774      11402
एकूण पोस्ट                       1005779   84405

  • संसदेत सरकारने माहिती दिली की, 6 केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये एकूण 84,405 पदे रिक्त आहेत, त्यापैकी केंद्रीय राखीव पोलिस दलात सर्वाधिक 29,985 पदे आहेत. बुधवारी सरकारकडून राज्यसभेत ही माहिती देण्यात आली आहे.
  • केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी देखील सांगितले की, सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत CAPF मध्ये सध्याची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
  • राज्यमंत्री उघड केलेल्या डेटानुसार, CAPF मध्ये एकूण 84,405 ज्यापैकी आसाम रायफल्स (9,659), सीमा सुरक्षा दल (19,254), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (10,918), केंद्रीय राखीव पोलीस दल (29,985), तिबेटी सीमा पोलीस(3,187) आणि आणि सशस्त्र सीमा बल (11,402) यांचा समावेश आहेतथापि, आसाम रायफल्स, बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी आणि एसएसबी या दलांची एकत्रित मंजूर संख्या 10,05,779 आहे.
  • राय पुढे म्हणाले की, सरकारने CAPF मधील रिक्त पदे वेगाने भरण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी वार्षिक भरतीची एक प्रक्रिया आहे, ज्यासाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) सोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.राय म्हणाले की, कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), सब-इन्स्पेक्टर (GD) किंवा सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) आणि असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) या पदांवर भरतीसाठी प्रत्येकी एक-एक नोडल दीर्घ काळासाठी समन्वय साधण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
  • ते म्हणाले की, सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्सना नॉन-जनरल ड्युटी कॅडरमधील रिक्त पदांवर कालबद्ध पद्धतीने भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    CAPF Recruitment 2023 – Vacancy, Notification, Pay Scale & Online Apply

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!